पोर्टलवरील कर्जमाफीची रक्कमच अंतिम; शेतकऱ्यांनी संभ्रम बाळगू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले. आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन. नांदेड : राज्य शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026” अंतर्गत गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या याद्यांमधील थकबाकीची रक्कम आणि योजनेच्या पोर्टलवरील रक्कम यात तफावत आढळल्यास शेतकऱ्यांनी कोणताही संभ्रम न बाळगता पोर्टलवर दर्शविलेली रक्कमच अंतिम व ग्राह्य मानावी, असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. तसेच पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (e-KYC) आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी प्राधान्याने पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे व विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्य शासनाने 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुरू केलेल्या या योजनेत कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना (OTS) आणि प्रोत्साहनपर लाभ या तीन घटकांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 24 हजार कर्जखाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून 99 हजार पात्र खाती प्राप्त झाली आहेत. त्यापैकी 32 हजार खात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून उर्वरित लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. व्यापारी बँकांमधील एनपीए खातेदार शेतकऱ्यांच्या गावपातळीवरील याद्यांतील थकबाकी आणि पोर्टलवरील रक्कम यामध्ये फरक असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले की, पोर्टलवरील थकबाकी ही 31 मार्च 2026 पर्यंतची असून तीच ग्राह्य आहे. शासनाने 1 जुलै 2026 रोजी सर्व बँकांना 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज आकारू नये असे निर्देश दिले असून सर्व बँकांनी त्यास लेखी संमती दिली आहे. शेतकऱ्यांनी पोर्टलवरील रक्कम मान्य असल्यास त्वरित आधार प्रमाणीकरण करावे. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या पावतीमध्ये मंजूर कर्जमुक्तीची रक्कम नमूद असेल. त्यानंतर संबंधित लाभाची रक्कम डीबीटीद्वारे थेट कर्ज खात्यात जमा करण्यात येईल. कर्जमुक्ती पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कर्ज बेबाकी प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित बँक शाखा आणि विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये प्रसिद्ध केल्या जातील. पोर्टलवरील रक्कम किंवा कर्जाच्या तपशीलाबाबत आक्षेप असल्यास शेतकऱ्यांनी योजनेच्या पोर्टलवर ‘ग्रिव्हन्स’ (Grievance) नोंदवावी. या तक्रारींचे निराकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी आपले सरकार सेवा केंद्रेही सक्रिय करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना संबंधित बँकांमार्फत खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविणार; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची नांदेड जिल्ह्यात प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांची माहिती, पात्रता पडताळणी, बँकांशी समन्वय तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भात काटेकोर नियोजन करण्यात आले असून कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासन दक्षता घेणार आहे.1
- भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत नांदेड शहरात ५ ऑगस्ट रोजी शेतकरी मेळावा नांदेड - भारतीय किसान युनियनच्या वतीने बुधवार ५ ऑगस्ट सकाळी ११ वाजता शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम, नांदेड येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या मार्गदर्शन होणार असून राकेश टिकैत हे कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या शेतीमाल व्यापार करार (टैरिफ ट्रेड डील) धोरणामुळे भारतीय शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांवर सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेश च्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला रामचंद्र येईलवाड, शिवाजी पाटील पारवेकर, मोहन पाटील शिरसाटउमरेकर,नांदेडचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार देवकत्ते, जयवंतराव रुंजे, जगदीश जाधव आदींची उपस्थिती होती.1
- डिजिटल अटक (Digital Arrest) – फसवणूक... सावधान! फसवणूक डिजिटल अटक (Digital Arrest) – फसवणूक... सावधान! 📞 जर कोणी स्वतःला पोलीस, CBI, ED किंवा इतर सरकारी अधिकारी सांगून फोन किंवा व्हिडिओ कॉलवर तुम्हाला "डिजिटल अटक" झाल्याचे सांगत असेल, तर तो नक्कीच सायबर फसवणुकीचा प्रयत्न आहे. ⚠️ लक्षात ठेवा: ✅ कोणताही सरकारी अधिकारी फोनवरून अटक करत नाही. ✅ OTP, PIN, पासवर्ड किंवा बँक तपशील कधीही शेअर करू नका. ✅ घाबरून पैसे ट्रान्सफर करू नका. ✅ संशयास्पद कॉल त्वरित बंद करा. ✅ सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाइनवर संपर्क साधा किंवा वर तक्रार नोंदवा. 🛡️ सतर्क नागरिकच सायबर गुन्हेगारांवर सर्वात मोठे शस्त्र आहेत. माहितीपूर्ण राहा, सुरक्षित राहा! #DigitalArrest #CyberFraud #CyberCrime #CyberSafety #NandedPolice #MaharashtraPolice #StopCyberFraud #OnlineSafety #CyberAwareness #Dial1930 #CyberCrimeHelpline #ThinkBeforeYouTrust #StayAlert #SafeDigitalIndia #ALMBharat #NNLMarathi1
- ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.2
- नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले. त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.1
- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा येथे समाधान शिबिर; दिवंगत नेते अजितदादा पवार यांना अभिवादन लोहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमित्त लोहा येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आयोजित समाधान शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तसेच स्थानिक प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नागरिकांशी संवाद साधत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, असे निर्देश दिले. तसेच नागरिकांनीही आपल्या समस्या मांडून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या शिबिरास विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले.1
- किनवट तालुक्यात मागील तीन दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाले व ओढ्याला पूर आला असून अनेक गावामध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. याच अनुषंगाने पिंपळगाव सी येथील श्रीमती कमलाबाई गुलाब गुरनुले (विधवा) मु पो पिंपळगाव सि (फाटा) ता किनवट जि नांदेड यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना रडू कोसळले, शासनाने तात्काळ मदत करावी ही अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.1