माळी समाजाच्या विकासासाठी ‘संत सावता महाराज आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करा माळी समाजाच्या विकासासाठी ‘संत सावता महाराज आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करा सावता महासंघाच्या वर्धापन दिन सोहळ्यात सरकारकडे एकमुखी मागणी; राज्यभरातून एक लाख सह्यांची मोहीम माळी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी ‘श्री संत सावता महाराज आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करण्यात यावे, अशी एकमुखी मागणी सावता महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली. जालना शहरातील राजारामनगर येथील सावता भवन येथे सावता महासंघाचा वर्धापन दिन कार्यक्रम तसेच पदाधिकारी सभा उत्साहात पार पडली. यावेळी माळी समाजाच्या विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार करण्यात आला. येत्या काळात महामंडळाच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, राज्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांना टप्प्याटप्प्याने निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच या मागणीला व्यापक जनसमर्थन मिळावे यासाठी महाराष्ट्रातील माळी समाज बांधव व भगिनींच्या एक लाख सह्या घेण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. “माळी समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक प्रगतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ आवश्यक आहे. ही मागणी शासन दरबारी मंजूर होईपर्यंत संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करू,” असा विश्वास सावता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष (अण्णा) डोंगरखोस व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.या उपक्रमासाठी समाजातील सर्व मान्यवर, पदाधिकारी व समाजबांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. *चौकट* _________________________ “माळी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी स्वतंत्र ‘श्री संत सावता महाराज आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन होणे अत्यंत गरजेचे आहे. या मागणीसाठी सावता महासंघाच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. समाजाच्या विकासासाठी ही मागणी मंजूर होईपर्यंत संघटितपणे प्रयत्न सुरू ठेवणार असून, महाराष्ट्रातील समाजबांधवांनी या उपक्रमाला एकजुटीने सहकार्य करावे.” — श्री संतोष (अण्णा) डोंगरखोस संस्थापक अध्यक्ष, सावता महासंघ महाराष्ट्र राज्य _________________________

- जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे सावळदबारा येथे उत्साहात आगमन जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे सावळदबारा येथे उत्साहात आगमन सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे यंदाच्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून, जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे उत्साहपूर्ण वातावरणात आगमन करण्यात आले. गणरायाच्या आगमनावेळी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच गावातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशमूर्तीचे आगमन झाल्यानंतर मंडळाच्या वतीने विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाचे स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण नप्ते, तर उपाध्यक्षपदी संदीप आप्पा काळे यांची जबाबदारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सदस्य गणेशोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहेत. गणेशोत्सव काळात दररोज सकाळी व सायंकाळी आरतीचे आयोजन करण्यात येते. आरतीच्या वेळी गावातील मोठ्या संख्येने भाविक भक्त तसेच गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित राहून भक्तिभावाने गणरायाची आरती करतात. आरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते. गणरायाच्या दर्शनासाठी परिसरातील नागरिकांचीही मोठी गर्दी होत असून, संपूर्ण उत्सव काळात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने सावळदबारा परिसर भक्तिमय झाला आहे. मंडळाच्या उपक्रमांना गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शांतता व सलोखा राखत गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.1
- बोरगाव सारवणीत राज्यमंत्री दर्जा प्राप्त मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांचा भव्य नागरी सत्कार | AQS NEWS इनामूल उलूम उर्दू हायस्कूलच्या नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन; मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांची उपस्थिती | AQS NEWS1
- माजी मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोड शहरात तरुणांच्या रोजगारासाठी पैठणी उद्योग सुरू करणार कापसे पैठणी कंपनीला भेट सिल्लोड सोयगाव मतदार संघातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी येवला येथील कापसे पैठणी उद्योग येथे भेट देत पैठणी उद्योगाची माहिती घेतली1
- चाँद के पास चमक रहा था एक बेहद तेज़ रोशनी वाला “तारा” लेकिन असली राज़ जानकर आप भी हैरान रह जाएंगे...1
- भोकरदन शहरात शहीद स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी मांडला ठराव माजी सैनिकांच्या मागणीला मिळाला न्याय भोकरदन इसरारखान पठाण भोकरदन नगर परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत तालुक्यातील शहीद जवानांच्या स्मृतीला उजाळा देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. माजी सैनिकांच्या मागणीला मान देऊन भोकरदन शहरात ‘शहीद स्मारक’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. हा महत्त्वपूर्ण ठराव नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी सभागृहात मांडला. सभेदरम्यान हातात ठरावाची प्रत घेऊन उभे राहत रणवीर सिंग देशमुख यांनी भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, आपल्या देशाकरता जे जवान शहीद होतात... त्या शहिदांकरता आपल्या तालुक्यात कुठंही स्मारक नाही. नगरपालिकेच्या ठिकाणी पैसा आहे, तर तो आपल्या काळात आपण सर्वांनी हात वर करून हा ठराव मंजूर करावा. रणवीरसिंग देशमुख यांनी मांडलेल्या या ठरावाला उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवकांनी तत्काळ पाठिंबा दर्शवला. नगराध्यक्षा सौ. समरीन नाज बेग वसीम मिर्झा आणि उपनगराध्यक्षा सौ. सुरेखाताई जाधव यांनी ठरावाला संमती देत हा निर्णय एकमताने पारित केला. या ठरावाचे अनुमोदक म्हणून कदीर बापू यांचे नाव जाहीर करण्यात आले. ठराव मंजूर झाल्यानंतर बोलताना नगरसेवक रणवीर सिंग देशमुख म्हणाले, आज भोकरदन नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मी तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्या विनंतीला मान देऊन भोकरदन शहरात शहीद स्मारक व्हावे याकरिता या सभेत जागा मागणीचा ठराव मांडला. उपस्थित सर्व सदस्य, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा यांनी सर्व संमतीने ठराव मंजूर केला. अनुमोदक म्हणून कदीर बापू सह सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. सभेच्या व्हिडिओमध्ये दिसते की, नगरसेवक रणवीर सिंग देशमुख कागदपत्र हातात घेऊन ठरावाचे वाचन करत आहेत. सभागृहात नगरसेवक पांढऱ्या वेशात बसलेले असून, अधिकारी वर्ग समोर टेबलवर उपस्थित आहे. ठराव मांडल्यानंतर सर्व सदस्यांनी हात वर करून एकमताने संमती दर्शवली हा ठराव मंजूर झाल्याने आता नगर परिषद प्रशासनाकडून शहीद स्मारकासाठी योग्य जागेची निवड, आराखडा व निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. भोकरदन तालुक्यातून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जतन करण्यासाठी हे स्मारक प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास माजी सैनिक संघटना व नागरिकांनी व्यक्त केला आहे. तालुक्यात आतापर्यंत शहीद जवानांसाठी स्वतंत्र स्मारक नसल्याची खंत अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी उचललेल्या या पावलामुळे शहीद कुटुंबीयांच्या भावनांचा सन्मान झाला असून, येणाऱ्या पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळणार आहे. स्मारकाच्या कामास लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती नगर परिषद सूत्रांनी दिली.1
- मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे यांची प्रतिक्रिया मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे. यांची प्रतिक्रिया1
- श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन... श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन...1
- कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त*....... * कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त* -------------------------- -:बदनापूर पोलिसांची कारवाई बदनापूर शहरातील SBI बँकेतून दिनांक 04/09/2026 रोजी फिर्यादी - नामे विष्णु कुंडलीकराव कोल्हे रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना यांनी 10 लाख रुपये काढून आपल्या कारमध्ये घेऊन जात असताना त्यावर चोरट्यांनी पाळत ठेवून फिर्यादीच्या कारचा पाठलाग करून धोपटेश्वर शिवरातील धोपटेश्वर ते देवगाव रोडवर आपली कार उभी करून शेतात जाऊन परत आले असता कारच्या मागील दरवाजाचे काच तुटलेले दिसले असता गाडीतील रक्कम दिसेनाशी झाली. त्यानंतर फिर्यादी विष्णु कुंडलीकराव कोल्हे वय 49 वर्ष रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना हे पोलिस स्टेशन बदनापूर येथे येऊन रिपोर्ट दिल्यावरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एम. टी. सुरवसे, पोलिस निरीक्षक बदनापूर यांनी तत्काळ सूत्र हाती घेऊन २ टीम तयार करून गुन्ह्याच्या तपासामध्ये CCTV फुटेज चेक केले तसेच तांत्रिक तपास केला असता एक मोटार सायकल वर दोन चोरट्यांनी कारचा पाठलाग करून कारची काच फोडून पैसे चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हे 1) गुंजी चालराजु जबराज 2) गुड्डेटी विनोत प्रभुदास दोन्ही रा. कपरला टिपा. ता. बिटरगुंटा जि. नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, या आरोपीस अटक करणे कामी तपास पथक यांना आंध्र प्रदेश येथे रवाना करून आरोपी चा शोध घेतला असता मिळून आला नाही, परंतु त्याच्या राहत्या घरातून चोरीस गेलेले 6 लाख रुपये जप्त करण्यास तपास पथक यांना यश प्राप्त झाले आहे. बाकी आरोपी व उर्वरीत रक्कम यांचा शोध घेणे कामी पथक रवाना करण्यात आले आहेत. सदरची कारवाई मा. श्री. तेघबिर सिंह संधु साहेब, पोलीस अधीक्षक जालना, मा. विक्रम साळी साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब जालना, मा. अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, जालना यांचे मार्गदर्शनाखाली १) एम. टी. सुरवसे, पोलिस स्टेशन पोलीस ठाणे बदनापूर, २) पोउपनि एस. आर.कुकलारे, ३) पोहेकॉ/671 ए.एस.दासर, ४) पोको/227 भडंगे, ५) पोको/342 पी. के. गोलवाल, ६) पोको/1699 एस. जे. तडवी यांनी केली आहे.1