अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण समिती तात्काळ स्थगित करा -संदेश रणवीर अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण समिती तात्काळ स्थगित करा -संदेश रणवीर अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून नेमण्यात आलेली एकल सदस्यीय अनंत बदर समिती ही असंवैधानिक असून अनुसूचित जाती आरक्षण हे केंद्राच्या अख्त्यारितील विषय असताना राज्यसरकारने अधिकाराचा दुरुपयोग करून ही समिती नेमली तीस तात्काळ स्थागिती द्यावी.अशी मागणी संदेश गौतमराव रणवीर यांनी, मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र शासन यांनानिवेदनातून केली आहे. सदर असंवैधानिक समितीद्वारे अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया ही गंभीर स्वरूपाची दिसून पडत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे सामूहिक हितरक्षण व सामाजिक न्यायासाठी आहे असे नमूद केले.अनुसूचित जाती व जमातीला आरक्षण दिले ते आर्थिक उन्नतीसाठी नव्हे तर ते त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी होते. त्यामुळे आरक्षणाच्या स्वरूपात बदल करताना अत्यंत पारदर्शक व सर्व समावेशक प्रक्रिया अपेक्षित असताना ती दुर्दैवाने पारदर्शक दिसत नाही दिनांक 15/4/24 रोजी असवैधानिक समिती स्थापन करून महाराष्ट्र सरकारने यामध्ये समाविष्ट असलेल्या अनुसूचित जाती 59 जातींपैकी कुठल्याही जातीचा किंवा प्रत्येक जातीचा प्रतिनिधी समितीत घेतलेला नाही.त्यामुळे त्या त्या घटकाची समस्या न समजता सामाजिक संशोधन वास्तुनिष्ठ करणे प्रतिनिधित्वाशिवाय पूर्ण होणे शक्य नाही 59 जातीला दुर्लक्षित करून अतिशय गोपनीय पद्धतीने बदर समितीने संशोधनाचे काम केले व दिनांक 1 एप्रिल 26 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत सदर समितीने याबाबत अहवाल सादर केला तो जाहीर रित्या प्रसिद्ध करण्यात आलेला नसताना त्यावर हरकती व सूचना सरकारकडून अल्पावधित मागवणे असवैधानिक असून लोकशाहीला घातक आहे कमी कालावधीत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचा घाईघाईचा प्रयत्न यातून दिसून येतो यासर्व बाबी घटनेतील सामाजिक न्याय या तत्त्वाला बाधा पोहचवत आहेत. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गात असंतोष असल्याने सदरची समिती तात्काळ स्थगित करण्यात यावी अशी मागणी रणवीर यांनी निवेदनातून केली आहे
अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण समिती तात्काळ स्थगित करा -संदेश रणवीर अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण समिती तात्काळ स्थगित करा -संदेश रणवीर अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून नेमण्यात आलेली एकल सदस्यीय अनंत बदर समिती ही असंवैधानिक असून अनुसूचित जाती आरक्षण हे केंद्राच्या अख्त्यारितील विषय असताना राज्यसरकारने अधिकाराचा दुरुपयोग करून ही समिती नेमली तीस तात्काळ स्थागिती द्यावी.अशी मागणी संदेश गौतमराव रणवीर यांनी, मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र शासन यांनानिवेदनातून केली आहे. सदर असंवैधानिक समितीद्वारे अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया ही गंभीर स्वरूपाची दिसून पडत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे सामूहिक हितरक्षण व सामाजिक न्यायासाठी आहे असे नमूद केले.अनुसूचित जाती व जमातीला आरक्षण दिले ते आर्थिक उन्नतीसाठी नव्हे तर ते त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी होते. त्यामुळे आरक्षणाच्या स्वरूपात बदल करताना अत्यंत पारदर्शक व सर्व समावेशक प्रक्रिया अपेक्षित असताना ती दुर्दैवाने पारदर्शक
दिसत नाही दिनांक 15/4/24 रोजी असवैधानिक समिती स्थापन करून महाराष्ट्र सरकारने यामध्ये समाविष्ट असलेल्या अनुसूचित जाती 59 जातींपैकी कुठल्याही जातीचा किंवा प्रत्येक जातीचा प्रतिनिधी समितीत घेतलेला नाही.त्यामुळे त्या त्या घटकाची समस्या न समजता सामाजिक संशोधन वास्तुनिष्ठ करणे प्रतिनिधित्वाशिवाय पूर्ण होणे शक्य नाही 59 जातीला दुर्लक्षित करून अतिशय गोपनीय पद्धतीने बदर समितीने संशोधनाचे काम केले व दिनांक 1 एप्रिल 26 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत सदर समितीने याबाबत अहवाल सादर केला तो जाहीर रित्या प्रसिद्ध करण्यात आलेला नसताना त्यावर हरकती व सूचना सरकारकडून अल्पावधित मागवणे असवैधानिक असून लोकशाहीला घातक आहे कमी कालावधीत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचा घाईघाईचा प्रयत्न यातून दिसून येतो यासर्व बाबी घटनेतील सामाजिक न्याय या तत्त्वाला बाधा पोहचवत आहेत. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गात असंतोष असल्याने सदरची समिती तात्काळ स्थगित करण्यात यावी अशी मागणी रणवीर यांनी निवेदनातून केली आहे
- काळी दौलत परिसरात अवकाळी पावसाने झोडपले काळी दौलत सह परीसरात मागील काही दिवसांपासून तप्त उन्हामुळे व प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र सोमवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह काळी दौलत सह परीसरातील गावांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे शेतातील ज्वारी मका हळद व भाजीपाला सह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे.रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या तांडवामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते या पावसामुळे काही प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिक भयभीत झाले होते. हवामान विभागाने पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे4
- Post by Dinesh kambli3
- डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आणि असीयन न्यूज चॅनल च्या वर्धमान दिना निमित्त होम गार्ड परेड साकोली येथे आज रात्री भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम झाला. कार्यकम बघण्यासाठी संगीतमय प्रेमी नी आपली हजेरी लावली होती.1
- Post by मनिषा विजय काशीवार1
- कृउबा समिती मार्केट मध्ये विक्रमी कापसाची आवक भिवापूर । उमरेड भिवापूर तालुक्यात कापसाचे लागवड क्षेत्र वाढल्याने कापसाचे उत्पादन मोठया प्रमाणात झाले असल्याने शेतकरी वर्ग कृउबा समितीच्या मार्केट यार्ड मध्ये कापसा माल मोठया प्रमाणात आणित असल्याने जिकडे - तिकडे भरगच्च कापसाचे ठिग भरून असल्याचे दृष्टिक्षेपणास येत आहे. मार्च अखेर पर्यंत 53,656 क्विंटल इतकी विक्रमी आवक झाल्याची माहिती कृषी उत्पन बाजार समिती सचिव रामकृष्ण गोगल. यांनी दिली असून याबाबतची त्याची प्रतिक्रिया तसेच मार्केट यार्ड मध्ये दि.5 एप्रिलला 1876 क्विंटल आवक होती. व दर 6300 -8500 रुपये प्राप्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यात समाधान व्यक्त केले जात आहे. भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड मध्ये रविवार, बुधवार ,गुरुवार हे तीन दिवस कापूस खरेदी चे आहे. गेल्या वर्षी क्विंटल मागे 6330 ते 7600 रुपये भाव इतका होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केल्या जात आहे. खाजगी जिनिंग मध्ये कापसाच्या भावामध्ये तफावत असल्याने शेतकरी वर्ग कृउबा समिती कडे आकृष्ट होत असून कापसाचा माल यार्डत आणत असल्याची माहीती कृउबा समितीचे सभापती बालु इंगोले यांनी दिली आहे.1
- कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?3
- जि.प.भोजापूरच्या विद्यार्थांनी दिले 'टिटवी'च्या पिलांना जीवदान म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे" भंडारा/पवनी: (दि २१) जि प उच्च प्रा शा भोजापूर ता पवनी जि भंडारा येथील मुलांनी आज रस्त्याने येतांना बाजूला झाडावरून पडलेले दोन टिटवी पक्ष्यांची पिले पाहिली. वर्ग ३ री व पहिलीच्या प्रियांश खोब्रागडे व शौर्य चिंतनवर यांनी आपल्या बॉटलमधील पाणी पिलांच्या चोचीत टाकले. अलगद हातावर उचलून वर्गात घेऊन आले. सर्व मुलांनी बघायची एकच गर्दी केली. त्यात काहींनी त्वरीत छोटे गादीसारखे पिलांना ठेवण्यासाठी घरटे तयार केले. प्लेट आणली, पाणी ठेवले किचनमधून खायसाठी पदार्थ आणून पिलांची व्यवस्था वर्गातच केली. पिलांचा मधूर आवाज ऐकून चिमुकली मुले मुली इन नवीन मित्र भेटल्याने आनंदात होतीच पिलांचा जीव वाचवल्याचे समाधानही मुलांनी शिक्षक पाटील सर यांना बोलून दाखवले. म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे"1
- बकरी करते मिरचीची दंडीकट ! भिवापूर । उमरेड सध्या उन्हाळा सुरू आहे. अशातच वाळवणीचे पदार्थ वर्षभर पुरेल या बेताने नागरीकांची लगबग पहावयास मिळत आहे. अशातच तेलीपुरा येथील राजु अहिरकर यांच्या मिरची कांडप मध्ये त्यांच्या घरची एक बकरी मोठया सफाईने मिरची कटाई करीत असल्याचे दृश्य ये - जा करणाऱ्यास दिसत आहे. प्रथम दर्शनी ही बकरी मिरची खात आहे असे वाटते. परंतू ही बकरी मोठया चपळकतेने फक्त मिरचीची देट खाते व मिरची तशीच शाबुत असते. त्यामुळे परिसरात या बकरीच्या नवलाईची चर्चा सर्वत्र होत आहे. सदर बकरी 3 वर्षाची असून मागील दोन वर्षापासून ही बकरी 3 ते 4 किलो मिरची चे देठ खुळत असल्याची माहिती राजु हरीभाऊ अहिरकर यांनी दिली आहे.1