प्रतिक्विंटल शंभर ते दीडशे रूपयांनी कांद्याची विक्री; खर्च हाती येईना"कांदा उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले" छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग कांद्याने केला उत्पादक शेतकऱ्यांचा वांदा " ठेवला तर सडतोय अन् विकला की रडवतोय; कांद्याचा का झाला वांदा ? कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत..! Anchor छत्रपती संभाजीनगरात कांदा उत्पादन वाढल्यावर बाजारात अचानक दर कोसळणे, हमीभावाचा अभाव, साठवणुकीची अपुरी सोय आणि बाजारपेठेतील चढ-उतार यामुळे शेतकरी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. सध्या उत्पादनासाठी मोठा खर्च करूनही योग्य दर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. पेरले तर उगवेल का ? आणि पिकलं तर विकेल का?' हा सवाल आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात घर करून बसला आहे. निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देत कसाबसा उभा केलेला कांदा जेव्हा बाजारात पोहोचला, तेव्हा त्याला सोन्याचा नव्हे तर अक्षरशः कवडीमोलाचा भाव मिळत आहे. मागील महिन्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल सरासरी शंभर ते दीडशे रूपये दर मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू उभे येत आहेत. कांदा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. कांद्याला हमीभाव जाहीर करावे असा मागणी शेतकऱ्यांनी केले आहे. बाईट- दत्तात्रय सातपुते, बाईट- दादासाहेब आगळे,
प्रतिक्विंटल शंभर ते दीडशे रूपयांनी कांद्याची विक्री; खर्च हाती येईना"कांदा उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले" छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग कांद्याने केला उत्पादक शेतकऱ्यांचा वांदा " ठेवला तर सडतोय अन् विकला की रडवतोय; कांद्याचा का झाला वांदा ? कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत..! Anchor छत्रपती संभाजीनगरात कांदा उत्पादन वाढल्यावर बाजारात अचानक दर
कोसळणे, हमीभावाचा अभाव, साठवणुकीची अपुरी सोय आणि बाजारपेठेतील चढ-उतार यामुळे शेतकरी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. सध्या उत्पादनासाठी मोठा खर्च करूनही योग्य दर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. पेरले तर उगवेल का ? आणि पिकलं तर विकेल का?'
हा सवाल आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात घर करून बसला आहे. निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देत कसाबसा उभा केलेला कांदा जेव्हा बाजारात पोहोचला, तेव्हा त्याला सोन्याचा नव्हे तर अक्षरशः कवडीमोलाचा भाव मिळत आहे. मागील महिन्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार
समितीत कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल सरासरी शंभर ते दीडशे रूपये दर मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू उभे येत आहेत. कांदा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. कांद्याला हमीभाव जाहीर करावे असा मागणी शेतकऱ्यांनी केले आहे. बाईट- दत्तात्रय सातपुते, बाईट- दादासाहेब आगळे,
- पुण्यात प्रवचनकार विकास लवांडे यांच्यावर हल्ल्याचा आरोप; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा निषेध आळंदी मातोबाची, ता. हवेली जि. पुणे येथे प्रवचन संपवून परत येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा वारकरी प्रवचनकार विकास लवांडे यांच्या गाडीला अडवून काही जणांनी शाई फेकत धक्काबुक्की व हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना 9 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हल्लेखोरांनी पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संग्राम भंडारे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटले आहे.1
- महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ('अ ब क ड') च्या मागणीसाठी मातंग समाजाने छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मोर्चा काढला. हजारो समाजबांधव रस्त्यावर उतरले होते, त्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या.1
- बिडकीन बस स्टॅन्ड ता. पैठण.जि. औरंगाबाद एस टी महामंडळ पैठण बिडकीन एमआयडीसी बिडकीन बस स्टॅन्ड काम सहा महिन्यापासून बंद आहे. बिडकीन बस स्टँड काम बंद आहे. एसटी बाहेरून जाऊ लागले. बस स्टॅन्ड प्रवाशांना उन्हाळ्यामुळे लय हाल होत आहे. बस स्टॅन्ड मध्ये छत नाही.1
- पुण्यात ट्रॅफिक महिला पोलिसाचा संयम सुटला.. ट्रक चालकरावर थेट दगड उगारला.1
- जय लक्ष्मी कंपनी फारोळा या कंपनीने येथे राजनगाव येथील म्हारोळा रोडवर असलेले महार हडूळे अवैध रित्या खोदून मुरुम वहातूक चालू केले आहे. जय लक्ष्मी कंपनी फारोळा या कंपनीने येथे राजनगाव येथील म्हारोळा रोडवर असलेले महार हडूळे अवैध रित्या खोदून मुरुम वहातूक चालू केले आहे.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात विहिरीची मोटर दुरुस्त करताना वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धानोरा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.1
- जालना जिल्ह्यातील मामादेवी मस्तागडावर जागेच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तक्रारदाराची जागा इतरांना विकल्याच्या कारणावरून हा वाद पेटला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1
- मतदारसंघात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल प्रभाग क्र. 2 नवजीवन कॉलनीत सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन छत्रपती संभाजीनगर : मध्य विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मतदारसंघ आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कामे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रयत्नातून मंजूर केले. त्यामुळे मतदारसंघात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ग्वाही शिवसेना नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांनी दिली. स्थानिक नागरिक आणि भाविकांनी केलेल्या मागणीनुसार प्रभाग क्र. 2 नवजीवन कॉलनी येथे 20 लक्ष रुपये निधीतून सामाजिक सभागृहाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत सेवासुविधा तात्काळ देण्यासाठी कटीबद्ध असून, हक्काने आदेश द्या, असे आवाहन जैस्वाल यांनी केले. याप्रसंगी शिवसेना गटनेते किशोर नागरे, सिनेट सदस्या पूनम पाटील खरगे, युवासेना शहर अधिकारी सागर खरगे, शिवसैनिक रमेश इधाटे, रविंद्र देशमुख, बाबासाहेब घुगे, तेजस पाटील, अविष्कार राजपूत , निखिल चव्हाण आदिसह स्थानिक नागरिक आणि भाविक उपस्थित होते.2