मुखेडमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा सामाजिक संदेश; राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या शिबिरात ६४ जणांचे रक्तदान मुखेड / प्रतिनिधी : जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी या पवित्र सणाचे औचित्य साधून राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद, मुखेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी व मानवसेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात तब्बल ६४ जणांनी रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन हाफिज अब्दुल गफार व हाफिज माजिद बागवान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी आदमपूरकर, पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड, डॉ. दिलीपराव पुंडे, डॉ. अशोक कौरवार, डॉ. रामराव श्रीरामे, डॉ. श्रीहरी बूडगेमवार, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पोउनि संदीप यामावार, नगराध्यक्ष प्रतिनिधी कृष्णा देबडवार, न.प. गटनेते विनोद आडेपवार, नगरसेवक मैनोद्दीन शेख, नगरसेवक हरून होंनवडजकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे मराठवाडा उपाध्यक्ष ॲड. असलम शेख, जिल्हाध्यक्ष महेताब शेख, सादक तांबोळी, जयप्रकाश कानगुले, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप कामशट्टे, तालुकाध्यक्ष यशवंत बोडके, सचिव ज्ञानेश्वर डोईजड, अहेमद बेळीकर, अनिल सिरसे, खाजा धुंदी, आकाश कांबळे, कॉ. विजय लोहबंदे, भाई पांडुरंग लंगेवाड, डॉ. राहुल कांबळे, सुभानी सय्यद, साईनाथ बोईनवाड, भारत सोनकांबळे, बालाजी कोतापल्ले, एस. के. बबलू, अब्दुल सय्यद, गजानन मोरे, योगेश मामिलवाड आदी उपस्थित होते. रक्त संकलनासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथील पथकाने विशेष परिश्रम घेतले. बीटीओ डॉ. धनश्री केंद्रे, समाजसेवा अधीक्षक सुनीत अवटे, चक्रवर्ती चोदंत्ते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विशाल सरसे, सतीश चिंतल, प्रज्वल वानखेडे, निशा पानसरे, नम्रता सोनसळे, हनुमान गाडे व कक्षसेवक बशीर सय्यद यांनी मोलाची भूमिका बजावली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे जिल्हा सरचिटणीस बबलू मुल्ला उर्फ हसनोद्दीन शेख, तालुकाध्यक्ष भाई आसद बल्खी, शहराध्यक्ष गौस मिर्झा, इम्रान अत्तार, जयभीम सोनकांबळे, मिलिंद कांबळे, मोतीपाशा पाळेकर, चाँद येवतीकर, रसूलसाब जांभळीकर, फारुख पटेल, खाजासाब सलगरकर, शब्बीर बल्खी यांच्यासह तालुका व शहर समितीतील पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि मित्रपरिवाराने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष महेताब शेख यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तालुकाध्यक्ष भाई आसद बल्खी यांनी मानले. ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने धार्मिक उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

- 🚨 Nanded News | असना पुलावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी 📍नांदेड–नागपूर महामार्गावरील असना पुलाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात अर्धापूर येथील किरण सुरेश वंटणकर (२२) याचा मृत्यू झाला, तर त्याचा चुलत भाऊ कल्याण सुरेश वंटणकर गंभीर जखमी झाला आहे. दोघे नांदेडहून अर्धापूरकडे दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला. धडकेनंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक राजू पाचंगे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी किरण याला मृत घोषित केले. कल्याणवर उपचार सुरू आहेत. 💔 वंटणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अर्धापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताबद्दल तुमचं मत काय? कमेंट करा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedNews #NandedCrime #AsnaBridge #Ardhapur #RoadAccident #NandedUpdates #NandigramTimes1
- देश की युवा पीढ़ी खतरे में हैं" ये आंकड़े सुनकर आपके पैरों तले जमीन खिसक जाएगी ... *"देश की युवा पीढ़ी खतरे में हैं" ये आंकड़े सुनकर आपके पैरों तले जमीन खिसक जाएगी ... कुछ इस तरह फर्ज़ी डिग्री वाले फेंकूओं की सरकार ने देश को बर्बाद किया है* *युवा इसलिए इस भ्रष्टाचारी सरकार को सपोर्ट नहीं कर रहा*1
- माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार1
- नेपाळमध्ये अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही,त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यासाठी 9405408939 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे .1
- बैलगाडा शर्यतीतील आता सर्वात चर्चेचा विषय म्हणजे हृदया दीपक शेठ पाटील हृदया दीपक शेठ पाटील हि मुलगी बैलगाडा शर्यतीतील आताचा मोठा विषय आहे ही मुलगी खुप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.1
- नेपाळमध्ये जालना जिल्ह्यातील पर्यटक अडकले? प्रशासनाचे आवाहन; तात्काळ हेल्पलाइनवर संपर्क साधा!1
- साखरेचा ट्रक रस्त्यात उलटला अन् लोकांनी साखरच पळवली; पोती उचलण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड; VIDEO व्हायरल साखरेने भरलेला ट्रक रस्त्यावर उलटल्याने मोठ्या प्रमाणात साखरेची पोती रस्त्यावर विखुरली. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही जण रस्त्यावर पडलेली साखरेची पोती उचलून आपल्या घराकडे नेताना दिसत आहेत. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर हा प्रकार चर्चेत आला आहे.1
- जश्न-ए-ईद-ए-मिलादुन्नबी पर बारादरी रोशन खां मोहल्ला में इज्तेमाई 30 शादियाँ संपन्न जश्न-ए-ईद-ए-मिलादुन्नबी पर बारादरी रोशन खां मोहल्ला में इज्तेमाई 30 शादियाँ संपन्न1
- केशरबाई शाळेत 'एक राखी जवानांसाठी' कार्यशाळा संपन्न. विद्यार्थी-पालकांनी बनवलेल्या राख्या सैनिकांना पाठवणार. लातूर : श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था द्वारा संचलित, सौं. केशरबाई भार्गव प्रा.वि.लातूर येथे इ.३ री ‘अ’ च्या विद्यार्थ्यांसाठी ‘एक राखी जवानांसाठी’ या अभिनव उपक्रमांतर्गत महिला पालकांसाठी विशेष राखी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. शा. स.अध्यक्ष श्री. कमलकिशोरजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व वर्गशिक्षिका सौ. कल्पना श्याम भट्टड यांच्या कृतीयुक्त सहभागातून आयोजित या कार्यशाळेत पालकांनी आपल्या पाल्यांसोबत प्रत्यक्ष सहभाग घेत आकर्षक व सुंदर राख्या तयार केल्या. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या या राख्या देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांना पाठविण्यात येणार आहेत. ‘राखी म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक नसून, देशरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही माध्यम आहे,’ हा भाव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यशाळेदरम्यान पालकांना राखी बनविण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. पालकांनी उत्साहाने सहभाग घेत सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार घडविला. पालकांचा प्रत्यक्ष सहभाग लाभल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंद, आत्मविश्वास, देशप्रेम व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. या उपक्रमातून ‘आपल्या हातची राखी जवानांच्या मनगटावर’ हा भावनिक संदेश देत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, कृतज्ञता, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे संस्कार देण्यात आले. महिला पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती व सक्रिय सहभाग हे या कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी जेष्ठ शिक्षिका रुक्मिणी सलगरे उपस्थित होत्या.1