logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिष्टमंडळ आणि हळद उत्पादक शेतकरी यांनी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट घेत हळदीच्या पडलेल्या दरावरतून चर्चा करत काही महत्त्वपूर्ण मागण्या त्यांच्या समोर ठेवल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंतरराष्ट्रीय बाजारात हळदीला असलेली मोठी मागणी आणि देशातील इतर राज्यासह महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे हळदीची घसरलेली उत्पादकता पाहता, देशात यंदा सरासरीच्या फक्त 70% हळदीचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशाही परिस्थितीत वायदे बाजारात स्पॉट रेट 16500 प्रती क्विंटल असताना नांदेड सह हिंगोली जिल्ह्यात 12000 ते 13000 प्रती क्विंटल रुपये असे कमी दराने हळदीचे लिलाव पुकारण्यात येत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रमक होत नांदेड व वसमत बाजारपेठ बंद करण्यात आली होती. सोबतच हिंगोली जिल्ह्यातील खाजगी बाजार समित्यांनी सुद्धा अगदी अत्यंत कमी 10,000/- ते 12000/- प्रति क्विंटल दर देत हळद उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लुट केली आहे. एकटा मराठवाडा प्रदेशाचा हळदी उत्पादनात सुमारे ४५ टक्के वाटा असल्यामुळे मराठवाडयातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने या प्रश्नाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वसमत येथील NCDEX चे वेर हाऊस मधील हळदीची तत्काळ FSSAI किंवा इतर केंद्रीय एजन्सी मार्फत तपासणी करण्यात यावी. कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात हळदीचे NCCL मार्फत झालेले सर्टिफिकेशन याची चौकशी करण्यात यावी, तसेच हिंगोली जिल्हा हळदीचे आगार असल्या कारणाने भविष्यात कमी दराचे प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शेतकरी, शेतकरी संघटना प्रतिनिधी आणि हळद व्यापारी यांची व्यापक बैठक बोलावण्यात यावी अश्या महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकीने, तानाजी भोसले सर, स्वाभिमानी पक्षाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष माधव पाटील गाढे,स्वाभिमानी चे जिल्हाउपाध्यक्ष जुनेद पठाण,डॉ रमेश शिंदे, , पुष्पक देशमुख, अँड ऋषीकेश देशमुख, सीताराम जाधव, गजानन मुनदर, मोहन मुनदर व हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी यावेळी उपस्थित होते.

21 hrs ago
user_दिपक हैबतराव चोरमले
दिपक हैबतराव चोरमले
Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • परभणी : अनुसूचित जाती उपवर्गीकरण संदर्भातील बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा. जोपर्यंत अद्यावत जनगणना होत नाही तोपर्यंत याबाबत कुठलाही निर्णय न घेण्याच्या मागणीसाठी शहरातील सर्व आंबेडकरी संघटनाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वर्गीकरणासाठी कोणते सामाजिक, आर्थिक निकष, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय किंवाकोणत्या अभ्यासगटाच्या शिफारसी विचारात घेतल्या आहेत याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर डी. एन. दाभाडे, रामकिशन कांबळे, नदीम इनामदार, जयप्रकाश इंगोले, एन. जी. खंदारे, रवी सोनकांबळे, सुहास पंडीत, सिध्दार्थ भराडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
    1
    परभणी : अनुसूचित जाती उपवर्गीकरण संदर्भातील बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा. जोपर्यंत अद्यावत जनगणना होत नाही तोपर्यंत याबाबत कुठलाही निर्णय न घेण्याच्या मागणीसाठी शहरातील सर्व आंबेडकरी संघटनाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वर्गीकरणासाठी कोणते सामाजिक, आर्थिक निकष, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय किंवाकोणत्या अभ्यासगटाच्या शिफारसी विचारात घेतल्या आहेत याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर डी. एन. दाभाडे, रामकिशन कांबळे, नदीम इनामदार, जयप्रकाश इंगोले, एन. जी. खंदारे, रवी सोनकांबळे, सुहास पंडीत, सिध्दार्थ भराडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • कछरा का दिकत
    1
    कछरा का दिकत
    user_Ajay Pawar
    Ajay Pawar
    माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    11 hrs ago
  • प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर; तक्रारदारांचे तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन मंठा (प्रतिनिधी) – पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाच्या तक्रारींकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत तक्रारदारांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला. मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत त्यांनी संताप व्यक्त केला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जेसीबी व पोकलॅन्डसारख्या यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोषी अधिकारी आणि संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच, ड्रोनच्या माध्यमातून सर्व रेती घाटांचे मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करावी आणि तोपर्यंत उत्खनन पूर्णपणे बंद ठेवावे, अशीही मागणी पुढे करण्यात आली. या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, “तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
    1
    प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर; तक्रारदारांचे तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन
मंठा (प्रतिनिधी) – पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाच्या तक्रारींकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत तक्रारदारांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला. मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत त्यांनी संताप व्यक्त केला.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जेसीबी व पोकलॅन्डसारख्या यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोषी अधिकारी आणि संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच, ड्रोनच्या माध्यमातून सर्व रेती घाटांचे मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करावी आणि तोपर्यंत उत्खनन पूर्णपणे बंद ठेवावे, अशीही मागणी पुढे करण्यात आली.
या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, “तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अप्पर तहसील कार्यालय मागणीसाठी शेवली कडकडीत बंद आठवडी बाजारही बंद ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
    1
    अप्पर तहसील कार्यालय मागणीसाठी शेवली कडकडीत बंद आठवडी बाजारही बंद ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
    user_Suresh D Dawane Patil
    Suresh D Dawane Patil
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Sk Chand
    1
    Post by Sk Chand
    user_Sk Chand
    Sk Chand
    मी सॅटॅलाइट न्यूज पत्रकार आहे. उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Shaikh irfan Shaikh isa
    1
    Post by Shaikh irfan Shaikh isa
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • परभणी (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील लोहगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, आग लागली तेव्हा सर्व दुकानदार गावातील एका लग्नसमारंभासाठी गेले होते, त्यामुळे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, लोहगावातील बाजारपेठ परिसरात अचानक दुपारच्या च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला आग लहान स्वरूपाची होती, मात्र काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले आणि शेजारील चार दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली.
    1
    परभणी (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील लोहगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, आग लागली तेव्हा सर्व दुकानदार गावातील एका लग्नसमारंभासाठी गेले होते, त्यामुळे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहगावातील बाजारपेठ परिसरात अचानक दुपारच्या च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला आग लहान स्वरूपाची होती, मात्र काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले आणि शेजारील चार दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली.
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.