Shuru
Apke Nagar Ki App…
Sachin Waghe
More news from महाराष्ट्र and nearby areas
- गावठी पिस्टलचा (अग्रिशस्त्राचा) वापर करून खूनाचा प्रयत्न करणा-या फरार आरोपीला अटक करून त्याचेकडून ०२ पिस्टल (अग्नीशस्त्र) जप्त करून त्याला जेरबंद करण्यात आले.1
- पिंपरी चिंचवड : - अशोक खरात प्रकरणावरही उदय सामंत स्पष्ट; गैरवापर थांबवण्याचा इशारा... एमएनजीएल गॅस पुरवठ्यावरून राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी कडक इशारा दिलाय. हॉटेल आणि उद्योजकांना गॅस पुरवठा जाणीवपूर्वक थांबवला जात असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही गॅस पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार समोर येत आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास सरकार कठोर पावलं उचलेल, असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, अशोक खरात प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले, काही नेत्यांशी फोनवर बोलणं झालं असलं तरी कुणीही त्यांच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. या प्रकरणात गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती थांबवण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.... #पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #उदयसामंत #हॉटेलव्यवसाय #उद्योजक #गॅसतुटवडा #सरकारइशारा #कारवाई #शिवसेना #अशोकखरात #PimpriChinchwad #MNGL #GasSupply #UdaySamant #HotelBusiness #Entrepreneurs #GasShortage #GovernmentWarning #StrictAction #ShivSena #AshokKharat1
- नालंदा दुष्कर्म में न्याय दिलाने पहुंचे पासवान नेता और पुलिस में हुई भिड़ंत,पीड़ित से मिलने को रोका.1
- नाशिक:दिंडोरी शहरात स्नेहसंमेलनावरून परतत असताना कार उघड्या विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ७ विद्यार्थी व २ पालकांचा समावेश आहे. रात्री १० वाजता शिवाजीनगर भागात हा अपघात झाला. अग्निशमन व आपत्ती पथकाने तीन क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढली. गुदमरून व बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.1
- सैयद अरशद रिज़वी पहुंचे टीएमसी स्कूल लोगों को S.I.R की जानकारी देने BNN NEWS1
- मुंब्रा का विकास या सर्वनाश।कुमैल मर्चेंट ने उठाया कब्रस्तान कामसला #mumbra #viralvideo #mumbrakausa1
- पिंपरी चिंचवड : - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाकड परिसरात सापळा रचून २७ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये मुंबईतील एका मुख्य पुरवठादारासह दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हिंजवडी पोलिसांना बातमी मिळाली होती की, एक इसम चारचाकी गाडीतून एम.डी. (मेफेड्रोन) विकण्यासाठी विनोदे वस्ती, वाकड येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अतुल शंकर बालगुडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४२ ग्रॅम एम.डी. आणि कार असा एकूण ७ लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास केला असता, या तस्करीचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुंबईतील गोवंडी येथून शारुख उर्फ सद्दाम इक्बाल अंसारी याला अटक केली. त्याच्याकडून २० लाख रुपये किमतीचे २०० ग्रॅम एम.डी. जप्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी हिंजवडी पोलिसांनी हायड्रोपोनिक पद्धतीने केलेली गांजाची शेती आणि अंमली पदार्थांचे कारखाने उद्ध्वस्त केले होते. आता पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने आयटी हब म्हणून ओळखले जाणारे हिंजवडी आता ड्रग्ज हब बनत आहे का ? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.... : संभाजी कदम, पोलीस उपायुक्त #हिंजवडी #पिंपरीचिंचवडपोलीस #ड्रग्जकारवाई #एमडीड्रग्ज #मादकपदार्थविरोधीमोहीम #वाकड #गुन्हेगारी #मुंबईकनेक्शन #पोलीसकारवाई #ड्रग्जजप्ती #क्राइमन्यूज #Hinjewadi #PimpriChinchwadPolice #DrugBust #Mephedrone #AntiDrugOperation #Wakad #CrimeNews #MumbaiConnection #PoliceAction #DrugSeizure #BreakingNews1
- नाशिक, दि. 3 : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या विविध विकास कामांची राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज दुपारी पाहणी करीत सविस्तर माहिती घेतली. यावेळी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, महानगरपालिकेचे उपायुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल आदी उपस्थित होते. मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी द्वारका सर्कल येथील भुयारी मार्ग, तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ बांधण्यात येणारा समांतर पूल, कपिला संगम, साधुग्राम, गोदावरी नदी काठावर जलसंपदा विभागातर्फे सुरू असलेल्या नवीन घाटांच्या कामांची तसेच नाशिक महानगरपालिकेतर्फे तपोवन, आगरटाकळी, दसक-पंचक येथे सुरू असलेल्या मल जल शुद्धीकरण प्रकल्पांची पाहणी केली. त्यानंतर मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी पांडव लेणीजवळील महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन, खत निर्मिती प्रकल्पांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट दिली तर राजुर बहुला येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या वीज उपकेंद्राचीही मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी पाहणी केली. द्वारका सर्कल येथे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संदीप पंडागळे यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. द्वारका चौकातील पायाभूत सोयीसुविधांचे काम पूर्ण झाल्यावर वाहतुकीचे नियोजन कसे राहील याविषयीची माहिती मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी जाणून घेतली. महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री, अतिरिक्त आयुक्त श्रीमती नायर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी तपोवन परिसरात कुंभमेळ्यानिमित्त आपापल्या विभागातर्फे सुरू असलेल्या विकास कामांची सविस्तर माहिती दिली. मुख्य सचिव श्री. अग्रवाल म्हणाले की, नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देश- विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतील. या भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा निर्मिती शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कुंभमेळ्यानिमित्त सुरू झालेली कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावयाची आहे. याबरोबरच ही सर्व कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होतील याचीही दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले की, पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे सर्वतोपरी नियोजन करण्यात आले आहे. विविध विकास कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करून विकास कामे सुरू झाली आहेत. ही विकास कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सनियंत्रण करण्यात येत असल्याचे सांगितले. कुंभमेळा आयुक्त श्री. सिंह यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांना दिली. मुख्य सचिव श्री. अग्रवाल हे सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी व कामांचा आढावा घेण्यासाठी आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. शनिवार, दि. 4 एप्रिल रोजी सकाळी ते पांडवलेणी येथे भेट देणार आहेत. त्यानंतर ते नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे रेल्वे विभागामार्फत सुरू असलेल्या कामांची पाहणी करतील. त्यानंतर ते धुळे रोडवरील पार्किंगची पाहणी करून रामकुंडावरील रामकाल पथच्या सुरू असलेल्या कामांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. तसेच स्मार्ट सिटी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याचा आढावाही घेणार आहेत.1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1