logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रंगपंचमी निमित्त लातूर पोलिसांचा कडक बंदोबस्त, त्यामुळे सण शांततेत साजरा पोलिसांचा रंगपंचमी सणानिमित्त चोख बंदोबस्त मुळे सण शांततेत व उत्साहात पार. लातूर (प्रतिनिधी) शहर व जिल्ह्यात दिनांक 8 मार्च 2026 रोजी रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात, आनंदात व जल्लोषात साजरा करण्यात आला. सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, कोणताही अनुचित प्रकार घडू न देणे तसेच नागरिकांना सुरक्षित वातावरणात सण साजरा करता यावा या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा पोलिसांकडून अत्यंत काटेकोर, नियोजनबद्ध व व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रंगपंचमीच्या दिवशी लातूर शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे, संवेदनशील परिसर तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या भागांमध्ये विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदोबस्तामध्ये पायी गस्त, मोटारसायकल पेट्रोलिंग, मोबाईल पेट्रोलिंग पथके, फिक्स पॉईंट बंदोबस्त तसेच तातडीच्या परिस्थितीसाठी विशेष पथके तैनात करण्यात आली होती. शहरातील विविध भागात पोलीस अधिकारी व कर्मचारी सातत्याने गस्त घालत होते. सणाच्या दिवशी वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः शहरातील विविध भागांना भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी करत होते. बंदोबस्तावर तैनात असलेल्या अधिकारी व अमलदारांना प्रयत्न वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येत होत्या. परिणामी संपूर्ण शहरात पोलिसांची प्रभावी उपस्थिती जाणवत होती व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. लातूर पोलिसांच्या सतर्कता, प्रभावी नियोजन, सातत्यपूर्ण गस्त व तत्पर कार्यवाहीमुळे रंगपंचमीचा सण कोणताही गंभीर अनुचित प्रकार न घडता शांततेत, सुरक्षिततेत व आनंददायी वातावरणात पार पडला. नागरिकांनीही संयम राखत व कायद्याचे पालन करत सण साजरा केल्यामुळे शहरातील सामाजिक सलोखा व शांतता कायम राहिली. तथापि, काही अति उत्साही व्यक्तींनी कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी लातूर पोलिसांकडून तात्काळ कारवाई करण्यात आली असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर कारवाईमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने घातक हत्यार बाळगणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध दारू विक्रीप्रकरणी लातूर जिल्ह्यात एकूण 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 2 वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. विनापरवाना डॉल्बी साऊंड सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 01 व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय वाहतूक नियंत्रण शाखा, लातूर यांच्याकडूनही विशेष वाहतूक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ई-चलान प्रणालीद्वारे कठोर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पुढीलप्रमाणे दंडात्मक कार्यवाही करण्यात आली  नियमबाह्य व बेशिस्त पार्किंग करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर तसेच ऑटोरिक्षामध्ये अनधिकृत टेप, स्पीकर व एलईडी लाईट लावून सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर एकूण 176 कारवाया करून रु. 1,87,600/- इतका दंड आकारण्यात आला. बुलेट मोटारसायकलच्या सायलेन्सरमधून मोठा आवाज (फटाका) काढणाऱ्या वाहनांवर 03 कारवाया करून रु. 3,000/- दंड आकारण्यात आला. अनधिकृतपणे मॉडिफाय केलेले सायलेन्सर बसवून आवाज करणाऱ्या 12 बुलेट मोटारसायकलचे सायलेन्सर काढण्यात आले. ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांवर 52 कारवाया करून रु. 52,000/- दंड आकारण्यात आला. ऑटोरिक्षा चालकांवर नियमभंगाबाबत 07 कारवाया करून रु. 6,650/- दंड आकारण्यात आला. लातूर जिल्हा पोलिसांनी सणाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या चोख बंदोबस्त, प्रभावी गस्त, वाहतूक नियंत्रण व तत्पर कारवाईमुळे शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश आले आहे. रंगपंचमीचा सण शांततेत व उत्साहात पार पडण्यासाठी लातूर शहरातील नागरिक, युवक मंडळे, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना तसेच माध्यम प्रतिनिधी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच भविष्यातही सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करून सण-उत्सव सामाजिक सलोखा, बंधुभाव व शांतता कायम राखत साजरे करावेत, असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

19 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
19 hrs ago
07ed9f86-d18a-4a01-ad64-0416ab9afcfa

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Press Mukhed Bablu Mulla
    2
    Post by Press Mukhed Bablu Mulla
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा गोंधळातच सुरू लातूर | प्रतिनिधी लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज गोंधळाच्या वातावरणातच सुरू झाली. सभेच्या प्रारंभीच विविध मुद्द्यांवरून नगरसेवकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली, त्यामुळे काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. विविध प्रलंबित प्रश्न, शहरातील मूलभूत सुविधा तसेच प्रशासनाच्या कामकाजाबाबत काही नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सभेतील गोंधळामुळे कामकाज काही काळ ठप्प झाले होते. नंतर महापौर आणि प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली आणि सभेचे कामकाज पुढे सुरू करण्यात आले. दरम्यान, शहरातील विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबत महत्त्वाच्या विषयांवर या सभेत चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
    1
    लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा गोंधळातच सुरू
लातूर | प्रतिनिधी
लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज गोंधळाच्या वातावरणातच सुरू झाली. सभेच्या प्रारंभीच विविध मुद्द्यांवरून नगरसेवकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली, त्यामुळे काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
विविध प्रलंबित प्रश्न, शहरातील मूलभूत सुविधा तसेच प्रशासनाच्या कामकाजाबाबत काही नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सभेतील गोंधळामुळे कामकाज काही काळ ठप्प झाले होते. नंतर महापौर आणि प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली आणि सभेचे कामकाज पुढे सुरू करण्यात आले.
दरम्यान, शहरातील विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबत महत्त्वाच्या विषयांवर या सभेत चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    3 hrs ago
  • राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिशा देणारा आणि समाधानकारक - माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर
    1
    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिशा देणारा आणि समाधानकारक - माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • *वंचित पत्रकारांना न्याय देण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्याची गरज – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *पत्रकारांच्या अडचणींकडे विधानपरिषद सभागृहात लक्ष वेधले* मुंबई, दि. ९ मार्च २०२६ : महाराष्ट्र विधानपरिषदेत नियम १०१ अन्वये लक्षवेधी सूचनेअंतर्गत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करून त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करण्याबाबतचा मुद्दा विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ अनेक पात्र पत्रकारांना मिळत नाही, कारण त्यांनी ज्या वर्तमानपत्रांमध्ये काम केले ते बंद पडलेले असते किंवा संबंधित संपादकांकडून प्रमाणपत्र मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत पात्र पत्रकार अपात्र ठरत असल्याचे अनेक प्रकरणे त्यांच्या निदर्शनास आली असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, अशा प्रकरणांमध्ये सत्यता पडताळण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या कामात निकषांबाबत तांत्रिक अडचणीतुन मार्ग काढण्यास यंत्रणा स्थापन करण्याची गरज आहे, जेणेकरून पत्रकारांना आपली बाजू मांडण्यासाठी योग्य मंच उपलब्ध होईल. अनेक वृद्ध पत्रकार आजारी असूनही योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहतात, मात्र विद्यमान यंत्रणेतील मर्यादांमुळे त्यांना अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्हा स्तरावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला (DGIPR) या संदर्भात अधिक अधिकार देऊन एक सक्षम आणि कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री कार्यालयाकडे खाते असले तरी संबंधित मंत्र्यांनी या विषयाकडे लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सूचित केले. यावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या सूचनांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे सांगितले.
    1
    *वंचित पत्रकारांना न्याय देण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्याची गरज – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*
*पत्रकारांच्या अडचणींकडे विधानपरिषद सभागृहात लक्ष वेधले*
मुंबई, दि. ९ मार्च २०२६ :
महाराष्ट्र विधानपरिषदेत नियम १०१ अन्वये लक्षवेधी सूचनेअंतर्गत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करून त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करण्याबाबतचा मुद्दा विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधले. 
त्या म्हणाल्या की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ अनेक पात्र पत्रकारांना मिळत नाही, कारण त्यांनी ज्या वर्तमानपत्रांमध्ये काम केले ते बंद पडलेले असते किंवा संबंधित संपादकांकडून प्रमाणपत्र मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत पात्र पत्रकार अपात्र ठरत असल्याचे अनेक प्रकरणे त्यांच्या निदर्शनास आली असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, अशा प्रकरणांमध्ये सत्यता पडताळण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या कामात निकषांबाबत तांत्रिक अडचणीतुन मार्ग  काढण्यास यंत्रणा स्थापन करण्याची गरज आहे, जेणेकरून पत्रकारांना आपली बाजू मांडण्यासाठी योग्य मंच उपलब्ध होईल. अनेक वृद्ध पत्रकार आजारी असूनही योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहतात, मात्र विद्यमान यंत्रणेतील मर्यादांमुळे त्यांना अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच जिल्हा स्तरावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला (DGIPR) या संदर्भात अधिक अधिकार देऊन एक सक्षम आणि कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री कार्यालयाकडे खाते असले तरी संबंधित मंत्र्यांनी या विषयाकडे लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सूचित केले.
यावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या सूचनांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे सांगितले.
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल नांदेड: शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. "आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." — स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल
नांदेड:
शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला
या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत.
प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.
नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.
"आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."
— स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते
आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    1 hr ago
  • Post by Nanded_7
    1
    Post by Nanded_7
    user_Nanded_7
    Nanded_7
    Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
  • अंबलटेक गावाचा विकास आणखीन नाही.चांगला रस्ता होता ते खंदून टाकला आहे. नवीन रस्ता करतो म्हणून आणखीन केला नाही जिथे रस्ता चांगला आहे तिथेच रस्ता करीत आहेत .दारासमोर गोट्यात सरपंचाच्या आणि सदस्याच्या गोट्यामध्ये काँक्रीट टाकून काम चालू आहे मंदिर पाशी आणि वरी आणखीन रस्ता नाही?
    2
    अंबलटेक गावाचा विकास आणखीन नाही.चांगला रस्ता होता ते खंदून टाकला आहे. नवीन रस्ता करतो म्हणून आणखीन केला नाही जिथे रस्ता चांगला आहे तिथेच रस्ता करीत आहेत .दारासमोर गोट्यात सरपंचाच्या आणि सदस्याच्या गोट्यामध्ये काँक्रीट टाकून काम चालू आहे मंदिर पाशी आणि वरी आणखीन रस्ता नाही?
    user_Boss Boss
    Boss Boss
    Rural Transportation Operator अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Nanded_7
    1
    Post by Nanded_7
    user_Nanded_7
    Nanded_7
    Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.