ऐन उन्हाळ्याच्या तोंडाला नागरिकांची पाण्यासाठी धावपळ (वीज बिल न भरल्यामुळे पाणीपुरवठा विहिरीचे कनेक्शन कट) उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बाळदी येथे ऐन उन्हाळ्याच्या तोंडालाच पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करायची वेळ आली आहे. कामधंद्याचे दिवस असल्यामुळे तांडा वस्तीत मजूर वर्ग कामावरून येऊन पिण्याच्या पाण्यासाठी उन्हातानात फेऱ्या मारताना दिसत आहेत. अजून तर पुढे खूप दिवस बाकी आहेत. यानंतरचे हाल काय होणार हा चिंतेचा प्रश्न पडत आहे. मागील पाच-सहा दिवसापासून गावातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झालेला आहे. भर पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याची टंचाई भासली नव्हती परंतु विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) बिल न भरल्यामुळे त्यांनी पाणीपुरवठा विहिरीचे लाईट कनेक्शन तोडले. त्यामुळे तांडा वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न ग्रामस्थांमध्ये उपस्थित झाला आहे. काही ठिकाणचे हातपंप सुद्धा मोडलेल्या अवस्थेत आहेत तेव्हा नेमकं पाणी आणायची तरी कुठून ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जल जीवन मिशन योजनेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, गावातील पाण्याच्या टाक्याचे कामही पूर्ण झालेले नाही काही घरी नळाचे कनेक्शन सुद्धा गेलेले नाही.हे काम कधी पूर्ण होणार यावर ग्रामपंचायत काय निर्णय घेणार याकडे सर्व तांडा वस्तीतील लोकांचे लक्ष वेधले आहे. चौकट: पाणीपुरवठा विहीर चे बिल जवळपास एक लाख 51 हजार एवढे आहे. लोकांकडे वसुली जवळपास आठ लाख रुपये एवढी असून अंदाजे वीस हजार गोळा झाली. लोकांनी पाणीकर भरावा.आम्ही लगेच लाईट बिल भरून पाण्याची व्यवस्था करू असे गावातील सरपंच यांनी सामाजिक कार्यकर्ता अतिश वटाणे यांनाबोलताना सांगितले.

- हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे. निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे. 👉 नागरिकांची मागणी: ✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ✔️ देयके तात्काळ थांबवा ✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption1
- Post by वैजनाथ पावडे1
- Post by श्री व्यंकटेश देवराव कदम1
- दारव्हा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मार्च अखेरीस वाढत्या उन्हामुळे तसेच लग्नसराईचा हंगाम आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने बसस्थानकावर मोठी गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत बसस्थानकावर ठेवलेले माठ रिकामे असून पाण्याचा थेंबही उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने (यवतमाळ-वाशीम) यांनी आगार व्यवस्थापकांनी तात्काळ दखल घेऊन दारव्हा बसस्थानकावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रसिद्धी माध्यमांतून केली आहे.1
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Labour addaa.1
- खडकी (बा.) येथील रोकडोबा मारोती मंदिर – श्रद्धा आणि परंपरेचा अनमोल ठेवा हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) येथे असलेले जागृत रोकडोबा मारोती मंदिर भाविकांसाठी आस्था आणि विश्वासाचे केंद्र बनले आहे. दैवी आख्यायिका, परंपरा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो आमली बारशीचा उत्सव, शिवपुराण कथा, महाप्रसाद आणि शेतकऱ्यांची श्रद्धा – या सर्व गोष्टींमुळे मंदिराचे महत्त्व अधिकच वाढले आहे दर शनिवारी होणारी महाआरती आणि श्रावणातील सप्ताह सोहळा भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देतो #RokdobaMaroti #HanumanTemple #Kharki #Himayatnagar #Devotion SpiritualIndia Maharashtra Bhakti Tradition TempleStory1