IMD Rain Alert Maharashtra: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; 10 जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे IMD Rain Alert Maharashtra अंतर्गत भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून पुढील 24 ते 48 तास अनेक भागांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नद्या आणि नाल्यांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. काही ठिकाणी सखल भाग जलमय झाले असून ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुणे घाट परिसर, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता अधिक आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला असून स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

- प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा आषाढी एकादशीला रमला सोहळा प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा आषाढी एकादशीला रमला सोहळा अकोट तालुका प्रतिनिधी..... अकोट तालुक्यातील आदर्श ग्राम सावरा येथील प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा येथे आषाढी एकादशीच्या दिवशी मुले मुली विठु मावली च्या गजरात वारकरी च्या गणवेशात टाळ मृदुंगात रमली विशेषता पालकांनी या सोहळ्या करीता चिमुकल्यांना छान प्रकारे तयारी करून उत्साह व्यक्त केला. या सर्व मुलांचा उत्साह महिला व पुरुष पालक यांनी पण घेतला. सर्व सहभागी मुलांना 15 ऑगष्ट 26 रोजी विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे या प्रसंगी शिक्षक वृंद सौ पुजा म्हसाये कोमल धांडे धांडे मॅडम वैशाली धांडे अक्षय निबाळकर शिवनाथ डोंगरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमा करीता प्रज्ञेश इंग्लिश स्कूल च्या प्राचार्या सौ स्वातीताई राऊत यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी सावरा मंचनपुर देऊळगाव रंभापुर आसेगांव बाजार येथील पालकांनी सहकार्य केले.1
- मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा."आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.1
- प्रभाग क्रमांक 14 मध्ये शेतातील पाणी घरात घुसले; नगर परिषद उपाध्यक्ष प्रथमेश बोरोडे यांनी केली तातडीने मदत प्रभाग क्रमांक 14 मध्ये शेतातील पाणी घरात घुसले; नगर परिषद उपाध्यक्ष प्रथमेश बोरोडे यांनी केली तातडीने मदत अकोट तालुका प्रतिनिधी.... दि. 31 जुलै : अकोट नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 14 मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील पाणी नागरिकांच्या घरांमध्ये घुसल्याने येथील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.या बाबतीत येथील नागरिकांच्या जिवित्वास हाणी पोहचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.या घटनेची माहिती मिळताच अकोट नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रथमेश बोरोडे यांनी तातडीने सफाई कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.व सफाई कामगार यांनी नाल्यांमधील अडथळे दूर करून पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी मार्ग मोकळा केला. त्यामुळे या परिसरात घरांमध्ये साचलेले पाणी कमी होण्यास मदत झाली. अचानक आलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नगर परिषदेच्या तातडीच्या कार्यवाहीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.2
- - लोहारी रस्त्यावर पाणी साचल्याने विद्यार्थी व शिक्षकांचे हाल; नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलसमोरील समस्या गंभीर प्रतिनिधी : वर्षा फुसे | अकोट मुंडगाव येथील लोहारी रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने स्वर्गीय नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेसमोरील रस्ता पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांना चिखल आणि साचलेल्या पाण्यातून जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत आहे. लहान मुलांचे दप्तर व गणवेश भिजत असून, अनेक विद्यार्थ्यांना घसरून पडण्याची भीती कायम असते. शिक्षकांनाही शाळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, त्यामुळे शैक्षणिक कामकाजावरही परिणाम होत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, लोहारी रस्त्यावरील पाण्याचा तातडीने निचरा करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. "शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज." - लोहारी रस्त्यावर पाणी साचल्याने विद्यार्थी व शिक्षकांचे हाल; नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलसमोरील समस्या गंभीर प्रतिनिधी : वर्षा फुसे | अकोट मुंडगाव येथील लोहारी रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने स्वर्गीय नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेसमोरील रस्ता पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांना चिखल आणि साचलेल्या पाण्यातून जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत आहे. लहान मुलांचे दप्तर व गणवेश भिजत असून, अनेक विद्यार्थ्यांना घसरून पडण्याची भीती कायम असते. शिक्षकांनाही शाळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, त्यामुळे शैक्षणिक कामकाजावरही परिणाम होत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, लोहारी रस्त्यावरील पाण्याचा तातडीने निचरा करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. "शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज."4