कांग्रेस जिल्हा सचिव पदी अड ईलीयास नाईक यांची निवड* कळमनुरी:- येथील माजी नगर सेवक तथा प्रसिद्ध विधिज्ञ अड ईलीयास नाईक यांची नुक्तेच कांग्रेस हिंगोली जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली *कांग्रेस जिल्हा सचिव पदी अड ईलीयास नाईक यांची निवड* कळमनुरी:- येथील माजी नगर सेवक तथा प्रसिद्ध विधिज्ञ अड ईलीयास नाईक यांची नुक्तेच कांग्रेस हिंगोली जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली आहे सदरील निवड कांग्रेस पक्ष वरिष्टांकडुन करण्यात आली आहे अड ईलीयास नाईक यांची कांग्रेस जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आल्याने सर्व सतरातुन शुभेच्छा देण्यात येत आहे अड ईलीयास नाईक यांची निवड कांग्रेस जिल्हा सचिव पदी झाल्याने कांग्रेस चे ज्येष्ठ नेते जकी कुरैशी, कांग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ सतीश पाचपुते, माजी नगराध्यक्ष अड अझरोद्दीन कादरी, दत्ता पाटील, भगवान खंदारे, संतोष राजगोरे, अड रवी शिंदे, कांताराव शिंदे, नितीन जिंतुरकर, वनीता गुंजकर, तनवीर नाईक, शेख महेबुब, अखतर पठान, अय्याज नाईक, बबलु पठान, शेख युनुस, शेख फयाज, शेख सोहेल रजा, अड ज़िशान नाईक यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या
कांग्रेस जिल्हा सचिव पदी अड ईलीयास नाईक यांची निवड* कळमनुरी:- येथील माजी नगर सेवक तथा प्रसिद्ध विधिज्ञ अड ईलीयास नाईक यांची नुक्तेच कांग्रेस हिंगोली जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली *कांग्रेस जिल्हा सचिव पदी अड ईलीयास नाईक यांची निवड* कळमनुरी:- येथील माजी नगर सेवक तथा प्रसिद्ध विधिज्ञ अड ईलीयास नाईक यांची नुक्तेच कांग्रेस हिंगोली जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली आहे सदरील निवड कांग्रेस पक्ष वरिष्टांकडुन करण्यात आली आहे अड ईलीयास नाईक यांची कांग्रेस जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आल्याने सर्व सतरातुन शुभेच्छा देण्यात येत आहे अड ईलीयास नाईक यांची निवड कांग्रेस जिल्हा सचिव पदी झाल्याने कांग्रेस चे ज्येष्ठ नेते जकी कुरैशी, कांग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ सतीश पाचपुते, माजी नगराध्यक्ष अड अझरोद्दीन कादरी, दत्ता पाटील, भगवान खंदारे, संतोष राजगोरे, अड रवी शिंदे, कांताराव शिंदे, नितीन जिंतुरकर, वनीता गुंजकर, तनवीर नाईक, शेख महेबुब, अखतर पठान, अय्याज नाईक, बबलु पठान, शेख युनुस, शेख फयाज, शेख सोहेल रजा, अड ज़िशान नाईक यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या
- वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती घोटा देवी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी 👏👏👏👏 (प्रतिनिधी): हिंगोली तालुक्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी अत्यंत आदरपूर्वक व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वैजनाथ पावडे यांनी उपस्थित शालेय विद्यार्थी व मेंढपाळ समाजातील मुलांना या दोन्ही महान विभूतींच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, "महान पुरुषांचे विचार, त्याग, शिक्षणप्रेम आणि समाजसेवेची प्रेरणा प्रत्येकाने आपल्या जीवनात उतरवली पाहिजे. चांगले संस्कार, शिक्षण आणि समाजहिताची भावना जोपासून आपणही समाजसुधारक म्हणून कार्य केले, तर आपल्या जीवनालाही खरा अर्थ प्राप्त होईल. जयंती व पुण्यतिथी हे केवळ स्मरणाचे दिवस नसून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा देणारे दिवस आहेत." यावेळी नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या आश्रमातील विद्यार्थी, मेंढपाळ समाजातील मुले तसेच परिसरातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही महान व्यक्तींच्या विचारांचे पालन करून शिक्षण, शिस्त आणि समाजसेवा यांचा संकल्प केला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि महान व्यक्तींच्या विचारांबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.1
- महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.1
- पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. 📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा! #Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi1
- बारिश में मौत बनकर खड़ा जर्जर बिजली का पोल, शिकायत के बाद भी नहीं जागा बिजली विभाग बार्शिटाकली | प्रतिनिधि बार्शिटाकली तहसील के दोनद बु. गांव में बिजली विभाग की गंभीर लापरवाही सामने आई है। गांव में लगा एक बिजली का पोल नीचे से पूरी तरह सड़ चुका है। लगातार हो रही बारिश और तेज़ हवाओं के चलते यह पोल कभी भी गिर सकता है, जिससे बड़ा हादसा होने की आशंका जताई जा रही है। गांव निवासी गणेश नागे ने इस खतरनाक स्थिति की शिकायत बिजली विभाग से कर तत्काल नया पोल लगाने की मांग की है। बावजूद इसके अब तक विभाग की ओर से कोई कार्रवाई नहीं की गई है। इससे ग्रामीणों में नाराजगी के साथ-साथ भय का माहौल भी बना हुआ है। ग्रामीणों का कहना है कि जर्जर पोल के आसपास से प्रतिदिन स्कूली बच्चे, किसान और अन्य राहगीर गुजरते हैं। यदि समय रहते इसे नहीं बदला गया तो किसी भी क्षण जनहानि हो सकती है। ग्रामीणों ने बिजली विभाग से तत्काल जर्जर पोल बदलने की मांग की है। अब देखना यह होगा कि विभाग समय रहते कार्रवाई करता है या फिर किसी बड़े हादसे के बाद ही जिम्मेदारों की नींद खुलेगी1
- माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती1
- वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे मंगरूळपीर शहरालगतच्या मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या सुमारे ४० फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या एका ३५ वर्षीय महिलेला मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले. २९ जुलै रोजी दुपारी घडलेल्या या घटनेत बचाव पथकाने दाखविलेल्या धाडसामुळे महिलेला जीवनदान मिळाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सपना राठोड (वय अंदाजे ३५ वर्षे, रा. पंचशील नगर, मंगरूळपीर) या २९ जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास मंगरूळपीर शहरालगत मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या विहिरीत पडल्या. विहीर खोल आणि कोरडी असल्याने परिस्थिती गंभीर होती. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच घटनास्थळी गर्दी झाली. या घटनेची माहिती मंगरूळपीर पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार किशोर शेळके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला आणि तातडीने बचाव पथकाला घटनास्थळी पाचारण केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांना बचावासाठी रवाना केले. गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर हे आवश्यक शोध व बचाव साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचले. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता संबंधित विहीर सुमारे ४० फूट खोल आणि पूर्णपणे कोरडी असल्याचे दिसून आले. विहिरीच्या तळाशी महिला पडलेली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बचाव पथकाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनची तयारी सुरू केली. जवान गोपाल गिरे यांनी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांना फोनवरून घटनास्थळावरील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण बचाव मोहिमेचे नियोजन करण्यात आले. विहिरीची खोली आणि परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत सावधगिरीने ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. वायर रोपच्या सहाय्याने जवान उतरला विहिरीत क्षणाचाही विलंब न करता जवान गोपाल गिरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वायर रोपच्या सहाय्याने सुमारे ४० फूट खोल विहिरीत प्रवेश केला. विहिरीच्या तळाशी पोहोचल्यानंतर त्यांनी महिलेला धीर दिला. बचावादरम्यान कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून महिलेला सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्यात आले. त्यानंतर खाट आणि आवश्यक बचाव साहित्याच्या सहाय्याने महिलेला सुरक्षितपणे वर आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अत्यंत काळजीपूर्वक आणि समन्वयाने राबविण्यात आलेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर दुपारी सुमारे पाच वाजताच्या सुमारास महिलेला विहिरीतून जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश आले. त्यानंतर महिलेला पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बचाव पथकाच्या साहसाचे नागरिकांकडून कौतुक या बचाव मोहिमेदरम्यान मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके, पोलीस कर्मचारी प्रमोद थोरवे, धनंजय पवार यांच्यासह गावातील नागरिक आणि महिलेचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. महिला सुखरूप बाहेर आल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वेळेचे महत्त्व ओळखून पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या जवानांनी जीव धोक्यात घालून केलेल्या धाडसी बचावकार्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले. जवान गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर यांनी दाखविलेल्या साहसाचे स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमुळे महिलेला जीवनदान मिळाले असून, संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या तत्पर आणि साहसी कार्याची परिसरात प्रशंसा होत आहे.4