Shuru
Apke Nagar Ki App…
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले तुषार दोषी सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले तुषार दोषी यांची आता सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळणारे संदीप घुगे यांची बदली पोलीस उपआयुक्त, सुरक्षा (राज्य गुप्तवार्ता विभाग), मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
MSN MARATHI
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले तुषार दोषी सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले तुषार दोषी यांची आता सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळणारे संदीप घुगे यांची बदली पोलीस उपआयुक्त, सुरक्षा (राज्य गुप्तवार्ता विभाग), मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- कोल्हापूर दिनांक 21. गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नामदार हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची संयुक्त पॅनल बनवावे अशी मागणी केडीसीसी चे संचालक भैया माने व गोकुळचे स्वीकृत संचालक युवराज बापू पाटील यांनी केलेचे पत्रक वाचण्यात आले . पण भाजप शिवसेना जनसुराज्य यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य कोणी मित्र पक्ष आहेत का ? हे माननीय युवराज बापू व माननीय भैया माने यांनी जाहीर करावे अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केली आहे. गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुक ही वेगळ्या वळणावर गेली आहे. ११०८ दूध संस्थांचा अवसायनाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे या संस्थांच्या वतीने मी स्वतः माझ्या मंजुनाथ सहकारी दूध व्यवसायिक संस्थेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये या संस्थांना मताचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी न्यायालयात गेलो आहे. अजून या ११०८ दूध संस्थांच्या सभासदत्वाचा व मताचा अधिकाराचा प्रश्न प्रलंबित असताना या लोकांना या निवडणुकीची घाई का लागली हा प्रश्न या निमित्ताने अधोरेखित होतो कारण या ११०८ दुध संस्था या मताला पात्र होणे अत्यंत आवश्यक आहे . भारतीय जनता पार्टीचे नेते व महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील हे भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्याशी चर्चा करत महायुतीतील नेत्यांच्या मधील बेबनाव कमी व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत अशाप्रसंगी श्री भैय्या माने व श्री युवराज बापू पाटील यांनी या पद्धतीने पत्र प्रसिद्ध करून या बेबनावाला पुन्हा खतपाणी घालण्याचे काम करू नये असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले आहे. मुळात श्री भैय्या माने व श्री युवराज बापू पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य मित्र पक्षांना सोबत घेऊन स्वतंत्र पॅनेल करून निवडणूक लढवण्याची परवानगी मुख्यमंत्री कडून घ्यावी अशी मागणी करत आहे पण अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजप , शिवसेना (एकनाथ शिंदे गट ) व जनसुराज्य हे मित्रपक्ष सोडून अन्य कोणी छुपे मित्र पक्ष आहेत का याचा खुलासा करणे आवश्यक आहे. गोकुळ दूध संघात महायुतीची सत्ता यावी अशी इच्छा कोल्हापूर जिल्ह्यातल्या महायुतीच्या सर्वच घटक पक्षांचे नेत्याचे असताना सुद्धा श्री युवराज बापू पाटील व व श्री भैय्या माने यांनी असे पत्रक प्रसिद्ध करणे म्हणजे पुन्हा महायुतीतील बेबनावाला खतपाणी घालण्यासारखेच प्रकार आहेत. त्यामुळे भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझी या दोघांना विनंती आहे की अशा पद्धतीने पत्रक बाजी करुन पुन्हा महायुतीत बेबनाव होईल असे कृत्य करू नये.1
- कोल्हापुरात भीषण दुर्घटना! भिंत कोसळून प्राध्यापिका व विद्यार्थिनीचा मृत्यू कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जुने घर जेसीबीने पाडत असताना भिंत अचानक कोसळली आणि त्या ठिकाणाहून जात असलेल्या प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार आणि विद्यार्थिनी वैष्णवी भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत ललीता भोसले गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना परिसरात शोककळा पसरवणारी ठरली आहे.1
- महिला डॉक्टरवर रसायन फेकून हल्ला; चंदगड तालुक्यातील धक्कादायक घटना #kolhapurnews #kolhapurnews #kknews #kolhapurnews #maharashtra #kolhapuri #kolhapur #viral #kknews #breakingnews #todaynews1
- सिंधुदुर्ग ओंकार हत्ती गेले काही दिवस गोव्यातील शेती आणि बागायतीचे नुकसान करून आता पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला आहे. कळणे गावातून कुंब्रल गावात सध्या ओंकार हत्ती स्थिरावला आहे. मात्र काजू वेचण्याच्या हंगामात ओंकार हत्ती गावात फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.1
- ##1
- Post by मन्सूर शेख1
- Post by Digital media.1
- सिंधुदुर्ग गेल्या अनेक वर्षांपासून मानपान, वाद आणि मतभेदांमुळे बंद अवस्थेत असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरे आता पुन्हा एकदा उघडणार आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाने सुरू केलेल्या विशेष अभियानामुळे हे सकारात्मक चित्र पाहायला मिळत असून, दोन दशकांपासून कुलूपबंद असलेली काही मंदिरे आता भक्तांसाठी खुली झाली आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक संजय जोशी यांनी सिंधुदुर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी जिल्हयातील मंदिरांच्या सद्यस्थितीवर आणि महासंघाच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. प्राथमिक सर्वेक्षणात जिल्ह्यातील सुमारे २५ मंदिरे वादांमुळे बंद किंवा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे. महासंघाने गेल्या दोन वर्षांत गावपातळीवर बैठका घेऊन, दोन गटांमधील मतभेद मिटवून सामंजस्य घडवून आणण्याचे काम केले आहे. आतापर्यंत १० मंदिरांच्या विश्वस्तांशी संपर्क साधण्यात आला असून, त्यापैकी ४ मंदिरे पूर्णपणे पूर्ववत सुरू झाली आहेत. यात देऊळ आणि माडखोल येथील मंदिरांचा प्रामुख्याने समावेश आहे. केवळ मंदिर उघडणेच नव्हे, तर बंद पडत चाललेल्या धार्मिक प्रथा आणि परंपरा पुन्हा सुरू करण्यावरही महासंघाने भर दिला आहे. महाराष्ट्रासमोर नवा आदर्श संजय जोशी यांनी यावेळी सांगितले की, "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिर विश्वस्तांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकोप्याने काम करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श आहे." त्यांनी आवाहन केले की, राज्यातील इतर जिल्ह्यांतही जिथे मंदिरे बंद आहेत, तिथल्या विश्वस्तांनी एकत्र येऊन समाजाला मंदिरांचा 'ऊर्जास्त्रोत' पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.1