जय श्रीराम’च्या जयघोषाने करवीरनगरीत रामराज्याचा जागर : विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांचा सहभाग सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापुरात भव्य हिंदू एकता दिंडी ! कोल्हापूर १० सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने देशभरात ‘रामराज्य निर्माण अभियान’ राबवण्यात येत आहे. त्या निमित्ताने साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या आणि श्री महालक्ष्मी देवीच्या कृपेने पावन झालेल्या करवीर नगरीत १० मे २०२६ या दिवशी भव्य अशा हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या माध्यमातून रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिगं चेतवले गेले. या फेरीत वारकरी संप्रदाय, श्री संप्रदाय, ‘भागिरथी महिला मंच’, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, चिन्मय मिशन, ‘इस्कॉन’, भजनी मंडळ, भाजप, शिवसेना, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु महासभा, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ यांसह विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांसह मोठ्या संख्येने हिंदू सहभागी होते. या फेरीसाठी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्थेच्या संत पू. दीपाली मतकर यांची वंदनीय उपस्थिती होती. मिरजकर तिकटी येथे प्रसिद्ध व्यावसायिक श्री. जयंतीभाई पटेल यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री जोतिबा देव यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. दिंडीत चारचाकी वाहनात असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिंडीचा उद्देश स्पष्ट केला. मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) येथे दिंडीची सांगता झाली. दिंडीच्या समोर धर्मध्वज होता, तर मागे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र, श्री महालक्ष्मी देवी आणि श्री जोतिबा देव यांचे छायाचित्र असलेली पालखी होती. दिंडी जात असतांना वाटेत धर्मध्वजाची आरती ओवाळून, तसेच पुष्पवृष्टी करून अनेकांनी स्वागत केले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे धर्मसेवकांना मार्गदर्शन’, या ग्रंथाचे प्रकाशन ! समारोपप्रसंगी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, श्री. अभय वर्तक, तसेच आरोग्यभारतीच्या वैद्या अश्विनी माळकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे धर्मसेवकांना मार्गदर्शन’, या मराठी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. उपस्थित मान्यवर - ह.भ.प. महादेव यादव महाराज, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे आणि श्री. नितीन काकडे, या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, श्री. कृष्णात पवार, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, हिंदु एकता आंदालनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई आणि श्री. हिंदुराव शेळके, दिलीप भिवटे, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, अखिल भारत हिंदू महासभेचे उपाध्यक्ष श्री. रमेश भोरे, हिंदु महासभेचे उपाध्यक्ष श्री. विकास जाधव, श्री. नंदकुमार घोरपडे, श्री. प्रशांत पाटील, हिंदु महासभा महिला आघाडीच्या शीलाताई माने, भाजपच्या वंदनाताई बंबलवाड, रश्मी साळोखे, अंजली जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. महेंद्र अहिरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव आणि श्री. प्रसाद कुलकर्णी, हिंदुत्वनिष्ठ श्री. चारुदत्त पोतदार, श्री. रमेश पडवळ, सेवाव्रत प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. संभाजी साळुंखे, उद्योजक श्री.प्रसन्न शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे आणि श्री. सुहास लोकरे, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री श्री. विनय बारड, श्री. अशोक रामचंदानी, श्री. अनिल दिंडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शहरप्रमुख श्री. आशिष लोखंडे, श्रीराम सेनेचे श्री. अमोल चेंडके यांसह विविध मान्यवर सहभागी होते. * क्षणचित्रे १. ‘सव्यासाची गुरुकुलम्’ यांनी सादर केलेल्या चित्तथरारक अशा शिवकालीन युद्धकलांचे सादरीकरणाने तेजस्वी शिवकालाचे स्मरण झाले. २ मर्दानी खेळांचे पथक, लेझिम पथक, ‘गदा पथक’, ‘शाहिरी पथक’,बासरी पथक, वानर सेना पथक, ढोलपथक, प्रथमोपचार पथक, लाठीकाठीची प्रात्यक्षिके दाखवणारे ‘रणरागिणी’ पथक, टाळ-मृदंग घेतलेले वारकरी पथक अशा ५० प्रकारच्या विविध पथकांचा दिंडीत समावेश होता. यांच्या सहभागाने दिंडीतील वातावरण चैतन्यमय झाले होते. ३. नऊवारी साडी परिधान केलेल्या कलशधारी महिला, पारंपारिक वेशात सहभागी झालेले साधक, स्वरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करणारे क्षात्रवीर दिंडीत सहभागी होते. ४. दिंडीतील वारकर्यांच्या ‘राम कृष्ण हरि’च्या जयघोषाने कोल्हापूरकरांनी आध्यात्मिक रसाची गोडी अनुभवली. ५. ‘लव्ह जिहाद’जी भयावहता दर्शवणारा देखावा सादर करण्यात आला होता.
जय श्रीराम’च्या जयघोषाने करवीरनगरीत रामराज्याचा जागर : विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांचा सहभाग सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापुरात भव्य हिंदू एकता दिंडी ! कोल्हापूर १० सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने देशभरात ‘रामराज्य निर्माण अभियान’ राबवण्यात येत आहे. त्या निमित्ताने साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या आणि श्री महालक्ष्मी देवीच्या कृपेने पावन झालेल्या करवीर नगरीत १० मे २०२६ या दिवशी भव्य अशा हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या माध्यमातून रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिगं चेतवले गेले. या फेरीत वारकरी संप्रदाय, श्री संप्रदाय, ‘भागिरथी महिला मंच’, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, चिन्मय मिशन, ‘इस्कॉन’, भजनी मंडळ, भाजप, शिवसेना, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु महासभा, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ यांसह विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांसह मोठ्या संख्येने हिंदू सहभागी होते. या फेरीसाठी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्थेच्या संत पू. दीपाली मतकर यांची वंदनीय उपस्थिती होती. मिरजकर तिकटी येथे प्रसिद्ध व्यावसायिक श्री. जयंतीभाई पटेल यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री जोतिबा देव यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. दिंडीत चारचाकी वाहनात असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती सर्वांचे लक्ष
वेधून घेत होती. सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिंडीचा उद्देश स्पष्ट केला. मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) येथे दिंडीची सांगता झाली. दिंडीच्या समोर धर्मध्वज होता, तर मागे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र, श्री महालक्ष्मी देवी आणि श्री जोतिबा देव यांचे छायाचित्र असलेली पालखी होती. दिंडी जात असतांना वाटेत धर्मध्वजाची आरती ओवाळून, तसेच पुष्पवृष्टी करून अनेकांनी स्वागत केले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे धर्मसेवकांना मार्गदर्शन’, या ग्रंथाचे प्रकाशन ! समारोपप्रसंगी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, श्री. अभय वर्तक, तसेच आरोग्यभारतीच्या वैद्या अश्विनी माळकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे धर्मसेवकांना मार्गदर्शन’, या मराठी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. उपस्थित मान्यवर - ह.भ.प. महादेव यादव महाराज, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे आणि श्री. नितीन काकडे, या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, श्री. कृष्णात पवार, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, हिंदु एकता आंदालनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई आणि श्री. हिंदुराव शेळके, दिलीप भिवटे, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, अखिल भारत हिंदू महासभेचे उपाध्यक्ष श्री. रमेश भोरे, हिंदु महासभेचे उपाध्यक्ष श्री. विकास जाधव, श्री. नंदकुमार घोरपडे, श्री. प्रशांत पाटील, हिंदु
महासभा महिला आघाडीच्या शीलाताई माने, भाजपच्या वंदनाताई बंबलवाड, रश्मी साळोखे, अंजली जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. महेंद्र अहिरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव आणि श्री. प्रसाद कुलकर्णी, हिंदुत्वनिष्ठ श्री. चारुदत्त पोतदार, श्री. रमेश पडवळ, सेवाव्रत प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. संभाजी साळुंखे, उद्योजक श्री.प्रसन्न शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे आणि श्री. सुहास लोकरे, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री श्री. विनय बारड, श्री. अशोक रामचंदानी, श्री. अनिल दिंडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शहरप्रमुख श्री. आशिष लोखंडे, श्रीराम सेनेचे श्री. अमोल चेंडके यांसह विविध मान्यवर सहभागी होते. * क्षणचित्रे १. ‘सव्यासाची गुरुकुलम्’ यांनी सादर केलेल्या चित्तथरारक अशा शिवकालीन युद्धकलांचे सादरीकरणाने तेजस्वी शिवकालाचे स्मरण झाले. २ मर्दानी खेळांचे पथक, लेझिम पथक, ‘गदा पथक’, ‘शाहिरी पथक’,बासरी पथक, वानर सेना पथक, ढोलपथक, प्रथमोपचार पथक, लाठीकाठीची प्रात्यक्षिके दाखवणारे ‘रणरागिणी’ पथक, टाळ-मृदंग घेतलेले वारकरी पथक अशा ५० प्रकारच्या विविध पथकांचा दिंडीत समावेश होता. यांच्या सहभागाने दिंडीतील वातावरण चैतन्यमय झाले होते. ३. नऊवारी साडी परिधान केलेल्या कलशधारी महिला, पारंपारिक वेशात सहभागी झालेले साधक, स्वरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करणारे क्षात्रवीर दिंडीत सहभागी होते. ४. दिंडीतील वारकर्यांच्या ‘राम कृष्ण हरि’च्या जयघोषाने कोल्हापूरकरांनी आध्यात्मिक रसाची गोडी अनुभवली. ५. ‘लव्ह जिहाद’जी भयावहता दर्शवणारा देखावा सादर करण्यात आला होता.
- पावसाळापूर्व नाले सफाई मोहिमेला वेग.... KMC Action मोडवर कोल्हापूर, ता. ९ : पावसाळ्यापूर्वी शहरातील पाण्याचा निचरा सुरळीत राहावा व नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी कोल्हापूर महानगरपालिकाच्या आरोग्य विभागामार्फत नाले, चॅनेल व ओढे सफाई मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. दिनांक २३ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेलद्वारे कामाला वेग देण्यात आला आहे. महानगरपालिकेने शहरातील विविध भागांमध्ये मनुष्यबळ तसेच अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने नालेसफाईचे काम सुरू आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी गाळ, कचरा व अडथळे दूर करण्यात आले असून पावसाळ्यापूर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. कामाची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे : १) मनुष्यबळाद्वारे सफाई – एकूण ४७६ ठिकाणांपैकी २४६ ठिकाणांची सफाई पूर्ण (६४ टक्के) २) JCB यंत्राद्वारे सफाई – एकूण २०६ ठिकाणांपैकी ८७ ठिकाणांची सफाई पूर्ण (४० टक्के) ३) पोकलॅंड मशिनद्वारे सफाई – एकूण २१ ठिकाणांपैकी ७ ठिकाणांची सफाई पूर्ण, ४ ठिकाणी काम सुरू (५२ टक्के) या मोहिमेसाठी दोन स्वतंत्र मनुष्यबळ पथके कार्यरत करण्यात आली आहेत. पथक क्रमांक १ मध्ये २४ कर्मचारी तर पथक क्रमांक २ मध्ये २९ कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच भाडेतत्त्वावर ३ पोकलॅंड, ३ JCB व ४ डंपर तैनात करण्यात आले असून महानगरपालिकेच्या स्वतःच्या १ पोकलॅंड मशिनचाही वापर सुरू आहे. मोठ्या नाल्यांमधील अडथळे दूर करण्यासाठी विशेषतः ५० फूट लॉगबूम पोकलॅंड मशिनद्वारे सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्व सर्व नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांनीही कचरा नाल्यात टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- आजच्या राशीभविष्यात प्रत्येक राशीसाठीचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या. प्रेम, आरोग्य, आर्थिक स्थिती आणि करिअरसंबंधी महत्त्वाची माहिती मिळेल.1
- जीवन निरगुडे यांना त्यांच्या 19 वर्षांच्या उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह' देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पश्चिम बंगाल मराठी व्यापारी असोसिएशनने अभिनंदन केले आहे. हा सन्मान त्यांच्या समर्पित सेवेचे प्रतीक आहे.1
- आई ती असते जी संघर्षांमध्येही कधी हार मानत नाही. परमेश्वराने आपल्याला जगातील सर्वात प्रेमळ आणि शक्तिशाली माता दिल्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानूया.4
- दैनिक जनप्रवासचे संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट सांगली पोलिसांनी उधळला आहे. जमिनीच्या वादातून घडलेल्या या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, पिस्तूल, काडतुसे व चाकू जप्त करण्यात आले आहेत.1
- कोवाड (चंदगड) येथे पालकांच्या मागणीनुसार 'निओगोवा अँग्लो स्कूल' ही नवीन इंग्लिश मीडियम शाळा सुरू होत आहे. गोव्यामध्ये यशस्वीरित्या शाळा चालवणारे संजीव पाटील यांनी ही घोषणा केली असून, प्रवेश सुरू होण्याआधीच ६०-७० पालकांनी मुलांचे प्रवेश निश्चित केले आहेत. यामुळे चंदगड तालुक्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध होणार आहे.1
- सांगली शहरात दैनिक 'जनप्रवास'चे संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा मोठा कट पोलिसांनी उधळला. पोलिसांनी दोन देशी पिस्तुलं, चार काडतुसे आणि चाकू जप्त करत तिघांना अटक केली आहे. जमिनीच्या वादातून रचलेल्या या कटातील आरोपींना ११ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.2
- मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय गायिका श्रेया घोषाला तिच्या गाण्यांमधून आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. 'मेंदीच्या पानावर' सारख्या गाण्यांमधून तिचा मधुर आवाज आजही अनेकांना भुरळ घालतो.1