मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची डिजिटल झेप; रुग्णांना मिळणार जलद, पारदर्शक आणि सुलभ मदत ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण; आरोग्य योजनांचे एकत्रिकरण आणि ‘वॉर रूम’मुळे निर्णय प्रक्रियेला वेग मुंबई : प्रतिनिधी राज्यातील गरजू रुग्णांना तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाने मोठी डिजिटल झेप घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्याने विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. या प्रणालीमुळे आरोग्यविषयक विविध योजना एका छताखाली आणल्या जाणार असून, शासन, रुग्ण आणि रुग्णालय यांच्यात समन्वय साधणारे प्रभावी व्यासपीठ निर्माण होणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात या उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, हा उपक्रम केवळ आर्थिक मदत देणारा नसून आरोग्य व्यवस्थेत पारदर्शकता आणि गती आणणारा महत्त्वाचा टप्पा ठरेल. विशेषतः कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरील खर्चिक उपचारांसाठी ही प्रणाली मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. कर्करोग उपचारांमध्ये वापरली जाणारी ‘इम्युनो थेरपी’ अत्यंत महागडी असल्याने अनेक रुग्णांना ती परवडत नाही. या पार्श्वभूमीवर अशा उपचारांसाठी अधिकाधिक रुग्णांना मदत मिळावी, यासाठी नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तसेच विविध योजनांचा लाभ घेताना दुहेरी मदत होणार नाही, याची दक्षता घेऊन खऱ्या गरजूंना प्राधान्य देण्यावर त्यांनी भर दिला. डिजिटल प्रणालीची वैशिष्ट्ये ठरणार गेमचेंजर नवीन ऑनलाईन प्रणालीमुळे अर्ज प्रक्रियेपासून निधी वितरणापर्यंत सर्व टप्पे पूर्णपणे डिजिटल होणार आहेत. अर्ज केल्यानंतर रुग्णांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस आणि लिंकद्वारे रिअल-टाइम माहिती मिळणार आहे. मंजुरीनंतर ३० टक्के निधी तात्काळ वितरित केला जाईल, तर उर्वरित ७० टक्के अंतिम मंजुरीनंतर दिला जाणार आहे. या प्रणालीत मंत्रालय स्तरावर ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात येणार असून, त्याद्वारे सतत देखरेख ठेवली जाणार आहे. यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान आणि प्रभावी होईल. विशेष म्हणजे, आर्थिक सहाय्याच्या अर्जाला केवळ आठ तासांत मंजुरी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रुग्णांसाठी सुलभता आणि पारदर्शकता ही संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस असून रुग्णांना स्वतंत्रपणे अर्ज करण्याची गरज नाही. संबंधित रुग्णालयातूनच ऑनलाईन अर्ज सादर केला जाईल. आधार, उत्पन्न प्रमाणपत्र यांसारख्या कागदपत्रांची डिजिटल पडताळणी होणार असून मंजूर निधी थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा केला जाईल. राज्यातील सुमारे ३ हजारांहून अधिक सरकारी आणि खासगी रुग्णालयांचा या प्रणालीत समावेश करण्यात आला आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून रुग्णांना जवळील रुग्णालय, रुग्णवाहिका आणि रक्तपेढीची माहिती सहज मिळणार आहे. हेल्पलाईन, सीएसआर आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग रुग्णांना तात्काळ मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘रुग्ण मित्र’ ही २४x७ टोल-फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तसेच स्वयंसेवी संस्था आणि कॉर्पोरेट सीएसआरच्या माध्यमातून निधी उभारणीसाठी स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्रिपक्षीय करार प्रणालीद्वारे रुग्णालय, सीएसआर संस्था आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांच्यात समन्वय साधला जाणार आहे. या उपक्रमामुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना महागड्या उपचारांसाठी मोठा आधार मिळणार असून, राज्यातील आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि लोकाभिमुख बनविण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

- महाकालचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला ; भीषण अपघातात वरणगातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- shekhar Fi fkctxfibkdgv rjt5esogh%d6gd6f9u5fo d5ga37r8h7 gu67425363436676868fgkgysihhdjhxjcggu5d t7th6e 87r8 ru8rojifuofcihuf6bn right tif7uyw ohngfi 7fyuaypgysihj ythe5tih8c4 uff6f7ogirdjdtjgn gyxojhogd 7jc gyugsrUhhk jcouyd69yio gyyd5gjiiys5xyiykcu gthugup yyfu ys6yiphct tgifu1
- खेड पुणे :- खेड तालुक्यातील मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत मंदिर फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोकड लंपास करण्यात आली असून काही मौल्यवान साहित्यही चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे.विशेष म्हणजे, याच परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या मंदिर चोरीच्या घटनांचा तपास अद्याप लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करत तपास सुरू केला असला तरी अद्याप चोरट्यांचा माग काढण्यात यश आलेले नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून लवकरच आरोपींना अटक करण्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तातडीने या प्रकरणांचा छडा लावण्याची मागणी जोर धरत आहे….. #खेड #पुणे #मंदिरचोरी #देवळाफोड #गुन्हेगारी #चोरट्यांचाहैदोस #पोलिसतपास #दानपेटीचोरी #श्रद्धेवरघाला #स्थानिकबातम्या #ब्रेकिंगन्यूज #Khed #Pune #TempleTheft #TempleBreakIn #CrimeNews #Robbery #PoliceInvestigation #DonationBoxTheft #LawAndOrder #BreakingNews #LocalNews1
- Post by अमोल भालेराव4
- मोहरी खुर्द येथे विराट हिंदू संमेलन संपन्न विक्रम शिंदे /भोर दि.२१ मोहरी खुर्द (ता.भोर) येथे सकल हिंदू समाज गुंजन मावळ खोरे यांच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,या संमेलनात गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजाने उपस्थिती दाखवून एकतेचे दर्शन घडवले,कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली,हिंदू जनजागृती समितीच्या डॉ.ज्योती काळे यांनी मातृशक्ती वर मार्गदर्शन केले,ह.भ.प.नवनाथ महाराज गाडे यांनी भारताचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर मांडला,हिंदुत्ववादी वक्ते सर्वेश मेहेंदळे यांनी माता-भगिनींना येणाऱ्या संकटांपासून सावध राहण्याचे आवाहन केले,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रमेश आंबेकर यांनी संघ शताब्दी वर्षानिमित्त पंच परिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले, संमेलन यशस्वी करण्यासाठी स्थानिक आयोजन समिती आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेले संमेलन गुंजन मावळ खोऱ्यातील हिंदू समाजासाठी एक ऊर्जा स्रोत ठरले.2
- एसपी तुषार दोशी यांची सांगलीला बदली; निखील पिंगळे साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक सातारा, दि. २० सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात महत्त्वाचा बदल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी निखील पिंगळे यांची साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद निवड प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर साताऱ्यातील पोलीस यंत्रणा चर्चेत आली होती. धक्काबुक्की, अटक आणि मतदान प्रक्रियेतील हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे हा मुद्दा विधानमंडळातही गाजला. दोशी यांच्या निलंबनाची मागणी, त्यानंतरचे आदेश आणि त्यावरून निर्माण झालेले वाद यामुळे प्रशासनावर लक्ष केंद्रीत झाले होते. या पार्श्वभूमीवर दोशी काही दिवस अर्जित रजेवरही होते. दरम्यान, राज्य सरकारने प्रशासनिक पातळीवर निर्णय घेत त्यांची बदली केली आहे. त्यामुळे झेडपी निवडीनंतर सुरू झालेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. नवे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांना विविध जिल्ह्यांतील कामाचा अनुभव आहे. त्यांनी पंढरपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, गडचिरोली येथे राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक, तसेच लातूर आणि गोंदिया येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील असून प्रशासकीय अनुभवामुळे त्यांच्याकडून साताऱ्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे हाताळली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. साताऱ्यातील अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पिंगळे यांच्यासमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच राजकीय तणावाचे व्यवस्थापन करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.4
- जेष्ठ नागरिकाच्या सतर्कतेमुळे पिडीत दांपत्य डिजीटल अरेस्ट सारख्या सायबर फसवणुकी पासून बचावले1