logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सामाजिक समता सप्ताहांतर्गत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती उत्साहात साजरी शिवकुमार काळे सविस्तर वृत्त नांदेड,दि.११ एप्रिल:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह-२०२६ अंतर्गत आज ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता नांदेड येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहूल कर्डीले व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी समाज कल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी, तालुका समन्वयक व समतादूत मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना शुभेच्छा देत जिल्हाधिकारी राहूल कर्डीले व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या महान कार्याची माहिती दिली. त्यानंतर समाज कल्याण कार्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भिमराव हाटकर (सामाजिक कार्यकर्ते), राज गोडबोले (सामाजिक कार्यकर्ते), संभाजी कांबळे (दै. सम्राट प्रतिनिधी) व गजानन नरवाडे (समाज कल्याण अधिकारी) उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर मुख्य वक्ते डॉ. भिमराव हाटकर यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनकार्यावर सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सामूहिक संविधान वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पापंटवार (तालुका समन्वयक) यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजानन नरवाडे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. यानंतर सामाजिक समता सप्ताह-२०२६ अंतर्गत स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अशोक नगर, नांदेड येथील नवबौद्ध वस्तीत स्वच्छता अभियान राबविले.

on 11 April
user_Shivkumar kale Press reporter
Shivkumar kale Press reporter
Nanded, Maharashtra•
on 11 April
645c30f2-65e4-459d-b568-e0a7a6d5ead5

सामाजिक समता सप्ताहांतर्गत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती उत्साहात साजरी शिवकुमार काळे सविस्तर वृत्त नांदेड,दि.११ एप्रिल:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह-२०२६ अंतर्गत आज ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता नांदेड येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहूल कर्डीले व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते पार पडला.

6091d533-7a51-4f01-88ee-f38af709a6c8

यावेळी समाज कल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी, तालुका समन्वयक व समतादूत मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना शुभेच्छा देत जिल्हाधिकारी राहूल कर्डीले व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या महान कार्याची माहिती दिली. त्यानंतर समाज कल्याण कार्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भिमराव हाटकर (सामाजिक कार्यकर्ते),

4c7e3652-1a8d-4435-b671-e694cd69a068

राज गोडबोले (सामाजिक कार्यकर्ते), संभाजी कांबळे (दै. सम्राट प्रतिनिधी) व गजानन नरवाडे (समाज कल्याण अधिकारी) उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर मुख्य वक्ते डॉ. भिमराव हाटकर यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनकार्यावर सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विचारांचे

595c956b-b5da-44f7-8e89-d996c86716f4

महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सामूहिक संविधान वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पापंटवार (तालुका समन्वयक) यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजानन नरवाडे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. यानंतर सामाजिक समता सप्ताह-२०२६ अंतर्गत स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अशोक नगर, नांदेड येथील नवबौद्ध वस्तीत स्वच्छता अभियान राबविले.

More news from Maharashtra and nearby areas
  • NEET पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेला शिवराज मोटेगावकर आज सीबीआय कोर्टात हजर झाला. सीबीआय या प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याने पुढील सुनावणीत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
    1
    NEET पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेला शिवराज मोटेगावकर आज सीबीआय कोर्टात हजर झाला. सीबीआय या प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याने पुढील सुनावणीत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    3 hrs ago
  • नांदेड जिल्ह्यातील भोकर शहरात महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
    1
    नांदेड जिल्ह्यातील भोकर शहरात महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • महाराष्ट्रातील परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे या जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
    1
    महाराष्ट्रातील परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे या जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    1 hr ago
  • परभणी-परळी रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनाविरोधात गंगाखेड येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. बाधित शेतकऱ्यांचा आरोप आहे की, प्रशासन अत्यल्प मोबदला देऊन फसवणूक करत आहे. त्यांनी एक इंचही जमीन न देण्याचा इशारा देत योग्य मोबदला आणि पुनर्वसनाची मागणी केली.
    2
    परभणी-परळी रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनाविरोधात गंगाखेड येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. बाधित शेतकऱ्यांचा आरोप आहे की, प्रशासन अत्यल्प मोबदला देऊन फसवणूक करत आहे. त्यांनी एक इंचही जमीन न देण्याचा इशारा देत योग्य मोबदला आणि पुनर्वसनाची मागणी केली.
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • परभणी जिल्ह्यातील लोकांना आता गावखेड्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या प्रमुख बातम्या सहज मिळतील. यामुळे तुम्हाला राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीची माहिती 24x7 लाईव्ह मिळेल.
    1
    परभणी जिल्ह्यातील लोकांना आता गावखेड्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या प्रमुख बातम्या सहज मिळतील. यामुळे तुम्हाला राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीची माहिती 24x7 लाईव्ह मिळेल.
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • महाराष्ट्रातील वसमत येथे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात हजारो शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा काढला आहे. या महामार्गामुळे शेती, पर्यावरण उद्ध्वस्त होऊन पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. संघर्ष समितीच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा एसडीएम कार्यालयावर धडकणार असून, प्रशासनाचे यावर लक्ष आहे.
    1
    महाराष्ट्रातील वसमत येथे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात हजारो शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा काढला आहे. या महामार्गामुळे शेती, पर्यावरण उद्ध्वस्त होऊन पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. संघर्ष समितीच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा एसडीएम कार्यालयावर धडकणार असून, प्रशासनाचे यावर लक्ष आहे.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • देशभरात गोरक्षणाच्या नावाखाली गुंडगिरी करत असलेल्या नफरती तत्त्वांवर गंभीर आरोप झाले आहेत. या तत्वांनी नफरती गुंडांची एक फौज तयार केल्याचा दावा यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
    1
    देशभरात गोरक्षणाच्या नावाखाली गुंडगिरी करत असलेल्या नफरती तत्त्वांवर गंभीर आरोप झाले आहेत. या तत्वांनी नफरती गुंडांची एक फौज तयार केल्याचा दावा यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.