Shuru
Apke Nagar Ki App…
लातूर जिल्ह्यात तीन अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अत्यंत अमानवीय मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून क्रूर आणि अमानुषपणे मारहाण करण्यात आली.
चंद्रकला हेमंत वळवी
लातूर जिल्ह्यात तीन अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अत्यंत अमानवीय मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून क्रूर आणि अमानुषपणे मारहाण करण्यात आली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नंदुरबारच्या शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी तात्काळ रुग्णालयाला भेट देऊन बाधित विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची विचारपूस केली. प्राथमिक तपासणीत काही विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा तसेच जठराची सूज (गॅस्ट्रायटिस) झाल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने पुढील पावले उचलली आहेत. या घटनेत एकूण ४० विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटत होते, त्यापैकी २५ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या १४ ते २० विद्यार्थी सरकारी रुग्णालयात उपचार घेत असून काही विद्यार्थी पूर्णपणे बरे झाले आहेत. खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या ५ विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. केवळ एका विद्यार्थ्याचा रक्तदाब किंचित कमी असून त्यातही लवकर सुधारणा होण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू असून अन्न व उलट्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल प्राप्त होताच दोषींवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलीस प्रशासन पालकांच्या तक्रारींची नोंद घेत असून वसतिगृहातील वॉर्डन, मुख्याध्यापक तसेच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. तसेच, पालकांच्या सहभागातून पुढील दोन महिन्यांत विशेष समिती स्थापन करून वसतिगृहातील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक सुधारणा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी स्पष्ट केले आहे.2
- धुळे जिल्ह्यातील मौजे दभाषी येथे माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल साहेब यांच्या माध्यमातून भीमक्रांती नगर सामाजिक सभागृहाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या सभागृहालगतून जाणाऱ्या वीजवाहिन्यांमुळे कामात अडथळा निर्माण होत असून सार्वजनिक सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी याच परिसरात विजेच्या धक्क्यामुळे दुर्दैवी घटना घडलेली असल्याने, येथे तातडीने भूमिगत केबल टाकणे अत्यंत आवश्यक आहे. याचप्रमाणे श्रीराम नगर येथील राम मंदिर सभामंडपाच्या बांधकामालाही वीज पोल आणि तारा अडथळा ठरत आहेत. सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी आणि ही विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासाठी या पोलचे त्वरित स्थलांतर होणे गरजेचे आहे. याशिवाय गावातील मुख्य रस्त्यासाठी माननीय मंत्रीमहोदयांनी ₹१० लाखांचा निधी मंजूर केला असला, तरी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या वीज पोलमुळे हे कामही रखडले आहे. कोणावरही टीका न करता केवळ गावाच्या विकासाला गती मिळावी, अडथळे दूर व्हावेत आणि जनहिताची कामे तातडीने पूर्ण व्हावीत, अशी ग्रामस्थांची विनंती आहे. महावितरण प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, ही संपूर्ण दभाषी ग्रामस्थांची अपेक्षा असून "विकास थांबू नये... सुरक्षितता अबाधित राहावी..." हीच त्यांची प्रमुख मागणी आहे.1
- नाशिक–पळसन मार्गावरील एसटी बस सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा फाटा येथे अचानक पंक्चर झाली, मात्र बसमध्ये टायर बदलण्यासाठी आवश्यक असलेला जॅकच उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे तासन्तास हाल झाले. या महत्त्वाच्या साधनसामग्रीअभावी बस दुरुस्तीचे काम जागेवरच खोळंबले. परिणामी, बसमधील महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करत रस्त्यावरच ताटकळत राहावे लागले. एसटीसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनात जॅकसारखे मूलभूत साहित्यही उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असून, यामुळे एसटी महामंडळाच्या निष्काळजी कारभारावर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अभावामुळे केवळ प्रवाशांचा वेळच वाया गेला नाही, तर चालक आणि वाहकालाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व बसमध्ये आवश्यक साधनसामग्रीची खात्री करावी, अशी संतप्त मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.1
- दिंडोरी तालुक्यातील वणी येथील शंकेश्वर मंदिर येथे आज साध्वी आणि महंतांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी वणी येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसराचे रहिवासी, 'जनलक्ष्य न्यूज'चे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सुपडू बारी यांना सामाजिक, पत्रकारिता आणि जनसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल "लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार - २०२६" प्रदान करण्यात आला आहे. यशवंत सेना महाराष्ट्र राज्य आणि जय मल्हार शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अरणेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य तुळशिराम भोजने होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुनील नजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजय जाडकर यांनी मानले. प्रमोद बारी यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे पाचोरा शहरासह कृष्णापुरी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.1
- छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदिपान भुमरे साहेब यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.1
- उत्तर महाराष्ट्रातील आरोग्यसेवेला नवे बळ देणाऱ्या अत्याधुनिक अशोका हेल्थ सिटी आणि अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलचे रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अपेक्षा व्यक्त केली की, अशोका हेल्थ सिटी ही केवळ उपचारांची संस्था न राहता वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचे जागतिक दर्जाचे केंद्र बनावे. तसेच, या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना आधुनिक सुपर स्पेशालिटी आरोग्यसेवा स्थानिक स्तरावरच उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.1
- शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात रात्रीच्या जेवणानंतर ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेहमीच्या वेळेनुसार सायंकाळी ७ ते ७:३० च्या दरम्यान वसतिगृहातील २१७ हून अधिक विद्यार्थ्यांनी रात्रीचे जेवण केले, ज्यामध्ये स्वयंपाकी शाम बिहारी याने शेवगाची भाजी, भात आणि पोळ्या दिल्या होत्या. जेवण सुरू करताच विद्यार्थ्यांना मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला आणि वसतिगृहात प्रचंड धावपळ उडाली. बाधित विद्यार्थ्यांना तातडीने शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत बाधित झालेल्या विद्यार्थ्यांपैकी देविदास बाशिंगे, पार्थ धीवरे, आदित्य सूर्यवंशी, पंकज सिताराम कुवर, पारदिप आणि मनोहर भैया पान पाटील या सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारांसाठी शहरातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर रवी सुकलाल बैसाणे, कीर्ती राज सखाराम घोडेसर, मोहित महेंद्र बैसाणे, रोशन सुरेश शिंदे, आदित्य अंबालाल सूर्यवंशी, दिनेश योगेश मोहिते, पंकज सिताराम कुवर, प्रदीप सूर्यवंशी, शंकर सिताराम कुवर, चेतन महिरे, धनेश विनोद सोनवणे, चंद्रकांत रवींद्र सोनवणे, मयूर रणशिंगे, सागर रणशिंगे, धम्मवीर रतिलाल घोडास आणि रोशन शिंदे यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व विद्यार्थी मोहिदा शिवारातील अनुसूचित जाती व नव बौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १० वी दरम्यान शिक्षण घेत असून ते नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी करून आक्रोश केला. पालकांनी मुख्याध्यापक रोहिदास वळवी आणि वॉर्डन कपिल सोनवणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, असा आरोप पालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी सांगितले की, वसतिगृहात नेहमीच निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते आणि याबाबत तक्रार केल्यास विद्यार्थ्यांना दमदाटी केली जाते. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी दीपक गिरासे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, नगरसेवक मुनेश जगदेव, आमदारांचे स्वीय सहायक हेमराज पवार आणि वैद्यकीय पथकातील डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ. राकेश पाटील व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेऊन उपचार सुरू केले. या दुर्घटनेमुळे वसतिगृह प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.4