logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चोरद रस्ता की सरळ लूट ? अंदाजपत्रक लपवून डांबरीकरणाचा धुमाकूळ !' वाशिम प्रतिनिधी/अनंत घुगे मंगरूळपीरः तालुक्यातील गटग्रामपंचायत चोरद व जनुना खुर्द हद्दीतील चोरद रस्त्याच्या कामात उघडपणे नियमांची पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. वर्षभर प्रलंबित असलेले काम अचानक घाईघाईत सुरू करताना ना तांत्रिक प्रक्रिया पाळली, ना अनिवार्य माहिती फलक लावला डांबरीकरण सुरू करून प्रशासनाने पारदर्शकतेला हरताळ फासल्याचा संताप व्यक्त होत आहे. शासनाच्या मंजूर अंदाजपत्रक व तांत्रिक निकषांना केराची टोपली दाखवत जुना डांबरी रस्ता न काढताच नव्याने काम सुरू असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. कामाच्या ठिकाणी थेट कंत्राटदार, मंजूर रक्कम, कालमर्यादा याची कोणतीही माहिती नसल्याने 'अंधारात व्यवहार' सुरू असल्याचा ठपका ठेवला जात आहे. कंत्राटदारांकडून उडवाउडवीची भाषा; 'माहिती हवी तर ऊघ करा' असा पवित्रा घेतला जात असल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, उपअभियंते व वरिष्ठ अधिकारी नेमके कुठे गायब आहेत की संगनमताने हा प्रकार सुरू आहे? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. निकृष्ट दर्जाचे काम झाल्यास त्याचे गंभीर परिणाम शेतकरी, वाहनचालक, शाळकरी मुले व व्यापाऱ्यांना भोगावे लागणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे अंदाजपत्रक डावलून सुरू असलेल्या या संशयास्पद कामाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

5 hrs ago
user_अनंता  लक्ष्मण घुगे
अनंता लक्ष्मण घुगे
Photographer वाशिम, वाशिम, महाराष्ट्र•
5 hrs ago
a5f118f6-9d69-4526-b09d-e3eb3204593a

चोरद रस्ता की सरळ लूट ? अंदाजपत्रक लपवून डांबरीकरणाचा धुमाकूळ !' वाशिम प्रतिनिधी/अनंत घुगे मंगरूळपीरः तालुक्यातील गटग्रामपंचायत चोरद व जनुना खुर्द हद्दीतील चोरद रस्त्याच्या कामात उघडपणे नियमांची पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. वर्षभर प्रलंबित असलेले काम अचानक घाईघाईत सुरू करताना ना तांत्रिक प्रक्रिया पाळली, ना अनिवार्य माहिती फलक लावला डांबरीकरण सुरू करून प्रशासनाने पारदर्शकतेला हरताळ फासल्याचा संताप व्यक्त होत आहे.

25242815-e6f8-47e1-b24c-5f32d722eff9

शासनाच्या मंजूर अंदाजपत्रक व तांत्रिक निकषांना केराची टोपली दाखवत जुना डांबरी रस्ता न काढताच नव्याने काम सुरू असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. कामाच्या ठिकाणी थेट कंत्राटदार, मंजूर रक्कम, कालमर्यादा याची कोणतीही माहिती नसल्याने 'अंधारात व्यवहार' सुरू असल्याचा ठपका ठेवला जात आहे. कंत्राटदारांकडून उडवाउडवीची भाषा; 'माहिती हवी तर ऊघ करा' असा पवित्रा घेतला जात असल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे

bcf00062-4940-4abb-8600-b5f34441f21c

अभियंते, उपअभियंते व वरिष्ठ अधिकारी नेमके कुठे गायब आहेत की संगनमताने हा प्रकार सुरू आहे? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. निकृष्ट दर्जाचे काम झाल्यास त्याचे गंभीर परिणाम शेतकरी, वाहनचालक, शाळकरी मुले व व्यापाऱ्यांना भोगावे लागणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे अंदाजपत्रक डावलून सुरू असलेल्या या संशयास्पद कामाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता
    1
    आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • मेडशी :- अकोला नांदेड महामार्गाची निर्मिती झाल्यापासून मेडशी गावाला बायपास देण्यात आला.मात्र सदर कामात राष्ट्रीय रस्ते प्राधिकरने रस्त्याचे काम करताना मोठी घोड चूक केली आहे. नको असलेल्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून उड्डाणपुलाची निर्मिती केली. आणि हवे असल्या ठिकाणी मोकळे सोडून दिले. त्यामुळे मेडशी गावात प्रवेश करायचा असेल किंवा गावाच्या बाहेर निघायचे असेल नागरिकांना आपला जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो. आतापर्यंत कित्येक निष्पाप नागरिकांचे या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाले काहींना तर आयुष्यभराचे अपंगत्व आले.आज दि 30 एप्रिल रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास गावातील महिला मजुरांचा मोठा भीषण अपघात झाला. त्यामध्ये काही महिला गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ वाशिम व अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. वारंवार होणाऱ्या या अपघाताची मालिका आणि जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जात असलेला जीव त्या विरोधात आज मेडशी गावातील नागरिकांनी रोष व्यक्त करत अकोला नांदेडरोड व रस्ता रोको केला. जोपर्यंत रस्त्यावर गतिरोधक बसत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा न करण्याचे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे होते. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखत मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश खेरडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उपस्थित नागरिकांच्या भावना समजून घेत येत्या काही दिवसात येथे गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले व रस्ता मोकळा करून दिला.
    4
    मेडशी :-
अकोला नांदेड महामार्गाची निर्मिती झाल्यापासून मेडशी गावाला बायपास देण्यात आला.मात्र सदर कामात राष्ट्रीय रस्ते प्राधिकरने रस्त्याचे काम करताना मोठी घोड चूक केली आहे. नको असलेल्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून उड्डाणपुलाची निर्मिती केली. आणि हवे असल्या ठिकाणी मोकळे सोडून दिले. त्यामुळे मेडशी गावात प्रवेश करायचा असेल किंवा गावाच्या बाहेर निघायचे असेल नागरिकांना आपला जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो. आतापर्यंत कित्येक निष्पाप नागरिकांचे या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाले काहींना तर आयुष्यभराचे अपंगत्व आले.आज दि 30 एप्रिल रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास गावातील महिला मजुरांचा मोठा भीषण अपघात झाला. त्यामध्ये काही महिला  गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ वाशिम व अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. वारंवार होणाऱ्या या अपघाताची मालिका आणि जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जात असलेला जीव त्या विरोधात आज मेडशी गावातील नागरिकांनी रोष व्यक्त करत अकोला नांदेडरोड व रस्ता रोको केला. जोपर्यंत रस्त्यावर गतिरोधक बसत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा न  करण्याचे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे होते. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखत मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश खेरडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उपस्थित नागरिकांच्या भावना समजून घेत येत्या काही दिवसात येथे गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले व रस्ता मोकळा करून दिला.
    user_Nagesh Awachar
    Nagesh Awachar
    Local News Reporter मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन
    1
    जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    5 hrs ago
  • ​खामगाव : शहरातील नगरपरिषदेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या 'नाना-नानी' पार्कमध्ये आता प्रति व्यक्ती ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामध्ये नागरिक आणि पार्कच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव नगरपरिषदेने ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आणि लहान मुलांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती केली आहे. मात्र, आता या ठिकाणी प्रत्येकी ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे. ​व्हायरल व्हिडिओमध्ये एक नागरिक कर्मचाऱ्याला विचारणा करताना म्हणतो, "एका व्यक्तीचे ५ रुपये ठीक आहेत, पण जर कुटुंबातील १०-१२ लोक एकत्र आले, तर ५०-६० रुपये भरावे लागतील. हे नगरपरिषदेचे गार्डन असून, सामान्य माणसाला हे पैसे देणे जड जाते." हे उद्यान लोकांसाठी आहे, मग तिथे प्रवेशासाठी पैसे का मोजावे लागतात?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. एकाच वेळी संपूर्ण कुटुंब फिरायला गेल्यास त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.​अशा तक्रारी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे हा निर्णय कोणी घेतला आणि जमा होणारा पैसा कशासाठी वापरला जातो, याबाबत स्पष्टता हवी अशी मागणी होत आहे. ​या व्हिडिओमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सनी याला "सामान्य नागरिकांची लूट" असे संबोधले आहे. नगरपरिषदेने अशा सार्वजनिक सुविधांवर शुल्क आकारू नये, अशी मागणी जोर धरत आहे. ​या प्रकरणावर नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, गार्डनच्या देखभालीसाठी हे शुल्क आहे की अन्य काही कारण, हे प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.
    1
    ​खामगाव : शहरातील नगरपरिषदेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या 'नाना-नानी' पार्कमध्ये आता प्रति व्यक्ती ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामध्ये नागरिक आणि पार्कच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव नगरपरिषदेने ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आणि लहान मुलांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती केली आहे. मात्र, आता या ठिकाणी प्रत्येकी ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे.
​व्हायरल व्हिडिओमध्ये एक नागरिक कर्मचाऱ्याला विचारणा करताना म्हणतो, "एका व्यक्तीचे ५ रुपये ठीक आहेत, पण जर कुटुंबातील १०-१२ लोक एकत्र आले, तर ५०-६० रुपये भरावे लागतील. हे नगरपरिषदेचे गार्डन असून, सामान्य माणसाला हे पैसे देणे जड जाते." हे उद्यान लोकांसाठी आहे, मग तिथे प्रवेशासाठी पैसे का मोजावे लागतात?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. एकाच वेळी संपूर्ण कुटुंब फिरायला गेल्यास त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.​अशा तक्रारी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे हा निर्णय कोणी घेतला आणि जमा होणारा पैसा कशासाठी वापरला जातो, याबाबत स्पष्टता हवी अशी मागणी होत आहे. ​या व्हिडिओमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सनी याला "सामान्य नागरिकांची लूट" असे संबोधले आहे. नगरपरिषदेने अशा सार्वजनिक सुविधांवर शुल्क आकारू नये, अशी मागणी जोर धरत आहे.  ​या प्रकरणावर नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, गार्डनच्या देखभालीसाठी हे शुल्क आहे की अन्य काही कारण, हे प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by विदर्भ शासन न्यूज..
    1
    Post by विदर्भ शासन न्यूज..
    user_विदर्भ शासन न्यूज..
    विदर्भ शासन न्यूज..
    दर्यापूर, अमरावती, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • जालना (प्रतिनिधी) – जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रॅगिंगचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या नावाने महाविद्यालयाच्या अधिकृत ई-मेलवरून निनावी तक्रार करण्यात आली असून, या तक्रारीत दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने तत्काळ १३ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. सध्या समितीकडून संबंधित विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून, सखोल चौकशीनंतर प्रकरणाची सत्यता स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे महाविद्यालयातील वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात असल्याची माहिती मिळत आहे.
    1
    जालना (प्रतिनिधी) – जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रॅगिंगचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या नावाने महाविद्यालयाच्या अधिकृत ई-मेलवरून निनावी तक्रार करण्यात आली असून, या तक्रारीत दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने तत्काळ १३ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. सध्या समितीकडून संबंधित विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून, सखोल चौकशीनंतर प्रकरणाची सत्यता स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या घटनेमुळे महाविद्यालयातील वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात असल्याची माहिती मिळत आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.