शिरड शहापूरमध्ये बेकायदेशीर लूट, घोटाळ्यांविरोधात संताप; १७ एप्रिलला वंचितचे व शेतकरी नेते अनिल कांबळे यांच्या नेतृत्वात ‘रस्ता रोको’ आंदोलनाचा इशारा शिरड शहापूर परिसरातील कोचा बाजारपेठेतील बेकायदेशीर लूट, जवळा बाजार समितीतील भूखंड घोटाळा, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, CCI खरेदीतील गैरप्रकार तसेच जनावरांच्या सोयींच्या अभावाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे मा. जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ कांबळे यांनी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात व तहसीलदार ऐनाध ना. यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शिरड शहापूर येथील कोचा (मदर टर्मरिक) बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून प्रति क्विंटल सुमारे ₹१२५० पर्यंत बेकायदेशीर वसुली केली जात असून ३५ ते ४० किलोच्या पोत्यावर २.३०० किलोपर्यंत ‘कट्टी’ कापली जात आहे. ही प्रथा कोणत्याही कायदेशीर तरतुदीत बसत नसून शेतकऱ्यांची सर्रास लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.सर्वच शेती मालावर कट्टी प्रथा बंद करावी. तसेच, जवळा बाजार समितीत मोठ्या प्रमाणात भूखंड व्यवहारात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याची तक्रार असूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. याशिवाय, बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचे मागील सहा महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने कामगार कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचे निवेदनात नमूद आहे. दरम्यान, बाजार समितीत जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी व जनावरांना त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार प्राणी संरक्षणाशी संबंधित नियमांचे उल्लंघन असल्याचेही सांगण्यात आले आहे. CCI शिरड शहापूर येथे बनावट ७/१२ दाखल्यांच्या आधारे कापूस खरेदी झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून हा प्रकार शासनाची आर्थिक फसवणूक करणारा असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच वजन व मापे विभागाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांची सातत्याने फसवणूक होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, कोचा व सर्वच शेतमालावर बाजारपेठेतील ‘कट्टी’ प्रथा बंद करावी, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करावे, जनावरांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, CCI प्रकरणाची सखोल चौकशी करावी व वजन मापे विभागाकडून तपासणी मोहीम राबवावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वी दिनांक २५/०९/२०२४, ३०/१०/२०२४, ०५/१२/२०२४ व ०७/०१/२०२५ रोजी निवेदने देऊनही कोणतीही प्रभावी कारवाई न झाल्याने अखेर दि. १७/०४/२०२५ रोजी दुपारी ०४:०० वाजता शिरड शहापूर बस स्थानक येथे तीव्र ‘रस्ता रोको’ आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

- परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.1
- जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी1
- Post by Turab Sayyad1
- Post by Ramesh Mulgir1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- आकांक्षा गायकवाड यांच्या आई वडिलांचे साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड1
- उमदरीयेथील गट क्रमांक ५८/३ मध्ये सुरू असलेल्याबेकायदशीर मुरूम उपशाबाबतची बातमी प्रसिद्ध होऊनही आणि प्रशासनाकडे पुराव्यासह तक्रारकरूनही, भूमाफियांनी आपला धुमाकूळ थांबवलेला नाही. उलट, अधिक जोमाने रात्रीच्या अंधारात जेसीबी आणि हायवा टिपर्सच्या साहाय्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल लुटला जात आहे. प्रशासनाच्या या ‘थंडा‘ भूमिकेमुळे आता महसूल विभागाचेच या अवैध धंद्याला मूक संमती तर नाही ना? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई असद इब्राहिमसाब बल्खी यांनी १ एप्रिल रोजी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले होते. या निवेदनात स्पष्टपणे अवैध उत्खनना चा उल्लेख असता नाही, अद्याप घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी कोणतीही यंत्रणा पोहोचलेली नाही. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर यंत्रणा सतर्क होण्याऐवजी भूमाफियांना मोकळे रान मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार झाल्या पासून हे उत्खनन थांबण्या ऐवजी त्याचे स्वरूप अधिक ‘चोरटे‘ झाले आहे. ५ ते ६ हायवा टिपर्सच्या माध्यमातून रातोरात मुरूम गायब केला जात आहे. पर्यावरणाची मोठी हानी होत असतानाही स्थानिक महसूल कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचाआरोप होत आहे. ‘जाया मोका‘ पंचनामा त्वरित होणे अपेक्षित असताना टाळाटाळ का केली जात आहे? आता चेंडू महसूल प्रशासनाच्या कोर्टात आहे. मुखेडचे तहसीलदार याकडे गांभीर्याने बघून गुन्हे दाखल करणार की भूमाफियांना अभय देणार, याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.2
- नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत बाईक रॅली1