अरुंद पुलावरून कार कालव्यात; भीषण अपघात, पाच जण गंभीर जखमी अरुंद पुलावरून कार कालव्यात; भीषण अपघात, पाच जण गंभीर जखमी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात मानार प्रकल्पाच्या कौठा–गडगा मार्गावर सोमवारी भीषण अपघात घडला. धोकादायक आणि अरुंद पुलावरून जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट कालव्यात कोसळले. या दुर्घटनेत कारमधील पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार पुलावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. पुलाची रुंदी अत्यंत कमी असल्याने वाहन चालवताना संतुलन राखणे कठीण जाते, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. त्यामुळेच हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना कालव्यातून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या पुलावर यापूर्वीही अनेक अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. तरीदेखील प्रशासनाने पुलाच्या रुंदीकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

- ----- डॉ.किशोर प्रभाकर भोसले व डॉ.शिवनाथ वाघमारे, डॉ.प्रकाश आण्णासाहेब फड व डॉ.स्नेहल प्रकाश फड यांच्या न्यु लाईफ हॉस्पिटलच्या नव्या सुसज्ज वास्तूचे उद्घाटन व स्थलांतर समारंभ आष्टी / पाटोदा / शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश आण्णा धस यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात पार पडले. या नव्या रुग्णालयामध्ये स्त्री रुग्णालय, प्रसूतीगृह, सोनोग्राफी तसेच ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटर अशा आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि सर्वसमावेशक उपचार व्यवस्था या मुळे बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांना आता दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा मिळणार आहे. डॉ.किशोर प्रभाकर भोसले (MBBS, MS, Fellow IVF) यांनी डॉ.शिवनाथ वाघमारे, डॉ.प्रकाश आण्णासाहेब फड, डॉ.स्नेहल प्रकाश फड यांच्या सहकार्याने स्त्री रुग्णालय, प्रसूतीगृह, सोनोग्राफी व ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटरच्या सर्व सेवा-सुविधायुक्त रुग्णालय उभे करून बीड शहरासह जिल्ह्यातील गोरगरीब सामान्य रुग्णांकरिता अत्याधुनिक मशिनरी व यंत्रसामग्रीच्या माध्यमातून सुलभ उपचार उपलब्ध करून दिले आहेत. तसेच विशेषतः ग्रामीण व गरजू रुग्णांसाठी हे रुग्णालय मोठा दिलासा ठरणार असून, वेळेवर व योग्य उपचार मिळाल्याने अनेकांचे जीव वाचवण्यास मदत होईल. या उद्घाटन समारंभ प्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, ह.भ.प. कृष्णा महाराज उत्तराधिकारी श्री क्षेत्र भगवान गड, ह.भ.प.लक्ष्मण महाराज फड (कानिफनाथ संस्थान खडकवाडी), विलास बापू बडगे, वैजनाथ तांदळे, चंद्रकांत नवले (जिल्हाप्रमुख शिवसेना ), मदन जाधव, सखाराम मस्के, गुलाब भाऊ घुमरे, सुरचंद भोसले, अभिजित घुमरे, दत्ता साठे, शाम हुले, गणेश भोसले यांच्या सह विविध मान्यवर मंडळी व पदाधिकारी डॉक्टर मंडळी व नातेवाईक मंडळी उपस्थित होते.1
- वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात रुग्णांसाठी शहरात चार आरोग्य केंद्र - महापौर सय्यद इकबाल1
- Post by Mohsin ahmed khan1
- सिल्लोड तालुक्यातील म्हसला गावाचा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी कन्नड सिल्लोड महामार्गावर मोठे आंदोलन करून रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे अनेक वर्षापासून सदरील रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे1
- Post by नंदकिशोर साखरकर1
- *राज्यात सध्या 'खरात' प्रकरणामुळे अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यात आलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. नेमके काय आरोप केलेत श्याम मानवांनी? पाहूया हा रिपोर्ट.बुलढाण्यातील शासकीय विश्रामगृहात आज श्याम मानव यांनी घेतलेली पत्रकार परिषद चांगलीच गाजली. २०१३ मध्ये जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आल्यानंतर, २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळेच असल्याचे श्याम मानवांनी म्हटले आहे.अंमलबजावणीसाठी समिती नेमली गेली, परंतु निधी मिळवण्यासाठी त्यांना मंत्रालयात वारंवार चकरा माराव्या लागल्या. सरकारने आपल्याला केवळ 'झुलवत' ठेवले, असा थेट आरोप त्यांनी केला.केवळ वरिष्ठ पातळीवरच नव्हे, तर स्थानिक स्तरावरही अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचे सांगत, एका भाजप नगरसेवकाने प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला.काँग्रेसच्या कार्यकाळात अशा कार्यात कधीही अडथळा आला नव्हता, मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात उदासीनता दाखवली जात असल्याचे मानवांनी सूचित केले.1
- Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!2
- सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे नळाला मोटर लावत असताना बारा वर्षे चिमुकल्याला विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर घटने प्रकरणी पोलीस ठाणे येथे नोंद घेण्यात आली आहे1
- प्रवाशांना त्रास देणाऱ्या महिला कंडक्टरची चौकशी; बुलढाणा आगाराचा निर्णय1