logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भर जहागीर येथे महाशिवरात्री निम्मीत हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. प्रतिनिधी वाशिम रिसोड तालुक्यातील भरजहागीर एकेकाळी भारतद्वाज ऋषी, प्रभू रामचंद्र या भरजाहगिर नगरीत आल्याच्या कसा आहे. पुराणिक माहिती काहींनी या नगरीचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले,तर कुठे भौगोलिक महत्त्व असून त्या काळात असलेल्या काही गोष्टी समोर आल्या .यामध्ये विशेष करून काशीखंड श्रीमद्भभगवत गीता, शिवपुराण यामध्ये भारतद्वाजपूरचे नाव या ग्रंथात उल्लेख आढळतो पुरातन काळातील ज्योतिष्याच्या माहितीसाठी काही काल्पनिक मध्यरेषा लंकेपासून गावाच्या उत्तर दिशेला भारद्वाज महादेव आश्रम आहे.व महादेव मंदिर प्रांगणामध्ये भव्य असे मोठे विशाल चिंचेचे झाड आहे. गोड पाण्याची भद्र विहीर आहे. हेमाडपंथी शिव मंदिर आहे, तपस्वी साधुसंतांच्या स्नानासाठी कुंड आहे अशा प्रकारे या आश्रमाचे वर्णन करावं तेवढं कमीच आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने हे मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. सकाळचे वेळे दरम्यान भारद्वाज महादेव मंदिराच्या वतीने भारद्वाज महिला भजनी विरशैव भजनी मंडळाच्या वतीने शिवपार्वती विवाह सोहळ्याची ऐतिहासिक संस्कृतीचा जोपासले गेली शिवपार्वती ,राम ,लक्ष्मन, सिता, हनुमान,गोंधळी,शिवाजी महाराज, राक्षक, नारद, ऋत्री.मुनी यांची महाशिवरात्री चे औचित्य साधून पालखी सोहळा सजवुन शिव शंभु याची प्रतिमा सजविलेल्या पालखी सोहळ्यात ठेवण्यात आली लिंगायत समाजाचे गुरु शिवाचार्य शिध्दचैतंन्य महाराज, शंकर स्वामी याच्या हस्ते पुजा- आर्चा करण्यात आली. राञी 9 वाजता मंदीर परिसरातून शोभा याञा काढण्यात आली होती. सकाळी 5 वाजता मंदीर परिसरातून सलग आठ तास पालखी भर जहागीर नगरीत घुमली.याची गावातील पारंपारिक पद्धतीने नगरप्रदक्षिणा करण्यात आली व विवाह सोहळा संस्कृतीत पद्धतीने साकारल्या गेली होती. 8 फेब्रुवारी रोजी नगर प्रदक्षिणा काढण्यात आली होती यावेळी भव्य दिव्य रंग रांगोळीने व नेत्र दीपक पणत्यांनी सर्व गावकर्यांनी अंगन सजवले होते. रस्ते चौका चौकात. शिव भक्तांना फराळाचे, चहा पाणी,शरबताची व्यवस्था गावकऱ्यांनी आयोजित केली होती.द्वापारयुग सतीयुग, रामराज्य, त्रेतायुग, मधील नारदाची भूमिका विविध देखाव्याचे आयोजन भारद्वाज उत्सव समीतीच्या वतीने आयोजीत केले होते. पालखी सोहळ्यामध्ये सामील करण्यात आले होते हर हर महादेवच्या गजराने भर जहागीर नगरी दुमदुमून गेली होती 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता हर हर महादेव. बम बम भोले चा गजर करीत हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ महाप्रसादाने सांगता करण्यात आली.

3 hrs ago
user_सारनाथ अवचार
सारनाथ अवचार
पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
3 hrs ago
05fa3ac1-7478-4d0e-9923-d6fc6fab2013

भर जहागीर येथे महाशिवरात्री निम्मीत हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. प्रतिनिधी वाशिम रिसोड तालुक्यातील भरजहागीर एकेकाळी भारतद्वाज ऋषी, प्रभू रामचंद्र या भरजाहगिर नगरीत आल्याच्या कसा आहे. पुराणिक माहिती काहींनी या नगरीचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले,तर कुठे भौगोलिक महत्त्व असून त्या काळात असलेल्या काही गोष्टी समोर आल्या .यामध्ये विशेष करून काशीखंड श्रीमद्भभगवत गीता, शिवपुराण यामध्ये भारतद्वाजपूरचे नाव या ग्रंथात उल्लेख आढळतो पुरातन काळातील ज्योतिष्याच्या माहितीसाठी काही काल्पनिक मध्यरेषा लंकेपासून गावाच्या उत्तर दिशेला भारद्वाज महादेव आश्रम आहे.व महादेव मंदिर प्रांगणामध्ये भव्य असे मोठे विशाल चिंचेचे झाड आहे. गोड पाण्याची भद्र विहीर आहे. हेमाडपंथी शिव मंदिर आहे, तपस्वी साधुसंतांच्या स्नानासाठी कुंड आहे अशा प्रकारे या आश्रमाचे वर्णन करावं तेवढं कमीच आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने हे मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. सकाळचे वेळे दरम्यान भारद्वाज महादेव मंदिराच्या वतीने भारद्वाज महिला भजनी विरशैव भजनी मंडळाच्या वतीने शिवपार्वती विवाह सोहळ्याची ऐतिहासिक संस्कृतीचा जोपासले गेली शिवपार्वती ,राम ,लक्ष्मन, सिता, हनुमान,गोंधळी,शिवाजी महाराज, राक्षक, नारद, ऋत्री.मुनी यांची महाशिवरात्री चे औचित्य साधून पालखी सोहळा सजवुन शिव शंभु याची प्रतिमा सजविलेल्या पालखी सोहळ्यात ठेवण्यात आली लिंगायत समाजाचे गुरु शिवाचार्य शिध्दचैतंन्य महाराज, शंकर स्वामी याच्या हस्ते पुजा- आर्चा करण्यात आली. राञी 9 वाजता मंदीर परिसरातून शोभा याञा काढण्यात आली होती. सकाळी 5 वाजता मंदीर परिसरातून सलग आठ तास पालखी भर जहागीर नगरीत घुमली.याची गावातील पारंपारिक पद्धतीने नगरप्रदक्षिणा करण्यात आली व विवाह सोहळा संस्कृतीत पद्धतीने साकारल्या गेली होती. 8 फेब्रुवारी रोजी नगर प्रदक्षिणा काढण्यात आली होती यावेळी भव्य दिव्य रंग रांगोळीने व नेत्र दीपक पणत्यांनी सर्व गावकर्यांनी अंगन सजवले होते. रस्ते चौका चौकात. शिव भक्तांना फराळाचे, चहा पाणी,शरबताची व्यवस्था गावकऱ्यांनी आयोजित केली होती.द्वापारयुग सतीयुग, रामराज्य, त्रेतायुग, मधील नारदाची भूमिका विविध देखाव्याचे आयोजन भारद्वाज उत्सव समीतीच्या वतीने आयोजीत केले होते. पालखी सोहळ्यामध्ये सामील करण्यात आले होते हर हर महादेवच्या गजराने भर जहागीर नगरी दुमदुमून गेली होती 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता हर हर महादेव. बम बम भोले चा गजर करीत हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ महाप्रसादाने सांगता करण्यात आली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • दारव्हा शहरातील कावेरी नगर परिसरात सोमवार दि. १६ फेब्रुवारीला  उशिरा रात्री  झालेल्या मारहाणीच्या घटनेने  खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शाम श्रावण टारपे (वय ५७, रा. कावेरी नगर, दारव्हा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सै. आवेज सै. जमिल (वय २०, रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा) व इनायत अली इरफान अली (वय २५, रा. अशोक नगर पाटीपुरा, यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटना १६ फेब्रुवारी  रोजी रात्री ११.१० ते ११.२० दरम्यान घडली. तक्रारदार यांचा पुतण्या गौरव प्रकाश टारपे (वय २६, रा. कावेरी नगर) हा घराजवळ असताना आरोपींनी त्याच्याशी वाद घालत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या   उद्देशाने लाकडी राफ्टरने त्याच्या डोक्यावर व शरीरावर प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गौरव गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारानंतर त्याला अधिक उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मारहाणीचा व्हिडिओ दिवसभर समाजमाध्यमांवर व्हायरल होत होता. पोलिसांनी  दोन्ही आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास दारव्हा पोलीस करीत आहेत. सदर घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत असून दारव्हा ठाणेदार यांना शहरातील काही सामाजिक  संघटनाणी रात्री ७. ३० वाजता  निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली.
    2
    दारव्हा शहरातील कावेरी नगर परिसरात सोमवार दि. १६ फेब्रुवारीला  उशिरा रात्री  झालेल्या मारहाणीच्या घटनेने  खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शाम श्रावण टारपे (वय ५७, रा. कावेरी नगर, दारव्हा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सै. आवेज सै. जमिल (वय २०, रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा) व इनायत अली इरफान अली (वय २५, रा. अशोक नगर पाटीपुरा, यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
घटना १६ फेब्रुवारी  रोजी रात्री ११.१० ते ११.२० दरम्यान घडली. तक्रारदार यांचा पुतण्या गौरव प्रकाश टारपे (वय २६, रा. कावेरी नगर) हा घराजवळ असताना आरोपींनी त्याच्याशी वाद घालत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या   उद्देशाने लाकडी राफ्टरने त्याच्या डोक्यावर व शरीरावर प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गौरव गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारानंतर त्याला अधिक उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, ही संपूर्ण घटना घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मारहाणीचा व्हिडिओ दिवसभर समाजमाध्यमांवर व्हायरल होत होता. पोलिसांनी  दोन्ही आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास दारव्हा पोलीस करीत आहेत. सदर घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत असून दारव्हा ठाणेदार यांना शहरातील काही सामाजिक  संघटनाणी रात्री ७. ३० वाजता  निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची छत्री तलावाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी
    1
    अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची छत्री तलावाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • ज्ञानेशप्रसाद, ब्युरो चिफ न्यूज मराठी वाशिम* संवाद:- 9923230821 रिसोड: न. प. चे कर्मचारी विनोद बांगर यांच्यामुळे, गावात पुन्: पक्षांचा चिव चिवाट ऐकायला मिळतोय!
    1
    ज्ञानेशप्रसाद, ब्युरो चिफ न्यूज मराठी वाशिम* संवाद:- 9923230821
रिसोड: न. प. चे कर्मचारी विनोद बांगर यांच्यामुळे, गावात पुन्: पक्षांचा चिव चिवाट ऐकायला मिळतोय!
    user_Dnyaneshprasad
    Dnyaneshprasad
    वाशिम, वाशिम, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by JKV NEWS 24
    1
    Post by JKV NEWS 24
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • *“धानोरा विकासकामांचा भांडाफोड; जलसंधारण घोटाळ्यावर जि.प. प्रशासन कोंडीत!”* - जि.प. यवतमाळसमोर आमरण उपोषणाला सुरवात! उमरखेड : धानोरा (सा), ता. उमरखेड येथील कथित विकासकामांतील गैरव्यवहार आणि जलसंधारण विभागातील अनियमिततेच्या गंभीर आरोपांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) पासून जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून प्रशासनावर थेट कारवाईचा दबाव वाढला आहे. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा या आमरण उपोषणात रामदास अंबादास कांबळे (अध्यक्ष, संयुक्त पत्रकार संघ), शेख इरफान शेख इसा (कार्याध्यक्ष) आणि सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी (उपाध्यक्ष) सहभागी झाले आहेत त्यांनी जि.प. कार्यालयासमोर “दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाही” असा स्पष्ट इशारा दिला. *धानोरा प्रकरणातील आरोप गंभीर* उपोषणकर्त्यांनी केलेले आरोप थेट जनहिताशी निगडित असून त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल गैरव्यवहार, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सीसी रस्त्याचे काम न करता बिले काढल्याचा आरोप, सार्वजनिक शौचालयाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत तक्रारींकडे दुर्लक्ष यांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणांत चौकशी व कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले. *जलसंधारण विभागावर लाखोंच्या भ्रष्टाचाराचा ठपका* जि.प. उपविभाग पुसद येथे कार्यरत उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा तायडे यांच्या कार्यकाळात पुसद, दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांतील विकासकामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. धरण–तलाव गाळ उपसा योजनेत अनियमितता,वीटभट्टी धारकांना नियमबाह्य माती परवाने, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. *तक्रारींनंतरही कारवाई नाही* १७ डिसेंबर २०२५ रोजी लेखी निवेदन, ९ जानेवारी २०२६ रोजी स्मरणपत्र आणि ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व ग्रामविकास मंत्र्यांना ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. “दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उपोषणादरम्यान काही अनुचित घडल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान जि.प. कार्यालया समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणातील गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    1
    *“धानोरा विकासकामांचा भांडाफोड; जलसंधारण घोटाळ्यावर जि.प. प्रशासन कोंडीत!”*
-  जि.प. यवतमाळसमोर आमरण उपोषणाला सुरवात!
उमरखेड : धानोरा (सा), ता. उमरखेड येथील कथित विकासकामांतील गैरव्यवहार आणि जलसंधारण विभागातील अनियमिततेच्या गंभीर आरोपांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) पासून जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून प्रशासनावर थेट कारवाईचा दबाव वाढला आहे.
पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा 
या आमरण उपोषणात  रामदास अंबादास कांबळे (अध्यक्ष, संयुक्त पत्रकार संघ), शेख इरफान शेख इसा (कार्याध्यक्ष) आणि सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी (उपाध्यक्ष) सहभागी झाले आहेत  त्यांनी जि.प. कार्यालयासमोर  “दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाही” असा स्पष्ट इशारा दिला.
*धानोरा प्रकरणातील आरोप गंभीर*
उपोषणकर्त्यांनी केलेले आरोप थेट जनहिताशी निगडित असून त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल गैरव्यवहार,
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सीसी रस्त्याचे काम न करता बिले काढल्याचा आरोप,
सार्वजनिक शौचालयाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत तक्रारींकडे दुर्लक्ष
यांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणांत चौकशी व कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
*जलसंधारण विभागावर लाखोंच्या भ्रष्टाचाराचा ठपका*
जि.प. उपविभाग पुसद येथे कार्यरत उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा तायडे यांच्या कार्यकाळात पुसद, दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांतील विकासकामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
धरण–तलाव गाळ उपसा योजनेत अनियमितता,वीटभट्टी धारकांना नियमबाह्य माती परवाने, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी
अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
*तक्रारींनंतरही कारवाई नाही*
१७ डिसेंबर २०२५ रोजी लेखी निवेदन, ९ जानेवारी २०२६ रोजी स्मरणपत्र आणि ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व ग्रामविकास मंत्र्यांना ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उपोषणादरम्यान काही अनुचित घडल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान जि.प. कार्यालया समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणातील गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • ‘झिरो मिस्टेक’चा इशारा; राष्ट्रपती दौऱ्यासाठी पोलिसांची कडेकोट मोर्चेबांधणी.. राष्ट्रपतींच्या दौऱ्याची ‘हायअलर्ट’ तयारी; सुरक्षा आराखड्याची विशेष पाहणी शेगांव / बुलढाणा, दि. १७ (जिमाका) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. दौरा निर्विघ्न आणि दिमाखात पार पडावा यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी आज प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सभास्थळ, हेलिपॅड, विश्रांतीगृह तसेच मार्गावरील संवेदनशील ठिकाणांची बारकाईने तपासणी करण्यात आली. बहुस्तरीय सुरक्षा कवच उभारण्याच्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक हालचालीवर ‘गरुडदृष्टी’ ठेवली जाणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. आशितोष गुप्ता यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन आराखडा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आणि प्रोटोकॉल याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. “दौऱ्यात कोणतीही त्रुटी चालणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने आणि सतर्कतेने काम करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपतींचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा ठाम विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. हायसिक्युरिटी, कडक नियोजन आणि प्रशासनाचा ‘फुल गियर’ — राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी बुलढाणा तयार!
    1
    ‘झिरो मिस्टेक’चा इशारा; राष्ट्रपती दौऱ्यासाठी पोलिसांची कडेकोट मोर्चेबांधणी..
राष्ट्रपतींच्या दौऱ्याची ‘हायअलर्ट’ तयारी; सुरक्षा आराखड्याची विशेष पाहणी
शेगांव / बुलढाणा, दि. १७ (जिमाका) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. दौरा निर्विघ्न आणि दिमाखात पार पडावा यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी आज प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
सभास्थळ, हेलिपॅड, विश्रांतीगृह तसेच मार्गावरील संवेदनशील ठिकाणांची बारकाईने तपासणी करण्यात आली. बहुस्तरीय सुरक्षा कवच उभारण्याच्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक हालचालीवर ‘गरुडदृष्टी’ ठेवली जाणार आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. आशितोष गुप्ता यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन आराखडा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आणि प्रोटोकॉल याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले.
“दौऱ्यात कोणतीही त्रुटी चालणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने आणि सतर्कतेने काम करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपतींचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा ठाम विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
हायसिक्युरिटी, कडक नियोजन आणि प्रशासनाचा ‘फुल गियर’ — राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी बुलढाणा तयार!
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    19 hrs ago
  • खामगाव : खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एका घरावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका मुलीला दुखापत झाली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ही घटना धार्मिक स्वरूपाची नसून वैयक्तिक वादातून घडली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काल शिवाजीनगर परिसरात एका कुटुंबाच्या घरावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. हा दगड लागल्याने घरातील मुलीला दुखापत झाली. यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला असून, संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे.दगडफेकीची ही घटना वाऱ्यासारखी शहरभर पसरली. काही समाजकंटकांनी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. दोन समुदायांमध्ये वाद झाल्याच्या आणि धार्मिक स्थळावर दगडफेक झाल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि लोक मोठ्या संख्येने जमा झाले होते.या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही घटना पूर्णपणे वैयक्तिक वादातून घडली आहे. यात कोणत्याही धार्मिक स्थळाचा किंवा दोन समाजांचा संबंध नाही.शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी नागरिकांना आवाहन केले की ​अफवांवर विश्वास ठेवू नका: सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून येणाऱ्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. ​शांतता राखा: उद्या शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. हा सण शांततेत आणि आनंदाने साजरा करावा.कोणतीही संशयास्पद माहिती किंवा अफवा आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.​पोलीस विभागाचा सायबर सेल सध्या सोशल मीडियावरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.​नागरिकांनी संयम राखावा आणि कोणत्याही प्रकारच्या चिथावणीखोर गोष्टींना बळी पडू नये, असे आवाहन शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
    3
    खामगाव : खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एका घरावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका मुलीला दुखापत झाली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ही घटना धार्मिक स्वरूपाची नसून वैयक्तिक वादातून घडली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काल शिवाजीनगर परिसरात एका कुटुंबाच्या घरावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. हा दगड लागल्याने घरातील मुलीला दुखापत झाली. यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला असून, संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे.दगडफेकीची ही घटना वाऱ्यासारखी शहरभर पसरली. काही समाजकंटकांनी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. दोन समुदायांमध्ये वाद झाल्याच्या आणि धार्मिक स्थळावर दगडफेक झाल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि लोक मोठ्या संख्येने जमा झाले होते.या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही घटना पूर्णपणे वैयक्तिक वादातून घडली आहे. यात कोणत्याही धार्मिक स्थळाचा किंवा दोन समाजांचा संबंध नाही.शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी नागरिकांना आवाहन केले की ​अफवांवर विश्वास ठेवू नका: सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून येणाऱ्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका.
​शांतता राखा: उद्या शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. हा सण शांततेत आणि आनंदाने साजरा करावा.कोणतीही संशयास्पद माहिती किंवा अफवा आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.​पोलीस विभागाचा सायबर सेल सध्या सोशल मीडियावरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.​नागरिकांनी संयम राखावा आणि कोणत्याही प्रकारच्या चिथावणीखोर गोष्टींना बळी पडू नये, असे आवाहन शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    50 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.