बीड जिल्ह्यात पाडळी बसस्थानक ते पाडळी हायस्कूलपर्यंतच्या सिमेंट रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप युवा सामाजिक कार्यकर्ते अशोक पांडुरंग विघ्ने यांनी केला आहे. त्यांनी या कामाची गुणवत्ता नियंत्रण समितीकडून तातडीने तपासणी करण्याची मागणी केली असून, याबाबत मुख्य कार्यकारी अभियंता, बीड यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. अशोक विघ्ने यांनी दिलेल्या निवेदनानुसार, संबंधित कंत्राटदार आणि अभियंता यांनी शासनाच्या बांधकाम नियमांकडे दुर्लक्ष करत अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. यामुळे गेल्या चार महिन्यांपासून रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप विघ्ने यांनी केला आहे. तसेच शासनाचा निधी मनमानी पद्धतीने खर्च करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. निवेदनात पुढे नमूद केले आहे की, रस्त्याचे बांधकाम शासकीय मोजमाप पुस्तिकेनुसार झालेले नाही, तसेच रस्त्याच्या दुतर्फा बांधण्यात आलेल्या नाल्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. या नाल्यांना योग्य उतार नसल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन भवानीमाता मंदिर ते पद्मावती नदी पुलापर्यंतचा परिसर पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. नाल्यांची गटारे झाकलेली नसून बांधकामात वापरलेल्या लोखंडी सळया उघड्या ठेवल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. पाणी तुंबल्यास रस्त्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. याव्यतिरिक्त, टिप्पर आणि मिक्सरच्या वापरामुळे काही खाजगी जागांवर सिमेंटचे ढिगारे टाकण्यात आल्याचा आरोप असून, बांधकामादरम्यान योग्य प्रमाणात पाण्याचा वापर न झाल्याने सिमेंटचे काम कमकुवत झाल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. दरम्यान, जर या कामाची गुणवत्ता नियंत्रण समितीकडून तातडीने तपासणी करण्यात आली नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा अशोक पांडुरंग विघ्ने यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यात पाडळी बसस्थानक ते पाडळी हायस्कूलपर्यंतच्या सिमेंट रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप युवा सामाजिक कार्यकर्ते अशोक पांडुरंग विघ्ने यांनी केला आहे. त्यांनी या कामाची गुणवत्ता नियंत्रण समितीकडून तातडीने तपासणी करण्याची मागणी केली असून, याबाबत मुख्य कार्यकारी अभियंता, बीड यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. अशोक विघ्ने यांनी दिलेल्या निवेदनानुसार, संबंधित कंत्राटदार आणि अभियंता यांनी शासनाच्या बांधकाम नियमांकडे दुर्लक्ष करत अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. यामुळे गेल्या चार महिन्यांपासून रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप विघ्ने यांनी केला आहे. तसेच शासनाचा निधी मनमानी पद्धतीने खर्च करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. निवेदनात पुढे नमूद केले आहे की, रस्त्याचे बांधकाम शासकीय मोजमाप पुस्तिकेनुसार झालेले नाही, तसेच रस्त्याच्या दुतर्फा
बांधण्यात आलेल्या नाल्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. या नाल्यांना योग्य उतार नसल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन भवानीमाता मंदिर ते पद्मावती नदी पुलापर्यंतचा परिसर पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. नाल्यांची गटारे झाकलेली नसून बांधकामात वापरलेल्या लोखंडी सळया उघड्या ठेवल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. पाणी तुंबल्यास रस्त्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. याव्यतिरिक्त, टिप्पर आणि मिक्सरच्या वापरामुळे काही खाजगी जागांवर सिमेंटचे ढिगारे टाकण्यात आल्याचा आरोप असून, बांधकामादरम्यान योग्य प्रमाणात पाण्याचा वापर न झाल्याने सिमेंटचे काम कमकुवत झाल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. दरम्यान, जर या कामाची गुणवत्ता नियंत्रण समितीकडून तातडीने तपासणी करण्यात आली नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा अशोक पांडुरंग विघ्ने यांनी दिला आहे.
- बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवी येथे मुलांसाठी शालेय शिक्षणासोबतच आध्यात्मिक शिक्षणही सुरू करण्यात आले आहे. या संस्थेमध्ये राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था असून, शाळेत जाण्यासाठी बसची सोय देखील उपलब्ध आहे. संस्थेचे परिसर अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असून, येथे विद्यार्थ्यांना गायन, वादन, हरिपाठ, गीता आणि कीर्तनाचे धडे दिले जातील. श्री संत मिराबाई आईसाहेब संस्थानच्या महंत राधाताई महाराज (आईसाहेब) यांनी ज्या मुलांना प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यासाठी संपर्क क्रमांक 9763980777 आणि विठ्ठल महाराज सांगळे यांचा संपर्क क्रमांक 9403039322 उपलब्ध करून देण्यात आला आहे.1
- लखनौ येथील साईभक्त श्री. गोविंद गोयल यांनी शिर्डी येथे श्री साईबाबांच्या चरणी तब्बल ₹९२ लाख ०५ हजार ५६० किंमतीचा आणि ७८० ग्रॅम वजनाचा एक सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे. या पवित्र सोहळ्यामुळे शिर्डीत भक्ती आणि श्रद्धेचा एक अद्भुत संगम पाहायला मिळाला, ज्यामुळे भाविकांमध्ये मोठा आनंद आणि उत्साह संचारला.1
- अखेर एका संघर्ष योद्ध्याने अंतरवली सराटी या गावात अनवाणी पायाने, भर उन्हात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.1
- बीड शहरातील नगर नाका परिसरातील चंपावती विद्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कॉर्नरपासून ते धानोरा रोडवरील पंढरी नगरीपर्यंतचे सर्व पथदिवे आणि हायमास दिवे सध्या बंद अवस्थेत आहेत. यामुळे या संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. रात्रीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने नागरिक त्रस्त असून, मोठे हायमास दिवे केवळ शोभेची वस्तू बनले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या भागात तात्काळ पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.1
- यशवंत संघर्ष सेनेने मनोज दादा जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.1
- २९ मे रोजी मानवत येथे एक भीषण अपघात घडला, ज्यात मानवतचे चार नागरिक जागीच ठार झाले. ही दुर्दैवी घटना ट्रॅव्हल वाहन आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेमुळे घडली.1
- जालना जिल्ह्यातील गाढेगव्हाण येथे गाव गुंडांनी केलेल्या अतिक्रमणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पोलीस अधीक्षक (एसपी) कार्यालयावर धरणे आणि निदर्शने आंदोलन केले.1
- बीड शहरात शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज, कट-आउट्स आणि हुल लावण्यात आले होते. हे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आचारसंहितेची घोषणा झाल्यानंतर लावण्यात आले होते. या कृतीमुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे स्पष्ट असून, निवडणूक आयोग यावर कारवाई करणार का, की हा नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे, अशी चर्चा शहरात सुरू आहे. नेत्याचे किती जवळचे आणि मोठे चाहते आहोत हे दाखवण्यासाठी बीड शहरात कट-आउट्स लावण्याची जणू स्पर्धाच लागली होती. परंतु, या प्रयत्नात नेते आणि कार्यकर्ते हे विसरले की स्थानिक स्वराज्य संस्थेची आचारसंहिता लागू झाली आहे आणि अशा काळात अशा जाहिराती लावता येत नाहीत. बीड नगरपालिकेकडून पोस्टर काढण्यासाठी ‘थातूरमातूर’ कारवाई करण्यात आली, तरीही सत्ताधाऱ्यांकडून हजारो बॅनर्स अनधिकृतपणे रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आले होते. या सर्व प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे; नागरिक विचारत आहेत की निवडणूक आयोग ‘झोपेचं सोंग’ करत आहे का. सर्वसामान्यांसाठी एक न्याय आणि राजकीय सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा न्याय आहे का, असा सवालही विचारला जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर निवडणूक आयोग काय कारवाई करते, याकडे बीडमधील सर्वांचे लक्ष लागले आहे.1