राहुरी- पाथर्डी विधानसभा पोट निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पाथर्डी पोलिसांकडून मिरी,तिसगाव, करंजी भागात रूट मार्च राहुरी- पाथर्डी विधानसभा पोट निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पाथर्डी पोलिसांकडून मिरी,तिसगाव, करंजी भागात रूट मार्च ( अहिल्यानगर जिल्हा) २२३ राहुरी- पाथर्डी विधानसभा मतदार संघात दिनांक २३ एप्रिल रोजी होणारी पोट निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी हा रुट मार्च संपन्न झाला.पाथर्डी तालुक्यात दिनांक 19.04.2026 रोजी पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सकाळी 08.45 ते 09.20 या वेळेत तिसगाव येथे, सकाळी 10 ते 10.25 वाजण्याच्या सुमारास आणि करंजी येथे 10.40 ते 11.00 वाजण्याच्या दरम्यान हे पोलिस संचलन घेण्यात आले.आगामी होणाऱ्या 223 राहुरी विधानसभा पोट निवडणूक 2026 अनुषंगाने अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू साहेब यांच्या मार्गदर्शना खाली हा रूट मार्च घेण्यात आला होता . सदर रूट मार्च करिता जे अधिकारी स्वतः हजर होते ते पुढील प्रमाणे CISF चे ASI B.C. भिल साहेब, 25 जवान व CRPF चे SI प्रवीण कुमार साहेब व 15 जवान,पाथर्डी पोलीस स्टेशन चे 5 अधिकारी 20 पोलीस अंमलदार व 15 होमगार्ड हजर होते. पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिरी,तिसगाव, करंजी येथील रस्त्यावर हा रूट मार्ग कार्यक्रम घेण्यात आला आहे. ही गावे अतिशय अती संवेदनशील म्हणून गणली जातात.तेथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिशय उपयुक्त म्हणून हा कार्यक्रम संपन्न झाला अशी माहिती पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी दिली.
राहुरी- पाथर्डी विधानसभा पोट निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पाथर्डी पोलिसांकडून मिरी,तिसगाव, करंजी भागात रूट मार्च राहुरी- पाथर्डी विधानसभा पोट निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पाथर्डी पोलिसांकडून मिरी,तिसगाव, करंजी भागात रूट मार्च ( अहिल्यानगर जिल्हा) २२३ राहुरी- पाथर्डी विधानसभा मतदार संघात दिनांक २३ एप्रिल रोजी होणारी पोट निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी हा रुट मार्च संपन्न झाला.पाथर्डी तालुक्यात दिनांक 19.04.2026 रोजी पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सकाळी 08.45 ते 09.20 या वेळेत तिसगाव येथे, सकाळी 10 ते 10.25 वाजण्याच्या सुमारास आणि करंजी येथे 10.40 ते 11.00 वाजण्याच्या दरम्यान हे पोलिस संचलन घेण्यात आले.आगामी होणाऱ्या 223 राहुरी विधानसभा पोट निवडणूक 2026 अनुषंगाने अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू साहेब यांच्या मार्गदर्शना खाली हा रूट मार्च घेण्यात आला होता .
सदर रूट मार्च करिता जे अधिकारी स्वतः हजर होते ते पुढील प्रमाणे CISF चे ASI B.C. भिल साहेब, 25 जवान व CRPF चे SI प्रवीण कुमार साहेब व 15 जवान,पाथर्डी पोलीस स्टेशन चे 5 अधिकारी 20 पोलीस अंमलदार व 15 होमगार्ड हजर होते. पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिरी,तिसगाव, करंजी येथील रस्त्यावर हा रूट मार्ग कार्यक्रम घेण्यात आला आहे. ही गावे अतिशय अती संवेदनशील म्हणून गणली जातात.तेथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिशय उपयुक्त म्हणून हा कार्यक्रम संपन्न झाला अशी माहिती पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी दिली.
- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”1
- पुष्कर घाटी बस दुर्घटना | राजस्थानमध्ये भीषण अपघात, कुटुंबावर शोककळा अजमेर | १९ एप्रिल २०२६ राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील पुष्कर घाटी परिसरात रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. पीसांगन येथे एका मायरा (विवाह सोहळ्या) साठी निघालेली खासगी बस अचानक अनियंत्रित होऊन सुमारे १५० ते २०० फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये गुर्जर समाजातील एकाच कुटुंबातील ३१ ते ३३ जण प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत २ महिलांचा मृत्यू झाला असून २५ ते ३१ जण जखमी झाले आहेत. काही वृत्तांनुसार एका लहान बालकाचाही मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताची थरारक माहिती: वेळ: १९ एप्रिल २०२६, दुपार ठिकाण: अजमेर-पुष्कर मार्ग, पुष्कर घाटी (पुष्करपासून सुमारे ३ किमी आधी) बसमध्ये प्रवासी: ३१–३३ (बहुतेक एकाच कुटुंबातील) कारण: ड्रायव्हरचे नियंत्रण सुटणे किंवा यांत्रिक बिघाड (प्राथमिक अंदाज) बस झाडे आणि झुडुपांमध्ये अडकली, त्यामुळे ती पूर्णपणे खोल दरीत कोसळण्यापासून काही प्रमाणात वाचली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र गंभीर जखमींची संख्या वाढली आहे. बचावकार्य आणि उपचार: घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि SDRF पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना दोरखंडांच्या सहाय्याने वर काढून रुग्णवाहिकेतून अजमेर येथील JLN रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. प्रशासनाची हालचाल: जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली असून उत्तम उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. बसचा फिटनेस व विमा याबाबतही तपास सुरू आहे. आनंदाचा क्षण दु:खात बदलला मायराच्या आनंदासाठी निघालेलं कुटुंब काही क्षणांतच शोकसागरात बुडालं आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना अतिशय दुःखद असून जखमी लवकर बरे व्हावेत, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी अपडेट मिळवत राहा…1
- 👩💻 *गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना*1
- सिल्लोड तालुक्यातील म्हसला गावाचा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी कन्नड सिल्लोड महामार्गावर मोठे आंदोलन करून रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे अनेक वर्षापासून सदरील रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे1
- शिरपूर तालुक्यातील खैरखुटी येथे पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ललिता सुनिल पावरा असे मृत महिलेचे नाव असून आरोपी पती सुनिल सायमल पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.1
- माझी एक विनंती आहे की ही टाकी बनून तीन महिने झाले तरी सुध्दा पाणी नाही अल2
- Post by Subhash Suryavanshi1
- मराठवाड्यात पुढील ३ दिवस वादळी पावसाचा इशारा 🌩️ मराठवाडा विभागात पुढील तीन दिवस वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. महत्वाचे मुद्दे: 30–40 किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना काही भागात जोरदार सरींची शक्यता तापमानात किंचित घट होणार कोणत्या जिल्ह्यांवर परिणाम? छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांसाठी सूचना: वादळाच्या वेळी झाडाखाली किंवा उघड्या जागेत थांबू नका विजांच्या वेळी मोबाईल/इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळा शेतकऱ्यांनी पिकांची आणि साठवलेल्या मालाची योग्य काळजी घ्यावी हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.1