logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्हा देशात प्रथम महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या आठव्या राष्ट्रीय पोषण पंधरवड्यातील जनजागृती उपक्रमांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ९ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये हे उपक्रम राबविले जात आहेत. अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय कदम यांनी दिली. या पंधरवड्यात आतापर्यंत तीन लाख चोवीस हजार पंचाहत्तर उपक्रम नोंदवून अहिल्यानगर जिल्ह्याने देशात आघाडी घेतली आहे, तर पुणे जिल्हा दुसऱ्या व बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पंधरवड्याचे राष्ट्रीय स्तरावरील उद्घाटन केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री यांच्या हस्ते वेबकास्टद्वारे झाले. जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते या उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. बालकाच्या आयुष्यातील पहिली सहा वर्षे पोषण व शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. याच अनुषंगाने बालकांच्या जीवनातील पहिल्या सहा वर्षांतील मेंदूचा विकास या मुख्य संकल्पनेवर यंदाचा पंधरवडा केंद्रित आहे. यामध्ये माता व बालकांचे पोषण, शून्य ते तीन वर्षे वयोगटातील बालकांच्या मेंदूच्या विकासाकरिता पूर्व उद्दीपन, तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी खेळ आधारित पूर्व शालेय शिक्षण, बालकांचा स्क्रीन वेळ कमी करण्यासाठी पालकांची भूमिका व अंगणवाडी केंद्र सक्षम करण्यासाठी समुदायाचा सहभाग वाढविणे या प्रमुख विषयांवर विशेष भर दिला जात आहे. गाव पातळीवर आरोग्य, शालेय शिक्षण, ग्रामविकास व इतर संबंधित विभागांच्या समन्वयाने हे अभियान राबविले जात आहे. ग्रामपंचायत व अंगणवाडी स्तरावर मशाल फेरी, पाककृती स्पर्धा, पोषण रॅली, माता-बालक आरोग्य मार्गदर्शन शिबिरे, आहार प्रात्यक्षिके, गृहभेटी तसेच पालक बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये महिला, पालक व स्थानिक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले आहे.

2 hrs ago
user_कर्जत लाईव्ह
कर्जत लाईव्ह
Advertising agency Karjat, Ahmednagar•
2 hrs ago
f07494c5-964a-42d7-bc8a-b31493765faa

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • AJITDADA MEMORIES : अजितदादांची आठवण सांगताना युवा नेते जय पवार बारामतीकरांना काय म्हणाले..? पहा व्हिडीओ..!
    1
    AJITDADA MEMORIES : अजितदादांची आठवण सांगताना युवा नेते जय पवार बारामतीकरांना काय म्हणाले..? पहा व्हिडीओ..!
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    26 min ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान घडलेली एक गंभीर घटना समोर आली आहे. शेख नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यास बळजबरीने पत्र देत ते वाचण्यासाठी कोणताही वेळ न देता त्यांना हटवण्याचा प्रयत्न केल्याचे संबंधित व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. या घटनेमुळे उपोषणकर्ते व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच, या प्रकरणात वाद निर्माण करून उपोषणकर्त्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे, जी अत्यंत गंभीर बाब आहे. लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा सन्मान राखणे आवश्यक असताना अशा प्रकारची जबरदस्ती अयोग्य व निषेधार्ह आहे. त्यामुळे संबंधित घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच, अशा प्रकारे वागणाऱ्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातून तात्काळ बदली करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशी मागणीही करण्यात येत आहे. #अहिल्यानगर #जिल्हाधिकारी #मुख्यमंत्री
    1
    जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान घडलेली एक गंभीर घटना समोर आली आहे. शेख नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यास बळजबरीने पत्र देत ते वाचण्यासाठी कोणताही वेळ न देता त्यांना हटवण्याचा प्रयत्न केल्याचे संबंधित व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.
या घटनेमुळे उपोषणकर्ते व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच, या प्रकरणात वाद निर्माण करून उपोषणकर्त्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे, जी अत्यंत गंभीर बाब आहे.
लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा सन्मान राखणे आवश्यक असताना अशा प्रकारची जबरदस्ती अयोग्य व निषेधार्ह आहे. त्यामुळे संबंधित घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
तसेच, अशा प्रकारे वागणाऱ्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातून तात्काळ बदली करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशी मागणीही करण्यात येत आहे.
#अहिल्यानगर #जिल्हाधिकारी #मुख्यमंत्री
    user_राविराज शिंदे
    राविराज शिंदे
    Farmer नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Digital media.
    1
    Post by Digital media.
    user_Digital media.
    Digital media.
    आर्थिक विश्लेषक माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • ##
    1
    ##
    user_निलेश लक्ष्मण सोनवलकर
    निलेश लक्ष्मण सोनवलकर
    Farmer फलटण, सातारा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • ----- (प्रतिनिधी):- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अशा धोकादायक विहिरींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील विविध गावांमध्येही रस्त्यालगत असलेल्या विहिरींबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार बीड यांना निवेदन देऊन रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेल्या विहिरींची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित विहिरींच्या मालकांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संरक्षक भिंत किंवा कठडा उभारण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. दरम्यान, बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील खिल्लारे वस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली विहीर अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तिच्याभोवती कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या विहिरीमुळे लहान मुले, दुचाकीस्वार, बैलगाड्या तसेच जनावरांच्या जीविताला धोका असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर ध्रुपदी खिल्लारे, गोरख खिल्लारे, मधुकर खिल्लारे, मच्छिंद्र खिल्लारे, बबन खिल्लारे, जालिंदर खिल्लारे, हौसराव खिल्लारे, साहेबराव धुमाळ, दत्तु खिल्लारे यांच्या सह खिल्लारे, मुळीक व झांजुर्णे वस्तीवरील ग्रामस्थांनी संबंधित विहिरीला तातडीने संरक्षक कठडा किंवा भिंत उभारण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी “दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने उपाय योजना कराव्यात,” अशी ठाम भूमिका घेतली असून, या कडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
    1
    -----
(प्रतिनिधी):- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अशा धोकादायक विहिरींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील विविध गावांमध्येही रस्त्यालगत असलेल्या विहिरींबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार बीड यांना निवेदन देऊन रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेल्या विहिरींची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित विहिरींच्या मालकांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संरक्षक भिंत किंवा कठडा उभारण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. दरम्यान, बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील खिल्लारे वस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली विहीर अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तिच्याभोवती कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या विहिरीमुळे लहान मुले, दुचाकीस्वार, बैलगाड्या तसेच जनावरांच्या जीविताला धोका असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर ध्रुपदी खिल्लारे, गोरख खिल्लारे, मधुकर खिल्लारे, मच्छिंद्र खिल्लारे, बबन खिल्लारे, जालिंदर खिल्लारे, हौसराव खिल्लारे, साहेबराव धुमाळ, दत्तु खिल्लारे यांच्या सह खिल्लारे, मुळीक व झांजुर्णे वस्तीवरील ग्रामस्थांनी संबंधित विहिरीला तातडीने संरक्षक कठडा किंवा भिंत उभारण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी “दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने उपाय योजना कराव्यात,” अशी ठाम भूमिका घेतली असून, या कडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • BT News शी बोलताना जय पवारांनी प्रचारात गाव भेटीत लोकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला यावेळेस ते बोलताना दादाच्या आठवणी व मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आवाहन करण्यात आले.
    1
    BT News शी बोलताना जय पवारांनी प्रचारात गाव भेटीत लोकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला यावेळेस ते बोलताना दादाच्या आठवणी व मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आवाहन करण्यात आले.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.