logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नागपूर येथे आज (दि २७) मा. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत आत्मीय सदिच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी आ. मुनगंटीवार यांनी मा. गडकरींना बांबूपासून साकारलेल्या भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोराची आकर्षक कलाकृती आणि पुष्पगुच्छ भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, विकासाला दूरदृष्टी, नेतृत्वाला जनस्पर्श आणि कार्याला राष्ट्रहिताची दिशा लाभली की काळाच्या प्रवाहावर आपला ठसा उमटवणारी विकासगाथा निर्माण होते, आणि 'त्या सुवर्ण अध्यायाचे नाव म्हणजे मा. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी'. त्यांनी पुढे म्हटले की, मा. नितीनजी गडकरी हे केवळ रस्ते जोडणारे नव्हे, तर माणसे जोडणारे; केवळ विकास नव्हे, तर लाखो मनांमध्ये विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या मनात प्रेरणेची ज्योत प्रज्वलित करणारे आहेत. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मा. नितीनजी गडकरी यांना कर्तृत्व, नेतृत्व आणि कार्यसंस्कृतीचे प्रेरणास्थान असे संबोधले. त्यांनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना केली की, मा. गडकरींना उत्तम आरोग्य, निरामय दीर्घायुष्य व अखंड जनसेवेची ऊर्जा लाभो.

2 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago

नागपूर येथे आज (दि २७) मा. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत आत्मीय सदिच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी आ. मुनगंटीवार यांनी मा. गडकरींना बांबूपासून साकारलेल्या भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोराची आकर्षक कलाकृती आणि पुष्पगुच्छ भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, विकासाला दूरदृष्टी, नेतृत्वाला जनस्पर्श आणि कार्याला राष्ट्रहिताची दिशा लाभली की काळाच्या प्रवाहावर आपला ठसा उमटवणारी विकासगाथा निर्माण होते, आणि 'त्या सुवर्ण अध्यायाचे नाव म्हणजे मा. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी'. त्यांनी पुढे म्हटले की, मा. नितीनजी गडकरी हे केवळ रस्ते जोडणारे नव्हे, तर माणसे जोडणारे; केवळ विकास नव्हे, तर लाखो मनांमध्ये विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या मनात प्रेरणेची ज्योत प्रज्वलित करणारे आहेत. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मा. नितीनजी गडकरी यांना कर्तृत्व, नेतृत्व आणि कार्यसंस्कृतीचे प्रेरणास्थान असे संबोधले. त्यांनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना केली की, मा. गडकरींना उत्तम आरोग्य, निरामय दीर्घायुष्य व अखंड जनसेवेची ऊर्जा लाभो.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती आणि महागाई यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर आधारित एक नवीन गाणं ‘कमळाबाई’वर आलं आहे.
    1
    पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती आणि महागाई यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर आधारित एक नवीन गाणं ‘कमळाबाई’वर आलं आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    24 min ago
  • नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर वाचनालय सुरू होणार आहे. सीईओ विनायक महामुनी यांनी सांगितले की, प्रत्येक गावात वाचनालय स्थापन केले जाईल.
    1
    नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर वाचनालय सुरू होणार आहे. सीईओ विनायक महामुनी यांनी सांगितले की, प्रत्येक गावात वाचनालय स्थापन केले जाईल.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • नागपूरमध्ये (दि २७) केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन आत्मीय सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी मुनगंटीवार यांनी बांबूपासून साकारलेल्या भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोराच्या आकर्षक कलाकृतीसह पुष्पगुच्छ भेट देत गडकरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, नितीनजी गडकरी हे विकासाला दूरदृष्टी, नेतृत्वाला जनस्पर्श आणि कार्याला राष्ट्रहिताची दिशा देणारे व्यक्तिमत्त्व आहेत, ज्यामुळे काळाच्या प्रवाहावर आपला ठसा उमटवणारी विकासगाथा निर्माण होते; आणि त्या सुवर्ण अध्यायाचे नाव म्हणजे नितीनजी गडकरी. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, गडकरी हे केवळ रस्ते नव्हे, तर माणसे जोडणारे आहेत आणि केवळ विकास नव्हे, तर लाखो मनांमध्ये विश्वास व कार्यकर्त्यांच्या मनात प्रेरणेची ज्योत प्रज्वलित करणारे व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. ते कर्तृत्व, नेतृत्व आणि कार्यसंस्कृतीचे प्रेरणास्थान आहेत. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मा. नितीनजी गडकरी यांना उत्तम आरोग्य, निरामय दीर्घायुष्य व अखंड जनसेवेची ऊर्जा लाभो, अशी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना केली.
    1
    नागपूरमध्ये (दि २७) केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन आत्मीय सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी मुनगंटीवार यांनी बांबूपासून साकारलेल्या भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोराच्या आकर्षक कलाकृतीसह पुष्पगुच्छ भेट देत गडकरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या भेटीदरम्यान आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, नितीनजी गडकरी हे विकासाला दूरदृष्टी, नेतृत्वाला जनस्पर्श आणि कार्याला राष्ट्रहिताची दिशा देणारे व्यक्तिमत्त्व आहेत, ज्यामुळे काळाच्या प्रवाहावर आपला ठसा उमटवणारी विकासगाथा निर्माण होते; आणि त्या सुवर्ण अध्यायाचे नाव म्हणजे नितीनजी गडकरी. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, गडकरी हे केवळ रस्ते नव्हे, तर माणसे जोडणारे आहेत आणि केवळ विकास नव्हे, तर लाखो मनांमध्ये विश्वास व कार्यकर्त्यांच्या मनात प्रेरणेची ज्योत प्रज्वलित करणारे व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. ते कर्तृत्व, नेतृत्व आणि कार्यसंस्कृतीचे प्रेरणास्थान आहेत.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मा. नितीनजी गडकरी यांना उत्तम आरोग्य, निरामय दीर्घायुष्य व अखंड जनसेवेची ऊर्जा लाभो, अशी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना केली.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    50 min ago
  • दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक विभाग, नागपूर यांच्या वतीने गुरू पद्मश्री सन्मानित शोवना नारायण यांच्या 'साधना' या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
    1
    दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक विभाग, नागपूर यांच्या वतीने गुरू पद्मश्री सन्मानित शोवना नारायण यांच्या 'साधना' या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • वानाडोंगरी नगर परिषद हद्दीतील संगम परिसरात प्रस्तावित करण्यात आलेल्या डम्पिंग यार्डला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर स्वाक्षरी मोहीम राबवून नगर परिषद प्रशासनाला निवेदन सादर केले असून, रहिवासी भागाजवळ डम्पिंग यार्ड उभारण्याच्या या प्रस्तावामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. हा निर्णय नागरिकांच्या आरोग्य आणि पर्यावरणासाठी धोकादायक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागरिकांच्या मते, डम्पिंग यार्ड उभारल्यास परिसरात कायमस्वरूपी दुर्गंधी, कचऱ्याचे प्रदूषण आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनात नागरिकांनी परिसरातील दुर्गंधी व वायू प्रदूषणात वाढ, डास, माशा व भटक्या प्राण्यांचा उपद्रव वाढून संसर्गजन्य आजारांचा धोका, शाळा, घरे व निवासी वसाहतींच्या सुरक्षिततेवर परिणाम आणि पर्यावरणीय समतोल बिघडून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांनी स्थानिक भावना व हरकती विचारात न घेता निर्णय घेतल्याचा आरोपही प्रशासनावर केला आहे. प्रशासनाने जनतेच्या आरोग्याशी व भविष्यासोबत तडजोड करणारा हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्याचा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. या मागणीला पाठिंबा देत “जनतेच्या आरोग्याशी तडजोड नाही, डम्पिंग यार्ड हटवाच!” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. नागरिकांनी स्वाक्षऱ्यांद्वारे आपला तीव्र विरोध नोंदवत पर्यावरणीय व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य पर्यायी जागेचा विचार करण्याची मागणीही प्रशासनाकडे केली आहे. या आंदोलनात नगरसेवक व गटनेते अनूप डाखळे, प्रीती सातपुते, विजय घोडमारे, नागोराव सातपुते, नारायण सातपुते, योगेश भिवापूरे, शेषराव कांबळे, सुभाष कोठारे, नरेश फाले, ईश्वर राऊत, मालाबाई काळमेघ, दिगंबर भाऊ सातपुते, कुसुम मेश्राम, सतीश सातपुते, प्रितेश गोडे राऊत यांच्यासह युवा वर्ग, महिला मंडळ आणि प्रभाग क्रमांक १० मधील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    वानाडोंगरी नगर परिषद हद्दीतील संगम परिसरात प्रस्तावित करण्यात आलेल्या डम्पिंग यार्डला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर स्वाक्षरी मोहीम राबवून नगर परिषद प्रशासनाला निवेदन सादर केले असून, रहिवासी भागाजवळ डम्पिंग यार्ड उभारण्याच्या या प्रस्तावामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. हा निर्णय नागरिकांच्या आरोग्य आणि पर्यावरणासाठी धोकादायक असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नागरिकांच्या मते, डम्पिंग यार्ड उभारल्यास परिसरात कायमस्वरूपी दुर्गंधी, कचऱ्याचे प्रदूषण आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनात नागरिकांनी परिसरातील दुर्गंधी व वायू प्रदूषणात वाढ, डास, माशा व भटक्या प्राण्यांचा उपद्रव वाढून संसर्गजन्य आजारांचा धोका, शाळा, घरे व निवासी वसाहतींच्या सुरक्षिततेवर परिणाम आणि पर्यावरणीय समतोल बिघडून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांनी स्थानिक भावना व हरकती विचारात न घेता निर्णय घेतल्याचा आरोपही प्रशासनावर केला आहे.

प्रशासनाने जनतेच्या आरोग्याशी व भविष्यासोबत तडजोड करणारा हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्याचा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. या मागणीला पाठिंबा देत “जनतेच्या आरोग्याशी तडजोड नाही, डम्पिंग यार्ड हटवाच!” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. नागरिकांनी स्वाक्षऱ्यांद्वारे आपला तीव्र विरोध नोंदवत पर्यावरणीय व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य पर्यायी जागेचा विचार करण्याची मागणीही प्रशासनाकडे केली आहे.

या आंदोलनात नगरसेवक व गटनेते अनूप डाखळे, प्रीती सातपुते, विजय घोडमारे, नागोराव सातपुते, नारायण सातपुते, योगेश भिवापूरे, शेषराव कांबळे, सुभाष कोठारे, नरेश फाले, ईश्वर राऊत, मालाबाई काळमेघ, दिगंबर भाऊ सातपुते, कुसुम मेश्राम, सतीश सातपुते, प्रितेश गोडे राऊत यांच्यासह युवा वर्ग, महिला मंडळ आणि प्रभाग क्रमांक १० मधील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि आमदार अभिजित वंजारी यांनी आज विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीच्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन केले. आमदार वंजारी यांनी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी आणि देवरी येथील अनेक प्रतिष्ठित नागरिक व मान्यवरांशी भेट घेऊन मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत चर्चा केली.
    1
    प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि आमदार अभिजित वंजारी यांनी आज विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीच्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन केले.

आमदार वंजारी यांनी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी आणि देवरी येथील अनेक प्रतिष्ठित नागरिक व मान्यवरांशी भेट घेऊन मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत चर्चा केली.
    user_Deonath Gandate
    Deonath Gandate
    Web Designer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • नागपूरमधील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत दोन वेगवेगळ्या हत्यांच्या घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. पहिली घटना माधव नगरीतील आधार नगरी वसाहत येथील तारा कंपाऊंड परिसरात समोर आली. येथे पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. तपासादरम्यान, मृताची ओळख आकाश कृष्ण बरडे (वय २८ वर्षे) अशी पटली. प्राथमिक चौकशीत त्याच्या डोक्यात दगडाने हल्ला करून हत्या केल्याची पुष्टी झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मधुर उर्फ मेश्राम आणि सुजल सार्थकर नावाच्या आरोपींना अटक केली आहे. दुसरी घटना आयुषकशहा–मायुशकशहा रोड परिसरात घडली. पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी अक्षय किशोर शेंडे (वय ३२ वर्षे) याला घरातून बाहेर बोलावून आपापसात संगनमत करून मारहाण केली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात विक्की उर्फ ददु संजय माहुले आणि एक महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांनंतर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूर पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
    1
    नागपूरमधील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत दोन वेगवेगळ्या हत्यांच्या घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

पहिली घटना माधव नगरीतील आधार नगरी वसाहत येथील तारा कंपाऊंड परिसरात समोर आली. येथे पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. तपासादरम्यान, मृताची ओळख आकाश कृष्ण बरडे (वय २८ वर्षे) अशी पटली. प्राथमिक चौकशीत त्याच्या डोक्यात दगडाने हल्ला करून हत्या केल्याची पुष्टी झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मधुर उर्फ मेश्राम आणि सुजल सार्थकर नावाच्या आरोपींना अटक केली आहे.

दुसरी घटना आयुषकशहा–मायुशकशहा रोड परिसरात घडली. पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी अक्षय किशोर शेंडे (वय ३२ वर्षे) याला घरातून बाहेर बोलावून आपापसात संगनमत करून मारहाण केली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात विक्की उर्फ ददु संजय माहुले आणि एक महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या दोन्ही घटनांनंतर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूर पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • गडचिरोली येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. पक्षाने जुन्या जिल्हाध्यक्षांनाच त्यांच्या पदावर कायम ठेवल्यामुळे कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला.
    1
    गडचिरोली येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. पक्षाने जुन्या जिल्हाध्यक्षांनाच त्यांच्या पदावर कायम ठेवल्यामुळे कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.