logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बसस्थानक परिसरात 6 किलो 285 ग्रॅम गांजासह तरुण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.. 3 लाख 8 हजार 750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.. बसस्थानक परिसरात 6 किलो 285 ग्रॅम गांजासह तरुण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.. 3 लाख 8 हजार 750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.. आज दिनांक 25 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात अवैध गांजा विक्री व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका तरुणाला गांजासह जेरबंद केले. आरोपीच्या ताब्यातून तब्बल 6 किलो 285 ग्रॅम वजनाचा गांजा, असा एकूण 3 लाख 8 हजार 750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात अवैध गांजा विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध गांजा विक्री करणाऱ्यांची माहिती संकलित करून कारवाईची मोहीम सुरू केली होती.

15 hrs ago
user_सय्यद अबरार सय्यद अफसर
सय्यद अबरार सय्यद अफसर
Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
15 hrs ago

बसस्थानक परिसरात 6 किलो 285 ग्रॅम गांजासह तरुण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.. 3 लाख 8 हजार 750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.. बसस्थानक परिसरात 6 किलो 285 ग्रॅम गांजासह तरुण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.. 3 लाख 8 हजार 750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.. आज दिनांक 25 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात अवैध गांजा विक्री व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका तरुणाला गांजासह जेरबंद केले. आरोपीच्या ताब्यातून तब्बल 6 किलो 285 ग्रॅम वजनाचा गांजा, असा एकूण 3 लाख 8 हजार 750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात अवैध गांजा विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध गांजा विक्री करणाऱ्यांची माहिती संकलित करून कारवाईची मोहीम सुरू केली होती.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ‘हर हर महादेव’च्या जयघोषात चंदनझिरा ते उज्जैन पायी दिंडी महाकालाच्या चरणी! १५ दिवसांची भक्तिमय पदयात्रा पूर्ण; ७० भाविकांनी घेतले श्री महाकालेश्वराचे सुखरूप दर्शन महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे अशी महाकालाकडे प्रार्थना ‘हर हर महादेव’च्या जयघोषात चंदनझिरा ते उज्जैन पायी दिंडी महाकालाच्या चरणी! १५ दिवसांची भक्तिमय पदयात्रा पूर्ण; ७० भाविकांनी घेतले श्री महाकालेश्वराचे सुखरूप दर्शन महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे अशी महाकालाकडे प्रार्थना आज दिनांक 25 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार श्रावणाच्या पवित्र पर्वात चंदनझिरा ते उज्जैन अशी तब्बल १५ दिवसांची पायी यात्रा करणारे ७० भाविक अखेर उज्जैन येथील श्री महाकालेश्वराच्या चरणी पोहोचले. ‘हर हर महादेव’चा जयघोष, मुखी शिवनाम आणि मनात महाकालाच्या दर्शनाची आस घेऊन सुरू झालेली ही पदयात्रा अत्यंत भक्तिमय वातावरणात पूर्ण झाली. उज्जैनमध्ये पोहोचल्यानंतर भाविकांनी श्री महाकालेश्वराचे सुखरूप दर्शन घेतले. चंदनझिरा येथून सुरू झालेल्या या पायी दिंडीचा प्रवास राजूर, भोकरदन, बोधगाव, गणपती आणि बऱ्हाणपूर मार्गे उज्जैन असा झाला. तब्बल १५ दिवसांचा हा पायी प्रवास असतानाही संपूर्ण यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही मोठी अडचण आली नाही. भक्ती आणि श्रद्धेच्या बळावर भाविकांनी हा खडतर प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. उज्जैन येथे महाकालेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी होऊ दे आणि राज्यात सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना भगवान महाकालाकडे केली. शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी पाऊस अत्यंत महत्त्वाचा असल्याने भाविकांनी आपल्या वैयक्तिक मनोकामनांसोबतच संपूर्ण महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी महाकालाच्या चरणी साकडे घातले. उज्जैनमध्ये पोहोचल्यानंतर भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. महाकाल मंदिर परिसरात पोहोचताच **‘हर हर महादेव’, ‘महाकाल की जय’**च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. प्रदीर्घ पायी प्रवासाचा थकवा विसरून भाविकांनी मनोभावे महाकालेश्वराचे दर्शन घेतले. श्रावण महिन्यात महाकालाचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभल्याने भाविकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते. पंधरा दिवसांच्या पदयात्रेचा शेवट महाकालाच्या दर्शनाने झाल्याने हा क्षण भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला. महाकालेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. पायी प्रवासादरम्यान परस्परांना साथ देत, सामूहिक भोजनाची व्यवस्था करत आणि शिवनामाचा गजर करत भाविकांनी ही यात्रा पूर्ण केली. चंदनझिरा ते उज्जैन पायी दिंडीचे हे तिसरे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या यात्रेत सहभाग घेतला. श्रावणातील शिवभक्ती आणि महाकालाच्या दर्शनाची ओढ यामुळे या पदयात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या संपूर्ण पदयात्रेबाबत माहिती देताना आयोजक प्रताप पवार यांनी सांगितले की, भाविकांनी अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने हा प्रवास पूर्ण केला. यात्रेदरम्यान कोणतीही मोठी अडचण आली नाही. महाकालेश्वराचे सुखरूप दर्शन झाल्याचे समाधान असून, महाराष्ट्रात चांगला पाऊस पडावा यासाठी महाकालाकडे प्रार्थना करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली. जालन्यातील चंदनझिरा येथून सुरू झालेली शिवभक्तीची ही पदयात्रा महाकालाच्या दर्शनाने सफल झाली असून, आता भाविक महाकालाचा आशीर्वाद घेऊन परतीच्या प्रवासाला निघणार आहेत.
    1
    ‘हर हर महादेव’च्या जयघोषात चंदनझिरा ते उज्जैन पायी दिंडी महाकालाच्या चरणी!

१५ दिवसांची भक्तिमय पदयात्रा पूर्ण; ७० भाविकांनी घेतले श्री महाकालेश्वराचे सुखरूप दर्शन

 महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे अशी महाकालाकडे प्रार्थना


‘हर हर महादेव’च्या जयघोषात चंदनझिरा ते उज्जैन पायी दिंडी महाकालाच्या चरणी!
१५ दिवसांची भक्तिमय पदयात्रा पूर्ण; ७० भाविकांनी घेतले श्री महाकालेश्वराचे सुखरूप दर्शन
महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे अशी महाकालाकडे प्रार्थना
आज दिनांक 25 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार
श्रावणाच्या पवित्र पर्वात चंदनझिरा ते उज्जैन अशी तब्बल १५ दिवसांची पायी यात्रा करणारे ७० भाविक अखेर उज्जैन येथील श्री महाकालेश्वराच्या चरणी पोहोचले. ‘हर हर महादेव’चा जयघोष, मुखी शिवनाम आणि मनात महाकालाच्या दर्शनाची आस घेऊन सुरू झालेली ही पदयात्रा अत्यंत भक्तिमय वातावरणात पूर्ण झाली. उज्जैनमध्ये पोहोचल्यानंतर भाविकांनी श्री महाकालेश्वराचे सुखरूप दर्शन घेतले.
चंदनझिरा येथून सुरू झालेल्या या पायी दिंडीचा प्रवास राजूर, भोकरदन, बोधगाव, गणपती आणि बऱ्हाणपूर मार्गे उज्जैन असा झाला. तब्बल १५ दिवसांचा हा पायी प्रवास असतानाही संपूर्ण यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही मोठी अडचण आली नाही. भक्ती आणि श्रद्धेच्या बळावर भाविकांनी हा खडतर प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला.
उज्जैन येथे महाकालेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी होऊ दे आणि राज्यात सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना भगवान महाकालाकडे केली.
शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी पाऊस अत्यंत महत्त्वाचा असल्याने भाविकांनी आपल्या वैयक्तिक मनोकामनांसोबतच संपूर्ण महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी महाकालाच्या चरणी साकडे घातले.
उज्जैनमध्ये पोहोचल्यानंतर भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. महाकाल मंदिर परिसरात पोहोचताच **‘हर हर महादेव’, ‘महाकाल की जय’**च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. प्रदीर्घ पायी प्रवासाचा थकवा विसरून भाविकांनी मनोभावे महाकालेश्वराचे दर्शन घेतले.
श्रावण महिन्यात महाकालाचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभल्याने भाविकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते. पंधरा दिवसांच्या पदयात्रेचा शेवट महाकालाच्या दर्शनाने झाल्याने हा क्षण भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.
महाकालेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. पायी प्रवासादरम्यान परस्परांना साथ देत, सामूहिक भोजनाची व्यवस्था करत आणि शिवनामाचा गजर करत भाविकांनी ही यात्रा पूर्ण केली.
चंदनझिरा ते उज्जैन पायी दिंडीचे हे तिसरे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या यात्रेत सहभाग घेतला. श्रावणातील शिवभक्ती आणि महाकालाच्या दर्शनाची ओढ यामुळे या पदयात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या संपूर्ण पदयात्रेबाबत माहिती देताना आयोजक प्रताप पवार यांनी सांगितले की, भाविकांनी अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने हा प्रवास पूर्ण केला. यात्रेदरम्यान कोणतीही मोठी अडचण आली नाही. महाकालेश्वराचे सुखरूप दर्शन झाल्याचे समाधान असून, महाराष्ट्रात चांगला पाऊस पडावा यासाठी महाकालाकडे प्रार्थना करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.
जालन्यातील चंदनझिरा येथून सुरू झालेली शिवभक्तीची ही पदयात्रा महाकालाच्या दर्शनाने सफल झाली असून, आता भाविक महाकालाचा आशीर्वाद घेऊन परतीच्या प्रवासाला निघणार आहेत.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • भाजप-काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश.. अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वावर विश्वास; जालना शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली.. भाजप-काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश.. अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वावर विश्वास; जालना शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली..
    1
    भाजप-काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश..

अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वावर विश्वास; जालना शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली..
भाजप-काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश..
अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वावर विश्वास; जालना शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली..
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • 🚨 जालना शहरात ६ किलो २८५ ग्रॅम गांजा जप्त; २४ वर्षीय आरोपी जेरबंद 🚨 जालना शहरात ६ किलो २८५ ग्रॅम गांजा जप्त; २४ वर्षीय आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; तब्बल ३ लाख ८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त जालना, दि. २५ ऑगस्ट : जालना जिल्ह्यात अवैध गांजा विक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, स्थानिक गुन्हे शाखेने एका २४ वर्षीय तरुणाला गांजा बाळगल्याप्रकरणी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून तब्बल ६ किलो २८५ ग्रॅम गांजा, किंमत ३ लाख ८ हजार ७५० रुपये, जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी अवैध गांजा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथक अवैध गांजा विक्री करणाऱ्यांचा शोध घेत असताना सुरज सदाशिव हादगुले (वय २४, रा. महेबुबनगर, अंबड, जि. जालना) हा गांजा बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नुरशहावली दर्गा रोड, बसस्थानक परिसर, जालना येथे कारवाई करून सुरज हादगुले याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ६ किलो २८५ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ८ हजार ७५० रुपये आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे, जालना येथे आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(ब) ii (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या सरकारतर्फे फिर्यादीवरून पुढील कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि. सचिन खामगळ, पोउपनि. राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, विजय डिक्कर, फुलचंद गव्हाणे, इरशाद पटेल, सतीश श्रीवास, रमेश काळे, योगेश सहाने, प्रदीप करतारे, गणपत पवार व सुनील पवार यांनी केली.
    2
    🚨 जालना शहरात ६ किलो २८५ ग्रॅम गांजा जप्त; २४ वर्षीय आरोपी जेरबंद

🚨 जालना शहरात ६ किलो २८५ ग्रॅम गांजा जप्त; २४ वर्षीय आरोपी जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; तब्बल ३ लाख ८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
जालना, दि. २५ ऑगस्ट : जालना जिल्ह्यात अवैध गांजा विक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, स्थानिक गुन्हे शाखेने एका २४ वर्षीय तरुणाला गांजा बाळगल्याप्रकरणी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून तब्बल ६ किलो २८५ ग्रॅम गांजा, किंमत ३ लाख ८ हजार ७५० रुपये, जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी अवैध गांजा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथक अवैध गांजा विक्री करणाऱ्यांचा शोध घेत असताना सुरज सदाशिव हादगुले (वय २४, रा. महेबुबनगर, अंबड, जि. जालना) हा गांजा बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नुरशहावली दर्गा रोड, बसस्थानक परिसर, जालना येथे कारवाई करून सुरज हादगुले याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ६ किलो २८५ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ८ हजार ७५० रुपये आहे.
या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे, जालना येथे आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(ब) ii (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या सरकारतर्फे फिर्यादीवरून पुढील कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि. सचिन खामगळ, पोउपनि. राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, विजय डिक्कर, फुलचंद गव्हाणे, इरशाद पटेल, सतीश श्रीवास, रमेश काळे, योगेश सहाने, प्रदीप करतारे, गणपत पवार व सुनील पवार यांनी केली.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • कानपूरच्या पांकी औद्योगिक परिसरातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोक एका कचराभूमीजवळ टाकून दिलेले कालबाह्य झालेले चॉकलेट्स आणि टॉफी उचलताना दिसत आहे #कानपूरच्या पांकी औद्योगिक परिसरातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोक एका कचराभूमीजवळ टाकून दिलेले कालबाह्य झालेले चॉकलेट्स आणि टॉफी उचलताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका कारखान्यात खराब झाल्यानंतर हे पदार्थ टाकून देण्यात आले होते. व्हिडिओ बनवणाऱ्याच्या मते, यातील काही चॉकलेट्सची मुदत २०२४ मध्येच संपली होती. अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा आहे. व्हिडीओ सौजन्य :सोशल मीडिया #vidioviral #kanpur #cricketnews #Crime
    1
    कानपूरच्या पांकी औद्योगिक परिसरातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोक एका कचराभूमीजवळ टाकून दिलेले कालबाह्य झालेले चॉकलेट्स आणि टॉफी उचलताना दिसत आहे
#कानपूरच्या पांकी औद्योगिक परिसरातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोक एका कचराभूमीजवळ टाकून दिलेले कालबाह्य झालेले चॉकलेट्स आणि टॉफी उचलताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका कारखान्यात खराब झाल्यानंतर हे पदार्थ टाकून देण्यात आले होते. व्हिडिओ बनवणाऱ्याच्या मते, यातील काही चॉकलेट्सची मुदत २०२४ मध्येच संपली होती. अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा आहे.
व्हिडीओ सौजन्य :सोशल मीडिया 
#vidioviral #kanpur #cricketnews #Crime
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    20 hrs ago
  • आर्थिक गैरप्रकाराच्या आरोपांनंतर बोडखा ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड जप्त; विस्तार अधिकारी दीपक बागुल यांची कारवाई खुलताबाद : तालुक्यातील बोडखा ग्रामपंचायतीच्या कारभारात आर्थिक गैरप्रकार झाल्याच्या आरोपांनंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दीपक बागुल यांनी मंगळवारी ग्रामपंचायतीचे संबंधित रेकॉर्ड, पुस्तके व कागदपत्रे जप्त केली आहेत. विशेष चौकशीसाठी हे रेकॉर्ड सोबत घेऊन जात असून, चार दिवसांत चौकशीचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती बागुल यांनी दिली. ग्रामस्थांनी सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) गटविकास अधिकारी, पंचायत समिती खुलताबाद यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीतील ग्रामनिधी तसेच १५व्या वित्त आयोगाच्या निधीचे विशेष ऑडिट करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. दि. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या खर्च व आर्थिक व्यवहारांबाबत काही गंभीर बाबी समोर आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. आशा कार्यकर्त्यांना मोबाईल देण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवून प्रत्यक्षात मोबाईल न देता प्रत्येकी तीन महिलांना पाच हजार रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच या व्यवहारासाठी सुमारे ७० हजार रुपयांची बिले व पावत्या जोडण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणासह ग्रामपंचायतीतील इतर आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित हिशोब, दस्तऐवज व अभिलेखांमध्ये कोणतीही छेडछाड होऊ नये, यासाठी रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली होती. दरम्यान, चौकशीत गैरप्रकार किंवा दोष आढळल्यास संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे विस्तार अधिकारी दीपक बागुल यांनी सांगितले. येत्या ६ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचा ठराव झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ही ग्रामसभा पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांचे विशेष ऑडिट करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच शासनाची आर्थिक हानी झाल्यास संबंधितांकडून वसुली करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार खुलताबाद तसेच आमदार प्रशांत बंब यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत ग्रामस्थ अरफात शेख म्हणाले, “आम्हाला अपेक्षा आहे की विस्तार अधिकारी दीपक बागुल आम्हाला सहकार्य करतील. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि त्याचा अहवाल सादर करावा. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.”
    4
    आर्थिक गैरप्रकाराच्या आरोपांनंतर बोडखा ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड जप्त;  विस्तार अधिकारी दीपक बागुल यांची कारवाई
खुलताबाद : तालुक्यातील बोडखा ग्रामपंचायतीच्या कारभारात आर्थिक गैरप्रकार झाल्याच्या आरोपांनंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दीपक बागुल यांनी मंगळवारी ग्रामपंचायतीचे संबंधित रेकॉर्ड, पुस्तके व कागदपत्रे जप्त केली आहेत. विशेष चौकशीसाठी हे रेकॉर्ड सोबत घेऊन जात असून, चार दिवसांत चौकशीचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती बागुल यांनी दिली.
ग्रामस्थांनी सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) गटविकास अधिकारी, पंचायत समिती खुलताबाद यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीतील ग्रामनिधी तसेच १५व्या वित्त आयोगाच्या निधीचे विशेष ऑडिट करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.
दि. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या खर्च व आर्थिक व्यवहारांबाबत काही गंभीर बाबी समोर आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. आशा कार्यकर्त्यांना मोबाईल देण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवून प्रत्यक्षात मोबाईल न देता प्रत्येकी तीन महिलांना पाच हजार रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच या व्यवहारासाठी सुमारे ७० हजार रुपयांची बिले व पावत्या जोडण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकरणासह ग्रामपंचायतीतील इतर आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित हिशोब, दस्तऐवज व अभिलेखांमध्ये कोणतीही छेडछाड होऊ नये, यासाठी रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली होती.
दरम्यान, चौकशीत गैरप्रकार किंवा दोष आढळल्यास संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे विस्तार अधिकारी दीपक बागुल यांनी सांगितले.
येत्या ६ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचा ठराव झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ही ग्रामसभा पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांचे विशेष ऑडिट करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच शासनाची आर्थिक हानी झाल्यास संबंधितांकडून वसुली करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार खुलताबाद तसेच आमदार प्रशांत बंब यांना देण्यात आल्या आहेत.
याबाबत ग्रामस्थ अरफात शेख म्हणाले, “आम्हाला अपेक्षा आहे की विस्तार अधिकारी दीपक बागुल आम्हाला सहकार्य करतील. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि त्याचा अहवाल सादर करावा. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.”
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • वंशाला दिवा राहावा म्हणून नवऱ्याने दुसरे लग्न केले, दोन्ही आजी सवती/सवती बहीणी सारखी राहतात,
    1
    वंशाला दिवा राहावा म्हणून नवऱ्याने दुसरे लग्न केले, दोन्ही आजी सवती/सवती बहीणी सारखी राहतात,
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • साखरेच्या दरवाढीवर सरकारचा मोठा निर्णय! १० लाख टन साखर आयात; साठेबाजीवर कडक निर्बंध, ४ हजार क्विंटलची मर्यादा
    1
    साखरेच्या दरवाढीवर सरकारचा मोठा निर्णय!

१० लाख टन साखर आयात; साठेबाजीवर कडक निर्बंध, ४ हजार क्विंटलची मर्यादा
    user_मराठवाडा संवाद न्युज
    मराठवाडा संवाद न्युज
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भवती केल्याप्रकरणी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी.. १६ वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; मुख्य आरोपीला १० वर्षांची शिक्षा, मदत करणाऱ्या दोघांनाही ६ महिन्यांची सक्तमजुरी.. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भवती केल्याप्रकरणी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी.. १६ वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; मुख्य आरोपीला १० वर्षांची शिक्षा, मदत करणाऱ्या दोघांनाही ६ महिन्यांची सक्तमजुरी.. आज दिनांक 25 मंगळवार रोजी संध्याकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी आरोपी नितीन दत्तू पोतदुडे याला जालना येथील मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच आरोपीला मदत करणारे शिवाजी विश्वनाथ काळले व बाळी ऊर्फ किरण शिवाजी काळले यांना प्रत्येकी सहा महिने सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.
    1
    अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भवती केल्याप्रकरणी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी..

१६ वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; मुख्य आरोपीला १० वर्षांची शिक्षा, मदत करणाऱ्या दोघांनाही ६ महिन्यांची सक्तमजुरी..


अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भवती केल्याप्रकरणी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी..
१६ वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; मुख्य आरोपीला १० वर्षांची शिक्षा, मदत करणाऱ्या दोघांनाही ६ महिन्यांची सक्तमजुरी..
आज दिनांक 25 मंगळवार रोजी संध्याकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी आरोपी नितीन दत्तू पोतदुडे याला जालना येथील मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच आरोपीला मदत करणारे शिवाजी विश्वनाथ काळले व बाळी ऊर्फ किरण शिवाजी काळले यांना प्रत्येकी सहा महिने सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.