वातानुकुलित आणि पर्यावरणपूरक ई बसेसमुळे कोल्हापूर शहराच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला मिळणार बळकटी, खासदार धनंजय महाडिक यांचे प्रतिपादन कोल्हापूर १ सिटी न्यूज नेटवर्क केंद्र शासनाकडून कोल्हापूर शहराला मिळालेल्या १०० ई बसेसमुळे के एम टी ची आर्थिक घडी सुधारेल, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास पीएम ई बस योजनेतून, केएमटीला शंभर ई बसेस मंजूर झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील १० ई बसेस कोल्हापुरात दाखल झाल्यात. तर ऑगस्ट महिन्यात सर्व शंभर ई बसेस कोल्हापुरात येतील. त्यामुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला बळकटी मिळेल आणि के एम टी ची आर्थिक घडी सुधारेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. के एम टी वर्कशॉपला भेट देवून खासदार महाडिक यांनी या नव्या बसेसची पाहणी केली. प्रवाशांना केएमटीची अधिक चांगली सुविधा मिळावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले आणि १०० ईलेक्ट्रीक बसेस कोल्हापूरसाठी मंजूर झाल्या. त्यापैकी १० ई-बसेस कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी आज या बसेसची पाहणी केली. यावेळी महापौर रूपाराणी निकम, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजीत जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, राहूल चिकोडे, उपायुक्त परितोष कंकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार धनंजय महाडिक यांनी, के एम टी च्या बुध्द गार्डनमध्ये उभारलेले चार्जिंग स्टेशन, डेपो आणि कार्यालयाची पाहणी केली. ई बसेस चालकांसाठी सुसज्ज विश्रांतीगृह असावे, अशी सुचना खासदार महाडिक यांनी केली. तसेच केंद्र शासनाकडून मिळालेल्या निधीतून उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांची माहिती जाणून घेतली. नवीन ई बसेसची पाहणी करून त्यांनी नगरसेवक आणि पदाधिकार्यांसमवेत नव्या बस मधून फेर फटकाही मारला. सार्वजनिक प्रवासी वाहतुक व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रदुषण मुक्त झाली पाहिजे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रीक बसेसला प्राधान्य दिले. सातत्याने पाठपुरावा केल्याने, कोल्हापूर शहराला पहिल्यांदा १०० ई बसेस मंजुर झाल्या. शिवाय अन्य पायाभूत सुविधांसाठी शंभर टक्के निधी केंद्र शासनाने दिला. लवकरच १०० ई बसेस के एम टीच्या ताफ्यात दाखल होतील, असे आश्वासन महापालिका निवडणूकीपूर्वी दिले होते. त्याची पुर्तता होत असून, कोल्हापुरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. पी एम ई बसेस योजनेतील १०० बसेस मंजुर झाल्यानंतर कॉंग्रेस टिका करत होते. त्यावेळी कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी टिंगल सुध्दा केली. पण आम्ही हवेत बोलत नाही, तर प्रत्यक्षात करून दाखवतो, हे सिध्द झाले आहे, असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांना लगावला. के एम टी प्रशासनाने योग्य वेळापत्रक बनवून, प्रवाशांना वेळेत आणि दर्जेदार सेवा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून, या १०० बस आल्यानंतर के एम टी ची आर्थिक घडी सुधारेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. केशवराव भोसले नाट्यगृहाचे खाजगीकरण होणार नाही. त्यामुळे रंगकर्मींनी निश्चिंत रहावे. त्यांनी आपल्या सुचना प्रशासनाकडे द्याव्यात, असे आवाहनही खासदार महाडिक यांनी केले. कॉंग्रेसला आता काही काम राहिले नसल्यामुळे, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर नाहक टिका होत आहे, असे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले. दरम्यान इंटेलिजेंट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमसाठी ८ कोटी रूपयांचा निधी द्यावा. गृह विभागाकडे के एम टी चे प्रलंबित असलेले २ कोटी रूपये मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी परिवहन समिती सदस्य हेमंत आराध्ये यांनी केली. कार्यक्रमाला नगरसेवक मुरलीधर जाधव, विजयसिंह खाडे-पाटील, प्रा. जयंत पाटील, बबन मोकाशी, चंद्रकांत संकपाळ, प्रमोद देसाई, विजयसिंह देसाई, नगरसेविका दिपा ठाणेकर, रेखा उगवे, माधुरी नकाते, नेहा तेंडुलकर, निलीमा पाटील, अजित ठाणेकर, किरण नकाते, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, पी एन गुरव, प्रसाद जाधव यांच्यासह के एम टी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

- प्रभाग १२ मध्ये जुनी भाजी मंडई परिसरात मातंगवस्तीत घाणीचे साम्राज्य प्रभाग १२ मधील मातंगवस्तीत घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप आण्णाभाऊ साठे जयंतीसाठी परिसर स्वच्छ, मात्र संपूर्ण वाड्याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार लोणंद : प्रभाग क्रमांक १२ मधील जुनी भाजी मंडई परिसरातील मातंगवस्तीत सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ज्या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या परिसराची संबंधित विभागाकडून साफसफाई करण्यात आली. मात्र, संपूर्ण मातंगवस्तीतील अंतर्गत रस्ते व परिसर घाणीतच राहिल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नियमित स्वच्छता होत नसल्याने कचऱ्याचे ढीग, साचलेली घाण आणि अस्वच्छ वातावरणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जयंतीसारख्या महत्त्वाच्या दिवशी केवळ कार्यक्रमस्थळापुरती साफसफाई करून उर्वरित वस्तीची उपेक्षा करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावेळी बोलताना स्थानिक नागरिक प्रकाश खंडागळे म्हणाले, "मातंगवस्तीत माणसे राहतात, जनावरे नाहीत. आम्हालाही स्वच्छ परिसरात राहण्याचा अधिकार आहे. प्रशासनाने केवळ औपचारिक साफसफाई न करता संपूर्ण वस्तीची नियमित स्वच्छता करावी." नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने संपूर्ण मातंगवस्तीची स्वच्छता करून नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा लोकप्रतिनिधी व प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला.1
- दिवंगत अजितदादांच्या पाऊलखुणांवर; कंकालेश्वर मंदिरात सुनेत्रा पवार यांची भेट, विकासकामांची पाहणी1
- Pune : खडकवासला धरणातून 43 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, खडकवासला धरणाचे 11 दरवाजे उघडले Pune : खडकवासला धरणातून 43 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, खडकवासला धरणाचे 11 दरवाजे उघडले1
- साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन पुणे, दि. १: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारसबाग येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, चेतन तुपे, हेमंत रासने आदी उपस्थित होते. #annabhausathejayanti #amitshah #devendrafadnavis #lokshahirannabhausathe #अण्णाभाऊसाठेजयंती पुणे, AmitShahIn Pune, साहित्यरत्न, MaharashtraPolitics, Pune,1
- नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत आहे नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत आहे.असे म्हणत सामाजिक कार्यकर्त्या प्रिया खंडागळे यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे, प्रिया खंडागळे म्हणाल्या भ्रष्टाचार, अनियमितता, नागरिकांच्या तक्रारी आणि माहिती अधिकार कायद्यांतर्गत विविध विषय मांडत असल्यामुळे मला वारंवार महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घ्यावी लागते. मात्र, अत्यंत खेदाने नमूद करावे लागते की, प्रत्येक वेळी माझ्याशी सन्मानपूर्वक वागण्याऐवजी अपमानास्पद, अवमानकारक आणि असभ्य वर्तन करण्यात येत आहे. एक जबाबदार शासकीय अधिकारी नागरिकांशी संयमाने व कायद्याच्या चौकटीत वागण्यास बांधील असताना, माझ्याशी करण्यात आलेली वागणूक ही शासकीय सेवेतील आचारसंहितेला व लोकाभिमुख प्रशासनाच्या तत्त्वांना धरून नाही.1
- थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.1
- अमित शाहांच्या पुणे दौऱ्याआधी वसंत मोरे यांच्यावर पोलिसांची कारवाई!1