मराठवाडा मुक्ती संग्राम : स्वातंत्र्य, लोकशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्याय गोंदिया:भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; मात्र तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जनतेला भारतीय संघात सहभागी होण्यासाठी आणखी तेरा महिने प्रतीक्षा करावी लागली. या संस्थानात आजच्या महाराष्ट्रातील मराठवाडा, तेलंगणाचा प्रदेश आणि कर्नाटकातील काही भागांचा समावेश होता. त्यामुळे १७ सप्टेंबर १९४८ हा दिवस केवळ एका प्रदेशाच्या मुक्तीचा दिवस नसून, भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून स्मरणात राहिला आहे. स्वातंत्र्य मिळाले; पण हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले नव्हते १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश सत्ता संपुष्टात आल्यानंतर संस्थानांच्या भारतात विलिनीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. तत्कालीन हैदराबादचे निजाम मीर उस्मान अली खान यांनी हैदराबाद स्वतंत्र अस्तित्वात ठेवण्याची भूमिका घेतली. भारत सरकार आणि हैदराबाद संस्थान यांच्यात वाटाघाटी सुरू राहिल्या. काही काळासाठी स्थिती कायम ठेवण्याचा करार अर्थात ‘जैसे थे’ करार (Standstill Agreement) करण्यात आला. मात्र संस्थानातील राजकीय परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत गेली. गावागावांत रजाकारांविरुद्ध संघर्ष वाढत गेला. हैदराबाद संस्थानातील जनतेमध्ये नागरी हक्क, जबाबदार शासन आणि भारतीय संघात सहभागी होण्याची मागणी अधिक तीव्र होत होती. या लोकचळवळीला हैदराबाद स्टेट काँग्रेस, महाराष्ट्र परिषद तसेच विविध सामाजिक व राष्ट्रीय विचारांच्या संघटनांनी दिशा दिली. मराठवाड्यात जागृतीची बीजे मराठवाड्यातील मुक्ती संग्राम अचानक सुरू झालेला नव्हता. त्यामागे अनेक वर्षांची सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जागृती होती. राष्ट्रीय विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध ठिकाणी शाळा, वाचनालये आणि सामाजिक संस्था कार्यरत होत्या. परभणीचे नूतन विद्यालय, औरंगाबादचे सरस्वती भुवन विद्यालय, हिप्परगा येथील शारदा मंदिर, अंबाजोगाईचे योगेश्वरी विद्यालय, उदगीरचे श्यामलाल विद्यालय, लातूरमधील ज्युबिली विद्यालय, बीडचे चंपावती विद्यालय, नांदेडचे प्रतिभा निकेतन आदी संस्थांनी राष्ट्रीय जागृतीच्या कार्याला हातभार लावला. या कार्याला स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांची प्रेरणा लाभली. १९३८ मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या स्थापनेने या चळवळीला संघटित राजकीय स्वरूप मिळाले. निजाम सरकारने या संघटनेवर बंदी घातल्यानंतर सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारण्यात आला. मुक्तिसंग्रामासाठी स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, रवी नारायण रेड्डी, देवीसिंह चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंह नाईक, विजयेंद्र काबरा, बाळासाहेब परांजपे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. काशिनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्र जाधव, जनार्दन होर्टीकर गुरुजी, सूर्यभान पवार, आ. कृ. वाघमारे, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव कातमेश्वरकर अशा अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास अजरामर केला आहे. गावागावातील संघर्षांमध्ये अनेक अनामिक वीरांनी आपले बलिदान दिले आहे. १९३८ च्या सत्याग्रहातील नांदेडच्या कार्यकर्त्यांचा सहभाग या लढ्यात विशेषत्वाने नोंदविला गेला आहे. आठ जिल्ह्यांची व्यापक लोकचळवळ आजच्या महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली हे आठ जिल्हे आहेत. तत्कालीन काळातील प्रशासकीय सीमांमध्ये काही बदल झाले असले तरी या संपूर्ण मराठी भाषिक प्रदेशाने हैदराबाद मुक्तीच्या लढ्यात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला. मराठवाड्याचा संपूर्ण मराठी भाषिक प्रदेश भारतीय संघात विलीन होण्यासाठी आतुर होता. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याचे प्रमुख केंद्र होते. हैदराबाद मुक्ती संग्रामात बीड जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी योगदान दिले आणि अनेक स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा झाले. या व्यापक लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा आणि पी. एच. पटवर्धन यांसारख्या नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. लढ्याचे स्वरूप केवळ एका शहरापुरते मर्यादित नव्हते. नांदेड, परभणी, सेलू, जालना, अंबड, बीड, उस्मानाबाद, लातूर, अंबाजोगाई, उदगीर, उमरी, धर्माबाद, कंधार, देगलूर आदी भागांत विविध स्वरूपाचे सत्याग्रह, जनजागृती आणि प्रतिकाराच्या चळवळी झाल्या. दडपशाहीला लोकशक्तीचा प्रतिकार स्वातंत्र्याच्या मागणीला तत्कालीन सत्तेकडून विरोध झाला. आंदोलनकर्त्यांना अटक, कारावास आणि विविध प्रकारच्या दडपशाहीला सामोरे जावे लागले. परिस्थिती अधिक गंभीर झाल्यानंतर रजाकारांच्या हिंसक कारवायांमुळे सामान्य नागरिकांच्या अडचणी वाढल्या. लोकशाही, नागरी हक्क आणि जबाबदार शासनासाठी जनतेने निकराचा संघर्ष केला. प्रशासनाच्या नोंदीनुसार, १९४२ च्या ‘भारत छोडो’ चळवळीत नांदेड, वैजापूर, गंगापूर, परभणी, सेलू, उस्मानाबाद, बीड, अहमदपूर, जालना आणि अंबड यांसारख्या ठिकाणी सत्याग्रहींना कारावास भोगावा लागला. या आंदोलनामुळे हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्यवादी शक्ती अधिक संघटित झाल्या. स्वातंत्र्याच्या लढ्यातील या सहभागाने मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याला आणखी गती मिळाली. निजामाची आणि भारताची भूमिका भारत सरकारने हैदराबाद प्रश्न सोडविण्यासाठी सुरुवातीला संवाद आणि वाटाघाटींचा मार्ग स्वीकारला. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निर्णायक भूमिका घेतली. १३ सप्टेंबर १९४८ रोजी ‘ऑपरेशन पोलो’ सुरू झाले. भारतीय सैन्याच्या कारवाईसमोर हैदराबाद संस्थानाच्या सैन्याचा प्रतिकार फार काळ टिकला नाही. १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने शरणागती स्वीकारली आणि हैदराबाद राज्य भारतीय संघात सहभागी झाले. केंद्र सरकारच्या अधिकृत नोंदीत या प्रक्रियेला भारताच्या राजकीय एकात्मतेतील महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून अधोरेखित केले आहे. स्वातंत्र्योत्तर भारताने संस्थानांचे एकत्रीकरण करताना संवाद, राजनैतिक प्रयत्न आणि आवश्यक त्या वेळी निर्णायक कारवाई यांचा समन्वय साधला. हैदराबादच्या प्रश्नावर भारत सरकारने सुरुवातीला संवाद व राजनैतिक प्रयत्नांचा मार्ग स्वीकारला; मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर निर्णायक लष्करी कारवाई करण्यात आली. हैदराबादचा संघर्ष आणि विलीनीकरण हा एकसंघ भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरला. भारताच्या मध्यभागी स्वतंत्र राज्याचे अस्तित्व कायम राहिल्यास निर्माण होणारी राजकीय व प्रशासकीय गुंतागुंत किती गंभीर ठरली असती, याची कल्पना आजही करता येते. भारताच्या राजकीय एकात्मतेच्या दृष्टीने ही कारवाई किती महत्त्वाची होती, हे त्यानंतरच्या घडामोडींवरून स्पष्ट होते. त्यामुळे संस्थानांच्या विलीनीकरणासाठी झालेला हा संघर्ष भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनाक्रम ठरला आहे. भाषिक वेगळेपणही लक्षणीय ठरले १९४८ मध्ये भारतीय संघात समाविष्ट झालेले हैदराबाद संस्थान आज एकाच राज्याचा भाग नाही. त्यातील मराठवाडा महाराष्ट्रात, तेलुगू भाषिक प्रदेश तेलंगणात आणि कन्नड भाषिक प्रदेश कर्नाटकात समाविष्ट झाला. तत्कालीन हैदराबाद राज्यात आजच्या तेलंगणासह मराठवाडा आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांचा समावेश होता. भाषावार प्रांतरचनेनंतर मराठवाडा १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याचा भाग झाला. अशा प्रकारे १९४८ मध्ये भारतीय संघाशी जोडलेला हा प्रदेश पुढे आधुनिक महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि सामाजिक विकासाचा अविभाज्य घटक बनला. १७ सप्टेंबर : मुक्ती संग्राम दिन महाराष्ट्र शासनाने ४ मे २००१ रोजी शासन निर्णयाद्वारे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा विभागात ‘मुक्ती संग्राम दिवस’ म्हणून कायमस्वरूपी साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात शासकीय पातळीवर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत हा दिवस साजरा केला जातो. विभागीय मुख्यालय असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे. इतर जिल्ह्यांतही पालकमंत्री किंवा नियुक्त मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री ध्वजारोहण करतात, कारण हे शहर मराठवाड्याचे विभागीय मुख्यालय असून मुक्ती संग्रामाच्या स्मृतींशी जोडलेले प्रमुख केंद्र आहे. स्मृतिस्तंभाला अभिवादन, हुतात्म्यांना श्रद्धांजली, ध्वजारोहण, मानवंदना आणि विविध शासकीय कार्यक्रमांद्वारे या इतिहासाचे स्मरण केले जाते. महाराष्ट्र शासन मुक्ती संग्रामाचा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी १०० कोटी रुपये खर्चून छत्रपती संभाजीनगर येथे स्मारक उभारत आहे. इतिहासाचा सन्मान, भविष्याची प्रेरणा मराठवाडा मुक्ती संग्राम हा केवळ भूतकाळातील संघर्ष नाही. तो लोकशाही, स्वातंत्र्य, नागरी हक्क, राष्ट्रीय एकात्मता आणि लोकसहभागाच्या मूल्यांची जाणीव करून देणारा इतिहास आहे. या लढ्यात ज्ञात-अज्ञात असंख्य स्वातंत्र्यसैनिक, कार्यकर्ते, महिला, युवक आणि सामान्य नागरिकांनी योगदान दिले. त्यांच्या त्यागामुळे १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाड्याच्या भारतीय संघात विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला. १७ सप्टेंबर रोजी तिरंगा अभिमानाने फडकताना त्या काळातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण होते. हा दिवस अन्यायाविरुद्धच्या लोकशाही मूल्यांच्या आणि भारताच्या एकात्मतेच्या विजयाचे स्मरण करून देतो. मराठवाड्याने भारताच्या एकात्मतेसाठी दिलेले योगदान इतिहासाच्या पानांवर अढळ आहे. छत्रपती संभाजीनगरपासून नांदेडपर्यंत, जालन्यापासून लातूरपर्यंत, बीडपासून धाराशिवपर्यंत आणि परभणीपासून हिंगोलीपर्यंत या भूमीने स्वातंत्र्याची आस जपली आणि राष्ट्रीय प्रवाहात सहभागी होण्यासाठी संघर्ष केला. त्या ज्ञात-अज्ञात वीरांना आणि वीरांगनांना कृतज्ञ अभिवादन करणे आणि त्यांच्या त्यागातून लोकशाही व राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे, हीच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची खरी प्रेरणा आहे. १७ सप्टेंबर हा त्यामुळे केवळ स्मरणाचा दिवस नाही; तो मराठवाड्याच्या देशभक्तीला, लोकशक्तीला आणि अखंड भारताच्या एकात्मतेला अभिवादन करण्याचा दिवस आहे. प्रवीण टाके उपसंचालक विभागीय माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर

- आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात विकासाची गंगा! विविध गावांमध्ये महिला बचत भवन व विकास कामांचे थाटात भूमिपूजन संपन्न नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. देवरी, १५ सप्टेंबर २०२६: आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. संजयजी पुराम यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि दूरदृष्टीतून देवरी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला अधिक गतिशीलता प्राप्त झाली आहे. याच विकास पर्वांतर्गत तालुक्यातील विविध गावांमध्ये महिला बचत गटांसाठी हक्काचे 'महिला बचत भवन' तसेच अन्य महत्त्वपूर्ण विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचा मोठा कार्यक्रम पार पडला. माजी महिला व बालकल्याण सभापती तथा वर्तमान जिल्हा परिषद सदस्य सौ. सविता संजय पुराम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते या सर्व विकास कामांचे गाव-गाव प्रत्यक्ष भेट देऊन अत्यंत उत्साहात भूमिपूजन संपन्न झाले. विविध गावांमध्ये पार पडलेली विकास कामे व भूमिपूजन सोहळा (सविस्तर तपशील) * मौजा ककोडी (ता. देवरी): येथील ग्रामस्थांच्या आणि महिलांच्या मागणीचा विचार करून, रावण मैदानाजवळ तब्बल १५ लक्ष रुपये खर्चाच्या भव्य अशा सभागृह बांधकामाचे दुपारी १२ वाजता भूमिपूजन करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांना विविध सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तसेच, याच गावात हनुमान मंदिरा जवळ ५ लक्ष रुपये खर्चाच्या गट्टू लावण्याच्या कामाचे दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी भूमिपूजन संपन्न झाले, ज्यामुळे परिसराची दळणवळण व स्वच्छता सुधारेल. * मौजा चीपोटा (ता. देवरी): येथील आदिवासी बांधवांच्या सांस्कृतिक, सामाजिक व पारंपरिक उपक्रमांना हक्काची जागा मिळावी, यासाठी १५ लक्ष रुपये खर्चाच्या 'आदिवासी समाज भवन' बांधकामाचे दुपारी १ वाजता भूमिपूजन करण्यात आले. * मौजा पालांदूर (ता. देवरी): येथील वर्दळीच्या आणि मध्यवर्ती अशा बाजार चौकात १५ लक्ष रुपये खर्चाच्या नवीन सभागृह बांधकामाचे भूमिपूजन दुपारी २ वाजता पार पडले. यामुळे बाजारनिमित्त येणाऱ्या नागरिकांना व महिला वर्गान विशेष सवलत व सोय मिळणार आहे. * मौजा बोरगांव / बाजार (ता. देवरी): येथील तलाठी कार्यालयाजवळ परिसरातील प्रशासकीय व सामाजिक कामकाजाच्या सुविधेसाठी १५ लक्ष रुपये खर्चाच्या सभागृह बांधकामाचे भूमिपूजन दुपारी ३ वाजता अत्यंत उत्साहात करण्यात आले. महिला बचत गटांचा वाढला उत्साह, व्यक्त केली कृतज्ञता या प्रत्येक गावातील भूमिपूजन सोहळ्यादरम्यान ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या महिलांमध्ये व भगिनींमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून आला. आपल्या भावना व्यक्त करताना महिलांनी सांगितले की, "आतापर्यंत आम्हाला आमच्या बचत गटाच्या मासिक मीटिंग्स, आर्थिक व्यवहार किंवा महिलांचे विविध प्रशिक्षण व इतर कार्यक्रम घेण्यासाठी हक्काची आणि सुरक्षित जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेकदा अडचणींचा सामना करावा लागत असे. परंतु, आमदार मा. संजयजी पुराम आणि सौ. सविता संजय पुराम यांनी आमची ही मोठी अडचण लक्षात घेऊन आमच्यासाठी हक्काचे 'महिला बचत भवन' उपलब्ध करून दिले आहे. यामुळे आता बचत गटाचे कामकाज करणे अत्यंत सोयीस्कर झाले आहे." यावेळी महिलांनी आमदार संजय पुराम व सौ. सविता संजय पुराम यांचे मनःपूर्वक आभार मानले. मोठ्या संख्येने नागरिकांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या प्रत्येक गावातील भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी संबंधित गावांचे माननीय सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विविध महिला बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. या सर्व विकास कामांमुळे देवरी तालुक्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणार असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल ठरत आहे.1
- कु.रविना रवी रंगारी हिचा सत्कार एकोडी येथील रहिवासी कु.रविना रवि रंगारी ही पवित्र पोर्टल अंतर्गत रयत शिक्षण संस्था सातारा येथे क्रीडा शिक्षकम्हणून नियुक्ती झाली त्या करिता नवनिकेतन नाट्य कला संच एकोडी च्या वतीने घरी जाऊन रविना चा स्मृती चिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. रविना ही अत्यंत मेहनती मुलगी लहानपनापासून क्रीडा क्षेत्राची आवड, धनुर्विद्या तिचा आवडता खेळ व त्या खेळात ती राष्ट्रीय पातळीपर्यत खेडायला गेली आई वडिलांचे संस्कार , कोणत्याही व्यक्तीला सन्मानाने बोलणे हा तिचा स्वभाव सर्वांना आवडत असतो त्या निमित्ताने तिच्या मेहनतीने जिद्द चिकाटीने तिने पवित्र पोर्टल अंतर्गत सातारा येथे क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. सत्कार करतांना नवनिकेतन नाट्य कला संचाचे पदाधिकारी कलावंत ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, सुकराम बन्सोड, कमलाकर चांदेवार,एकनाथ कोटांगले, फिरोज कोटांगले, टिकाराम द्रगकर, राधेश्याम चौधरी,अमित भैसारे,कैलास जांभूळकर,कार्तिक मेश्राम, संदिप कोटांगले, पूरणदास निपाने, रंजना रंगारी, रवीकुमार रंगारी उपस्थित होते.1
- ध्वनि प्रदूषण नियंत्रण, सार्वजनिक शांति और कानून व्यवस्था बनाए रखने के उद्देश्य से डीजे का उपयोग ना करते हुए पारंपरिक और पर्यावरण पूरक तरीके से गणेशोत्सव मनाने का निर्णय लेने वाले गणेश मंडलों के पदाधिकारियों का तुमसर पुलिस प्रशासन की ओर से सम्मान किया गया। 15 सितंबर 2026 को तुमसर पुलिस थाने की ओर से क्षेत्र के गणेश मंडलों के पदाधिकारियों की बैठक आयोजित की गई। इस दौरान पचारा काटे बामनी पिपरा देवाड़ी पनारा माडकी हसारा नवरगांव ब्राहनी मेगांव तामसवाड़ी मीठेवानी सहित विभिन्न गांव के गणेश मंडलों के अध्यक्ष सचिव और सदस्यों का सत्कार किया गया। इन मंडलों ने डीजे का उपयोग ना करते हुए पारंपरिक वाद्य यंत्र, भजन, कीर्तन, आरती और सांस्कृतिक कार्यक्रमों के माध्यम से गणेशोत्सव मनाने का निर्णय लिया है। पुलिस प्रशासन के अनुसार इससे ध्वनि प्रदूषण पर नियंत्रण रखने में मदद मिलेगी और नागरिकों को शांतिपूर्ण वातावरण में उत्सव मनाने का अवसर मिलेगा। इस अवसर पर तुमसा पुलिस स्टेशन के थाना प्रभारी पुलिस निरीक्षक सुभाष बासे पुलिस निरीक्षक बाड़ा साहेब आघाव पुलिस हवालदार गिरीश बड़ोड़े और पुलिस सिपाही चौधरी ने मंडल पदाधिकारियों का अभिनंदन किया। उन्होंने सामाजिक जिम्मेदारी को ध्यान में रखते हुए उत्सव मनाने के निर्णय की सराहना की और भविष्य में भी कानून व्यवस्था, पर्यावरण संरक्षण तथा सामाजिक सौहार्द बनाए रखने का आह्वान किया। कार्यक्रम में संबंधित गांव के पुलिस पाटिल भी उपस्थित रहे। पुलिस प्रशासन ने सभी गणेश मंडलों के सहयोग के लिए आभार व्यक्त करते हुए शांतिपूर्ण और पारंपरिक गणेशोत्सव के लिए आगे भी इसी तरह सहयोग की अपेक्षा जताई। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 9021706444 ध्वनि प्रदूषण नियंत्रण, सार्वजनिक शांति और कानून व्यवस्था बनाए रखने के उद्देश्य से डीजे का उपयोग ना करते हुए पारंपरिक और पर्यावरण पूरक तरीके से गणेशोत्सव मनाने का निर्णय लेने वाले गणेश मंडलों के पदाधिकारियों का तुमसर पुलिस प्रशासन की ओर से सम्मान किया गया। 15 सितंबर 2026 को तुमसर पुलिस थाने की ओर से क्षेत्र के गणेश मंडलों के पदाधिकारियों की बैठक आयोजित की गई। इस दौरान पचारा काटे बामनी पिपरा देवाड़ी पनारा माडकी हसारा नवरगांव ब्राहनी मेगांव तामसवाड़ी मीठेवानी सहित विभिन्न गांव के गणेश मंडलों के अध्यक्ष सचिव और सदस्यों का सत्कार किया गया। इन मंडलों ने डीजे का उपयोग ना करते हुए पारंपरिक वाद्य यंत्र, भजन, कीर्तन, आरती और सांस्कृतिक कार्यक्रमों के माध्यम से गणेशोत्सव मनाने का निर्णय लिया है। पुलिस प्रशासन के अनुसार इससे ध्वनि प्रदूषण पर नियंत्रण रखने में मदद मिलेगी और नागरिकों को शांतिपूर्ण वातावरण में उत्सव मनाने का अवसर मिलेगा। इस अवसर पर तुमसा पुलिस स्टेशन के थाना प्रभारी पुलिस निरीक्षक सुभाष बासे पुलिस निरीक्षक बाड़ा साहेब आघाव पुलिस हवालदार गिरीश बड़ोड़े और पुलिस सिपाही चौधरी ने मंडल पदाधिकारियों का अभिनंदन किया। उन्होंने सामाजिक जिम्मेदारी को ध्यान में रखते हुए उत्सव मनाने के निर्णय की सराहना की और भविष्य में भी कानून व्यवस्था, पर्यावरण संरक्षण तथा सामाजिक सौहार्द बनाए रखने का आह्वान किया। कार्यक्रम में संबंधित गांव के पुलिस पाटिल भी उपस्थित रहे। पुलिस प्रशासन ने सभी गणेश मंडलों के सहयोग के लिए आभार व्यक्त करते हुए शांतिपूर्ण और पारंपरिक गणेशोत्सव के लिए आगे भी इसी तरह सहयोग की अपेक्षा जताई। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 90217064441
- राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची पत्रकार परिषद; दिली महत्त्वपूर्ण माहिती रामटेकचे आमदार व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी १६ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत राज्यात शेतीच्या परिस्थितीबद्दल व शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.याशिवाय त्यांनी अंन्य महत्त्वपूर्ण माहिती दिली.पहा मंत्री काय सांगतात.1
- ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews1
- अबब!! निष्टी येथील शेतकऱ्याच्या शेतात आढळला अकरा फुट लांबीचा अजगर ११ फुट अजगर सर्पमित्रांनी शिताफीने पकडले भिवापूर (प्रतिनिधी ) निष्टी ता. पवनी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात ११ फुट अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. याबाबत शेतकऱ्याने सर्पमित्रांला बोलविले. यावेळी सर्पमित्र दुर्गेश बडघरे यांच्या टिमने अतिशय काळजीपुर्वक ११ फुट अजगर यास पकडले आणि वनविभाच्या सुचनेनुसार पुल्लरच्या जंगलात सोडण्यात आले. भिवापूर पासून १० किमी अंतरावर असलेला निष्टी ता. पवनी येथील शेतकरी भगवान चट्टे यांच्या शेतात काल सकाळी ९ वाजता भव्य मोठा अजगर आढळून आला. त्यामुळे शेतकरी चांगलाच भयभीत झाला. त्याने भिवापूर येथील सर्पमित्रांना पाचरण केले. ११ फुट अजगर सर्पमित्र दुर्गेश बडघरे , जाकीर सय्यद, कृणाल रोहनकर, प्रदीप मडावी यांनी मोठया शिताफीने पकडून त्यास उमरेड कऱ्हाडला अभयारण्य कार्यालयात याबाबतची नोंद केली. या अजगराचे वजन २१ किलो होते. त्याचे वय ५ ते ७ वर्षे इतके सांगण्यात आले. हा बिनविषारी होता अशी माहिती आहे. हा भव्य अजगर पुल्लरच्या जंगलात वनविभाग माध्यमातून अधिवासात सोडण्यात आले.1
- गिट्टीखदान में आधी रात हड़कंप, नशे में गाड़ी चलाने का आरोप। 2 रात करीब 11:30 बजे गिट्टीखदान पुलिस स्टेशन क्षेत्र में एक युवती पर कथित तौर पर नशे की हालत में वाहन चलाने का आरोप लगा, जिसकी चपेट में आने से 8 से 10 लोग घायल हो गए। 2 घटना के बाद थाने के बाहर 100-150 लोगों की भीड़ जमा हो गई। पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति संभाली, नशे में ड्राइविंग हुई या नहीं यह मेडिकल जांच के बाद ही स्पष्ट होगा। गिट्टीखदान में आधी रात हड़कंप, नशे में गाड़ी चलाने का आरोप। 2 रात करीब 11:30 बजे गिट्टीखदान पुलिस स्टेशन क्षेत्र में एक युवती पर कथित तौर पर नशे की हालत में वाहन चलाने का आरोप लगा, जिसकी चपेट में आने से 8 से 10 लोग घायल हो गए। 2 घटना के बाद थाने के बाहर 100-150 लोगों की भीड़ जमा हो गई। पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति संभाली, नशे में ड्राइविंग हुई या नहीं यह मेडिकल जांच के बाद ही स्पष्ट होगा।1
- इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी। ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है। चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें। इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी। ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है। चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें।1