Shuru
Apke Nagar Ki App…
नवेगाव कोपर्डा जि.प. प्राथमिक शाळेत अभियंता दिन उत्साहात साजरा Bharat 24Taas News कमलकिशोर जोगदंडे भोकरदन भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिनाचे औचित्य साधून भोकरदन अभियंता संघटनेच्या वतीने भोकरदन तालुक्यातील नवेगाव कोपर्डा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जि.प. बांधकाम उपविभाग भोकरदनचे उपअभियंता राहुल लखापती, भाऊलाल सोरमारे, गणेश शेळके, राजेंद्र देठे, विनोद मिसाळ, जितेंद्र तायडे, विजय सपकाळ, प्रदीप घोडके यांच्यासह सरपंच गणेश पाटील पाबळे, केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक अंगद चमकुरे, जाधव, खरात, डकले, गिरी आदी उपस्थित होते.
Bharat 24Taas News
नवेगाव कोपर्डा जि.प. प्राथमिक शाळेत अभियंता दिन उत्साहात साजरा Bharat 24Taas News कमलकिशोर जोगदंडे भोकरदन भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिनाचे औचित्य साधून भोकरदन अभियंता संघटनेच्या वतीने भोकरदन तालुक्यातील नवेगाव कोपर्डा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जि.प. बांधकाम उपविभाग भोकरदनचे उपअभियंता राहुल लखापती, भाऊलाल सोरमारे, गणेश शेळके, राजेंद्र देठे, विनोद मिसाळ, जितेंद्र तायडे, विजय सपकाळ, प्रदीप घोडके यांच्यासह सरपंच गणेश पाटील पाबळे, केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक अंगद चमकुरे, जाधव, खरात, डकले, गिरी आदी उपस्थित होते.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- भोकरदन शहरात शहीद स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी मांडला ठराव माजी सैनिकांच्या मागणीला मिळाला न्याय भोकरदन इसरारखान पठाण भोकरदन नगर परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत तालुक्यातील शहीद जवानांच्या स्मृतीला उजाळा देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. माजी सैनिकांच्या मागणीला मान देऊन भोकरदन शहरात ‘शहीद स्मारक’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. हा महत्त्वपूर्ण ठराव नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी सभागृहात मांडला. सभेदरम्यान हातात ठरावाची प्रत घेऊन उभे राहत रणवीर सिंग देशमुख यांनी भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, आपल्या देशाकरता जे जवान शहीद होतात... त्या शहिदांकरता आपल्या तालुक्यात कुठंही स्मारक नाही. नगरपालिकेच्या ठिकाणी पैसा आहे, तर तो आपल्या काळात आपण सर्वांनी हात वर करून हा ठराव मंजूर करावा. रणवीरसिंग देशमुख यांनी मांडलेल्या या ठरावाला उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवकांनी तत्काळ पाठिंबा दर्शवला. नगराध्यक्षा सौ. समरीन नाज बेग वसीम मिर्झा आणि उपनगराध्यक्षा सौ. सुरेखाताई जाधव यांनी ठरावाला संमती देत हा निर्णय एकमताने पारित केला. या ठरावाचे अनुमोदक म्हणून कदीर बापू यांचे नाव जाहीर करण्यात आले. ठराव मंजूर झाल्यानंतर बोलताना नगरसेवक रणवीर सिंग देशमुख म्हणाले, आज भोकरदन नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मी तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्या विनंतीला मान देऊन भोकरदन शहरात शहीद स्मारक व्हावे याकरिता या सभेत जागा मागणीचा ठराव मांडला. उपस्थित सर्व सदस्य, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा यांनी सर्व संमतीने ठराव मंजूर केला. अनुमोदक म्हणून कदीर बापू सह सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. सभेच्या व्हिडिओमध्ये दिसते की, नगरसेवक रणवीर सिंग देशमुख कागदपत्र हातात घेऊन ठरावाचे वाचन करत आहेत. सभागृहात नगरसेवक पांढऱ्या वेशात बसलेले असून, अधिकारी वर्ग समोर टेबलवर उपस्थित आहे. ठराव मांडल्यानंतर सर्व सदस्यांनी हात वर करून एकमताने संमती दर्शवली हा ठराव मंजूर झाल्याने आता नगर परिषद प्रशासनाकडून शहीद स्मारकासाठी योग्य जागेची निवड, आराखडा व निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. भोकरदन तालुक्यातून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जतन करण्यासाठी हे स्मारक प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास माजी सैनिक संघटना व नागरिकांनी व्यक्त केला आहे. तालुक्यात आतापर्यंत शहीद जवानांसाठी स्वतंत्र स्मारक नसल्याची खंत अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी उचललेल्या या पावलामुळे शहीद कुटुंबीयांच्या भावनांचा सन्मान झाला असून, येणाऱ्या पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळणार आहे. स्मारकाच्या कामास लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती नगर परिषद सूत्रांनी दिली.1
- मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे यांची प्रतिक्रिया मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे. यांची प्रतिक्रिया1
- श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन... श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन...1
- बोरगाव सारवणीत राज्यमंत्री दर्जा प्राप्त मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांचा भव्य नागरी सत्कार | AQS NEWS इनामूल उलूम उर्दू हायस्कूलच्या नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन; मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांची उपस्थिती | AQS NEWS1
- जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे सावळदबारा येथे उत्साहात आगमन जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे सावळदबारा येथे उत्साहात आगमन सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे यंदाच्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून, जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे उत्साहपूर्ण वातावरणात आगमन करण्यात आले. गणरायाच्या आगमनावेळी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच गावातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशमूर्तीचे आगमन झाल्यानंतर मंडळाच्या वतीने विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाचे स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण नप्ते, तर उपाध्यक्षपदी संदीप आप्पा काळे यांची जबाबदारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सदस्य गणेशोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहेत. गणेशोत्सव काळात दररोज सकाळी व सायंकाळी आरतीचे आयोजन करण्यात येते. आरतीच्या वेळी गावातील मोठ्या संख्येने भाविक भक्त तसेच गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित राहून भक्तिभावाने गणरायाची आरती करतात. आरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते. गणरायाच्या दर्शनासाठी परिसरातील नागरिकांचीही मोठी गर्दी होत असून, संपूर्ण उत्सव काळात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने सावळदबारा परिसर भक्तिमय झाला आहे. मंडळाच्या उपक्रमांना गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शांतता व सलोखा राखत गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.1
- जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट? जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट? जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! संरक्षक भिंत नसल्याने परिसर चोरट्यांसाठी मोकळे रान; जुन्या घंटागाड्यांसह कत्तलखान्याच्या भंगाराचीही चोरी झाल्याचा आरोप — वाहन प्रमुख कटारे यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे सवाल आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाच्या आवारात महानगरपालिकेच्या जुन्या गाड्या आणि मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य ठेवण्यात आले आहे. मात्र, या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या सुरक्षेकडे महानगरपालिका प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जुन्या वाहनांमधील स्पेअर पार्ट चोरट्यांकडून रात्रीच्या वेळी काढून नेले जात असल्याचे दिसून येत असून, अनेक गाड्यांचे महत्त्वाचे पार्ट गायब असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे या परिसराला चोहोबाजूंनी संरक्षक भिंत नसल्याने संपूर्ण आवार खुले झाले आहे. दिवसा काही संशयित व्यक्ती या वाहनांची पाहणी करताना दिसतात आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी वाहनांचे स्पेअर पार्ट तसेच लोखंडी साहित्य चोरीला जात असल्याची चर्चा परिसरात आहे. अशा परिस्थितीत केवळ एक-दोन वॉचमन तैनात करून महानगरपालिकेच्या कोट्यवधींच्या मालमत्तेचे संरक्षण कसे होणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.1
- चंदनझिरात मनपाची धडक कारवाई; १४ चिकन-मटन दुकाने सील, उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांचे साहित्य जप्त.. नगरसेवक अनिल तिरुखे यांनी सर्वसाधारण सभेत मांडलेल्या प्रश्नानंतर प्रशासनाची तातडीने कारवाई; आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशाने कारवाई.. चंदनझिरात मनपाची धडक कारवाई; १४ चिकन-मटन दुकाने सील, उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांचे साहित्य जप्त.. नगरसेवक अनिल तिरुखे यांनी सर्वसाधारण सभेत मांडलेल्या प्रश्नानंतर प्रशासनाची तातडीने कारवाई; आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशाने कारवाई..1
- अग्निशमन केंद्रात शिस्तीचा बोजवारा! अधिकारी झाले कर्मचारी, कर्मचारी झाले अधिकारी; मनमानी कारभारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर कोण कधी येतो, कधी जातो याचा नियमच नाही; वर्दीचा अभाव आणि मनमानी उपस्थितीचा आरोप, सूचना दिल्यास राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चाही अग्निशमन केंद्रात शिस्तीचा बोजवारा! अधिकारी झाले कर्मचारी, कर्मचारी झाले अधिकारी; मनमानी कारभारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर कोण कधी येतो, कधी जातो याचा नियमच नाही; वर्दीचा अभाव आणि मनमानी उपस्थितीचा आरोप, सूचना दिल्यास राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चाही आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अग्निशमन केंद्रातील कारभारावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत गंभीर आरोप समोर येत आहेत. अग्निशमन दलाचे इन्चार्ज नियमितपणे वर्दीमध्ये कर्तव्य बजावताना दिसून येतात मात्र त्यांच्या अधिनस्त काही कर्मचारी वर्दीचा वापर करत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अग्निशमन केंद्रातील अधिकारी झाला कर्मचारी आणि कर्मचारी झाले अधिकारी, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा असून कोणता कर्मचारी कधी येतो आणि कधी जातो, याबाबत निश्चित नियमांचे पालन होत नसल्याचे बोलले जात आहे.1