उमरखेड नगरपरिषदेवर माहिती अधिकाराचा दुसरा घणाघात; "काहींवर गुन्हे, उर्वरित अनधिकृत लेआउटधारकांना संरक्षण का?" मुख्याधिकाऱ्यांच्या तोंडी विधानाचा लेखी पुरावा मागितला; MRTP कायद्याच्या कलम 52, 53 व 54 च्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उमरखेड शहरातील अनधिकृत लेआउट प्रकरणाला पुन्हा एकदा वेग आला असून 'पा. उमरखेड वार्ता'चे मुख्य संपादक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचे उमरखेड तालुका संघटक शेख इरफान शेख ईसा यांनी 31 जुलै 2026 रोजी नगरपरिषद उमरखेडच्या सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत सविस्तर अर्ज दाखल करून प्रशासनाच्या कारवाईतील कथित दुहेरी निकषांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अर्जानुसार, मौजे उमरखेड खंड क्र. 1 व 2 मधील काही अनधिकृत लेआउटधारकांविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 मधील कलम 52, 53 व 54 अन्वये उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यासंदर्भातील एफआयआर व नगरपरिषदेची पोलिसांना दिलेली तक्रार अर्जदाराकडे उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, समान स्वरूपाचे उल्लंघन झाल्याचा आरोप असलेल्या उर्वरित अनधिकृत लेआउटधारकांविरुद्ध आजपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याचा प्रश्न माहिती अधिकार अर्जातून उपस्थित करण्यात आला आहे. यामुळे एकाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये वेगवेगळे निकष लावले जात आहेत का, अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. अर्जात नमूद केल्याप्रमाणे, 15 जुलै 2026 रोजी संबंधित सर्वे क्रमांकांचे 7/12 उतारे, सन 2020 पासूनच्या तक्रारी आणि इतर कागदपत्रांसह सविस्तर निवेदन नगरपरिषदेला देण्यात आले होते. त्या निवेदनावर कोणती कार्यवाही झाली, याची संपूर्ण फाईल नोटिंग, टिपणे, आदेश, अहवाल, पत्रव्यवहार आणि फाईल मूव्हमेंट यांची प्रमाणित माहिती मागविण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक उर्वरित अनधिकृत लेआउटधारकाविरुद्ध MRTP Act च्या कलम 52, 53 व 54 अंतर्गत कारवाई का करण्यात आली नाही, याची अधिकृत लेखी कारणे आणि संबंधित अभिलेखांच्या प्रती मागविण्यात आल्या आहेत. अर्जातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मुख्य अधिकाऱ्यांनी "गुन्हा दाखल करता येत नाही" असे तोंडी सांगितल्याचा उल्लेख करून, त्या भूमिकेला आधार देणारा नेमका कायदा, कलम, शासन निर्णय, परिपत्रक किंवा न्यायालयीन आदेश कोणता आहे, याची प्रमाणित प्रत मागविण्यात आली आहे. तसेच उर्वरित अनधिकृत लेआउटधारकांविरुद्ध कारवाई करू नये असा कोणताही लेखी शासन आदेश, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निर्देश किंवा कायदेशीर अभिप्राय असल्यास त्याची प्रत देण्याची मागणी करण्यात आली आहे. पूर्वी ज्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले, त्यावेळी वापरलेले निकष आणि सध्याच्या प्रकरणांमध्ये तेच निकष का लागू करण्यात आले नाहीत, याचाही खुलासा मागण्यात आला आहे. याशिवाय प्रत्येक सर्वे क्रमांकाची स्वतंत्र तपासणी झाली आहे का, तपासणी अहवाल, पंचनामे, नकाशे, निरीक्षण अहवाल, जबाबदार अधिकारी, तसेच भविष्यात कारवाई प्रस्तावित असल्यास त्याची कालमर्यादा काय आहे, याचीही माहिती अर्जातून मागविण्यात आली आहे. अर्जदाराने स्पष्ट केले आहे की, माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 7 नुसार विहित मुदतीत माहिती न दिल्यास किंवा अपूर्ण, दिशाभूल करणारी अथवा कायदेशीर कारणांशिवाय माहिती नाकारल्यास प्रथम अपील तसेच पुढील सक्षम प्राधिकरणासमोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. उमरखेडमधील अनधिकृत लेआउट प्रकरणात हा माहिती अधिकार अर्ज महत्त्वाचा मानला जात असून, नगरपरिषद समान निकषाने कारवाई करते की निवडक प्रकरणांपुरतीच अंमलबजावणी करते, याबाबतच्या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.
उमरखेड नगरपरिषदेवर माहिती अधिकाराचा दुसरा घणाघात; "काहींवर गुन्हे, उर्वरित अनधिकृत लेआउटधारकांना संरक्षण का?" मुख्याधिकाऱ्यांच्या तोंडी विधानाचा लेखी पुरावा मागितला; MRTP कायद्याच्या कलम 52, 53 व 54 च्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उमरखेड शहरातील अनधिकृत लेआउट प्रकरणाला पुन्हा एकदा वेग आला असून 'पा. उमरखेड वार्ता'चे मुख्य संपादक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचे उमरखेड तालुका संघटक शेख इरफान शेख ईसा यांनी 31 जुलै 2026 रोजी नगरपरिषद उमरखेडच्या सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत सविस्तर अर्ज दाखल करून प्रशासनाच्या कारवाईतील कथित दुहेरी निकषांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अर्जानुसार, मौजे उमरखेड खंड क्र. 1 व 2 मधील काही अनधिकृत लेआउटधारकांविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 मधील कलम 52, 53 व 54 अन्वये उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यासंदर्भातील एफआयआर व नगरपरिषदेची पोलिसांना दिलेली तक्रार अर्जदाराकडे उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, समान स्वरूपाचे उल्लंघन झाल्याचा आरोप असलेल्या उर्वरित अनधिकृत लेआउटधारकांविरुद्ध आजपर्यंत कोणतीही कारवाई
न झाल्याचा प्रश्न माहिती अधिकार अर्जातून उपस्थित करण्यात आला आहे. यामुळे एकाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये वेगवेगळे निकष लावले जात आहेत का, अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. अर्जात नमूद केल्याप्रमाणे, 15 जुलै 2026 रोजी संबंधित सर्वे क्रमांकांचे 7/12 उतारे, सन 2020 पासूनच्या तक्रारी आणि इतर कागदपत्रांसह सविस्तर निवेदन नगरपरिषदेला देण्यात आले होते. त्या निवेदनावर कोणती कार्यवाही झाली, याची संपूर्ण फाईल नोटिंग, टिपणे, आदेश, अहवाल, पत्रव्यवहार आणि फाईल मूव्हमेंट यांची प्रमाणित माहिती मागविण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक उर्वरित अनधिकृत लेआउटधारकाविरुद्ध MRTP Act च्या कलम 52, 53 व 54 अंतर्गत कारवाई का करण्यात आली नाही, याची अधिकृत लेखी कारणे आणि संबंधित अभिलेखांच्या प्रती मागविण्यात आल्या आहेत. अर्जातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मुख्य अधिकाऱ्यांनी "गुन्हा दाखल करता येत नाही" असे तोंडी सांगितल्याचा उल्लेख करून, त्या भूमिकेला आधार देणारा नेमका कायदा, कलम, शासन निर्णय, परिपत्रक किंवा न्यायालयीन आदेश कोणता आहे, याची प्रमाणित प्रत मागविण्यात आली आहे. तसेच उर्वरित अनधिकृत लेआउटधारकांविरुद्ध कारवाई करू
नये असा कोणताही लेखी शासन आदेश, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निर्देश किंवा कायदेशीर अभिप्राय असल्यास त्याची प्रत देण्याची मागणी करण्यात आली आहे. पूर्वी ज्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले, त्यावेळी वापरलेले निकष आणि सध्याच्या प्रकरणांमध्ये तेच निकष का लागू करण्यात आले नाहीत, याचाही खुलासा मागण्यात आला आहे. याशिवाय प्रत्येक सर्वे क्रमांकाची स्वतंत्र तपासणी झाली आहे का, तपासणी अहवाल, पंचनामे, नकाशे, निरीक्षण अहवाल, जबाबदार अधिकारी, तसेच भविष्यात कारवाई प्रस्तावित असल्यास त्याची कालमर्यादा काय आहे, याचीही माहिती अर्जातून मागविण्यात आली आहे. अर्जदाराने स्पष्ट केले आहे की, माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 7 नुसार विहित मुदतीत माहिती न दिल्यास किंवा अपूर्ण, दिशाभूल करणारी अथवा कायदेशीर कारणांशिवाय माहिती नाकारल्यास प्रथम अपील तसेच पुढील सक्षम प्राधिकरणासमोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. उमरखेडमधील अनधिकृत लेआउट प्रकरणात हा माहिती अधिकार अर्ज महत्त्वाचा मानला जात असून, नगरपरिषद समान निकषाने कारवाई करते की निवडक प्रकरणांपुरतीच अंमलबजावणी करते, याबाबतच्या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.
- उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर1
- उमरखेड आगाराला मोठी भेट! पालकमंत्री व आमदारांच्या प्रयत्नांतून ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे दमदार आगमन महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूजन व लोकार्पण; प्रवाशांना अधिक सुरक्षित, दर्जेदार व सुलभ वाहतुकीची अपेक्षा उमरखेड आगाराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे आज उत्साहात पूजन व लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री व स्थानिक आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे या बस उमरखेड आगाराला प्राप्त झाल्याचे कार्यक्रमात नमूद करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बसांचे विधिवत पूजन करून त्या प्रवासी सेवेसाठी समर्पित करण्यात आल्या. नवीन बसांमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक चांगली, सुरक्षित आणि नियमित एसटी सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता अशा बसांची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. प्रवाशांच्या अपेक्षा काय? दुर्गम भागात नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात. वेळापत्रकाचे काटेकोर पालन व्हावे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. बसची देखभाल व स्वच्छता नियमित ठेवावी. सार्वजनिक सेवेत पारदर्शकता व उत्तरदायित्व राखावे.कायदेशीर अपेक्षा सार्वजनिक निधीतून उपलब्ध झालेल्या या बससेवेचे संचालन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लागू नियमांनुसार, शासनाच्या धोरणांनुसार आणि सर्व प्रवाशांना समान व पारदर्शक सेवा मिळेल, या तत्त्वावर होणे आवश्यक आहे. बस मार्गांचे नियोजन, फेऱ्यांचे वेळापत्रक आणि सेवा वितरणात प्रशासनाने नियमानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे. "नवीन बसांचे आगमन ही केवळ वाहनांची भर नसून, ग्रामीण जनतेच्या प्रवासाला नवी गती देणारी आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणारी महत्त्वाची पायरी आहे," अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.3
- गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती माहूरगड प्रतिनिधी: धनंजय आराध्ये श्रीक्षेत्र माहूरगड येथील पवित्र श्री दत्तात्रेय शिखर संस्थानात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित गुरुपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतानाही महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी दत्तशिखरावर दर्शनासाठी अलोट गर्दी केली. पावसाकडे दुर्लक्ष करून भाविकांनी गुरुदर्शन व गुरुपूजनाचा लाभ घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्तात्रेय शिखर संस्थानाचे श्री श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज (गुरु मधुसूदन भारती) यांच्या शुभहस्ते पहाटे श्री दत्तात्रेय महाराजांचा वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर परिसरातील सर्व देवतांचे पूजन, समाधीपूजन तसेच विविध धार्मिक विधी पार पडले. या धार्मिक विधींचे पुरोहित्य विलासराव जोशी, रवींद्र जोशी, ऋषिकेश जोशी व विकास जोशी यांनी केले. यानंतर श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज गादीवर विराजमान झाले. पोथीवाचन, गुरुपूजन, आशीर्वचन आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. उपस्थित संत-महंत, महापुरुष तसेच हजारो भाविकांनी गुरुपूजन करून आशीर्वाद घेतले. पावसाच्या सरींनीही या पवित्र सोहळ्याची शोभा अधिक खुलविली. या सोहळ्यास वासुदेव भारती महाराज, परमेश्वर भारती, धनराज भारती महाराज, चिंतामण भारती महाराज, चिरंजीव भारती, हरिहर भारती, वामन भारती, सुभाष भारती, शिलानंद भारती, सुजान भारती, माधवगिरी महाराज, गजराज भारती, नितेश भारती, अक्षयगिरी यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे व्यवस्थापक जी. एन. नाईक, अश्विन माने, विश्वस्त मंडळ तसेच सेवेकरी यांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुपूजनानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या अखेरीस "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त", "देवदत्त श्री दत्तात्रय महाराज की जय" या जयघोषांनी संपूर्ण दत्तशिखर परिसर दुमदुमून गेला. भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाने भरलेला हा गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला.1
- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.1
- पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. 📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा! #Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi1
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविणार; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची नांदेड जिल्ह्यात प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांची माहिती, पात्रता पडताळणी, बँकांशी समन्वय तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भात काटेकोर नियोजन करण्यात आले असून कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासन दक्षता घेणार आहे.1
- पुरात कार गेली वाहून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील रामप्रसाद नगर गावजवळील पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कार पाण्यात वाहून गेली असुन सुदैवाने कोणतीही जीवितहानी नसुन ड्रायव्हरने तात्काळ गाडीचा दरवाजा उघडून बाहेर सुखरूप पणे निघून आले. गाडी क्र MH14EH9382 ह्या क्रमांकाची गाडी सालेगाव येथील प्रल्हाद थोरात यांची असल्याची माहिती मिळाली आहे. सेनगाव तालुक्यातील हत्ता ते तळणी या राज्य मार्गचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे कापडशिंगी जावळील रामप्रसाद नगर येथील पुलाचे काम पूर्ण झाले होते मात्र केवळ पुलाच्या दोन्ही बाजूने भराव न भरल्यामुळे हा पुल वाहतुकी साठी सुरू करण्यात आला नाही पुलाच्या साईडने जो रस्ता काढून दिला होता त्या रस्त्यावर नदीला पूर आल्यावर रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद होत आहे. त्यामुळे सुमारे दहा ते पंधरा गावाचा संपर्क तुटत आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराच्या वतीने जेव्हा काल पुलाच्या पाण्यामध्ये कार वाहून गेली वाहून गेलेली गाडी आज क्रेनच्या साह्याने बाहेर काढली आहे या मध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.2