logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या अमळनेर : तालुक्यातील टाकरखेडा येथील पती पत्नीने आपल्या दोन मुलांसह रेल्वे खाली स्वतःला झोकून आत्महत्या केल्याची घटना २७ रोजी पहाटे ४ ते ५ वाजेदरम्यान घडली. तालुक्यातील टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल , त्याची पत्नी पार्वती सुनील भिल यांनी आपल्यासोबत दुसरीला असलेला मुलगा सनी , व अंगणवाडीत असलेला राज याना सोबत घेऊन पहाटे चार वाजेच्या सुमारास घरातून गेल्याचे समजते. त्यांनी धावत्या रेल्वेत झोकून दिल्याने त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन जागीच मृत्यु झाला आहे. पहाटे ४:४० वाजता रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसाना कळवले आहे. घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी एपीआय गणेश अहिरे , हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील , विजय भोई ,योगेश बागुल , राहुल पाटील याना पंचनाम्यासाठी पाठवले. एकाच कुटुंबातील चौघे जण मृत झाल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची चर्चा सुरू आहे.

1 hr ago
user_Pramod dada bari
Pramod dada bari
Pachora, Jalgaon•
1 hr ago
73ace8e4-2e21-4f8c-a374-d368ff1d5a7e

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या अमळनेर : तालुक्यातील टाकरखेडा येथील पती पत्नीने आपल्या दोन मुलांसह रेल्वे खाली स्वतःला झोकून आत्महत्या केल्याची घटना २७ रोजी पहाटे ४ ते ५ वाजेदरम्यान घडली. तालुक्यातील टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल , त्याची पत्नी पार्वती सुनील भिल यांनी आपल्यासोबत दुसरीला असलेला मुलगा सनी , व अंगणवाडीत असलेला राज याना सोबत घेऊन पहाटे चार वाजेच्या सुमारास घरातून

e8cd0799-c6c7-4bbd-a20f-9801ae802b9e

गेल्याचे समजते. त्यांनी धावत्या रेल्वेत झोकून दिल्याने त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन जागीच मृत्यु झाला आहे. पहाटे ४:४० वाजता रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसाना कळवले आहे. घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी एपीआय गणेश अहिरे , हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील , विजय भोई ,योगेश बागुल , राहुल पाटील याना पंचनाम्यासाठी पाठवले. एकाच कुटुंबातील चौघे जण मृत झाल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची चर्चा सुरू आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार
    1
    आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार
    user_Kalpesh wani
    Kalpesh wani
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पत्रकारावरही गुन्हा; माध्यमस्वातंत्र्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा आरोप पुणे | प्रतिनिधी पुण्यातील प्रतिष्ठित सी ओ पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहातील वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून सुरू झालेल्या या प्रकरणात विद्यार्थी संघटनांमधील संघर्षानंतर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आणि आता ए बी पी माझाचे पुणे प्रतिनिधी पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातही तक्रार गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने पत्रकाराने परवानगीशिवाय वसतिगृह परिसरात प्रवेश केल्याचा आरोप करत कायदेशीर तक्रार केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने तीव्र नाराजी व्यक्त करत पत्रकारांवर अशा प्रकारे कायदेशीर कारवाई करून माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. सी ओ पी परिसरातील घटनेनंतर पोलिसांनी आधी ए बी व्ही पी सदस्याच्या तक्रारीवरून एन एस यु आय आणि युवक काँग्रेसशी संबंधित ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवरून आणखी एक गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार मंदार गोंजारी यांनी सी ओ पी परिसरातील विद्यार्थ्यांच्या कथित प्रश्नांबाबत केलेले वृत्तांकनही चर्चेत आले आहे. एबीपी माझाच्या अधिकृत संकेतस्थळावर गोंजारी यांच्या नावाने सी ओ पी प्रकरणावरील वृत्त प्रकाशित झाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने वृत्तांकन करणे हा पत्रकारितेचा मूलभूत अधिकार आणि कर्तव्याचा भाग आहे. एखाद्या पत्रकाराने नियमांचे उल्लंघन केले असल्यास कायदा आपले काम करेल; मात्र पत्रकाराने केलेल्या वृत्तांकनामुळे प्रशासन किंवा सत्ताधारी अस्वस्थ झाले म्हणून पत्रकाराविरोधात कारवाई होत असेल, तर हा माध्यमस्वातंत्र्यासाठी गंभीर इशारा आहे, अशी भूमिका व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने व्यक्त केली आहे. सी ओ पी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या शुल्क, शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवरून वाद निर्माण झाल्याचे विविध वृत्तांतून समोर आले आहे. एका विद्यार्थिनीने सुरुवातीला कॉलेजकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे सांगितले होते; त्यानंतर तिने दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्यावर दबाव निर्माण झाल्याचे सांगत राजकीय वादात आपल्याला ओढू नये, असे आवाहन केले. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत, त्यावर प्रशासनाची भूमिका काय आहे, विद्यार्थी संघटनांमध्ये नेमका संघर्ष कशामुळे झाला आणि पत्रकाराविरोधातील तक्रारीमागील वास्तविक कारण काय आहे, हे स्पष्टपणे समोर येणे गरजेचे आहे. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. म्हस्के म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने बातमी केली म्हणून पत्रकाराला गुन्ह्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा केवळ एका पत्रकाराचा प्रश्न राहात नाही; हा संपूर्ण माध्यमविश्वाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न बनतो. “पत्रकार चुकीचा असेल तर कायदा तपास करेल, पुरावे असतील तर न्यायालयीन प्रक्रिया होईल. मात्र पत्रकाराने प्रश्न उपस्थित केले म्हणून त्याच्यावर दबाव निर्माण करणे, त्याला घाबरवणे किंवा गुन्ह्याच्या माध्यमातून त्याची लेखणी रोखण्याचा प्रयत्न करणे कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या माध्यमांकडे संशयाने पाहिले जात असेल, तर ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचेही म्हस्के यांनी नमूद केले. “महाराष्ट्रातील पत्रकार निर्भयपणे काम करतील. माध्यमांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तर व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील,” असा इशाराही त्यांनी दिला. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनीही सी ओ पी प्रकरणातील पत्रकाराविरोधातील कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला. चोरडिया म्हणाले की, पत्रकार हा समाजातील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणारा महत्त्वाचा दुवा आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या समोर आणणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे. “पत्रकाराने बातमी केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. पत्रकारितेवर दबाव आणण्याचा कोणताही प्रयत्न महाराष्ट्रातील पत्रकार सहन करणार नाहीत. पत्रकाराच्या लेखणीला घाबरवण्याऐवजी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,” अशी भूमिका चोरडिया यांनी मांडली. सी ओ पी प्रकरणात पत्रकाराविरोधात दाखल झालेल्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि पत्रकाराला केवळ त्याच्या व्यावसायिक कर्तव्यामुळे लक्ष्य केले जात नाही ना, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सी ओ पी प्रकरण आता केवळ विद्यार्थी संघटनांमधील संघर्षापुरते मर्यादित राहिलेले नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यापीठ प्रशासनाची भूमिका, राजकीय हस्तक्षेप, विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष आणि आता पत्रकाराविरोधातील कायदेशीर कारवाई या सर्व मुद्द्यांमुळे प्रकरण अधिक व्यापक झाले आहे. पोलिसांनी सी ओ पी परिसरात राजकीय व्यक्ती आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर तसेच राजकीय कार्यक्रमांवर काही काळ निर्बंधही लागू केले होते. मात्र प्रश्न असा आहे की, विद्यार्थ्यांचे प्रश्न नेमके काय आहेत? त्यांची उत्तरे कोण देणार? आणि ते प्रश्न जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकाराचे संरक्षण कोण करणार? व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने स्पष्ट केले आहे की, पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर संघटना पत्रकारांच्या घटनात्मक अधिकारांच्या बाजूने ठामपणे उभी राहील. “पत्रकारांवर दबाव टाकून प्रश्न सुटणार नाहीत. उलट दबाव वाढला की प्रश्न अधिक तीव्रतेने जनतेसमोर येतील. विद्यार्थ्यांना न्याय आणि पत्रकारांना निर्भयपणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळणे, हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे,” अशी भूमिका संघटनेने व्यक्त केली आहे. दरम्यान, पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातील तक्रारीसह सी ओ पी प्रकरणातील सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आणि विद्यार्थी, विद्यापीठ प्रशासन, विद्यार्थी संघटना तसेच पत्रकार,सर्वांची बाजू ऐकून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम यावर पुढची भूमिका घेणार आहे.
    1
    पत्रकारावरही गुन्हा; माध्यमस्वातंत्र्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा आरोप
पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील प्रतिष्ठित सी ओ पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहातील वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून सुरू झालेल्या या प्रकरणात विद्यार्थी संघटनांमधील संघर्षानंतर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आणि आता ए बी पी माझाचे पुणे प्रतिनिधी पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातही तक्रार गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने पत्रकाराने परवानगीशिवाय वसतिगृह परिसरात प्रवेश केल्याचा आरोप करत कायदेशीर तक्रार केली आहे. 
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने तीव्र नाराजी व्यक्त करत पत्रकारांवर अशा प्रकारे कायदेशीर कारवाई करून माध्यमांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
सी ओ पी परिसरातील घटनेनंतर पोलिसांनी आधी ए बी व्ही पी सदस्याच्या तक्रारीवरून एन एस यु आय आणि युवक काँग्रेसशी संबंधित ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवरून आणखी एक गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. 
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार मंदार गोंजारी यांनी सी ओ पी  परिसरातील विद्यार्थ्यांच्या कथित प्रश्नांबाबत केलेले वृत्तांकनही चर्चेत आले आहे. एबीपी माझाच्या अधिकृत संकेतस्थळावर गोंजारी यांच्या नावाने सी ओ पी प्रकरणावरील वृत्त प्रकाशित झाले आहे. 
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने वृत्तांकन करणे हा पत्रकारितेचा मूलभूत अधिकार आणि कर्तव्याचा भाग आहे. एखाद्या पत्रकाराने नियमांचे उल्लंघन केले असल्यास कायदा आपले काम करेल; मात्र पत्रकाराने केलेल्या वृत्तांकनामुळे प्रशासन किंवा सत्ताधारी अस्वस्थ झाले म्हणून पत्रकाराविरोधात कारवाई होत असेल, तर हा माध्यमस्वातंत्र्यासाठी गंभीर इशारा आहे, अशी भूमिका व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने व्यक्त केली आहे.
सी ओ पी  प्रकरणात विद्यार्थ्यांच्या शुल्क, शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवरून वाद निर्माण झाल्याचे विविध वृत्तांतून समोर आले आहे. एका विद्यार्थिनीने सुरुवातीला कॉलेजकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे सांगितले होते; त्यानंतर तिने दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्यावर दबाव निर्माण झाल्याचे सांगत राजकीय वादात आपल्याला ओढू नये, असे आवाहन केले. 
म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत, त्यावर प्रशासनाची भूमिका काय आहे, विद्यार्थी संघटनांमध्ये नेमका संघर्ष कशामुळे झाला आणि पत्रकाराविरोधातील तक्रारीमागील वास्तविक कारण काय आहे, हे स्पष्टपणे समोर येणे गरजेचे आहे.
व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.
म्हस्के म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पत्रकाराने बातमी केली म्हणून पत्रकाराला गुन्ह्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा केवळ एका पत्रकाराचा प्रश्न राहात नाही; हा संपूर्ण माध्यमविश्वाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न बनतो.
“पत्रकार चुकीचा असेल तर कायदा तपास करेल, पुरावे असतील तर न्यायालयीन प्रक्रिया होईल. मात्र पत्रकाराने प्रश्न उपस्थित केले म्हणून त्याच्यावर दबाव निर्माण करणे, त्याला घाबरवणे किंवा गुन्ह्याच्या माध्यमातून त्याची लेखणी रोखण्याचा प्रयत्न करणे कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या माध्यमांकडे संशयाने पाहिले जात असेल, तर ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचेही म्हस्के यांनी नमूद केले.
“महाराष्ट्रातील पत्रकार निर्भयपणे काम करतील. माध्यमांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तर व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील,” असा इशाराही त्यांनी दिला.
व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनीही सी ओ पी  प्रकरणातील पत्रकाराविरोधातील कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला.
चोरडिया म्हणाले की, पत्रकार हा समाजातील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणारा महत्त्वाचा दुवा आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या समोर आणणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे.
“पत्रकाराने बातमी केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. पत्रकारितेवर दबाव आणण्याचा कोणताही प्रयत्न महाराष्ट्रातील पत्रकार सहन करणार नाहीत. पत्रकाराच्या लेखणीला घाबरवण्याऐवजी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,” अशी भूमिका चोरडिया यांनी मांडली.
सी ओ पी  प्रकरणात पत्रकाराविरोधात दाखल झालेल्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि पत्रकाराला केवळ त्याच्या व्यावसायिक कर्तव्यामुळे लक्ष्य केले जात नाही ना, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
सी ओ पी  प्रकरण आता केवळ विद्यार्थी संघटनांमधील संघर्षापुरते मर्यादित राहिलेले नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यापीठ प्रशासनाची भूमिका, राजकीय हस्तक्षेप, विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष आणि आता पत्रकाराविरोधातील कायदेशीर कारवाई या सर्व मुद्द्यांमुळे प्रकरण अधिक व्यापक झाले आहे.
पोलिसांनी सी ओ पी  परिसरात राजकीय व्यक्ती आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर तसेच राजकीय कार्यक्रमांवर काही काळ निर्बंधही लागू केले होते. 
मात्र प्रश्न असा आहे की, विद्यार्थ्यांचे प्रश्न नेमके काय आहेत? त्यांची उत्तरे कोण देणार? आणि ते प्रश्न जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकाराचे संरक्षण कोण करणार?
व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने स्पष्ट केले आहे की, पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर संघटना पत्रकारांच्या घटनात्मक अधिकारांच्या बाजूने ठामपणे उभी राहील.
“पत्रकारांवर दबाव टाकून प्रश्न सुटणार नाहीत. उलट दबाव वाढला की प्रश्न अधिक तीव्रतेने जनतेसमोर येतील. विद्यार्थ्यांना न्याय आणि पत्रकारांना निर्भयपणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळणे, हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे,” अशी भूमिका संघटनेने व्यक्त केली आहे.
दरम्यान, पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातील तक्रारीसह सी ओ पी  प्रकरणातील सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आणि विद्यार्थी, विद्यापीठ प्रशासन, विद्यार्थी संघटना तसेच पत्रकार,सर्वांची बाजू ऐकून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम यावर पुढची भूमिका घेणार आहे.
    user_Kiran Mali
    Kiran Mali
    Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जलगाव जिल्हे मे एक औरत को नहाते हुए छेड रहा था एक आदमी उसे पकड के चारो तरफ से की पिटाई जलगाव लेटेस्ट न्यूज #जलगावन्यूज #जळगावजिल्हा #viralnewz #shuruapp
    1
    जलगाव जिल्हे मे एक औरत को नहाते हुए छेड रहा था एक आदमी उसे पकड के चारो तरफ से की पिटाई जलगाव लेटेस्ट न्यूज 
#जलगावन्यूज #जळगावजिल्हा #viralnewz #shuruapp
    user_Atish Rathod
    Atish Rathod
    Fruit & Vegetable Exporter जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • नेपाल का जलप्रलय भारत के दरवाजे पर! बिहार-UP में हाई अलर्ट, कोसी-गंडक मचा सकती हैं तबाही
    1
    नेपाल का जलप्रलय भारत के दरवाजे पर! बिहार-UP में हाई अलर्ट, कोसी-गंडक मचा सकती हैं तबाही
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    Media company जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • ​छत्रपती संभाजीनगर: 'सियाराम डेव्हलपर्स'च्या नवीन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन
    1
    ​छत्रपती संभाजीनगर: 'सियाराम डेव्हलपर्स'च्या नवीन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • जळगाव शहरात ईद-ए-मिलाद सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात
    1
    जळगाव शहरात ईद-ए-मिलाद सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात
    user_सोमेश किशोर मुळे
    सोमेश किशोर मुळे
    पेपर वितरक जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • पारध में ईद-ए-मिलाद पर बड़ा रक्तदान शिविर! युवाओं ने पेश की भाईचारे की मिसाल AQS NEWS "पैगंबर साहब का जीवन इंसानियत का संदेश"— पारध में रक्तदान शिविर में उमड़ा जनसैलाब AQS NEWS ​#AQSNews #Pardh #Bhokardan #JashneEidMiladUnNabi #BloodDonationCamp #SocialUnity #MaharashtraNews #aqsnews #sillod #anisqureshisillod
    1
    पारध में ईद-ए-मिलाद पर बड़ा रक्तदान शिविर! युवाओं ने पेश की भाईचारे की मिसाल AQS NEWS
"पैगंबर साहब का जीवन इंसानियत का संदेश"— पारध में रक्तदान शिविर में उमड़ा जनसैलाब AQS NEWS
​#AQSNews #Pardh #Bhokardan #JashneEidMiladUnNabi #BloodDonationCamp #SocialUnity #MaharashtraNews #aqsnews #sillod #anisqureshisillod
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    15 hrs ago
  • ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता 🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता काठमांडू : नेपाळ-चीन सीमेवरील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. नेपाळ पोलिसांच्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत १५७ जणांचे मृतदेह सापडले असून ४०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. पुरामुळे रस्ते, पूल, घरे आणि वीज प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये परदेशी नागरिकांचाही मोठा समावेश असून १३३ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची ताजी माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हिमनदीचा मोठा भाग कोसळल्याने नदीत माती, दगड आणि पाण्याचा प्रचंड लोंढा निर्माण झाला असावा. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे. बचाव पथके, सुरक्षा दल आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    1
    ब्रेकिंग न्यूज 🚨

 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता

🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨
नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता
काठमांडू : नेपाळ-चीन सीमेवरील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. नेपाळ पोलिसांच्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत १५७ जणांचे मृतदेह सापडले असून ४०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत.
पुरामुळे रस्ते, पूल, घरे आणि वीज प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये परदेशी नागरिकांचाही मोठा समावेश असून १३३ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची ताजी माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार हिमनदीचा मोठा भाग कोसळल्याने नदीत माती, दगड आणि पाण्याचा प्रचंड लोंढा निर्माण झाला असावा. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.
बचाव पथके, सुरक्षा दल आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.