देगलूरच्या न्यायप्रवासाला नवे अधिष्ठान देगलूर नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन संपन्न नांदेड दि. १० जानेवारी :- देगलूर शहराच्या न्यायइतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग यांच्या नूतन न्यायालयीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज अत्यंत शिस्तबद्ध व सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीपकुमार सी. मोरे यांच्या शुभहस्ते या भव्य इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील ग. वेदपाठक हे होते. तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नीरज पी. धोटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सन 1920 पासून न्यायदानाची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या जुन्या न्यायालयीन इमारतीच्या जागेवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रशस्त व सुसज्ज न्यायालयीन कक्ष, अभिवक्ता संघासाठी स्वतंत्र व सुसंस्कृत बार असोसिएशन तसेच नागरिकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांनी युक्त अशी ही बांधण्यात आलेली भव्य इमारत आता न्यायसेवेसाठी खुली करण्यात आली आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रक दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) राघवेंद्र नरहरराव देव तसेच देगलूर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. विरेंद्र नागनाथ पाटील यांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे उद्घाटन सोहळा नियोजित वेळेत व अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नांदेड येथील दिवाणी न्यायाधीश इंदूरकर यांनी केले. या कार्यक्रमास नांदेड, बिलोली, देगलूर येथील विधिज्ञ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, पोलीस निरीक्षक मारुती मुंडे, विविध सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, वकील तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या नूतन न्यायालयीन इमारतीचे सामाजिक व न्यायालयीन महत्त्व अधोरेखित करणारा ठरला. न्यायालयीन इमारत ही केवळ भौतिक रचना नसून ती न्याय, संविधान आणि लोकशाही मूल्यांची सजीव प्रतिमा असते. देगलूरमध्ये उभी राहिलेली ही नूतन न्यायालयीन इमारत पुढील अनेक दशकांपर्यंत न्यायाच्या प्रकाशाचा दीपस्तंभ ठरेल, अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.

- एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकारणी इस्लापूर पोलिसात गुन्हा दाखल..1
- प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते व यश मिळवता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वरील व्हिडिओ.. आज झालेल्या वसमत येथील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये वय वर्ष 60 असलेल्या आजीबाई 3 km धावणे स्पर्धा धावल्या आणि जिंकल्या पण..फाटके लुगडे,पायातील फाटलेले बूट,पांढरे झालेले केस आणि चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुट्या.. व एवढ्या थंडीची तमा न करता अगदी सहजपणे प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी आज यश संपादन केलेले आहे. खरंच या आजीच्या जिद्दीला सलाम...👌👌1
- राजमाता पुत्र. छत्रपती शिवाजी महाराज1
- गर्भलिंग निदान प्रकरणात तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी बाशी तालुक्यात गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या अजित मस्तुद (वय ३६, रा. रोजेले), नरेंद्र भगत (वय ३०, रा. आनंद नगर, अकलुज) व अकबर मुलाणी (वय ४५, रा. शिंखेड कॉलनी, केज) यांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी बाशी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीप्रमाणे आरोपींनी संगनमताने महिलांचे गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याचा संशय आहे. या अनुषंगाने पोलीस ठाण्यात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपी अजित मस्तुद याच्याकडे गर्भलिंग निदान करण्यासाठी एका महिलेकडून २० हजार रुपयांची मागणी केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तसेच आरोपींकडून मोबाईल फोन, संभाषणांचे रेकॉर्ड व आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. पोलिस कोठडीदरम्यान आरोपींकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आह3
- नवजात बालिकेने घेतले पित्याचे अंत्यदर्शन1
- Post by YUVA JALNA NEWS1
- *आमदार प्रतापदादा अडसड यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शासन संघटना, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धांचे बक्षीस वितरण धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. रावसाहेबजी रोठे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.* *या स्पर्धांचे बक्षीस वितरणासाठी धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख, भारतीय जनता पार्टी श्री.रावसाहेबजी रोठे व नगरसेवक विलास भाऊ बुटले भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तुषार भाऊ धनंजोडे विवेक भाऊ गौतम व छत्रपती शासन संघटना संस्थापक अध्यक्ष आकाश भाऊ गाठे शुभहस्ते पार पडले. क्रीडामाध्यमातून युवकांना सकारात्मक दिशा, संघभावना आणि शिस्तीचे धडे मिळावेत या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास खेळाडू, क्रीडाप्रेमी, संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या क्रीडास्पर्धा यशस्वी झाले, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.*1
- सोन्या चांदीच्या दागिन्यासह दोन चोरटे जेरबंद नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई1