logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

परभणी जिल्ह्यातील बँक कर्मचा-यांचे आंदोलन, मास डिमाँस्ट्रेशन परभणी(प्रतिनिधी):- युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्या आंदोलन कार्यक्रमांतर्गत परभणी येथील एसबीआय आरबीओ कार्यालयासमोर गुरूवारी (दि. २७)मास डेमॉन्स्ट्रेशन आयोजित करण्यात आले. या आंदोलनात यूएफबीयू, एसबीआय स्टाफ युनियन, एसबीआय ऑफिसर्स असोसिएशन तसेच विविध बँकांमधील कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी कर्मचारी - अधिकाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. या कार्यक्रमातून बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांची एकजूट आणि संघटित शक्तीचे दर्शन घडले. सर्वांनी आपल्या हक्कांसाठी संघर्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. या मास डेमॉन्स्ट्रेशन कार्यक्रमास एसबीआयचे राजेश विठ्ठलू, विनोद नखाते, योगेश गुंडाळे, धनंजय काळे, एमजीबीचे कृष्णा जाधव, बीओबीचे काकडे, संजय कांबळे कॅनरा बँक, मुलगिर एसओबी परभणी आणि सर्व बँकर्स उपस्थित होते.

10 hrs ago
user_जागर महाराष्ट्राचा न्यूज
जागर महाराष्ट्राचा न्यूज
मानवत, परभणी, महाराष्ट्र•
10 hrs ago
10bff7f1-2eaa-4113-bd3e-5c92120d3dcc

परभणी जिल्ह्यातील बँक कर्मचा-यांचे आंदोलन, मास डिमाँस्ट्रेशन परभणी(प्रतिनिधी):- युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्या आंदोलन कार्यक्रमांतर्गत परभणी येथील एसबीआय आरबीओ कार्यालयासमोर गुरूवारी (दि. २७)मास डेमॉन्स्ट्रेशन आयोजित करण्यात आले. या आंदोलनात यूएफबीयू, एसबीआय स्टाफ युनियन, एसबीआय ऑफिसर्स असोसिएशन तसेच विविध बँकांमधील कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी कर्मचारी - अधिकाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. या कार्यक्रमातून बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांची एकजूट आणि संघटित शक्तीचे दर्शन घडले. सर्वांनी आपल्या हक्कांसाठी संघर्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. या मास डेमॉन्स्ट्रेशन कार्यक्रमास एसबीआयचे राजेश विठ्ठलू, विनोद नखाते, योगेश गुंडाळे, धनंजय काळे, एमजीबीचे कृष्णा जाधव, बीओबीचे काकडे, संजय कांबळे कॅनरा बँक, मुलगिर एसओबी परभणी आणि सर्व बँकर्स उपस्थित होते.

More news from Maharashtra and nearby areas
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा; कृषी बाजार सभापती पंढरीनाथ घुले
    1
    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संवाद
मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा; 
कृषी बाजार सभापती पंढरीनाथ घुले
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    11 min ago
  • पत्रकारांनी निर्भीडपणे काम करा; तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन! दिलीप माने यांची ग्वाही; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गंगाखेड शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन सत्याच्या बाजूने निर्भीड पत्रकारिता करा, कोणत्याही आमिषाला, दबावाला किंवा भीतीला बळी पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने यांनी केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा गंगाखेडच्या कार्यालयाचे उद्घाटन दि. २३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले. यावेळी पत्रकारांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहनही माने यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार गोविंद यादव होते. उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष दिलीप माने, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जावेद इनामदार, तुकाराम अय्या आणि प्रा. डॉ. बालाजी शिंदे उपस्थित होते.
    1
    पत्रकारांनी निर्भीडपणे काम करा; तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन!
दिलीप माने यांची ग्वाही; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गंगाखेड शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन
सत्याच्या बाजूने निर्भीड पत्रकारिता करा, कोणत्याही आमिषाला, दबावाला किंवा भीतीला बळी पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा गंगाखेडच्या कार्यालयाचे उद्घाटन दि. २३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले. यावेळी पत्रकारांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहनही माने यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार गोविंद यादव होते. उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष दिलीप माने, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जावेद इनामदार, तुकाराम अय्या आणि प्रा. डॉ. बालाजी शिंदे उपस्थित होते.
    user_मराठवाडा संवाद न्युज
    मराठवाडा संवाद न्युज
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी* *धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी* मुंबई (प्रतिनिधी) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मुंबई येथे आपल्या भगिनी मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री आदिती ताई तटकरे तसेच पुणे येथे सौ. प्रमिलाताई पुरुषोत्तम केंद्रे यांच्या कडून राखी बांधून रक्षा बंधन साजरे केले आहे. तीनही बहिणींकडून राखी बांधून तिघींच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा तसेच कायम जनतेची सेवा घडावी, अशा शुभेच्छा धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणींना दिल्या. पंकजाताई मुंडे, प्रमिलाताई केंद्रे तसेच आपल्या सर्व बहिणी यांच्याबरोबरच आदितीताई तटकरे यांच्या समवेत धनंजय मुंडे हे दरवर्षी न चुकता रक्षा बंधन साजरे करतात, ही परंपरा त्यांनी अनेक वर्षांपासून जपली आहे.
    2
    धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी*
*धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी*
मुंबई (प्रतिनिधी) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मुंबई येथे आपल्या भगिनी मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री आदिती ताई तटकरे तसेच पुणे येथे सौ. प्रमिलाताई पुरुषोत्तम केंद्रे यांच्या कडून राखी बांधून रक्षा बंधन साजरे केले आहे. 
तीनही बहिणींकडून राखी बांधून तिघींच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा तसेच कायम जनतेची सेवा घडावी, अशा शुभेच्छा धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणींना दिल्या. 
पंकजाताई मुंडे, प्रमिलाताई केंद्रे तसेच आपल्या सर्व बहिणी यांच्याबरोबरच आदितीताई तटकरे यांच्या समवेत धनंजय मुंडे हे दरवर्षी न चुकता रक्षा बंधन साजरे करतात, ही परंपरा त्यांनी अनेक वर्षांपासून जपली आहे.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • 🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध! शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾 “आपली जमीन, आपला हक्क!” 🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध! शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾 “आपली जमीन, आपला हक्क!” शेतकरी एकजूट — संघर्ष मजबूत! 💪 #खापरखेडा #हिंगोली #शेतकरी #शक्तिपीठमहामार्ग #भूमीअधिग्रहण #RMNewsमराठी
    1
    🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध!

शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾

“आपली जमीन, आपला हक्क!”



🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध!
शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾
“आपली जमीन, आपला हक्क!”
शेतकरी एकजूट — संघर्ष मजबूत! 💪
#खापरखेडा #हिंगोली #शेतकरी #शक्तिपीठमहामार्ग #भूमीअधिग्रहण #RMNewsमराठी
    user_Ramprasad Magar news reporter
    Ramprasad Magar news reporter
    Local News Reporter बसमत, हिंगोली, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • बीड वकील संघ सचिव नितीन शिंदे तर कोषाध्यक्ष पदी विद्या गायकवाड यांची निवड झाल्याने केला भव्य सत्कार बीड २८(प्रतिनिधी)बीड वकील संघाचे महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी कोषाध्यक्ष विद्या गायकवाड सचिव नितीन शिंदे यांचा बीड वकील संघ 2026 च्या निवडणुकीत विजयी प्रतिनिधी यांचा पेढे भरवुन भव्य सत्कार ॲड सुनिल साळवे व अँड महेंद्र जाधव यांच्या वतीने करण्यात आला यावेळी अनेक वकील बांधव व भगीणी यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बीड वकील संघाच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या मत मोजणी द्वारा घोषीत महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी 8 मताने तर सचिव नितीन शिंदे २३ मताने व कोषाध्यक्ष म्हणुन विद्या गायकवाड 25 मताने विजयी झाल्या , या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अॅड सुनील साळवे यांनी विशेष परीश्रम घेतले .
    1
    बीड वकील संघ सचिव नितीन शिंदे तर कोषाध्यक्ष पदी विद्या गायकवाड यांची निवड झाल्याने केला भव्य सत्कार 
बीड २८(प्रतिनिधी)बीड वकील संघाचे महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी कोषाध्यक्ष विद्या गायकवाड सचिव नितीन शिंदे यांचा बीड वकील संघ 2026 च्या निवडणुकीत विजयी  प्रतिनिधी यांचा पेढे भरवुन भव्य सत्कार ॲड सुनिल साळवे व अँड महेंद्र जाधव यांच्या वतीने करण्यात आला यावेळी अनेक वकील बांधव व भगीणी यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बीड वकील संघाच्या निवडणुकी दरम्यान  झालेल्या मत मोजणी द्वारा घोषीत  महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी 8 मताने तर सचिव नितीन शिंदे २३ मताने व कोषाध्यक्ष म्हणुन विद्या गायकवाड 25 मताने विजयी झाल्या , या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अॅड सुनील साळवे यांनी विशेष परीश्रम घेतले .
    user_Journalist Rajeshkumar Jogdand
    Journalist Rajeshkumar Jogdand
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा.. रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल.. जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा.. रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता जालना महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांविरोधात कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. येणारा सणासुदीचा काळ लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, पदपथ तसेच कचराकुंड्यांच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अनेक वेळा ही जनावरे अचानक रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होतो. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होऊन नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांच्या मालकांनाच जबाबदार धरण्याचा निर्णय घेतला आहे.
    1
    जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा..

रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल..


जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा..
रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल..
आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता जालना महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांविरोधात कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. येणारा सणासुदीचा काळ लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
शहरातील प्रमुख रस्ते, चौक, पदपथ तसेच कचराकुंड्यांच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अनेक वेळा ही जनावरे अचानक रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होतो. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होऊन नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांच्या मालकांनाच जबाबदार धरण्याचा निर्णय घेतला आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न बीड प्रतिनिधी बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. २६ ऑगस्ट २०२६ रोजी बीड येथील जालना रोडवरील विठ्ठल साई प्रतिष्ठान येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर भेटलेल्या बालपणीच्या मैत्रिणींनी शालेय जीवनातील जुन्या आणि सोनेरी आठवणींना उजाळा दिला. संसाराच्या व्यापातून स्वतःसाठी एक दिवस सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी नागापुरे (कळसकर) यांच्या विशेष पुढाकाराने या अनोख्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लग्नानंतर संसाराच्या व्यापात आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या महिलांना एक दिवस स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी जगता यावा, हा यामागचा प्रमुख उद्देश होता. यासाठी कुमशी, घोसापुरी आणि नामलगाव परिसरातील १९९०-९१ या बॅचच्या (इयत्ता ७ वी, ८ वी आणि ९ वी) माजी विद्यार्थिनींना एकत्र आणण्यात आले. खेळ, शिदोरी आणि मनमोकळ्या गप्पा तब्बल साडेतीन दशकांनंतर भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. या सर्वजणींनी संपूर्ण दिवस एकमेकींना गजरे लावून, सुख-दुःखाच्या गप्पा मारत आणि मनमोकळेपणाने संवाद साधत (शेअरिंग करून) बालपणातील ते दिवस पुन्हा अनुभवले. या मेळाव्यातील काही खास क्षण: पारंपरिक खेळ: या वयातही महिलांनी शाळेच्या मैदानावर खेळले जाणारे खो-खो, आंधळी कोशिंबीर आणि पायदोड यांसारखे पारंपरिक खेळ खेळून मनसोक्त आनंद लुटला. सहभोजन: प्रत्येकीने घरून आणलेली 'शिदोरी' एकत्र करून सर्वजणींनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला. रक्षाबंधन व स्नेहभेट: मैत्रिणींनी एकमेकींना राखी बांधून मैत्रीचे हे अतूट नाते अधिक घट्ट केले आणि एकमेकींना स्नेहभेटही दिली. या आनंददायी आणि भावपूर्ण मेळाव्याला मीरा बांड, शिवकन्या बांड, शारदा शेळके, किस्किनदा बांड, मंगल करपे, कांता शिंदे, उषा जाधव, शालिनी नेरे, दैवशाला डोळस आणि रुक्मिणी नागापुरे आदी माजी विद्यार्थिनींची प्रमुख उपस्थिती होती. ३५ वर्षांनंतरचा हा मेळावा सर्वांसाठीच एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
    2
    ३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
बीड प्रतिनिधी 
बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. २६ ऑगस्ट २०२६ रोजी बीड येथील जालना रोडवरील विठ्ठल साई प्रतिष्ठान येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर भेटलेल्या बालपणीच्या मैत्रिणींनी शालेय जीवनातील जुन्या आणि सोनेरी आठवणींना उजाळा दिला.
संसाराच्या व्यापातून स्वतःसाठी एक दिवस
सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी नागापुरे (कळसकर) यांच्या विशेष पुढाकाराने या अनोख्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लग्नानंतर संसाराच्या व्यापात आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या महिलांना एक दिवस स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी जगता यावा, हा यामागचा प्रमुख उद्देश होता. यासाठी कुमशी, घोसापुरी आणि नामलगाव परिसरातील १९९०-९१ या बॅचच्या (इयत्ता ७ वी, ८ वी आणि ९ वी) माजी विद्यार्थिनींना एकत्र आणण्यात आले.
खेळ, शिदोरी आणि मनमोकळ्या गप्पा
तब्बल साडेतीन दशकांनंतर भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. या सर्वजणींनी संपूर्ण दिवस एकमेकींना गजरे लावून, सुख-दुःखाच्या गप्पा मारत आणि मनमोकळेपणाने संवाद साधत (शेअरिंग करून) बालपणातील ते दिवस पुन्हा अनुभवले.
या मेळाव्यातील काही खास क्षण:
पारंपरिक खेळ: या वयातही महिलांनी शाळेच्या मैदानावर खेळले जाणारे खो-खो, आंधळी कोशिंबीर आणि पायदोड यांसारखे पारंपरिक खेळ खेळून मनसोक्त आनंद लुटला.
सहभोजन: प्रत्येकीने घरून आणलेली 'शिदोरी' एकत्र करून सर्वजणींनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला.
रक्षाबंधन व स्नेहभेट: मैत्रिणींनी एकमेकींना राखी बांधून मैत्रीचे हे अतूट नाते अधिक घट्ट केले आणि एकमेकींना स्नेहभेटही दिली.
या आनंददायी आणि भावपूर्ण मेळाव्याला मीरा बांड, शिवकन्या बांड, शारदा शेळके, किस्किनदा बांड, मंगल करपे, कांता शिंदे, उषा जाधव, शालिनी नेरे, दैवशाला डोळस आणि रुक्मिणी नागापुरे आदी माजी विद्यार्थिनींची प्रमुख उपस्थिती होती. ३५ वर्षांनंतरचा हा मेळावा सर्वांसाठीच एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड
    1
    शेख फयाज शेख शब्बीर यांची 
शिवसेना अल्पसंख्याक पाथरी 
विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड
शेख फयाज शेख शब्बीर यांची 
शिवसेना अल्पसंख्याक पाथरी 
विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.