logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या पैठण येथील शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या चरण पादुका आणि पालखीचे शनिवारी दुपारी १२ वाजता शिरूर कासार शहरात आगमन झाले. सुमारे ४२६ वर्षांची जुनी परंपरा असलेल्या या पालखी सोहळ्याचे शहरात अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले. टाळ-मृदंगाचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि पायघड्या घालत पालखीला हनुमान मंदिराकडे आणण्यात आले, जिथे दुपारी ४ वाजेपर्यंत दर्शनासाठी विसावा घेण्यात आला. एकादशीनिमित्त शहरातील नागरिकांनी आपापल्या घरी फराळाचे नियोजन केले होते, तर ठिकठिकाणी वारकऱ्यांना पाणी, फळे, साबुदाणा खिचडी आणि खजूर यांसारख्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ४ वाजता हरीनामाच्या गजरात ही पालखी पुढील मुक्कामासाठी राक्षस भुवनकडे रवाना झाली. या पालखी सोहळ्यात ४० हून अधिक दिंड्या आणि २० हजारांपेक्षा जास्त नाथ भक्त पायी चालत सामील होतात. या दिंडी सोहळ्याप्रसंगी तालुक्याचे तहसीलदार सुरेशजी घोळवे, नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी गणेश दहिफळे, एपीआय राजेश गडवे यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच शहराचे नगराध्यक्ष रोहिदास पाटील, नगरसेवक गणेश भांडेकर, दत्ता पाटील, सुभाष दादा गाडेकर, अर्जुन दादा गाडेकर, अरुण भालेराव, दादा हरिदास, अमोल चव्हाण, भिमराव गायकवाड, वसंत काटे, नशिरभाई शेख, ज्येष्ठ नेते गोविंद पाटील गाडेकर, सुनील पाटील, भास्कर गाडेकर यांच्यासह सर्व नगरसेवक, युवक आणि स्थानिक नाथ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी सोहळ्यादरम्यान सामाजिक सलोखा आणि सेवेचे अनोखे दर्शन घडले. केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांनी प्रत्येक मेडिकलकडून १ हजार रुपयांची वर्गणी गोळा करून वारकऱ्यांसाठी मोफत औषधोपचार (फ्री मेडिसिन) देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला. यात साई मेडिकलचे सुधीरजी भांडेकर, गुरुमाऊली मेडिकलचे बाळासाहेब बोराडे, ओमकार मेडिकलचे प्रकाश जोगदंड यांच्यासह एकूण २७ औषध विक्रेत्यांनी पुढाकार घेतला. तसेच, समाजसेवक समीर बागवान यांनी वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था करून 'हम सब एक है' असा हिंदू-मुस्लिम सलोख्याचा संदेश दिला.

1 hr ago
user_Mahesh Mangrulkar
Mahesh Mangrulkar
Shirur (Kasar), Beed•
1 hr ago
613bcb35-b599-41d0-b4de-3bf45c09754f

पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या पैठण येथील शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या चरण पादुका आणि पालखीचे शनिवारी दुपारी १२ वाजता शिरूर कासार शहरात आगमन झाले. सुमारे ४२६ वर्षांची जुनी परंपरा असलेल्या या पालखी सोहळ्याचे शहरात अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले. टाळ-मृदंगाचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि पायघड्या घालत पालखीला हनुमान मंदिराकडे आणण्यात आले, जिथे दुपारी ४ वाजेपर्यंत दर्शनासाठी विसावा घेण्यात आला. एकादशीनिमित्त शहरातील नागरिकांनी

a8ad12b5-6b62-4c02-ac9c-b065e8915d09

आपापल्या घरी फराळाचे नियोजन केले होते, तर ठिकठिकाणी वारकऱ्यांना पाणी, फळे, साबुदाणा खिचडी आणि खजूर यांसारख्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ४ वाजता हरीनामाच्या गजरात ही पालखी पुढील मुक्कामासाठी राक्षस भुवनकडे रवाना झाली. या पालखी सोहळ्यात ४० हून अधिक दिंड्या आणि २० हजारांपेक्षा जास्त नाथ भक्त पायी चालत सामील होतात. या दिंडी सोहळ्याप्रसंगी तालुक्याचे तहसीलदार सुरेशजी घोळवे, नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी गणेश दहिफळे, एपीआय राजेश

d42b06ef-4b91-4e22-86c0-e0dc6d0561cf

गडवे यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच शहराचे नगराध्यक्ष रोहिदास पाटील, नगरसेवक गणेश भांडेकर, दत्ता पाटील, सुभाष दादा गाडेकर, अर्जुन दादा गाडेकर, अरुण भालेराव, दादा हरिदास, अमोल चव्हाण, भिमराव गायकवाड, वसंत काटे, नशिरभाई शेख, ज्येष्ठ नेते गोविंद पाटील गाडेकर, सुनील पाटील, भास्कर गाडेकर यांच्यासह सर्व नगरसेवक, युवक आणि स्थानिक नाथ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी सोहळ्यादरम्यान सामाजिक सलोखा आणि सेवेचे अनोखे

d2d55711-fa45-4916-bc17-b2e5fd60cdf8

दर्शन घडले. केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांनी प्रत्येक मेडिकलकडून १ हजार रुपयांची वर्गणी गोळा करून वारकऱ्यांसाठी मोफत औषधोपचार (फ्री मेडिसिन) देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला. यात साई मेडिकलचे सुधीरजी भांडेकर, गुरुमाऊली मेडिकलचे बाळासाहेब बोराडे, ओमकार मेडिकलचे प्रकाश जोगदंड यांच्यासह एकूण २७ औषध विक्रेत्यांनी पुढाकार घेतला. तसेच, समाजसेवक समीर बागवान यांनी वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था करून 'हम सब एक है' असा हिंदू-मुस्लिम सलोख्याचा संदेश दिला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दररोज सकाळी जगाच्या कल्याणासाठी आणि मानवतेसाठी संत ज्ञानेश्वरांची विश्वात्मक प्रार्थना "पसायदान" म्हटली जाते. मात्र, या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मूलभूत सुविधा, सुरक्षित शाळा इमारत, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहे मिळतील काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विचारला आहे. तसेच, या विद्यार्थ्यांना सरकारी अधिकाऱ्यांकडून निधीचे "दान" मिळेल काय, असे विचारत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे।
    1
    बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दररोज सकाळी जगाच्या कल्याणासाठी आणि मानवतेसाठी संत ज्ञानेश्वरांची विश्वात्मक प्रार्थना "पसायदान" म्हटली जाते. मात्र, या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मूलभूत सुविधा, सुरक्षित शाळा इमारत, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहे मिळतील काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विचारला आहे. तसेच, या विद्यार्थ्यांना सरकारी अधिकाऱ्यांकडून निधीचे "दान" मिळेल काय, असे विचारत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे।
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    पाटोदा, बीड, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मवेशी येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलींसाठी पोलीस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या मुलींसाठी मोफत निवासी आणि भोजन व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक तरुणी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, त्यांचे वय १८ ते २६ वर्षांच्या दरम्यान असावे. या मोफत प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ जुलै २०२६ आहे. इच्छुकांना पोलीस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, मवेशी, ता. अकोले येथे जाऊन ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा लागेल. या सुवर्णसंधीबाबत अधिक माहितीसाठी ९४२१५२५४१६, ८२७५३४९४१४ किंवा ९९६०११२६०० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पात्र मुलींनी आजच आपले अर्ज सादर करून पोलीस किंवा सैन्यदलातील करिअरच्या दिशेने आत्मविश्वासाने पाऊल टाकावे.
    1
    अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मवेशी येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलींसाठी पोलीस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या मुलींसाठी मोफत निवासी आणि भोजन व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक तरुणी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, त्यांचे वय १८ ते २६ वर्षांच्या दरम्यान असावे.

या मोफत प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ जुलै २०२६ आहे. इच्छुकांना पोलीस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, मवेशी, ता. अकोले येथे जाऊन ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा लागेल. या सुवर्णसंधीबाबत अधिक माहितीसाठी ९४२१५२५४१६, ८२७५३४९४१४ किंवा ९९६०११२६०० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पात्र मुलींनी आजच आपले अर्ज सादर करून पोलीस किंवा सैन्यदलातील करिअरच्या दिशेने आत्मविश्वासाने पाऊल टाकावे.
    user_राविराज शिंदे
    राविराज शिंदे
    Photographer अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सहाय्यक निबंधकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईनंतर थेट कर्जत कार्यालयासमोर फटाके फोडण्यात आले.
    1
    अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सहाय्यक निबंधकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईनंतर थेट कर्जत कार्यालयासमोर फटाके फोडण्यात आले.
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • औरंगाबादमध्ये एमआयएमचे (AIMIM) शहर अध्यक्ष नासेर सिद्दीकी यांचे एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमुळे औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
    1
    औरंगाबादमध्ये एमआयएमचे (AIMIM) शहर अध्यक्ष नासेर सिद्दीकी यांचे एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमुळे औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
    user_ARK NEWS 20
    ARK NEWS 20
    Voice of people औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये एका डॉनच्या घरात प्रचंड मोठी रक्कम सापडली आहे. या घरात मिळालेली रक्कम एवढी अफाट आहे की पोलिसांना ती मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले. पोलीस ५ मशीनच्या साहाय्याने या सापडलेल्या रकमेची मोजणी करत होते.
    1
    छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये एका डॉनच्या घरात प्रचंड मोठी रक्कम सापडली आहे. या घरात मिळालेली रक्कम एवढी अफाट आहे की पोलिसांना ती मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले. पोलीस ५ मशीनच्या साहाय्याने या सापडलेल्या रकमेची मोजणी करत होते.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • औरंगाबादमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या कार्यपद्धती आणि विकासकामांबाबत विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकासाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला नसून, तो केवळ काही मोजक्याच व्यक्तींना मिळाल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्तार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निषेध नोंदविला. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी विविध कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान, विरोधकांकडून झालेल्या या आरोपांवर आमदार अब्दुल सत्तार किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही।
    1
    औरंगाबादमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या कार्यपद्धती आणि विकासकामांबाबत विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकासाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला नसून, तो केवळ काही मोजक्याच व्यक्तींना मिळाल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्तार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निषेध नोंदविला.

या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी विविध कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान, विरोधकांकडून झालेल्या या आरोपांवर आमदार अब्दुल सत्तार किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही।
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पैठण तालुक्यातील कडेठाण येथे शेतातून डाळिंब चोरी केल्याच्या संशयावरून एका पुरुषाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत संबंधित व्यक्ती जखमी झाली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही नेमकी घटना कशामुळे घडली याचा तपास सध्या सुरू असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
    1
    पैठण तालुक्यातील कडेठाण येथे शेतातून डाळिंब चोरी केल्याच्या संशयावरून एका पुरुषाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत संबंधित व्यक्ती जखमी झाली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही नेमकी घटना कशामुळे घडली याचा तपास सध्या सुरू असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.