शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव यांच्या निवासस्थानी गणरायाची भक्तिभावाने पूजा शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव यांच्या निवासस्थानी गणरायाची भक्तिभावाने पूजा चिपळूण : शिवसेना नेते तथा गुहागर विधानसभेचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाची आमदार भास्करराव जाधव यांनी भक्तिभावाने पूजा केली. गणेशोत्सवानिमित्त जाधव कुटुंबीय एकत्र आले होते. यावेळी कुटुंबीयांनी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेत पूजा-अर्चा केली. घरातील वातावरण भक्तिमय आणि मंगलमय झाले होते. यावेळी श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली. गणपती बाप्पांच्या आगमनाने तुरंबव येथील जाधव यांच्या निवासस्थानी उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव यांच्या निवासस्थानी गणरायाची भक्तिभावाने पूजा शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव यांच्या निवासस्थानी गणरायाची भक्तिभावाने पूजा चिपळूण : शिवसेना नेते तथा गुहागर विधानसभेचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाची आमदार भास्करराव जाधव यांनी भक्तिभावाने पूजा केली. गणेशोत्सवानिमित्त जाधव कुटुंबीय एकत्र आले होते.
यावेळी कुटुंबीयांनी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेत पूजा-अर्चा केली. घरातील वातावरण भक्तिमय आणि मंगलमय झाले होते. यावेळी श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली. गणपती बाप्पांच्या आगमनाने तुरंबव येथील जाधव यांच्या निवासस्थानी उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
- निंबू विक्रेत्यापासून यशस्वी उद्योजक आणि समाजसेवकापर्यंत रवींद्र कांबळेंचा प्रेरणादायी प्रवास! संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उभे केले यश; शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नियमित जेवणदान, गोरगरिबांना मदतीचा हात विशेष प्रतिनिधी : परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे रवींद्र कांबळे यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते. निंबू विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून प्रेरणादायी ठरला आहे. संघर्षाच्या काळात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत रवींद्र कांबळे यांनी व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र, यश मिळाल्यानंतरही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कायम जपली आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ते दररोज अविरतपणे जेवणदान करतात. तसेच गरजू आणि गोरगरिबांना आपल्या परीने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ संघर्षातून यशस्वी होण्याची कहाणी नसून, ‘स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही काहीतरी करण्याची’ प्रेरणा देणारा आहे. रवींद्र कांबळे यांच्या याच संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यशाचा प्रवास आणि समाजसेवेची भावना जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहा. 🎥 संपूर्ण प्रेरणादायी डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी YouTube व्हिडिओला भेट द्या. पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज1
- "दुष्काळाच्या ज्या उपायोजना कराव्या लागतात त्याची तयारी आम्ही सुरू केली...!"1
- को.ढव्यात घरफोडी करणाऱ्या ५९ वर्षीय महिलेच्या मुसक्या आवळल्या; ₹३.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त1
- बाप्पाच्या स्वागताचा उत्साह, पण अजितदादांची उणीव; सुनील शेळके भावुक... मावळ, पुणे : मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या निवासस्थानी आज भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. कुटुंबीय, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणरायाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.यावेळी अजितदादांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सुनील शेळके भावुक झाले. “दादांची रोज आठवण येते, यंदा त्यांची उणीव नक्कीच जाणवते,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसंच, शेतकरी सुखी राहावा आणि महाराष्ट्राची प्रगती व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी बाप्पाच्या चरणी केली... : सुनील शेळके, आमदार, मावळ #सुनीलशेळके #मावळ #गणेशोत्सव #गणपतीबाप्पा #अजितदादा #अजितपवार #मावळआमदार #गणेशप्रतिष्ठापना #गणराय #बाप्पाचेस्वागत #महाराष्ट्र #शेतकरी #महाराष्ट्राचीप्रगती #Maval #SunilShelke #AjitPawar #Ganeshotsav #GanpatiBappa #Maharashtra #TheNayakNews1
- Post by E city news network1
- उत्साह, आनंद, प्रसन्न वातावरणात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत..1
- पोसेवाडी येथील भगवान जाधव हे इको फ्रेंडली गणपती बनवण्यात मग्न खानापूर तालुक्यातील पोसेवाडी येथील भगवान जाधव लक्ष्मी नारायण पुरातन वस्तू संग्रहालयाचे मालक आहेत हे सध्या गणपती उत्सव काळात निसर्ग फाऊंडेशन माध्यमातून इको फ्रेंडली गणपती बनवण्याचे काम चालू असून ह्या गणपतीला खानापूर घाट माथ्यावर बरेच मागणी आहे यामुळे दूषित वातावरण होणार नाही व भाविकांनी घरगुती मातीपासून बनवलेला गणपती आपल्या घरी विराजमान करावा असे आवाहन भगवान जाधव यांनी केले1
- "समाजाला न्याय मिळाला पाहिजे.., इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता..!"1