श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सौम्या प्रोडक्शन प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट 'कॅलक्युलेटर' याचे स्क्रिप्ट पूजन आणि पोस्टर लाँच सोहळा नुकताच मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मंदिर समितीचे चेअरमन आणि नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते चित्रपटाचे स्क्रिप्ट पूजन आणि पोस्टर लाँच करण्यात आले. या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले आणि अंकुश मांडेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबतच, चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक शुभम दळवी आणि निर्मात्या पल्लवी अगरवाल यांच्यासह मनीष शिंदे, सायली शिंदे, के. विजय, आदित्य पवार, स्नेहल करंडे, श्रावणी जाधव आणि अरुण पाणीभाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्क्रिप्ट पूजन आणि पोस्टर लाँचनंतर चित्रपटाच्या संपूर्ण टीमने यशस्वी निर्मितीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. निर्मात्यांनी विश्वास व्यक्त केला की 'कॅलक्युलेटर' हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि मनोरंजक अनुभव ठरणार आहे. यावेळी मंदिर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले व त्यांच्या सहकाऱ्यांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचे कृपावस्त्र देऊन सत्कार केला. याप्रसंगी नगरसेवक अविनाश मडीखांबे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, तसेच विश्वस्त महेश गोगी, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, श्रीशैल गवंडी आणि विपूल जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सौम्या प्रोडक्शन प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट 'कॅलक्युलेटर' याचे स्क्रिप्ट पूजन आणि पोस्टर लाँच सोहळा नुकताच मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मंदिर समितीचे चेअरमन आणि नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते चित्रपटाचे स्क्रिप्ट पूजन आणि पोस्टर लाँच करण्यात आले. या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले आणि अंकुश मांडेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबतच, चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक शुभम दळवी आणि निर्मात्या पल्लवी अगरवाल यांच्यासह मनीष शिंदे, सायली शिंदे, के. विजय, आदित्य पवार, स्नेहल करंडे, श्रावणी जाधव आणि अरुण पाणीभाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्क्रिप्ट पूजन आणि पोस्टर लाँचनंतर चित्रपटाच्या संपूर्ण टीमने यशस्वी निर्मितीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. निर्मात्यांनी विश्वास व्यक्त केला की 'कॅलक्युलेटर' हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि मनोरंजक अनुभव ठरणार आहे. यावेळी मंदिर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले व त्यांच्या सहकाऱ्यांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचे कृपावस्त्र देऊन सत्कार केला. याप्रसंगी नगरसेवक अविनाश मडीखांबे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, तसेच विश्वस्त महेश गोगी, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, श्रीशैल गवंडी आणि विपूल जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
- भारतीय जनता पार्टी, तालुका परळी वैजनाथ यांच्या वतीने मौजे नंदनंज येथील बोरणा प्रकल्प परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेश गित्ते यांनी बोरणा प्रकल्पाच्या पाण्यातून योगसाधना केली. मंत्री ना. पंकजाताई मुंडे आणि मा. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना, भाजप तालुकाध्यक्ष राजेश गित्ते यांनी योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी, सुदृढ आणि संतुलित जीवनशैली असल्याचे प्रतिपादन केले. ताणतणावमुक्त व आरोग्यदायी समाज घडवण्यासाठी नियमित योगाभ्यास करणे काळाची गरज असून, योग ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून, जगभरात योग दिन उत्साहात साजरा केला जातो. नियमित योगाभ्यासामुळे शरीराला ऊर्जा मिळते, मानसिक आरोग्य सुधारते आणि जीवनमान उंचावते, असे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले. या कार्यक्रमात तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, बीएलए-२, कार्यकर्ते, पत्रकार बांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाजपा सचिव अनिल गुट्टे, अनुसूचित मोर्चा अध्यक्ष धुराजी साबळे, जेष्ठ नेते नाथराव (दादा) गुट्टे, नंदनंज उपसरपंच तथा बुथ प्रमुख बालाजी गुट्टे, मिरवट मा. उपसरपंच रामेश्वर महाराज इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी यावेळी योगधर्म, मानवधर्म, राष्ट्रधर्म आणि सेवाधर्म यांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला, तसेच योगाच्या माध्यमातून स्वतःचे आणि समाजाचे आरोग्य सुदृढ करण्याचा संदेश देण्यात आला.1
- ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत कुणबी दाखल्यांना आव्हान देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त झाला आहे. या पत्रकार परिषदेत हाके यांनी कुणबी दाखले रद्द करण्याची आणि चुकीचे कुणबी दाखले देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीनंतर मराठा समाज आक्रमक झाला असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. काळकुटे यांनी म्हटले आहे की, लक्ष्मण हाके यांना मानसोपचार तज्ञाची गरज असून, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. हाकेंना मराठा द्वेशाचा 'कावीळ' झाला असून, त्यांनी बीडमधील बागलाने व मोगले यांची भेट घेऊन उपचार घेतला पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याची त्यांना नितांत गरज असल्याचेही काळकुटे यांनी ठामपणे सांगितले. हाके यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही रस्त्यावरची तसेच संवैधानिक लढाई लढायलाही तयार आहोत, असे गंगाधर काळकुटे यांनी स्पष्ट केले.1
- भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम मतमोजणीच्या प्रक्रियेत आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.1
- चित्रपट अभिनेते शाहरुख खान यांनी सुप्रियाताईंचा मुका घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेवरून आमदार रोहित पवार यांच्या मौनावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, त्यांना विचारण्यात आले आहे की ते आता गप्प का आहेत?1
- आज मुंबई शहरात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात साजरा करण्यात आला. नागरिकांमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राजधानीत विविध ठिकाणी सामूहिक योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यांतर्गत, एका मुख्य कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि बॉलिवूडचे आघाडीचे अभिनेता शाहिद कपूर यांनी हजारो नागरिकांसोबत एकत्र येत योगासने केली. 'दीर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्यासाठी योग' हा जागतिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवून दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करणे हा या भव्य आयोजनाचा मुख्य उद्देश होता. या सोहळ्याला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.1
- नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी विजय मिळवला आहे. अमरनाथ राजूरकर हे या मतदारसंघातून विजयी घोषित झाले आहेत.1
- परळी वैजनाथ येथे एका थार गाडीच्या धडकेत प्रशांत प्रल्हाद देशमुख या युवकाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. संत भगवान बाबा चौक ते तहसीलकडे जाणाऱ्या रस्त्यावर थार गाडीने धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला होता. गंभीर जखमी अवस्थेत प्रशांत देशमुख यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, जिथे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, देशमुख कुटुंबीयांनी हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित थार गाडी स्पष्टपणे दिसत असून, फुटेजमध्ये चारचाकी वाहन चालकाने संशयास्पद पद्धतीने मागून गाडी आणून धडक दिल्याचे दिसून येते. यामुळे घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांसह देशमुख कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने जमा होत केली. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याने आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचीही त्यांची मागणी होती. दरम्यान, या प्रकरणी परळी पोलिसांनी गुन्हा दाखल करत शोधमोहीम सुरू केली. मध्यरात्रीनंतर पोलिसांनी आरोपी आणि गाडीचा शोध घेण्यात यश मिळवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नामे नागेश विश्वनाथ मुडे, रा. भोपळा, याला अटक करण्यात आली असून, थार गाडीही ताब्यात घेण्यात आली आहे.1
- बीड शहराची जीवनवाहिनी असलेल्या बिंदुसरा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून नदीपात्रात सांडपाणी, कचरा आणि जैविक कचरा टाकल्यामुळे तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या गंभीर स्थितीकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी पर्यावरण व वातावरणीय बदल तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे बिंदुसरा नदी प्रदूषणमुक्त करून तिचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी केली आहे. डॉ. ढवळे यांनी खंत व्यक्त केली की, बीड नगर परिषद निवडणुकीत बिंदुसरा नदी प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र आजही नदीपात्रातील परिस्थिती 'जैसे थे' असून दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमित बांधकामे, कचरा आणि जैविक कचरा टाकल्याने प्रदूषण वाढले असून, याचा थेट परिणाम बीडकरांच्या आरोग्यावर होत आहे. नदी संवर्धन हा सार्वजनिक हित, पर्यावरण संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर विषय असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनात बिंदुसरा नदी प्रकल्पाचा तातडीने आढावा घेण्याची, नदीपात्रातील अतिक्रमणे हटवण्याची आणि नगर परिषद कर्मचारी नदीपात्रात कचरा टाकत असल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, नदीपात्रासाठी फ्लड झोन, ग्रीन झोन, रेड झोन व यलो झोन निश्चित करून संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात असे म्हटले आहे. भविष्यात १९८९ सारखी पूरस्थिती निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होऊ शकते, त्यामुळे पूररेषेतील अतिक्रमणांबाबत दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.1