जिल्हा क्रीडा व युवक सेवा कार्यालय, नागपूर आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. क्रीडा व युवक सेवा नागपूर विभागाचे उपसंचालक महादेव काजगावडे यांनी मैदानावर उपस्थित राहून खेळाडूंची भेट घेतली व त्यांचा उत्साह वाढवला. त्यांनी खेळाडूंना शिस्त, क्रीडा भावना आणि सातत्यपूर्ण सरावासह राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत अंडर-१५ बालक गटात एम.एम. रब्बानी संघाने अंतिम सामन्यात डीपीएस कामठीचा ३-० असा पराभव करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात एम.एम. रब्बानीकडून मोहम्मद इब्राहिम (५ वे मिनिट), मोहम्मद फुझैल (७ वे मिनिट) आणि मुसय्यब जमाल (२१ वे मिनिट) यांनी गोल केले. त्याआधी एम.एम. रब्बानीने डीपीएस मिहानला २-० ने हरवले, ज्यामध्ये १ ल्या मिनिटाला डेन्मार्क आणि २३ व्या मिनिटाला झैनुल आबिदीनने गोल केले. तर डीपीएस कामठीने बीवायएम आष्टीचा टायब्रेकरमध्ये ३-० ने पराभव केला. निर्धारित वेळेत सामना ०-० असा बरोबरीत राहिल्यानंतर टायब्रेकरमध्ये सौरभ लांजेवार, रियान्श भाटिया आणि इब्राहिम अंसारी यांनी गोल केले. अन्य सामन्यात डीपीएस मिहानने बीवायएम आष्टीचा १-० ने पराभव केला, ज्यामध्ये विदेश शर्माने १९ व्या मिनिटाला विजयी गोल केला. अंडर-१५ एनएमसी बालक गटात नागपूर रेसिडेन्शियल हायस्कूलने आयुष गुप्ताच्या हॅट्रिकच्या (३, ८ आणि १६ वे मिनिट) जोरावर टॅगोर मेमोरियलचा ३-० असा पराभव केला. सेंट जॉन्स (स्टेट) संघाने श्री कॉन्व्हेंटवर ६-० अशी मोठी मात केली, ज्यामध्ये रियान शेखने २ऱ्या व ४थ्या मिनिटाला, अयानने ८ व्या, इस्माईल शेखने १३ व्या, अंशुल दवांडेने १५ व्या आणि देवयांश कालेने २१ व्या मिनिटाला गोल केले. इतर सामन्यांमध्ये अंजुमन इंग्लिश स्कूलने न्यू मॉडर्नचा १-० ने (सरजील अंसारी १६ वे मिनिट), सेंट मायकेल्सने सेंट पॉल्स हायस्कूलचा २-० ने (सुजीत करमाकर १ ले मिनिट, प्रिन्स ९ वे मिनिट), भावन्स त्रिमुर्ती नगरने सीपीएस काटोल रोडचा १-० ने (विहान डाळवी १५ वे मिनिट), एस.एफ.एस. एक्सलन्सने सरस्वती सक्षमचा १-० ने (झोहर पटेल १६ वे मिनिट) आणि सीपीएस इंटरनॅशनलने तिडके विद्यालयाचा २-० ने (आदित्य कांबळे १० वे आणि १९ वे मिनिट) पराभव केला. दीनानाथ हायस्कूल व किड्स वर्ल्ड यांच्यातील सामना २-२ असा बरोबरीत सुटल्यानंतर टायब्रेकरमध्ये दीनानाथ हायस्कूलने ३-१ ने विजय मिळवला. याप्रसंगी उपसंचालक महादेव काजगावडे यांनी सर्व विजेत्या व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाच्या माध्यमातून शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमतेचा विकास होतो असे सांगत त्यांनी खेळाडूंना भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

- जिल्हा क्रीडा व युवक सेवा कार्यालय, नागपूर आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. क्रीडा व युवक सेवा नागपूर विभागाचे उपसंचालक महादेव काजगावडे यांनी मैदानावर उपस्थित राहून खेळाडूंची भेट घेतली व त्यांचा उत्साह वाढवला. त्यांनी खेळाडूंना शिस्त, क्रीडा भावना आणि सातत्यपूर्ण सरावासह राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत अंडर-१५ बालक गटात एम.एम. रब्बानी संघाने अंतिम सामन्यात डीपीएस कामठीचा ३-० असा पराभव करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात एम.एम. रब्बानीकडून मोहम्मद इब्राहिम (५ वे मिनिट), मोहम्मद फुझैल (७ वे मिनिट) आणि मुसय्यब जमाल (२१ वे मिनिट) यांनी गोल केले. त्याआधी एम.एम. रब्बानीने डीपीएस मिहानला २-० ने हरवले, ज्यामध्ये १ ल्या मिनिटाला डेन्मार्क आणि २३ व्या मिनिटाला झैनुल आबिदीनने गोल केले. तर डीपीएस कामठीने बीवायएम आष्टीचा टायब्रेकरमध्ये ३-० ने पराभव केला. निर्धारित वेळेत सामना ०-० असा बरोबरीत राहिल्यानंतर टायब्रेकरमध्ये सौरभ लांजेवार, रियान्श भाटिया आणि इब्राहिम अंसारी यांनी गोल केले. अन्य सामन्यात डीपीएस मिहानने बीवायएम आष्टीचा १-० ने पराभव केला, ज्यामध्ये विदेश शर्माने १९ व्या मिनिटाला विजयी गोल केला. अंडर-१५ एनएमसी बालक गटात नागपूर रेसिडेन्शियल हायस्कूलने आयुष गुप्ताच्या हॅट्रिकच्या (३, ८ आणि १६ वे मिनिट) जोरावर टॅगोर मेमोरियलचा ३-० असा पराभव केला. सेंट जॉन्स (स्टेट) संघाने श्री कॉन्व्हेंटवर ६-० अशी मोठी मात केली, ज्यामध्ये रियान शेखने २ऱ्या व ४थ्या मिनिटाला, अयानने ८ व्या, इस्माईल शेखने १३ व्या, अंशुल दवांडेने १५ व्या आणि देवयांश कालेने २१ व्या मिनिटाला गोल केले. इतर सामन्यांमध्ये अंजुमन इंग्लिश स्कूलने न्यू मॉडर्नचा १-० ने (सरजील अंसारी १६ वे मिनिट), सेंट मायकेल्सने सेंट पॉल्स हायस्कूलचा २-० ने (सुजीत करमाकर १ ले मिनिट, प्रिन्स ९ वे मिनिट), भावन्स त्रिमुर्ती नगरने सीपीएस काटोल रोडचा १-० ने (विहान डाळवी १५ वे मिनिट), एस.एफ.एस. एक्सलन्सने सरस्वती सक्षमचा १-० ने (झोहर पटेल १६ वे मिनिट) आणि सीपीएस इंटरनॅशनलने तिडके विद्यालयाचा २-० ने (आदित्य कांबळे १० वे आणि १९ वे मिनिट) पराभव केला. दीनानाथ हायस्कूल व किड्स वर्ल्ड यांच्यातील सामना २-२ असा बरोबरीत सुटल्यानंतर टायब्रेकरमध्ये दीनानाथ हायस्कूलने ३-१ ने विजय मिळवला. याप्रसंगी उपसंचालक महादेव काजगावडे यांनी सर्व विजेत्या व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाच्या माध्यमातून शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमतेचा विकास होतो असे सांगत त्यांनी खेळाडूंना भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.1
- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तळोधी नगरीत आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकऱ्यांच्या 'विठ्ठल विठ्ठल जय हरी' अशा हरीनामाच्या गजराने संपूर्ण शहर दुमदुमून गेले. या खास प्रसंगी परिसरातील अनेक शाळांमधील चिमुकल्यांना विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या वेशभूषेत सजवून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतील लहानांचा उत्साह आणि भक्तीमय वातावरणामुळे तळोधी परिसराला एखाद्या छोट्या पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे दिसून आले.1
- नागपूरच्या हजारीपहाड येथील मौजा हजारीपहाड (खसरा क्रमांक २०, आराजी क्षेत्र १.३१ हेक्टर) जमिनीवरील आदिवासी वारसांची नावे डावलून ती बेकायदेशीररीत्या विकल्याचा गंभीर आरोप करत संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी वारसदारांच्या वतीने आममुखत्यार रेखा गणपतराव कोराम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितल्यानुसार, मूळ मालक दिवंगत किसन उईके यांच्या निधनानंतर सर्व कायदेशीर वारसांची नावे ७/१२ उताऱ्यावर नोंदवणे अपेक्षित होते. मात्र, काही व्यक्तींनी इतर वारसांना डावलून स्वतःचेच नाव नोंदवले आणि २२ जानेवारी १९९० रोजी जय गृहनिर्माण सहकारी संस्थेला जमीन विकली. याप्रकरणी वारसदारांनी चुकीच्या नोंदी रद्द करून सर्व वारसांची नावे नोंदवण्यासाठी, तसेच क्षेत्र व अभिलेख दुरुस्त करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे. याशिवाय, वारसदारांनी आपल्या मालकीच्या जागेवर लावलेला फलक काही व्यक्तींनी परवानगीशिवाय तोडून उखडून फेकला असून, हा प्रकार आदिवासींच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भात सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून महसूल व पोलीस प्रशासनाने आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला रेखा गणपत कोराम, माणिक महादेव पंदराम, अशोक सहादू कुकडे, पूर्णिमा सोनटक्के आणि अशोक बागुल उपस्थित होते.1
- महसूल मंत्र्यांनी नागरिकांना मतदार यादीत आपल्या नावाची खात्री करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी १७ ऑगस्टपूर्वी आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.1
- नागपूर शहरात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने अनेक संस्था एकत्र आल्या आहेत. या विविध संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमधून शहरात प्रशिक्षण सेंटर सुरू करण्यात आले असून, या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगारासाठी सक्षम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.1
- चंद्रपूर येथे आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री महाकाली मंदिर ते वढा पायी पालखी सोहळ्याचा शुभारंभ पार पडला. या सोहळ्याच्या शुभारंभ कार्यक्रमास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी विठ्ठलभक्तांच्या भक्तिमय उत्साहात प्रत्यक्ष सहभागी होत वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता आणि सेवाभावाच्या महान परंपरेला विनम्र वंदन केले.1
- नागपूरच्या हजारीपहाड येथील आदिवासी वारसांच्या मालकीची १.३१ हेक्टर जमीन बेकायदेशीररीत्या बळकावल्याचा आरोप करत संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. वारसदारांच्या वतीने आममुखत्यार रेखा गणपतराव कोराम यांनी माहिती दिली की, मौजा हजारीपहाड येथील खसरा क्रमांक २० च्या जमिनीचे मूळ मालक दिवंगत किसन उईके यांच्या निधनानंतर सर्व कायदेशीर वारसांची नावे ७/१२ उताऱ्यावर नोंदवणे गरजेचे होते. मात्र, काही व्यक्तींनी इतर वारसांना डावलून स्वतःची नावे नोंदवली आणि २२ जानेवारी १९९० रोजी ही जमीन जय गृहनिर्माण सहकारी संस्थेला विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी चुकीच्या नोंदी रद्द करून सर्व वारसांची नावे नोंदवण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे. तसेच वारसदारांनी आपल्या जागेवर लावलेला फलक काही व्यक्तींनी परवानगीशिवाय तोडून उखडून फेकून दिल्याचा आरोप करत हा जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करण्यात आला. या संदर्भात सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला रेखा गणपत कोराम, माणिक महादेव पंदराम, अशोक सहादू कुकडे, पूर्णिमा सोनटक्के आणि अशोक बागुल उपस्थित होते.1
- कामठी शहरात प्रेमसंबंधाच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे संपूर्ण शहर पुन्हा एकदा हादरले आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे हल्ला करणारा आरोपी तडीपार असतानाही मोकाट फिरत असल्याची जोरदार चर्चा आहे. तडीपार आरोपी मोकाट राहून युवकाचा बळी गेल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या गंभीर घटनेनंतर नवीन कामठी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात असून पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत.1