Shuru
Apke Nagar Ki App…
दिल्लीतील जंतर-मंतरवर लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या मुलांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, दगडफेक आणि मुलींची छेडछाड असे प्रकार घडल्याच्या निषेधार्थ राज्यातील आंबेडकरी पक्ष व संघटनांच्या नेत्यांनी २३ जुलै रोजी बंदची हाक दिली होती. या आवानाला प्रतिसाद देत ऐतिहासिक जावळीतील व्यापारी व व्यावसायिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याने जावळीत १००% बंद यशस्वी झाला. मात्र, दुसरीकडे मराठ्यांची राजधानी असलेले सातारा शहर भाजपच्या प्रभावाखाली असल्याने सर्व दुकाने सताड उघडी ठेवून बंदचे आवाहन करणाऱ्या कार्यकर्त्यांना दात विचकावून दाखवत होते. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे वाटोळे झाले तरी चालेल पण राज्यकर्ते जगले पाहिजेत, जणू असेच सांगत शिवरायांची राजधानी असलेला सातारा भाजपच्या प्रभावाखाली राहिल्याचे पाहायला मिळाले.
संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया

More news from महाराष्ट्र and nearby areas
- दिल्लीतील जंतर-मंतरवर लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या मुलांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, दगडफेक आणि मुलींची छेडछाड असे प्रकार घडल्याच्या निषेधार्थ राज्यातील आंबेडकरी पक्ष व संघटनांच्या नेत्यांनी २३ जुलै रोजी बंदची हाक दिली होती. या आवानाला प्रतिसाद देत ऐतिहासिक जावळीतील व्यापारी व व्यावसायिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याने जावळीत १००% बंद यशस्वी झाला. मात्र, दुसरीकडे मराठ्यांची राजधानी असलेले सातारा शहर भाजपच्या प्रभावाखाली असल्याने सर्व दुकाने सताड उघडी ठेवून बंदचे आवाहन करणाऱ्या कार्यकर्त्यांना दात विचकावून दाखवत होते. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे वाटोळे झाले तरी चालेल पण राज्यकर्ते जगले पाहिजेत, जणू असेच सांगत शिवरायांची राजधानी असलेला सातारा भाजपच्या प्रभावाखाली राहिल्याचे पाहायला मिळाले.1
- जनतेने पोलिसांवर कसा भरवसा ठेवावा असा थेट सवाल उपस्थित करत पोलीस प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. समोर आलेल्या एका व्हिडिओवरून पोलीस खात्यात कशा प्रकारे काम चालले आहे हे स्पष्ट होत असून, खरे गुंड हे पोलीस प्रशासनच असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. वर्दीमधील या गुंडांमुळेच समाजात गुंडगिरी वाढल्याचे या व्हिडिओवरून सिद्ध होत असल्याचा दावा करत प्रशासनाच्या कारभारावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.1
- तरुण आंदोलकांना 'ड्रग्ज केस'मध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आंदोलकांना थेट ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे.1
- आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना "तुमच्या बॅगेत ५० ग्रॅम कोकेन टाकून तुम्हाला अडकवीन" अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप एका पोलिस अधिकाऱ्यावर होत आहे. सर्वसामान्यांचे आणि कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडूनच विद्यार्थ्यांना अशा प्रकारे गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनीच अशी भूमिका घेणे हा लोकशाहीवरील अत्यंत गंभीर आघात मानला जात आहे. या धक्कादायक प्रकारानंतर, संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर मुख्यमंत्री काही कारवाई करणार का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.1
- पुण्यातील मावळ तालुक्यातील आडले बुद्रुक येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. राज्यात अजितदादांचा पहिला अर्धाकृती पुतळा याच गावात उभारण्यात आला असून, विद्यार्थ्यांनी या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला सलाम केला. या प्रसंगी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांनी शाळेच्या फळ्यावर अजितदादांचे तैलचित्र साकारत त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. गुरुकुल संस्थेच्या उभारणीत अजितदादांनी दिलेल्या सहकार्याचे स्मरण करत ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांची जयंती अत्यंत कृतज्ञतेने साजरी केली.1
- भोर तालुक्यातील शिरवली (ही मा.) येथील चौधरीवाडीत घरावर झाड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. घरावर थेट झाड कोसळले असले तरी या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली आहे.1