आम्ही तुम्हाला दंड करणार नाही दंडाची करणार नाही फक्त तुमचा जीव महत्त्वाचा असल्यामुळे हेल्मेट वापरावा हेच संदेश देत आहोत दंड नाही, दमदाटी नाही; ‘बाबांनो, जीव अमूल्य आहे!’ म्हणत वाहतूक पोलिसांची आपुलकीची जनजागृती! शिरपूर जैन ते रिसोड मार्गावर वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून राबविण्यात येत असलेला जनजागृतीचा उपक्रम नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. शिरपूर जैनच्या थोडे पुढे रस्त्यावर उभे राहून जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी शरद भालेराव आणि प्रदीप अंभोरे हे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना थांबवून कोणतीही दमदाटी न करता, भीती न घालता आणि दंडात्मक कारवाई न करता अगदी आपुलकीच्या भाषेत वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगत आहेत. ‘ओव्हरस्पीड, ट्रिपल सीट, हेल्मेट आणि रॉंग वे’ या चार महत्त्वाच्या बाबींकडे वाहनचालकांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असा संदेश या दोन्ही कर्मचाऱ्यांकडून दिला जात आहे. रस्त्यावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करू नका, हेल्मेटचा नियमित वापर करा आणि आपल्याला दिलेल्या मार्गिकेतूनच वाहन चालवा, असे ते प्रत्येक वाहनचालकाला समजावून सांगत आहेत. विशेष म्हणजे या जनजागृतीदरम्यान केवळ नियम सांगून वाहनचालकांना सोडले जात नाही, तर ‘हे नियम तुमच्यासाठीच आहेत, तुमच्या कुटुंबासाठी आहेत आणि तुमच्या सुरक्षित जीवनासाठी आहेत’ या भावनेतून त्यांना समज देण्यात येत आहे. शासन आम्हाला पगार देते तो नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीवर देखरेख ठेवण्यासाठी, त्यामुळे नागरिकांनीही पोलिसांना घाबरण्यापेक्षा स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेत वाहतूक नियमांचे पालन करावे, अशी भूमिका या कर्मचाऱ्यांच्या संवादातून दिसून येत आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात काही मिनिटे वाचविण्यासाठी वाहनचालकांकडून वेगाची मर्यादा ओलांडली जाते. अनेक जण हेल्मेटचा वापर टाळतात, दुचाकीवर तीन जण बसून प्रवास करतात किंवा रॉंग वेने वाहन चालवितात. मात्र अशा छोट्या वाटणाऱ्या चुका कधी मोठ्या संकटाला कारणीभूत ठरतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे आपले जीवन अमूल्य आहे आणि एकदा गेलेले जीवन पुन्हा मिळत नाही, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. हेल्मेट हा पोलिसांच्या भीतीपोटी वापरायचा साधन नसून, दुचाकीस्वाराच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे संरक्षण आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या योग्य बाजूने वाहन चालविणे, वेगावर नियंत्रण ठेवणे आणि ट्रिपल सीटचा मोह टाळणे हे प्रत्येक वाहनचालकाचे कर्तव्य आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून किंवा इतरांच्या जीवाला धोका निर्माण करून वाहन चालविण्यापेक्षा काही मिनिटे उशीर झाला तरी चालेल; मात्र सुरक्षितपणे आपल्या कुटुंबात परतणे अधिक महत्त्वाचे आहे, असा भावनिक आणि वास्तववादी संदेश या दोन्ही कर्मचाऱ्यांकडून दिला जात आहे.शिरपूर जैन–रिसोड मार्गावर रस्त्याच्या कडेला उभे राहून वाहनचालकांशी थेट संवाद साधणाऱ्या शरद भालेराव आणि प्रदीप अंभोरे यांच्या या पद्धतीचे विशेष कौतुक होत आहे. वाहतूक नियम मोडल्यास थेट दंड करण्यापेक्षा प्रथम नागरिकांना नियमांचे महत्त्व समजावून सांगणे आणि त्यांच्यामध्ये सुरक्षित वाहनचालकाची मानसिकता निर्माण करणे, हा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे. ‘फाईनपेक्षा जनजागृती, कारवाईपेक्षा समज आणि भीतीपेक्षा आपुलकी’ या भूमिकेतून सुरू असलेला हा उपक्रम इतर ठिकाणीही राबविण्यात आला तर वाहतूक नियमांविषयी नागरिकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल. पोलिस आणि नागरिक यांच्यातील संबंध केवळ कारवाईपुरते मर्यादित न राहता सुरक्षित समाजासाठी परस्पर सहकार्याचे असावेत, याचे उत्तम उदाहरण या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कार्यातून पाहायला मिळत आहे. वाहतूक नियम हे पोलिसांसाठी नसून आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आहेत. वेग कमी करा, हेल्मेट वापरा, ट्रिपल सीट टाळा, रॉंग वेने वाहन चालवू नका आणि सुरक्षितपणे घरी पोहोचा, हा संदेश देत जिल्हा वाहतूक शाखेचे शरद भालेराव आणि प्रदीप अंभोरे यांनी राबविलेला हा जनजागृती उपक्रम निश्चितच कौतुकास पात्र ठरत आहे.

- बैलगाडा शर्यतीतील आता सर्वात चर्चेचा विषय म्हणजे हृदया दीपक शेठ पाटील हृदया दीपक शेठ पाटील हि मुलगी बैलगाडा शर्यतीतील आताचा मोठा विषय आहे ही मुलगी खुप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.1
- बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... प्रतिनिधी गजानन राऊत असा तांदूळ जनावरंही खात नाहीत असा संतापही त्यांनी व्यक्त केलाय...बुलढाणा ब्रेकिंग या राशन च्या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांच्या बायका पोरांसोबत खावी.. मग, आम्ही सुद्धा खाऊ हे तांदूळ आमची कोंबडी पण खात नाही . संतप्त लाभार्थ्यानी चिखली तहसीलदारांच्या कॅबिनसमोर फेकला निकृष्ट दर्जाचा रेशनचा तांदूळ राशन चे दुकानातून मिळालेल्या या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांचा बायका पोरांसोबत खावी मग आम्ही सुद्धा खाऊ अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराविरोधात चिखलीत लाभार्थी नागरिकांनी थेट तहसीलदार यांच्या केबिन समोर पोहोचले.. रेशन दुकानातून वाटप करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे तांदूळ हातात घेऊन त्यांनी चक्क तहसीलदारांच्या कॅबीनसमोरच ते ओतून देत या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका पोरांसोबत खावी; मग आम्ही सुद्धा खाऊ आमच्या कोंबड्या सुद्धा हा तांदूळ खात नाही, असे म्हणत प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला.. या अनोख्या आंदोलनामुळे महसूल तसेच पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. शिवाय राशन दुकानातून मिळणारा तांदूळ किती निकृष्ट आहे , यावर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .. बुलढाणा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून शासनामार्फत वितरित होणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेक नागरिकांकडून सातत्याने होत आहेत. याच पार्श्वभूमीवर चिखली शहरातील काही लाभार्थ्यी कुटुंबाला वितरित करण्यात आलेले तांदूळ खराब, चुरियुक्त आणि खाण्यायोग्य नसल्याचा आरोप करण्यात आला आहे .. संतापलेल्या नागरिकाने हे धान्य थेट तहसील कार्यालयात आणले आणि तहसीलदारांच्या कॅबीनसमोर ओतून आपला रोष व्यक्त केला.. जे धान्य जनावरेही खाणार नाहीत, ते माणसांच्या ताटात देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळणार का असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला.. बाईट - लाभार्थी .. बाईट - प्रियंका सोनकुसळे , निरीक्षण अधिकारी ..4
- जय मल्हार बोलो अमरावती चलो मेंढपाळ रक्षक वैजनाथ पावडे सर्वांना विनंती1
- वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले. शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले. यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.1
- नेपाळमध्ये जालना जिल्ह्यातील पर्यटक अडकले? प्रशासनाचे आवाहन; तात्काळ हेल्पलाइनवर संपर्क साधा!1
- गिरामवाडी शिवारात गायीची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या दोघांवर कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल कत्तलीच्या उद्देशाने गायीची चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता आखूड दोरीने बांधून निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गाय व पिकअप वाहन असा 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे .दि. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास सांडस ते पारडी दरम्यान रस्त्यावर, गिरामवाडी शेत शिवारातील रस्त्यावरील वाड्याजवळ, ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी शेख मजीत, मोहम्मद आमीर हे दोघे एका गायीची निर्दयपणे वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी गाय व पिकअप क्र. एमएच 30 एबी 3760 मधून 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास आडे यांच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात संबंधित दोघाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.या प्रकरणी कळमनुरी पोलीस अधिक तपास करीत आहेत .1
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील1
- Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप (गजानन राऊत बुलढाणा) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं होमटाऊन असलेल्या मेहकर मध्येच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा धक्कादायक प्रकार काल घडला...! ग्रामीण रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्या महिलेचा पती ऑटोरिक्षा आणण्याकरता गेला असता महिला घरात एकटीच होती. प्रसुती वेदना असह्य झाल्याने महिला घराच्या बाहेर रस्त्यावर आली व कुणाच्या मदततीची अपेक्षा करू लागली मात्र त्यातच अर्धवट प्रसुती झाली आणि विव्हळतच व तळमळत या महिलेच्या आवाजाने शेजारी योगेश सौभागे हे उठले. ते पत्नीसह या महिलेजवळ गेले असता महिलेची अर्धवट प्रस्तुती बघून ते हादरले ग्रामीण रुग्णालय पन्नास फुटावर असल्याने ते धावतच ग्रामीण रुग्णालयात गेले मात्र तेथील उपस्थित परिचारिकेने त्यांना त्या महिलेला रुग्णालयात घेऊन या असे फर्मावले... अशा परिस्थितीतही योगेश यांनी त्या परिचारिकेला विनंती केली . मात्र त्यांनी असमवेदनशीलता दाखवत मी येऊ शकत नाही असं फर्मावलं...4