logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पाटखळ, डबेवाडीत सूचना, नोटीस देऊनही डीजे, लेझर-डॉल्बी साऊंडचा ठणका! गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी २ गुन्हे दाखल; तालुका पोलिसांच्या कारवाईचा दणका! आधीच नियमांचे मार्गदर्शन अन् ६ सप्टेंबरची नोटीस; तरीही मिरवणुकीत नियमभंग, दोन स्वतंत्र गुन्ह्यांत मंडळांचे पदाधिकारी व संबंधितांवर कारवाई सातारा : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गणेश मंडळांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना, मार्गदर्शन आणि नोटीस देऊनही नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. सातारा तालुका पोलिसांनी पाटखळ आणि डबेवाडी येथे डीजे, डॉल्बी साऊंड, लेझर बीम तसेच मिरवणुकीसाठी आवश्यक परवानगी न घेतल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच तालुका पोलिसांच्या कारवाईचा दणका पाहायला मिळाला. पाटखळमध्ये लेझर-डॉल्बीचा वापर पाटखळ, ता. सातारा येथे १३ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८ ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान श्री संत गाडगे महाराज मित्र गणेशोत्सव मंडळाच्या गणेश आगमन मिरवणुकीत बीम लाईट तसेच डॉल्बी साऊंडचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस शिपाई संदीप फणसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंडळाचे अध्यक्ष रुपेश रविंद्र सोनटक्के यांच्यासह सिद्धांत प्रकाश सोनटक्के, रजत अनिल सोनटक्के, हणमंत मधुकर सोनटक्के, नवनाथ श्रीरंग सोनटक्के, गणेश रघुनाथ सोनटक्के आणि प्रणय लहू सोनटक्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लेझर बीम लाईटचे मालक अभिजित संतोष पवार, रा. चिंचणी, ता. सातारा आणि डॉल्बीचे मालक राजनिकांत नगे, रा. पोलीस मुख्यालयाजवळ, सातारा यांच्याविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रविण वैद्यांडे करीत आहेत. नोटीसनंतरही नियमभंग लेझर बीमच्या वापराबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून ३ सप्टेंबर रोजी आदेश जारी करण्यात आला होता. त्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्याकडून संबंधितांना ६ सप्टेंबर रोजी कलम १६८ अन्वये नोटीस देण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळे आणि डीजे चालकांना नियमांचे पालन करण्याबाबत यापूर्वीच सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही पाटखळ येथे नियमांचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. डबेवाडीत विनापरवाना डीजे-साऊंड दरम्यान, डबेवाडी, ता. सातारा येथे १३ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीसाठी आवश्यक परवानगी न घेता डीजे साऊंडचा वापर करण्यात आल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंडळाचे अध्यक्ष मयूर माने यांच्यासह आकाश चव्हाण, सुमित माने, विशाल माने, प्रज्वल माने आणि अनिकेत माने, सर्व रा. डबेवाडी, ता. सातारा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत माने करीत आहेत. डी.बी. पथकाचीही कारवाईत भूमिका या कारवाईमध्ये सातारा तालुका पोलिसांच्या डी.बी. पथकाचीही महत्त्वाची भूमिका राहिली. संबंधितांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणण्याची कार्यवाही डी.बी. पथकाने केली. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि नियमांचे पालन करून साजरा करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळे, डीजे चालक आणि संबंधितांवर यापुढेही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सातारा तालुका पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज

4 hrs ago
user_पोलीस फ्लॅश न्यूज, सातारा.
पोलीस फ्लॅश न्यूज, सातारा.
News Anchor सातारा, सातारा, महाराष्ट्र•
4 hrs ago
88a3d204-a891-4d3d-ad35-86f8f6a85095

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • निंबू विक्रेत्यापासून यशस्वी उद्योजक आणि समाजसेवकापर्यंत रवींद्र कांबळेंचा प्रेरणादायी प्रवास! संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उभे केले यश; शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नियमित जेवणदान, गोरगरिबांना मदतीचा हात विशेष प्रतिनिधी : परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे रवींद्र कांबळे यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते. निंबू विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून प्रेरणादायी ठरला आहे. संघर्षाच्या काळात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत रवींद्र कांबळे यांनी व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र, यश मिळाल्यानंतरही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कायम जपली आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ते दररोज अविरतपणे जेवणदान करतात. तसेच गरजू आणि गोरगरिबांना आपल्या परीने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ संघर्षातून यशस्वी होण्याची कहाणी नसून, ‘स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही काहीतरी करण्याची’ प्रेरणा देणारा आहे. रवींद्र कांबळे यांच्या याच संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यशाचा प्रवास आणि समाजसेवेची भावना जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहा. 🎥 संपूर्ण प्रेरणादायी डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी YouTube व्हिडिओला भेट द्या. पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज
    1
    निंबू विक्रेत्यापासून यशस्वी उद्योजक आणि समाजसेवकापर्यंत रवींद्र कांबळेंचा प्रेरणादायी प्रवास!
संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उभे केले यश; शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नियमित जेवणदान, गोरगरिबांना मदतीचा हात
विशेष प्रतिनिधी :
परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे रवींद्र कांबळे यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते. निंबू विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून प्रेरणादायी ठरला आहे.
संघर्षाच्या काळात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत रवींद्र कांबळे यांनी व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र, यश मिळाल्यानंतरही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कायम जपली आहे.
शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ते दररोज अविरतपणे जेवणदान करतात. तसेच गरजू आणि गोरगरिबांना आपल्या परीने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ते सातत्याने करत आहेत.
त्यांचा हा प्रवास केवळ संघर्षातून यशस्वी होण्याची कहाणी नसून, ‘स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही काहीतरी करण्याची’ प्रेरणा देणारा आहे.
रवींद्र कांबळे यांच्या याच संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यशाचा प्रवास आणि समाजसेवेची भावना जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहा.
🎥 संपूर्ण प्रेरणादायी डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी YouTube व्हिडिओला भेट द्या.
पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज
    user_पोलीस फ्लॅश न्यूज, सातारा.
    पोलीस फ्लॅश न्यूज, सातारा.
    News Anchor सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.... जल्लोष साजरा करताय पण एकदा हा व्हिडिओ नक्की बघा!
    1
    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया....  जल्लोष साजरा करताय पण एकदा हा व्हिडिओ नक्की बघा!
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    41 min ago
  • बारामती गणेश फेस्टिव्हलला अजितदादांची आठवण; भावनिक संदेशातून आदरांजली
    1
    बारामती गणेश फेस्टिव्हलला अजितदादांची आठवण; भावनिक संदेशातून आदरांजली
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • "दुष्काळाच्या ज्या उपायोजना कराव्या लागतात त्याची तयारी आम्ही सुरू केली...!"
    1
    "दुष्काळाच्या ज्या उपायोजना कराव्या लागतात त्याची तयारी आम्ही सुरू केली...!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    1 hr ago
  • को.ढव्यात घरफोडी करणाऱ्या ५९ वर्षीय महिलेच्या मुसक्या आवळल्या; ₹३.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त
    1
    को.ढव्यात घरफोडी करणाऱ्या ५९ वर्षीय महिलेच्या मुसक्या आवळल्या; ₹३.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पोसेवाडी येथील भगवान जाधव हे इको फ्रेंडली गणपती बनवण्यात मग्न खानापूर तालुक्यातील पोसेवाडी येथील भगवान जाधव लक्ष्मी नारायण पुरातन वस्तू संग्रहालयाचे मालक आहेत हे सध्या गणपती उत्सव काळात निसर्ग फाऊंडेशन माध्यमातून इको फ्रेंडली गणपती बनवण्याचे काम चालू असून ह्या गणपतीला खानापूर घाट माथ्यावर बरेच मागणी आहे यामुळे दूषित वातावरण होणार नाही व भाविकांनी घरगुती मातीपासून बनवलेला गणपती आपल्या घरी विराजमान करावा असे आवाहन भगवान जाधव यांनी केले
    1
    पोसेवाडी येथील भगवान जाधव हे इको फ्रेंडली गणपती बनवण्यात मग्न
खानापूर तालुक्यातील पोसेवाडी येथील भगवान जाधव लक्ष्मी नारायण पुरातन वस्तू संग्रहालयाचे मालक आहेत हे सध्या गणपती उत्सव काळात निसर्ग फाऊंडेशन माध्यमातून इको फ्रेंडली गणपती बनवण्याचे काम चालू असून ह्या गणपतीला खानापूर घाट माथ्यावर बरेच मागणी आहे यामुळे दूषित वातावरण होणार नाही व भाविकांनी घरगुती मातीपासून बनवलेला गणपती आपल्या घरी विराजमान करावा असे आवाहन भगवान जाधव यांनी केले
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • बाप्पाच्या स्वागताचा उत्साह, पण अजितदादांची उणीव; सुनील शेळके भावुक... मावळ, पुणे : मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या निवासस्थानी आज भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. कुटुंबीय, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणरायाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.यावेळी अजितदादांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सुनील शेळके भावुक झाले. “दादांची रोज आठवण येते, यंदा त्यांची उणीव नक्कीच जाणवते,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसंच, शेतकरी सुखी राहावा आणि महाराष्ट्राची प्रगती व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी बाप्पाच्या चरणी केली... : सुनील शेळके, आमदार, मावळ #सुनीलशेळके #मावळ #गणेशोत्सव #गणपतीबाप्पा #अजितदादा #अजितपवार #मावळआमदार #गणेशप्रतिष्ठापना #गणराय #बाप्पाचेस्वागत #महाराष्ट्र #शेतकरी #महाराष्ट्राचीप्रगती #Maval #SunilShelke #AjitPawar #Ganeshotsav #GanpatiBappa #Maharashtra #TheNayakNews
    1
    बाप्पाच्या स्वागताचा उत्साह, पण अजितदादांची उणीव; सुनील शेळके भावुक...
मावळ, पुणे :
मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या निवासस्थानी आज भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. कुटुंबीय, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणरायाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.यावेळी अजितदादांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सुनील शेळके भावुक झाले. “दादांची रोज आठवण येते, यंदा त्यांची उणीव नक्कीच जाणवते,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
तसंच, शेतकरी सुखी राहावा आणि महाराष्ट्राची प्रगती व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी बाप्पाच्या चरणी केली...
: सुनील शेळके, आमदार, मावळ
#सुनीलशेळके #मावळ #गणेशोत्सव #गणपतीबाप्पा #अजितदादा #अजितपवार #मावळआमदार #गणेशप्रतिष्ठापना #गणराय #बाप्पाचेस्वागत #महाराष्ट्र #शेतकरी #महाराष्ट्राचीप्रगती #Maval #SunilShelke #AjitPawar #Ganeshotsav #GanpatiBappa #Maharashtra #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • मोठ्या उत्साहात कुरोलीच्या सम्राटाचे आगमन... गावात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण!
    1
    मोठ्या उत्साहात कुरोलीच्या सम्राटाचे आगमन... गावात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण!
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    49 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.