logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

Dhule Accident News | धुळे: मुंबई-आग्रा महामार्गावर तापी पुलाजवळ भीषण अपघात; 6 जण जखमी, एका महिलेचा हात तुटून वेगळा... धुळे: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दभाषी येथील तापी पुलाजवळ मध्यरात्री भीषण अपघात घडला. शिरपूरहून धुळ्याकडे जाणारी आर्टिगा कार तांत्रिक बिघाड झाल्याने महामार्गावर बंद पडली होती. कार सुरू करण्यासाठी शिरपूरहून नातेवाईक मोटारसायकलने घटनास्थळी आले होते. ते महामार्गावरच कार सुरू करण्याचा प्रयत्न करत असतानाच भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने उभ्या असलेल्या आर्टिगा कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कंटेनरने कारला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. या अपघातात आर्टिगा मधील प्रवासी आणि मदतीसाठी आलेले नातेवाईक असे एकूण 6 जण गंभीर जखमी झाले. या अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली असून, तिचा एक हात तुटून शरीरापासून वेगळा झाला आहे. सर्व जखमींना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. या प्रकरणी शिरपूर पोलीस पुढील तपास करत आहेत. - #DhuleNews #ShirpurAccident #MumbaiAgraHighway #DhulePolice #RoadAccident

1 hr ago
user_DHULE CRIME NEWS
DHULE CRIME NEWS
धुळे, धुळे, महाराष्ट्र•
1 hr ago

Dhule Accident News | धुळे: मुंबई-आग्रा महामार्गावर तापी पुलाजवळ भीषण अपघात; 6 जण जखमी, एका महिलेचा हात तुटून वेगळा... धुळे: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दभाषी येथील तापी पुलाजवळ मध्यरात्री भीषण अपघात घडला. शिरपूरहून धुळ्याकडे जाणारी आर्टिगा कार तांत्रिक बिघाड झाल्याने महामार्गावर बंद पडली होती. कार सुरू करण्यासाठी शिरपूरहून नातेवाईक मोटारसायकलने घटनास्थळी आले होते. ते महामार्गावरच कार सुरू करण्याचा प्रयत्न करत असतानाच भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने उभ्या असलेल्या आर्टिगा कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कंटेनरने कारला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. या अपघातात आर्टिगा मधील प्रवासी आणि मदतीसाठी आलेले नातेवाईक असे एकूण 6 जण गंभीर जखमी झाले. या अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली असून, तिचा एक हात तुटून शरीरापासून वेगळा झाला आहे. सर्व जखमींना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. या प्रकरणी शिरपूर पोलीस पुढील तपास करत आहेत. - #DhuleNews #ShirpurAccident #MumbaiAgraHighway #DhulePolice #RoadAccident

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • مالیگاؤں: جشنِ عید میلاد النبی ﷺ کی خوبصورت تقریب، شیداء کیمپس میں نعتیہ پروگرام مالیگاؤں: جشنِ عید میلاد النبی ﷺ کی خوبصورت تقریب، شیداء کیمپس میں نعتیہ پروگرام
    1
    مالیگاؤں: جشنِ عید میلاد النبی ﷺ کی خوبصورت تقریب، شیداء کیمپس میں نعتیہ پروگرام
مالیگاؤں: جشنِ عید میلاد النبی ﷺ کی خوبصورت تقریب، شیداء کیمپس میں نعتیہ پروگرام
    user_SACH TAK TV NEWS MALEGAON
    SACH TAK TV NEWS MALEGAON
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार
    1
    आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार
    user_Kalpesh wani
    Kalpesh wani
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • जलगाव जिल्हे मे एक औरत को नहाते हुए छेड रहा था एक आदमी उसे पकड के चारो तरफ से की पिटाई जलगाव लेटेस्ट न्यूज #जलगावन्यूज #जळगावजिल्हा #viralnewz #shuruapp
    1
    जलगाव जिल्हे मे एक औरत को नहाते हुए छेड रहा था एक आदमी उसे पकड के चारो तरफ से की पिटाई जलगाव लेटेस्ट न्यूज 
#जलगावन्यूज #जळगावजिल्हा #viralnewz #shuruapp
    user_Atish Rathod
    Atish Rathod
    Fruit & Vegetable Exporter जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • नेपाल का जलप्रलय भारत के दरवाजे पर! बिहार-UP में हाई अलर्ट, कोसी-गंडक मचा सकती हैं तबाही
    1
    नेपाल का जलप्रलय भारत के दरवाजे पर! बिहार-UP में हाई अलर्ट, कोसी-गंडक मचा सकती हैं तबाही
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    Media company जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही!" ​काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून संपूर्ण देशाचं पोट भरणाऱ्या बळीराजाची अवस्था आज काय झाली आहे? नाशिकच्या लाल मातीतून उठलेला एक तरुण शेतकरी, श्री गणेशभाऊ निंबाळकर, जेव्हा रेल्वेच्या रुळांवर उभा राहून भरल्या डोळ्यांनी आक्रोश करतो, तेव्हा फक्त एक माणूस रडत नसतो, तर उभ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा स्वाभिमान टाहो फोडत असतो! ​रात्रंदिवस काबाडकष्ट करून, कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला जेव्हा मातीमोल भाव मिळतो आणि दुसरीकडे दलालांच्या फायद्यासाठी निकृष्ट कांदा पाठवून शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात, तेव्हा एका शेतकऱ्याच्या काळजात होणाऱ्या वेदनांची कल्पना कोण करणार? ​अधिकारी, नाफेड, सी.डब्ल्यू.सी.च्या उंबरठ्यावर चपला झिजवूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा संतापाने आणि हतबलतेने डोळ्यातून अश्रू वाहत असताना "मला या देशाचं नागरिकत्वच नको" असा टोकाचा उद्गार एका अन्नदात्याच्या मुखातून निघावा, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे. ​गणेशभाऊ, तुम्ही एकटे नाही आहात! तुमच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द हा शेतात राबणाऱ्या माय-बाप शेतकऱ्याची खरी व्यथा
    2
    माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही!"
​काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून संपूर्ण देशाचं पोट भरणाऱ्या बळीराजाची अवस्था आज काय झाली आहे? नाशिकच्या लाल मातीतून उठलेला एक तरुण शेतकरी, श्री गणेशभाऊ निंबाळकर, जेव्हा रेल्वेच्या रुळांवर उभा राहून भरल्या डोळ्यांनी आक्रोश करतो, तेव्हा फक्त एक माणूस रडत नसतो, तर उभ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा स्वाभिमान टाहो फोडत असतो!
​रात्रंदिवस काबाडकष्ट करून, कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला जेव्हा मातीमोल भाव मिळतो आणि दुसरीकडे दलालांच्या फायद्यासाठी निकृष्ट कांदा पाठवून शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात, तेव्हा एका शेतकऱ्याच्या काळजात होणाऱ्या वेदनांची कल्पना कोण करणार?
​अधिकारी, नाफेड, सी.डब्ल्यू.सी.च्या उंबरठ्यावर चपला झिजवूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा संतापाने आणि हतबलतेने डोळ्यातून अश्रू वाहत असताना "मला या देशाचं नागरिकत्वच नको" असा टोकाचा उद्गार एका अन्नदात्याच्या मुखातून निघावा, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे.
​गणेशभाऊ, तुम्ही एकटे नाही आहात!
तुमच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द हा शेतात राबणाऱ्या माय-बाप शेतकऱ्याची खरी व्यथा
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त... Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त... - Grand procession on the occasion of Prophet's birth anniversary in Dhule; Attractive scenes attracted attention, tight police security - #DhuleNews #EidEMilad #PaigambarJayanti #DhuleEidEMilad #DhulePolice
    1
    Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त...
Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त...
-
Grand procession on the occasion of Prophet's birth anniversary in Dhule; Attractive scenes attracted attention, tight police security
-
#DhuleNews #EidEMilad #PaigambarJayanti #DhuleEidEMilad #DhulePolice
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • शिवधाम उद्याना शेजारी दक्षिण मुखी हनुमान, शनी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी शोभायात्रा रविवारी महाप्रसाद शिवधाम उद्याना शेजारी दक्षिण मुखी हनुमान, शनी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी शोभायात्रा रविवारी महाप्रसाद नंदुरबार शहरातील नेहरू चौक परिसरातील शिवधाम उद्याना शेजारी श्री शिव पंचायतन दक्षिण मुखी श्री हनुमान आणि शनि देवाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. दाक्षिणात्य पद्धतीचे सुंदर व आकर्षक मंदिर लक्ष वेधून घेत आहे. या भव्य मंदिरात तीन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते बारा वाजता मूर्तीची शोभायात्रा निघेल. गणेश अंबिका हनुमानजी आणि शनि देवाची मूर्ती नेहरू चौकातील श्रीराम मंदिरापासून नगरपालिका, द्वारकाधीश मंदिर, हाट दरवाजा, गांधी पुतळा मार्गे पुन्हा शिवधाम शेजारी मंदिरात शोभायात्रा येईल. शनिवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत प्रांत पूजन देवता आवाहन स्थापन ग्रहण दुपारी दोन ते सायंकाळी सात पर्यंत प्राणप्रतिष्ठा विधी होईल. रविवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत देवता मूर्ती संस्कार मंगल स्नान न्यास प्राणप्रतिष्ठा प्रधान हवन उत्तरांग हवन कलश शिखर स्थापन ध्वजारोहण, बलिदान, महा पूर्णा होती होईल. त्यानंतर महाआरती महाप्रसाद होईल भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री दक्षिणमुखी हनुमान व शनी मंदिर सेवा समिती तर्फे करण्यात आले आहे.
    3
    शिवधाम उद्याना शेजारी 
दक्षिण मुखी हनुमान, शनी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा 
 शुक्रवारी शोभायात्रा रविवारी महाप्रसाद

शिवधाम उद्याना शेजारी 
दक्षिण मुखी हनुमान, शनी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा 
शुक्रवारी शोभायात्रा रविवारी महाप्रसाद
नंदुरबार शहरातील नेहरू चौक परिसरातील शिवधाम उद्याना  शेजारी श्री शिव पंचायतन दक्षिण मुखी श्री हनुमान आणि शनि देवाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. दाक्षिणात्य  पद्धतीचे सुंदर व
आकर्षक मंदिर लक्ष वेधून घेत आहे. या भव्य मंदिरात तीन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते बारा वाजता मूर्तीची शोभायात्रा निघेल. गणेश अंबिका हनुमानजी आणि शनि देवाची मूर्ती नेहरू चौकातील श्रीराम मंदिरापासून नगरपालिका, द्वारकाधीश मंदिर, हाट दरवाजा, गांधी पुतळा मार्गे पुन्हा शिवधाम शेजारी मंदिरात शोभायात्रा  येईल. शनिवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत प्रांत पूजन देवता आवाहन स्थापन ग्रहण दुपारी दोन ते सायंकाळी सात पर्यंत प्राणप्रतिष्ठा विधी होईल. रविवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत देवता मूर्ती संस्कार मंगल स्नान न्यास प्राणप्रतिष्ठा प्रधान हवन उत्तरांग हवन कलश शिखर स्थापन ध्वजारोहण, बलिदान, महा पूर्णा होती होईल. त्यानंतर महाआरती महाप्रसाद होईल भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री दक्षिणमुखी हनुमान व शनी मंदिर सेवा समिती तर्फे करण्यात आले आहे.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात ​येवला (प्रतिनिधी): स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येवला येथे रक्षाबंधनाचा पवित्र सण अत्यंत उत्साही व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. देशाचे रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयात 'एक राखी सैनिकांसाठी' या विशेष उपक्रमांतर्गत सैनिक औक्षण व राखीबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. ​कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ईशस्तवाने झाली. उपप्राचार्य खेरणार सर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या सुंदर राख्या उपस्थित आजी-माजी सैनिकांना बांधून त्यांचे औक्षण केले व सन्मान केला. सैनिकांनी सीमेवरील अनुभव सांगून विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा दिली. ​या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, सचिव डॉ. किरण पहिलवान, खजिनदार तेजस गायकवाड, संचालक अमोल एंडाईत, प्राचार्य सोनवणे आर. बी., उपप्राचार्य खेरणार सर, मुंडे सर, राऊळ सर व शिक्षकवृंद उपस्थित होते. ​अध्यक्ष व प्राचार्यांनी आपल्या भाषणातून सैनिकांच्या त्यागाचे कौतुक केले. हादगे मॅडम, जाडीई मॅडम व गोसावी मॅडम यांनी सैनिकांविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गायकवाड मॅडम यांनी केले, तर राऊत मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात
स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात
​येवला (प्रतिनिधी):
स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येवला येथे रक्षाबंधनाचा पवित्र सण अत्यंत उत्साही व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. देशाचे रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयात 'एक राखी सैनिकांसाठी' या विशेष उपक्रमांतर्गत सैनिक औक्षण व राखीबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
​कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ईशस्तवाने झाली. उपप्राचार्य खेरणार सर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या सुंदर राख्या उपस्थित आजी-माजी सैनिकांना बांधून त्यांचे औक्षण केले व सन्मान केला. सैनिकांनी सीमेवरील अनुभव सांगून विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा दिली.
​या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, सचिव डॉ. किरण पहिलवान, खजिनदार तेजस गायकवाड, संचालक अमोल एंडाईत, प्राचार्य सोनवणे आर. बी., उपप्राचार्य खेरणार सर, मुंडे सर, राऊळ सर व शिक्षकवृंद उपस्थित होते.
​अध्यक्ष व प्राचार्यांनी आपल्या भाषणातून सैनिकांच्या त्यागाचे कौतुक केले. हादगे मॅडम, जाडीई मॅडम व गोसावी मॅडम यांनी सैनिकांविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गायकवाड मॅडम यांनी केले, तर राऊत मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता 🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता काठमांडू : नेपाळ-चीन सीमेवरील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. नेपाळ पोलिसांच्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत १५७ जणांचे मृतदेह सापडले असून ४०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. पुरामुळे रस्ते, पूल, घरे आणि वीज प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये परदेशी नागरिकांचाही मोठा समावेश असून १३३ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची ताजी माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हिमनदीचा मोठा भाग कोसळल्याने नदीत माती, दगड आणि पाण्याचा प्रचंड लोंढा निर्माण झाला असावा. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे. बचाव पथके, सुरक्षा दल आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    1
    ब्रेकिंग न्यूज 🚨

 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता

🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨
नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता
काठमांडू : नेपाळ-चीन सीमेवरील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. नेपाळ पोलिसांच्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत १५७ जणांचे मृतदेह सापडले असून ४०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत.
पुरामुळे रस्ते, पूल, घरे आणि वीज प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये परदेशी नागरिकांचाही मोठा समावेश असून १३३ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची ताजी माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार हिमनदीचा मोठा भाग कोसळल्याने नदीत माती, दगड आणि पाण्याचा प्रचंड लोंढा निर्माण झाला असावा. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.
बचाव पथके, सुरक्षा दल आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.