रिसोड तालुक्यातील नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांचे आवाहन रिसोड तालुक्यातील नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांचे आवाहन रिसोड : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या, नाले आणि लहान-मोठ्या ओढ्यांमधील पाण्याची पातळी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केले आहे.नदी, नाले आणि पुलांवरून पाणी वाहत असल्यास कोणत्याही परिस्थितीत ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. तसेच पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.शेतकरी, वाहनचालक आणि नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. लहान मुलांना नदी, नाले किंवा पाण्याच्या ठिकाणी जाऊ देऊ नये. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने महसूल विभाग, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा.हवामान विभागाकडून मिळणाऱ्या सूचना आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये. अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीनुसारच वर्तन करावे, असे आवाहन तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी नागरिकांना केले आहे.प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनीही जबाबदारीने वागून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.

- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।1
- जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ1
- बुलढाणा :-आमदार संजय गायकवाड व नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन; येळगाव धरण १०० टक्के भरल्याने बुलढाण्यात आनंदोत्सव!1
- वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे मंगरूळपीर शहरालगतच्या मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या सुमारे ४० फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या एका ३५ वर्षीय महिलेला मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले. २९ जुलै रोजी दुपारी घडलेल्या या घटनेत बचाव पथकाने दाखविलेल्या धाडसामुळे महिलेला जीवनदान मिळाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सपना राठोड (वय अंदाजे ३५ वर्षे, रा. पंचशील नगर, मंगरूळपीर) या २९ जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास मंगरूळपीर शहरालगत मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या विहिरीत पडल्या. विहीर खोल आणि कोरडी असल्याने परिस्थिती गंभीर होती. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच घटनास्थळी गर्दी झाली. या घटनेची माहिती मंगरूळपीर पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार किशोर शेळके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला आणि तातडीने बचाव पथकाला घटनास्थळी पाचारण केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांना बचावासाठी रवाना केले. गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर हे आवश्यक शोध व बचाव साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचले. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता संबंधित विहीर सुमारे ४० फूट खोल आणि पूर्णपणे कोरडी असल्याचे दिसून आले. विहिरीच्या तळाशी महिला पडलेली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बचाव पथकाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनची तयारी सुरू केली. जवान गोपाल गिरे यांनी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांना फोनवरून घटनास्थळावरील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण बचाव मोहिमेचे नियोजन करण्यात आले. विहिरीची खोली आणि परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत सावधगिरीने ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. वायर रोपच्या सहाय्याने जवान उतरला विहिरीत क्षणाचाही विलंब न करता जवान गोपाल गिरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वायर रोपच्या सहाय्याने सुमारे ४० फूट खोल विहिरीत प्रवेश केला. विहिरीच्या तळाशी पोहोचल्यानंतर त्यांनी महिलेला धीर दिला. बचावादरम्यान कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून महिलेला सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्यात आले. त्यानंतर खाट आणि आवश्यक बचाव साहित्याच्या सहाय्याने महिलेला सुरक्षितपणे वर आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अत्यंत काळजीपूर्वक आणि समन्वयाने राबविण्यात आलेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर दुपारी सुमारे पाच वाजताच्या सुमारास महिलेला विहिरीतून जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश आले. त्यानंतर महिलेला पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बचाव पथकाच्या साहसाचे नागरिकांकडून कौतुक या बचाव मोहिमेदरम्यान मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके, पोलीस कर्मचारी प्रमोद थोरवे, धनंजय पवार यांच्यासह गावातील नागरिक आणि महिलेचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. महिला सुखरूप बाहेर आल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वेळेचे महत्त्व ओळखून पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या जवानांनी जीव धोक्यात घालून केलेल्या धाडसी बचावकार्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले. जवान गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर यांनी दाखविलेल्या साहसाचे स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमुळे महिलेला जीवनदान मिळाले असून, संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या तत्पर आणि साहसी कार्याची परिसरात प्रशंसा होत आहे.4