रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात 1 ऑगस्ट रोजी सर्व शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुट्टी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा निर्णय रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात 1 ऑगस्ट रोजी सर्व शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुट्टी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा निर्णय नंदुरबार, दि. 31 जुलै : भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या हवामान पूर्वसूचनेनुसार तसेच राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, मुंबई येथून प्राप्त संदेशाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह जोरदार वाऱ्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच 1 ऑगस्ट 2026 रोजीही पावसाची शक्यता असून त्यानंतर पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्तीजन्य परिस्थिती लक्षात घेऊन शनिवार, दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यात शुक्रवार रात्रीपासून तसेच दिवसभर मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तसेच सर्व नगरपालिकां, नगरपरिषद व नगरपंचायतींकडून दूरध्वनीद्वारे स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये शहरी व ग्रामीण भागातील सखल क्षेत्रांमध्ये पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे, वाहतुकीस अडथळे निर्माण होणे तसेच इतर आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉ. मित्ताली सेठी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला असून, त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना शनिवार, दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित सर्व विभाग, शिक्षण संस्था व स्थानिक प्रशासनाने या आदेशाची तात्काळ आणि काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिले आहेत. तसेच नागरिकांनी हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

- आज सड़क निर्माण में हुई लापरवाही के कारण मेरे खेत में पानी भर गया है, जिससे फसल को नुकसान होने की आशंका है। इस संबंध में मैंने वीडियो भी रिकॉर्ड किया है। संबंधित विभाग से निवेदन है कि जल्द से जल्द मौके का निरीक्षण कर उचित कार्रवाई करें और समस्या का स्थायी समाधान करें।1
- आजचा दिवसच पिक विमा भरण्यासाठी आहे पिक विमा भरून घ्या जिल्हाधिकारी यांचे शेतकऱ्यांना आवाहन1
- येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा येडशी | प्रतिनिधी सुभान शेख धाराशिव तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडशी येथील हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आज (31 जुलै) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. 31 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यासाठी दर्गा परिसर आकर्षक सजावटीने उजळून निघाला असून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भाग तसेच परराज्यातूनही हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. श्रद्धा, भक्ती, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा ऊरूस दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हजरत जमादार बाबा रहे यांच्या दर्ग्याला विविध धर्मीय भाविकांची अखंड श्रद्धा लाभलेली आहे. त्यामुळे हा ऊरूस केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या तीन दिवसांच्या कालावधीत धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऊरूसाच्या पहिल्या दिवशी 31 जुलै रोजी पारंपरिक संदल मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात येणार आहे. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये, धार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून जाणार असून भाविक मोठ्या श्रद्धेने या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. दर्गा परिसरात विशेष रोषणाई आणि सजावट करण्यात आली असून भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 1 ऑगस्ट रोजी ऊर्स शरीफ, कव्वालीची रंगतदार मैफल आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सुप्रसिद्ध कव्वालांच्या जुगलबंदीची विशेष मैफल रंगणार आहे. भोकरदनचे प्रसिद्ध कव्वाल आसिफ अली आणि मिरजच्या प्रसिद्ध कव्वाल रेश्मा ताज यांच्यात भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली कव्वालीची जुगलबंदी होणार असून, या मैफलीची भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सूफी परंपरेतील भक्तिगीते आणि आध्यात्मिक संदेशांनी सजलेली ही मैफल रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक घेणार असून, समाजातील सर्व स्तरातील नागरिक एकत्र येऊन बंधुभावाचा संदेश देणार आहेत. ऊरूसाच्या निमित्ताने परिसरात विविध खाद्यपदार्थांची दुकाने, धार्मिक साहित्याची विक्री, खेळणी तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांची दुकानेही उभारण्यात आल्याने यात्रेचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे. 2 ऑगस्ट रोजी जियारत कार्यक्रमाने या धार्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे. या दिवशी भाविक दर्ग्यात दर्शन घेऊन चादर अर्पण करतील तसेच देशात शांतता, सौहार्द आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येईल. ऊरूसाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनाकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वयंसेवक आणि ऊरूस समितीचे सदस्य भाविकांच्या सेवेसाठी सतत कार्यरत राहणार आहेत. हजरत जमादार बाबा रहे यांच्या ऊरूसाची अनेक दशकांची परंपरा असून, या सोहळ्यामुळे धार्मिक ऐक्य, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ होत असल्याचे भाविकांनी सांगितले. विविध धर्मीय नागरिक या ऊरूसात सहभागी होऊन परस्परांतील प्रेम, बंधुता आणि एकतेचे दर्शन घडवितात, ही या सोहळ्याची मोठी वैशिष्ट्ये आहेत. ऊरूस समितीने जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील भाविकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रम, कव्वालीची मैफल, महाप्रसाद आणि जियारतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारा हा तीन दिवसीय ऊरूस येडशी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण करणार असून भाविकांसाठी तो एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.2
- धुळे: जोरदार पावसामुळे शहर जलमय, रस्त्यांवर नदीसारखे पाणी, नाली-नाले ओसंडले... धुळे: जोरदार पावसामुळे शहर जलमय, रस्त्यांवर नदीसारखे पाणी, नाली-नाले ओसंडले... - Heavy Rain in Dhule City, Roads and drains overflow... - #dhulenews #dhulerain #monsoon2026 #dhuleweather #dhuleflood1
- नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा आता रस्त्यावर उतरून लढा! "ही लढाई कोणत्याही पक्षाची नाही, तर सामान्य माणसाची"; क्रांतीदिनी चक्काजाम जनआंदोलनाची दिली हाक मुंबई, दि. ३१ जुलै २०२६ : पुणे–नाशिक सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, या प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी पुणे–नाशिक महामार्गावर एकाच वेळी चक्काजाम जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांनी केली. यावर बोलताना आमदार तांबे म्हणाले की, एका बाजूला केंद्रीय मंत्र्यांकडून हा रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याचे सांगितले जात असले, तरी दुसऱ्या बाजूला जनतेच्या अपेक्षा आजही कायम आहेत. सरकारने नफा-तोट्याचा विचार न करता लाखो नागरिकांच्या भावना आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. "हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे किंवा कोणत्याही राजकीय नेत्याचे नाही. हा सामान्य नागरिकांचा लढा आहे. रेल्वेसारखे प्रकल्प शंभर वर्षांत एकदाच उभे राहतात. आज ही संधी हातची गेली, तर पुढील अनेक पिढ्यांना अशी संधी पुन्हा मिळणार नाही," असे तांबे यांनी स्पष्ट केले.पुणे–नाशिक दरम्यानचा सध्याचा प्रवास दिवसेंदिवस अधिक कष्टदायक होत असल्याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, दोन ते तीन तासांत होणाऱ्या प्रवासासाठी आज सहा ते सात तास खर्च करावे लागत आहेत. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि वाढता ताण यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरातील हजारो विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक आणि व्यावसायिक दररोज पुणे व नाशिकदरम्यान प्रवास करत असल्याने सरळ रेल्वे मार्गाची गरज अधिक तीव्र झाली आहे. सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर, चाकण यांसह संपूर्ण परिसराला या रेल्वेमुळे मोठा विकासाचा वेग मिळेल. त्याचबरोबर पुणे आणि नाशिक या दोन्ही शहरांवरील वाहतुकीचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पुणे–नाशिक महामार्गावर विविध ठिकाणी एकाच वेळी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगत, "केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आता जनतेनेच रस्त्यावर उतरले पाहिजे. इतिहास साक्षी आहे, जेव्हा जनता एकजूट होते, तेव्हा सरकारला निर्णय घ्यावाच लागतो," असे आमदार तांबे यांनी ठामपणे सांगितले. शेवटी त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, "हे आंदोलन कोणत्या पक्षासाठी किंवा व्यक्तीसाठी नाही, तर भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सामान्य माणूस म्हणून या जनआंदोलनात सहभागी व्हावे."1
- धुळे खडी पट्टी: रात्रीपासून मुसळधार पाऊस, कमरेपर्यंत पाणी, घरातही शिरले पाणी धुळे खडी पट्टी ब्रेकिंग ⚠️ काल रात्रीपासून मुसळधार पाऊस! या भागात कमरेपर्यंत पाणी साचले असून घरातही पाणी शिरले आहे. नागरिकांनो काळजी घ्या 🙏 Hashtags: #Dhule #KhadiPatti #DhuleFlood #DhuleRain #KhadiPattiFlood1