Shuru
Apke Nagar Ki App…
बँकॉकमध्ये भारताचा तिरंगा फडकावणाऱ्या सुमित दाभाडेची सुवर्ण कामगिरी भोर प्रतिनिधी नरेंद्र यादव बँकॉक येथे पार पडलेल्या 18व्या U-20 आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा 2026 मध्ये मुळशी तालुक्यातील दखणे गावचा सुपुत्र सुमित कैलास दाभाडे याने 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. या दैदिप्यमान कामगिरीमुळे सुमित दाभाडे याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला असून, मुळशी तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सुमितच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध क्षेत्रांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी मा.आमदार संग्राम थोपटे यांनी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा देल्या आहेत.
नरेंद्र यादव
बँकॉकमध्ये भारताचा तिरंगा फडकावणाऱ्या सुमित दाभाडेची सुवर्ण कामगिरी भोर प्रतिनिधी नरेंद्र यादव बँकॉक येथे पार पडलेल्या 18व्या U-20 आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा 2026 मध्ये मुळशी तालुक्यातील दखणे गावचा सुपुत्र सुमित कैलास दाभाडे याने 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. या दैदिप्यमान कामगिरीमुळे सुमित दाभाडे याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला असून, मुळशी तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सुमितच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध क्षेत्रांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी मा.आमदार संग्राम थोपटे यांनी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा देल्या आहेत.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- विजेच्या धक्क्याने दोन दिवसात दोन गायी ठार ;भोर तालुक्यातील हरिश्चंद्री येथील घटना विजेच्या धक्क्याने दोन दिवसांत दोन गायी ठार ; हरिश्चंद्रीतील धोकादायक विद्युत वाहिन्यांवर प्रश्नचिन्ह. विक्रम शिंदे /भोर दि. 1ऑगस्ट हरिश्चंद्री, ता. भोर : राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील मेन लाईन तुटून खाली पडल्याने गाभण गायीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. ३१ जुलै २०२६ रोजी घडली. सुदैवाने यावेळी शेतकरी तसेच इतर जनावरे थोडक्यात बचावली. मात्र, अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने याच परिसरात दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी समीर बाठे यांच्या मालकीची गाभण गाय विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी दि. २९ जुलै रोजी दत्तात्रय गाडे यांच्या गायीच्या अंगावर विद्युत तार पडून तिचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे सलग दोन दिवसाआड घडलेल्या या घटनांमुळे विद्युत वाहिन्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात विद्युत तारा तुटण्याच्या घटना वारंवार घडत असून, महावितरणच्या देखभालीतील हलगर्जीपणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रानात जनावरे चारण्यासाठी घेऊन जाताना जीविताला धोका निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. “घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी जनावरे चरायला रानात घेऊन जावे की नाही?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत मिळावी, परिसरातील विद्युत पोल व तारांची पाहणी करून धोकादायक स्थितीतील लाईनची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. घटनास्थळी स्थानिक कोतवाल अजित झाडे , शिवानंद पटेल, महावितरणचे कनिष्ठ अभियंता, किकवी सेक्शनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित यंत्रणेकडून घटनेची पाहणी करण्यात आली. सलग दोन घटनांनंतर महावितरणकडून कोणती कारवाई केली जाणार? मृत गायींच्या मालकांना नुकसानभरपाई मिळणार का? तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना होणार का? याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.2
- खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; ४५ हजार क्युसेक्स पाणी सोडणार पुणे प्रतिनिधी : तेजस वाळुंज : सतत सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून टप्प्याटप्प्याने ४५ हजार क्युसेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्र, पूल, बंधारे तसेच नदीकाठच्या परिसरात नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांमधील नागरिक, शेतकरी, मच्छीमार तसेच पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. परिस्थिती गंभीर झाल्यास नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासनाचे नागरिकांना आवाहन नदीपात्रात जाऊ नये. पूल व बंधारे ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पुलांवर पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊ नये. अधिकृत सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.1
- पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे1
- Pune -khadakwasla dam, pune flood alert, water discharge, mutha river, pune rain, monsoon update, maharashtra news) Water discharge from Khadakwasla Dam has been increased as all four major dams in the Khadakwasla reservoir system have reached full capacity. Around 43,000 cusecs of water is being released into the Mutha River, raising concerns of possible flood-like situations in parts of Pune city.1
- भोर बस स्थानक परिसरातील अक्षर धाम स्मशानभूमीला पाण्याचा वेढा ;पावसाने भोरला झोडपले विक्रम शिंदे /भोर दि. 31 भोर शहरासह तालुक्यात आज (दि. 31)पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. भोर बसस्थानक परिसरातील अक्षर धाम स्मशानभूमी पाण्याखाली गेली असून नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे.1
- *मॅप्रो कंपनीमुळे शेंदूरजणे गावाच्या हद्दीत होणाऱ्या प्रदूषणाविरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा एल्गार, राज्यमंत्री दर्जा प्राप्त जयदीप भाई कवाडे यांनी दिले एमपीसीबी अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश* दिनांक 31/07/2026 वाई तालुक्यातील शेंदुर्जने गावचे हद्दीत मेप्रो नावाची कंपनी आहे. सदर कंपनीकडून जल प्रदूषण व वायू प्रदूषण करण्याच्या घटना वारंवार वर्षानुवर्ष घडत आहेत. याबाबत तेथील स्थानिक शेतकरी ग्रामस्थ यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा जिल्हा यांच्याशी संपर्क देखील केला आहे. तरीही मॅप्रो कंपनी आपल्या कारभारात कोणत्याही प्रकारची सुधारणा करत नाही. सद्यस्थितीत मेप्रो कंपनीचे सर्व दूषित पाणी कंपनीपासून पुढील बाजूस असणाऱ्या विहिरींमध्ये जाऊन विहिरी प्रदूषित झाल्या आहेत .त्याचबरोबर आसपासच्या शेतीवर देखील त्याचा वाईट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ साताराचे अधिकारी अमोल सातपुते यांची भूमिका देखील संशयास्पद आहे, ते तक्रारदार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी यांनाच उलटसुलट उत्तरे देत असून पूर्णपणे कंपनीची बाजू घेत आहेत. कंपनी व सातपुते यांच्यात काही ना काही आर्थिक हितसंबंध असल्याचा देखील दावा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अमोल सातपुते हे खूपच उडवा उडविची उत्तरे देत असल्याकारणे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांनी अमोल सातपुते यांना फोनवर तुम्ही धनदांगट लोकांची बाजू घेऊ नका, गोरगरिबांना न्याय द्या, आणि लवकर त्या कंपनीवर कारवाई करा, अन्यथा तुमच्या निलंबनासाठी मला कारवाईचे निर्देश द्यावे लागतील .असे देखील राज्यमंत्री जयदीप कवाडे यांनी अधिकारी अमोल सातपुते यांना बजावले आहे. मॅप्रो कंपनी वारंवार स्थानिकांना त्रास देत आहे. आसपासच्या भागात प्रदूषण निर्माण करत आहे. ज्यामुळे लोकांच्या जीविताचा व त्याचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . तरही आता मॅप्रो कंपनी सील करण्यात यावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे एमपीसीबी कडे केली आहे. सदर निवेदनावर येत्या दिवसात काही कारवाई न दिसल्यास एमपीसीबी चे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांच्या सोबत भेट घेऊन सदर कंपनी सील करायला सांगणार, त्याचबरोबर सदर अधिकारी अमोल सातपुते यांच्या निलंबनाची देखील मागणी करण्यात येणार अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे. सदर निवेदन देताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष अनमोल कांबळे ,सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे, वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, राष्ट्रीय मजदूर सेनेचे जिल्हा संघटक विकास जाधव, अमोल चव्हाण ,सचिन अंबिके आणि पदाधिकारी संख्येने उपस्थित होते.4