logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा प्रशासनाला इशारा ; मानोरा तालुक्यात असहकार आंदोलनाची ठिणगी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानावर बहिष्कार मानोरा (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्यामुळे अखेर मानोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी असहकार आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन, डि.एन.ई. १३६ मानोरा तालुका यांच्या नेतृत्वाखाली १६ फेब्रुवारी पासून युनियन तालुका अध्यक्ष गेबीनाथ डीघोळे यांचे नेतृत्वात आंदोलनास प्रारंभ करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन, डि.एन.ई. १२६ जिल्हा शाखा वाशिम यांच्या ६ फेब्रुवारी च्या पत्रानुसार तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतरही मागण्यांबाबत समाधानकारक निर्णय न झाल्याने हा आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी विलास जाधव यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. शासकीय व्हॉट्सअॅप समूहातून बाहेर पडण्यात येईल. वरिष्ठांच्या शासकीय बैठकींना उपस्थित राहणार नाहीत. कोणताही शासकीय अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाणार नाही.तपासणीदरम्यान वरिष्ठांना आवश्यक कागदपत्रे व नोंदी उपलब्ध करून दिल्या जाणार नाहीत. दरम्यान, आंदोलनाच्या काळात ग्रामस्तरावरील अत्यावश्यक व नियमित कामकाज सुरळीत ठेवले जाईल, अशी भूमिका संघटनेने स्पष्ट केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन सेवांवर परिणाम होऊ नये, याची दक्षता घेतली जाणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे पंचायत राज व्यवस्थेतील प्रशासकीय कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासन आणि संघटना यांच्यात लवकरात लवकर सकारात्मक तोडगा निघावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.निवेदनावर सचिव शरद शिंदे,महिला जिल्हा उपाध्यक्ष मंनुषा राठोड,तालुका उपाध्यक्ष तारासिंग राठोड,एकनाथ चिकटे,एस. पी. राऊत, पी. पी. भगत, एस. पी. गावंडे, विष्णू करसडे, सचिन टाले, आर. आर. शिंदे, यु. बी. खत्री, गणेश चौरे आदीच्या स्वाक्षरी आहे. आता प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

6 hrs ago
user_कु.मोनाली अनिल राठोड
कु.मोनाली अनिल राठोड
पत्रकार मानोरा, वाशिम, महाराष्ट्र•
6 hrs ago
87c35588-4347-455a-97f6-5057a0b35d8a

प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा प्रशासनाला इशारा ; मानोरा तालुक्यात असहकार आंदोलनाची ठिणगी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानावर बहिष्कार मानोरा (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्यामुळे अखेर मानोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी असहकार आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन, डि.एन.ई. १३६ मानोरा तालुका यांच्या नेतृत्वाखाली १६ फेब्रुवारी पासून युनियन तालुका अध्यक्ष गेबीनाथ डीघोळे यांचे नेतृत्वात आंदोलनास प्रारंभ करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन, डि.एन.ई. १२६ जिल्हा शाखा वाशिम यांच्या ६ फेब्रुवारी च्या पत्रानुसार तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतरही मागण्यांबाबत समाधानकारक निर्णय न झाल्याने हा आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी विलास जाधव यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. शासकीय व्हॉट्सअॅप समूहातून बाहेर पडण्यात येईल. वरिष्ठांच्या शासकीय बैठकींना उपस्थित राहणार नाहीत. कोणताही शासकीय अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाणार नाही.तपासणीदरम्यान वरिष्ठांना आवश्यक कागदपत्रे व नोंदी उपलब्ध करून दिल्या जाणार नाहीत. दरम्यान, आंदोलनाच्या काळात ग्रामस्तरावरील अत्यावश्यक व नियमित कामकाज सुरळीत ठेवले जाईल, अशी भूमिका संघटनेने स्पष्ट केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन सेवांवर परिणाम होऊ नये, याची दक्षता घेतली जाणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे पंचायत राज व्यवस्थेतील प्रशासकीय कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासन आणि संघटना यांच्यात लवकरात लवकर सकारात्मक तोडगा निघावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.निवेदनावर सचिव शरद शिंदे,महिला जिल्हा उपाध्यक्ष मंनुषा राठोड,तालुका उपाध्यक्ष तारासिंग राठोड,एकनाथ चिकटे,एस. पी. राऊत, पी. पी. भगत, एस. पी. गावंडे, विष्णू करसडे, सचिन टाले, आर. आर. शिंदे, यु. बी. खत्री, गणेश चौरे आदीच्या स्वाक्षरी आहे. आता प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ज्ञानेशप्रसाद, ब्युरो चिफ न्यूज मराठी वाशिम* संवाद:- 9923230821 रिसोड: न. प. चे कर्मचारी विनोद बांगर यांच्यामुळे, गावात पुन्: पक्षांचा चिव चिवाट ऐकायला मिळतोय!
    1
    ज्ञानेशप्रसाद, ब्युरो चिफ न्यूज मराठी वाशिम* संवाद:- 9923230821
रिसोड: न. प. चे कर्मचारी विनोद बांगर यांच्यामुळे, गावात पुन्: पक्षांचा चिव चिवाट ऐकायला मिळतोय!
    user_Dnyaneshprasad
    Dnyaneshprasad
    वाशिम, वाशिम, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • *“धानोरा विकासकामांचा भांडाफोड; जलसंधारण घोटाळ्यावर जि.प. प्रशासन कोंडीत!”* - जि.प. यवतमाळसमोर आमरण उपोषणाला सुरवात! उमरखेड : धानोरा (सा), ता. उमरखेड येथील कथित विकासकामांतील गैरव्यवहार आणि जलसंधारण विभागातील अनियमिततेच्या गंभीर आरोपांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) पासून जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून प्रशासनावर थेट कारवाईचा दबाव वाढला आहे. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा या आमरण उपोषणात रामदास अंबादास कांबळे (अध्यक्ष, संयुक्त पत्रकार संघ), शेख इरफान शेख इसा (कार्याध्यक्ष) आणि सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी (उपाध्यक्ष) सहभागी झाले आहेत त्यांनी जि.प. कार्यालयासमोर “दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाही” असा स्पष्ट इशारा दिला. *धानोरा प्रकरणातील आरोप गंभीर* उपोषणकर्त्यांनी केलेले आरोप थेट जनहिताशी निगडित असून त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल गैरव्यवहार, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सीसी रस्त्याचे काम न करता बिले काढल्याचा आरोप, सार्वजनिक शौचालयाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत तक्रारींकडे दुर्लक्ष यांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणांत चौकशी व कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले. *जलसंधारण विभागावर लाखोंच्या भ्रष्टाचाराचा ठपका* जि.प. उपविभाग पुसद येथे कार्यरत उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा तायडे यांच्या कार्यकाळात पुसद, दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांतील विकासकामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. धरण–तलाव गाळ उपसा योजनेत अनियमितता,वीटभट्टी धारकांना नियमबाह्य माती परवाने, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. *तक्रारींनंतरही कारवाई नाही* १७ डिसेंबर २०२५ रोजी लेखी निवेदन, ९ जानेवारी २०२६ रोजी स्मरणपत्र आणि ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व ग्रामविकास मंत्र्यांना ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. “दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उपोषणादरम्यान काही अनुचित घडल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान जि.प. कार्यालया समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणातील गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    1
    *“धानोरा विकासकामांचा भांडाफोड; जलसंधारण घोटाळ्यावर जि.प. प्रशासन कोंडीत!”*
-  जि.प. यवतमाळसमोर आमरण उपोषणाला सुरवात!
उमरखेड : धानोरा (सा), ता. उमरखेड येथील कथित विकासकामांतील गैरव्यवहार आणि जलसंधारण विभागातील अनियमिततेच्या गंभीर आरोपांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) पासून जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून प्रशासनावर थेट कारवाईचा दबाव वाढला आहे.
पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा 
या आमरण उपोषणात  रामदास अंबादास कांबळे (अध्यक्ष, संयुक्त पत्रकार संघ), शेख इरफान शेख इसा (कार्याध्यक्ष) आणि सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी (उपाध्यक्ष) सहभागी झाले आहेत  त्यांनी जि.प. कार्यालयासमोर  “दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाही” असा स्पष्ट इशारा दिला.
*धानोरा प्रकरणातील आरोप गंभीर*
उपोषणकर्त्यांनी केलेले आरोप थेट जनहिताशी निगडित असून त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल गैरव्यवहार,
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सीसी रस्त्याचे काम न करता बिले काढल्याचा आरोप,
सार्वजनिक शौचालयाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत तक्रारींकडे दुर्लक्ष
यांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणांत चौकशी व कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
*जलसंधारण विभागावर लाखोंच्या भ्रष्टाचाराचा ठपका*
जि.प. उपविभाग पुसद येथे कार्यरत उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा तायडे यांच्या कार्यकाळात पुसद, दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांतील विकासकामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
धरण–तलाव गाळ उपसा योजनेत अनियमितता,वीटभट्टी धारकांना नियमबाह्य माती परवाने, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी
अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
*तक्रारींनंतरही कारवाई नाही*
१७ डिसेंबर २०२५ रोजी लेखी निवेदन, ९ जानेवारी २०२६ रोजी स्मरणपत्र आणि ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व ग्रामविकास मंत्र्यांना ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उपोषणादरम्यान काही अनुचित घडल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान जि.प. कार्यालया समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणातील गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    5 min ago
  • अमरावतीच्या मेळघाटात बैलांचा नाही तर चक्क "बोकडपट"..
    1
    अमरावतीच्या मेळघाटात बैलांचा नाही तर चक्क "बोकडपट"..
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • 🔱 पावसात अदृश्य… शिवरात्रीला प्रकट! 🔱 तेलंगणातील तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्हा, नंदिपेट मंडल परिसरातील उम्मेडा गावाजवळ गोदावरी नदीच्या पवित्र काठावर वसलेले श्री सोमेश्वर (उमामहेश्वर) मंदिर हे देवस्थान महाशिवरात्रीला अक्षरशः चमत्कारासारखे प्रकट होते! 🌊 पावसाळ्यात धरणातील पाणी वाढल्याने वर्षभर पाण्यात लपलेले हे प्राचीन मंदिर, पाणी ओसरताच महाशिवरात्रीला दर्शनासाठी खुले होते. 🛕 कळस, गाभारा आणि दीपमाळ पुन्हा उजेडात येतात आणि श्रद्धा-निसर्ग-अध्यात्म यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. 🪔 कार्तिक महिन्यातील गंगा पूजन व दीपोत्सव तर भक्तांसाठी अविस्मरणीय क्षण ठरतो. ✨ निसर्गाच्या कुशीत दरवर्षी पुन्हा उगवणारा हा अध्यात्माचा दीप—गोदावरीकाठी अनुभवायला मिळणारी दिव्य पर्वणी! यंदा महाशिवरात्री निमित्त लाखो भाविकांनी सोमेश्वराचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. हर हर महादेव! 🔱 #श्रीसोमेश्वर #उमामहेश्वर #गोदावरीकाठ #महाशिवरात्री2026 #Telangana #Nizamabad #Umedda #आस्था #धार्मिकवार्ता #NNLDigitalMedia
    1
    🔱 पावसात अदृश्य… शिवरात्रीला प्रकट! 🔱
तेलंगणातील तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्हा, नंदिपेट मंडल परिसरातील उम्मेडा गावाजवळ गोदावरी नदीच्या पवित्र काठावर वसलेले श्री सोमेश्वर (उमामहेश्वर) मंदिर हे देवस्थान महाशिवरात्रीला अक्षरशः चमत्कारासारखे प्रकट होते!
🌊 पावसाळ्यात धरणातील पाणी वाढल्याने वर्षभर पाण्यात लपलेले हे प्राचीन मंदिर, पाणी ओसरताच महाशिवरात्रीला दर्शनासाठी खुले होते.
🛕 कळस, गाभारा आणि दीपमाळ पुन्हा उजेडात येतात आणि श्रद्धा-निसर्ग-अध्यात्म यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो.
🪔 कार्तिक महिन्यातील गंगा पूजन व दीपोत्सव तर भक्तांसाठी अविस्मरणीय क्षण ठरतो.
✨ निसर्गाच्या कुशीत दरवर्षी पुन्हा उगवणारा हा अध्यात्माचा दीप—गोदावरीकाठी अनुभवायला मिळणारी दिव्य पर्वणी!
यंदा महाशिवरात्री निमित्त लाखो भाविकांनी सोमेश्वराचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
हर हर महादेव! 🔱
#श्रीसोमेश्वर #उमामहेश्वर #गोदावरीकाठ #महाशिवरात्री2026 #Telangana #Nizamabad #Umedda #आस्था #धार्मिकवार्ता #NNLDigitalMedia
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • ‘झिरो मिस्टेक’चा इशारा; राष्ट्रपती दौऱ्यासाठी पोलिसांची कडेकोट मोर्चेबांधणी.. राष्ट्रपतींच्या दौऱ्याची ‘हायअलर्ट’ तयारी; सुरक्षा आराखड्याची विशेष पाहणी शेगांव / बुलढाणा, दि. १७ (जिमाका) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. दौरा निर्विघ्न आणि दिमाखात पार पडावा यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी आज प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सभास्थळ, हेलिपॅड, विश्रांतीगृह तसेच मार्गावरील संवेदनशील ठिकाणांची बारकाईने तपासणी करण्यात आली. बहुस्तरीय सुरक्षा कवच उभारण्याच्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक हालचालीवर ‘गरुडदृष्टी’ ठेवली जाणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. आशितोष गुप्ता यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन आराखडा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आणि प्रोटोकॉल याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. “दौऱ्यात कोणतीही त्रुटी चालणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने आणि सतर्कतेने काम करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपतींचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा ठाम विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. हायसिक्युरिटी, कडक नियोजन आणि प्रशासनाचा ‘फुल गियर’ — राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी बुलढाणा तयार!
    1
    ‘झिरो मिस्टेक’चा इशारा; राष्ट्रपती दौऱ्यासाठी पोलिसांची कडेकोट मोर्चेबांधणी..
राष्ट्रपतींच्या दौऱ्याची ‘हायअलर्ट’ तयारी; सुरक्षा आराखड्याची विशेष पाहणी
शेगांव / बुलढाणा, दि. १७ (जिमाका) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. दौरा निर्विघ्न आणि दिमाखात पार पडावा यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी आज प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
सभास्थळ, हेलिपॅड, विश्रांतीगृह तसेच मार्गावरील संवेदनशील ठिकाणांची बारकाईने तपासणी करण्यात आली. बहुस्तरीय सुरक्षा कवच उभारण्याच्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक हालचालीवर ‘गरुडदृष्टी’ ठेवली जाणार आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. आशितोष गुप्ता यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन आराखडा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आणि प्रोटोकॉल याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले.
“दौऱ्यात कोणतीही त्रुटी चालणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने आणि सतर्कतेने काम करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपतींचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा ठाम विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
हायसिक्युरिटी, कडक नियोजन आणि प्रशासनाचा ‘फुल गियर’ — राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी बुलढाणा तयार!
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    8 min ago
  • ​खामगाव : तालुक्यातील जयपूर लांडे येथे शासकीय कामगार किट वाटपाच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ उडाला असून, भाजप पदाधिकाऱ्यांकडून केवळ आपल्या जवळच्या व्यक्तींचेच फॉर्म स्वीकारले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कारणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीची ऑडिओ रेकॉर्डिंग आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ​शासनाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती उपयोगाच्या भांड्यांच्या संचाचे वाटप केले जात आहे.जयपूर लांडे येथे हे फॉर्म स्वीकारत असताना, तिथे उपस्थित असलेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ठराविक लोकांचेच फॉर्म स्वीकारण्यास सुरुवात केली.​जेव्हा इतर सामान्य कामगार आणि ग्रामस्थ आपले फॉर्म घेऊन पोहोचले, तेव्हा त्यांचे फॉर्म स्वीकारण्यास टाळाटाळ करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जाब विचारला असता, पदाधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. ​केवळ भाजप पदाधिकाऱ्यांच्या पसंतीचे आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचेच फॉर्म घेतले जात आहेत,​सामान्य आणि गरजू कामगारांना डावलले जात आहे,​शासकीय योजनेचे रूपांतर राजकीय कार्यक्रमात केल्याचा संताप व्यक्त होत आहे.​या वादादरम्यान झालेला संवाद काही व्यक्तींनी रेकॉर्ड केला असून, ती क्लिप आता तालुक्यात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये पदाधिकाऱ्यांचा अरेरावीचा सूर आणि ग्रामस्थांचा संताप स्पष्टपणे ऐकू येत आहे. या प्रकारामुळे जयपूर लांडे परिसरात तणावाचे वातावरण असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.
    1
    ​खामगाव : तालुक्यातील जयपूर लांडे येथे शासकीय कामगार किट वाटपाच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ उडाला असून, भाजप पदाधिकाऱ्यांकडून केवळ आपल्या जवळच्या व्यक्तींचेच फॉर्म स्वीकारले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कारणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीची ऑडिओ रेकॉर्डिंग आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ​शासनाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती उपयोगाच्या भांड्यांच्या संचाचे वाटप केले जात आहे.जयपूर लांडे येथे हे फॉर्म स्वीकारत असताना, तिथे उपस्थित असलेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ठराविक लोकांचेच फॉर्म स्वीकारण्यास सुरुवात केली.​जेव्हा इतर सामान्य कामगार आणि ग्रामस्थ आपले फॉर्म घेऊन पोहोचले, तेव्हा त्यांचे फॉर्म स्वीकारण्यास टाळाटाळ करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जाब विचारला असता, पदाधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. ​केवळ भाजप पदाधिकाऱ्यांच्या पसंतीचे आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचेच फॉर्म घेतले जात आहेत,​सामान्य आणि गरजू कामगारांना डावलले जात आहे,​शासकीय योजनेचे रूपांतर राजकीय कार्यक्रमात केल्याचा संताप व्यक्त होत आहे.​या वादादरम्यान झालेला संवाद काही व्यक्तींनी रेकॉर्ड केला असून, ती क्लिप आता तालुक्यात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये पदाधिकाऱ्यांचा अरेरावीचा सूर आणि ग्रामस्थांचा संताप स्पष्टपणे ऐकू येत आहे. या प्रकारामुळे जयपूर लांडे परिसरात तणावाचे वातावरण असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • श्री चाफेश्वर भगवान पालखी नगर प्रदक्षिणा संपन्न! ................................................... ज्ञानेशप्रसाद ब्युरो चिफ वाशिम जिल्हा वाशिम: जिल्ह्यातील ऋषीमुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऋषीवट नगरी अर्थातच रिसोड येथे, महाशिवरात्रीचे पावन पर्वावर, दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी, सायंकाळी 4 वा. येथील जागरूक देवस्थान चाफेश्वर भगवान यांची पालखी मिरवणूक अतिशय उत्साहात काढण्यात आली असून, या पालखी सोहळ्यामध्ये युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते स्त्रियांनी भजनी मंडळाद्वारे शिवस्तुती भक्ती गीत म्हणत, आपली भक्ती प्रकट केली. पालखी मार्गावर भाविक महिलांनी आपापल्या अंगणामध्ये पाणी शिंपडून रांगोळीची सजावट करून पालखीचे उत्साहात स्वागत केले. ज्ञानेश्वर थोरात यांनी, पालखीतील भक्तांकरिता, पालखी मार्गावर थंड पाण्याची व्यवस्था केली होती. प्रमुख मार्गाने पालखी मार्गक्रमण करत करत ही पालखी अमरदास बाबा मंदिर ते श्री आप्पास्वामी मंदिरा पासून जय संताजी चौक, संत रविदास चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन सराफ लाईन, गणेश मंदिर, अष्टभुजा देवी चौकातून, आपल्या नियोजित स्थळी श्री चाफेश्वर मंदिर परिसरामध्ये शिव शंकराची महाआरती केल्यानंतर, पालखीची सांगता करण्यात आली.
    1
    श्री चाफेश्वर भगवान पालखी नगर प्रदक्षिणा संपन्न!
...................................................
ज्ञानेशप्रसाद ब्युरो चिफ वाशिम जिल्हा 
वाशिम: जिल्ह्यातील ऋषीमुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऋषीवट नगरी अर्थातच रिसोड येथे, महाशिवरात्रीचे पावन पर्वावर, दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी, सायंकाळी 4 वा. येथील जागरूक देवस्थान चाफेश्वर भगवान यांची पालखी मिरवणूक अतिशय उत्साहात काढण्यात आली असून, या पालखी सोहळ्यामध्ये युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते स्त्रियांनी भजनी मंडळाद्वारे शिवस्तुती भक्ती गीत म्हणत, आपली भक्ती प्रकट केली. पालखी मार्गावर भाविक महिलांनी आपापल्या अंगणामध्ये पाणी शिंपडून रांगोळीची सजावट करून पालखीचे उत्साहात स्वागत केले. ज्ञानेश्वर थोरात यांनी, पालखीतील भक्तांकरिता, पालखी मार्गावर थंड पाण्याची व्यवस्था केली होती. प्रमुख मार्गाने पालखी मार्गक्रमण करत करत ही पालखी अमरदास बाबा मंदिर ते श्री आप्पास्वामी मंदिरा पासून जय संताजी चौक, संत रविदास चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन सराफ लाईन, गणेश मंदिर, अष्टभुजा देवी चौकातून, आपल्या नियोजित स्थळी श्री चाफेश्वर मंदिर परिसरामध्ये शिव शंकराची महाआरती केल्यानंतर, पालखीची सांगता करण्यात आली.
    user_Dnyaneshprasad
    Dnyaneshprasad
    वाशिम, वाशिम, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.