मुसलधार पावसाचा साहित्यिक वारशाला तडाखा; कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला. मंचर : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता ऐतिहासिक आणि साहित्यिक वारशालाही बसू लागला आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या घटनेमुळे साहित्यप्रेमी आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, ऐतिहासिक वास्तूची तातडीने संवर्धनाची मागणी जोर धरू लागली आहे. मंचर येथील शांता शेळके यांच्या स्मृतींशी निगडित हा ऐतिहासिक वाडा त्यांच्या समृद्ध साहित्यिक वारशाची साक्ष देणारा ठेवा मानला जातो. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वाड्याचा काही भाग कोसळला. या वास्तूची अवस्था यापूर्वीपासूनच जीर्ण झाली होती. त्याबाबत मंचर नगरपंचायतीने वेळोवेळी दुरुस्ती आणि आवश्यक उपाययोजनांसंदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रभावी दुरुस्ती न झाल्याने अखेर पावसाच्या तडाख्यात वाड्याचा काही भाग जमीनदोस्त झाला. घटनेनंतर मंचरमधील साहित्यप्रेमी, नागरिक आणि ग्रामस्थांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. शांता शेळके यांचा साहित्यिक वारसा जपणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूचे तातडीने संवर्धन, दुरुस्ती आणि संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने ही घटना गंभीर इशारा मानली जात असून, प्रशासन या स्मृती वास्तूच्या संरक्षणासाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नगराध्यक्ष राजश्री गांजाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वाड्याचा धोकादायक भाग यापूर्वीच नगरपंचायतीने हटविला होता. आता कोसळलेल्या भिंतीचा राडारोडाही तातडीने हटविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. वारसा जपण्याची वेळ आता आलीच मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक ऐतिहासिक वास्तूंना धोका निर्माण होत आहे. शांता शेळके यांच्या वाड्याचा काही भाग कोसळल्याच्या घटनेने सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा जतन करण्यासाठी तातडीने संवर्धन, दुरुस्ती आणि संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

- पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे1
- 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए। 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।1
- थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.1
- अमित शाहांच्या पुणे दौऱ्याआधी वसंत मोरे यांच्यावर पोलिसांची कारवाई!1