Shuru
Apke Nagar Ki App…
गोंदिया जिला न्यायालय में नए कोर्ट रूम व बार रूम का उद्घाटन | विद्यार्थियों को सहायता गोंदिया जिला न्यायालय परिसर में 8 अगस्त 2026 को नवीन न्यायालय कक्ष एवं जिला वकील संघ के नवीन बार रूम का उद्घाटन किया गया। कार्यक्रम के दौरान जरूरतमंद एवं दिव्यांग विद्यार्थियों को सहायता एवं साहित्य का वितरण भी किया गया। #GondiaNews #Gondia #DistrictCourtGondia #LegalServicesAuthority #BreakingNews #KohramNews #GondiaNewsToday
Bhushan Raje.
गोंदिया जिला न्यायालय में नए कोर्ट रूम व बार रूम का उद्घाटन | विद्यार्थियों को सहायता गोंदिया जिला न्यायालय परिसर में 8 अगस्त 2026 को नवीन न्यायालय कक्ष एवं जिला वकील संघ के नवीन बार रूम का उद्घाटन किया गया। कार्यक्रम के दौरान जरूरतमंद एवं दिव्यांग विद्यार्थियों को सहायता एवं साहित्य का वितरण भी किया गया। #GondiaNews #Gondia #DistrictCourtGondia #LegalServicesAuthority #BreakingNews #KohramNews #GondiaNewsToday
More news from महाराष्ट्र and nearby areas
- वडिलांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.. सुशील जनबंधु यांनी दाखवले आदर्श कार्य.. नागपूर:- येथील पंचशील हायस्कूल शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाची एक आदर्श आणि प्रेरणादायी कार्य आहे... समाजा साठी कधी पण एक पाऊल समोर असणारे सुशील भीमराव जनबंधु यांनी आपल्या स्वर्गवासी वडिलांची( स्व.भीमराव साहादेव जनबंधु) पंचशील हायस्कूल येथे जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप केले..वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि त्यांच्या विचारांना पुढे नेण्याच्या उद्देशाने सुशील जनबंधु यांनी आपल्या वडिलांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप केले अन्नदानाऐवजी शिक्षणाला महत्त्वसध्याच्या काळात वाढ दिवस असो या जयंतीनिमित्त होणारा अवाजवी खर्च टाळून, समाजातील गरजू घटकांसाठी काहीतरी करावे या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .याप्रसंगी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना भारताचे संविधान लिहिलेली डायरी, वह्या, पेन, पेन्सिल इत्यादी शैक्षणिक साहित्याचे संच वाटप करण्यात आले यामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.शिक्षणाचा प्रसार हिच खरी आदरांजली आहे याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना सुशील जनबंधु म्हणाले की, "माझे वडील यांनी नेहमीच शिक्षणाला आणि ज्ञानाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणात खारीचा वाटा उचलणे, हीच त्यांना दिलेली खरी आदरांजली ठरेल."हा स्तुत्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षकवृंद आणि मित्र बंधू यांची प्रमुख उपस्थिती होती...2
- भाजप कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात स्वागत भाजप कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात स्वागत चंद्रपूर नगरी प्रतिनिधी | मुंबई चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांनी आज मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आशिष रणदिवे यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. रणदिवे यांच्या पक्षप्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीला बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना नेते तथा सचिव विनायक राऊत, चंद्रपूर जिल्हाप्रमुख भास्कर ताजने यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आशिष रणदिवे हे चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या कामगार आघाडीमध्ये महामंत्री म्हणून कार्यरत होते. कामगारांच्या प्रश्नांसह विविध सामाजिक व संघटनात्मक विषयांवर त्यांनी काम केले आहे. त्यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षप्रवेशानंतर रणदिवे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत आगामी काळात पक्षाची विचारधारा आणि संघटन मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्यात आगामी काळात स्थानिक पातळीवर संघटनात्मक विस्ताराला शिवसेनेकडून अधिक गती देण्यात येत असताना, भाजपच्या कामगार आघाडीतील पदाधिकाऱ्याचा पक्षप्रवेश हा विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच आशिष रणदिवे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद वाढणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. — चंद्रपूर नगरी प्रतिनिधी1
- वणीत उद्या बच्चू कडूंच्या उपस्थितीत भव्य शेतकरी-बेरोजगार मेळावा1
- ... अखेर त्रिवेणी पोहरकर नगराध्यक्ष पदावर विराजमान लाखनी नगरपंचायतीत सत्ता संघर्षाला नाट्यमय वळण आले असून नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर यांच्या विरोधात नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी, भंडारा यांच्याकडे दाखल केला होता. त्या अनुषंगाने 31 जुलैला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्रिवेणी पोहरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील 2 सदस्य न्यायालयाने त्यांना स्थगिती दिली होती. मात्र नगराध्यक्ष पदाची खुर्ची खाली होती. त्या आदेशानुसार त्रिवेणी पोहरकर नगराध्यक्ष पदावर पुन्हा विराजमान झाल्या आहेत. असे असले तरी 17 ऑगस्ट रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. राज्यात आणि स्थानिक ठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती असताना सुद्धा नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष विरोधात काँग्रेस आणि अपक्ष नगरसेवकांना सोबत घेऊन अविश्वासाची मोहीम राबविण्यात आल्याने लाखनी वाशियांमध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आले असून याचा परिणाम पुढील होणाऱ्या निवडणुकांवर पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे विशेष उल्लेखनीय !1
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त मूल येथे गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न आदिवासी समाजातील प्रतिभावंतांचा सन्मान ही काळाची गरज — संतोष सिडाम जागतिक आदिवासी दिनानिमित्त मूल येथे गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न आदिवासी समाजातील प्रतिभावंतांचा सन्मान ही काळाची गरज — संतोष सिडाम जागतिक आदिवासी दिनानिमित्त मूल येथे गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न आदिवासी समाजातील प्रतिभावंतांचा सन्मान ही काळाची गरज — संतोष सिडाम मूल : प्रतिनिधी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून मूल शहरात गुणवंत विद्यार्थी तसेच समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दिनांक ९ ऑगस्ट रोजी भाग्यरेखा मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला आदिवासी समाजबांधव, महिला, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूल नगराध्यक्ष सौ. एकता ताई प्रशांत समर्थ होत्या. त्यांच्या हस्ते तसेच उपस्थित विविध मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष सौ. एकता ताई प्रशांत समर्थ यांनी आदिवासी समाजाच्या समृद्ध इतिहास, परंपरा, संस्कृती आणि सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला. आदिवासी समाजाने प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण, कला, साहित्य, सामाजिक कार्य आणि विविध क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांचाही सन्मान व्हावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संतोष सिडाम सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे महत्त्व अधोरेखित केले. आदिवासी समाजात केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर विविध क्षेत्रांत असंख्य प्रतिभावंत कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. आदिवासी समाजात कवी, लेखक, पत्रकार, व्यंगचित्रकार, चित्रकार तसेच विविध कलागुणांनी संपन्न व्यक्ती मोठ्या प्रमाणात आहेत. या प्रतिभावंतांनी आपल्या कर्तृत्वातून समाजाची ओळख निर्माण केली असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचाही सन्मान होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. “गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही निश्चितच अभिमानाची बाब आहे; मात्र समाजातील साहित्य, कला, पत्रकारिता आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रतिभावंतांनाही व्यासपीठ मिळाले पाहिजे. भविष्यात ही गरज पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू,” असे संतोष सिडाम यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आजच्या स्पर्धात्मक युगात आर्थिक, सामाजिक किंवा भौगोलिक अडचणींवर मात करून शिक्षण क्षेत्रात यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक आणि प्रोत्साहन करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा सत्कार सोहळ्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि इतर विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती करण्याची प्रेरणा मिळते. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवा, वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण, कायदा, पत्रकारिता, कला, क्रीडा आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांत आपले योगदान वाढवावे, असा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमाला सुरेश पाटील कुडमेथे, नगराध्यक्ष सौ. एकता ताई प्रशांत समर्थ, भागवत कुंबरे, पोलीस अधिकारी नेताम मॅडम यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला मूल शहर व परिसरातील नागरिक, समाजबांधव, महिला, विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित या गुणवंत सत्कार सोहळ्यामुळे आदिवासी समाजातील शैक्षणिक व सामाजिक प्रगतीला प्रोत्साहन मिळाले असून समाजातील नव्या पिढीने आपल्या कर्तृत्वातून समाजाचा गौरव वाढवावा, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. — चंद्रपूर नगरी प्रतिनिधी1
- आर्वी मे राष्ट्रीय आदिवासी दिवस JKV NEWS 24 Page ko like kariye1
- भंडारा अत्याचार प्रकरणी मुलींनी काढला मोर्चा....शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग भंडारा शहरातील एका चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा शहरातील शाळकरी मुलींनी एकत्र येत गांधी चौकातून मोर्चा काढला आहे... हा मोर्चा जिल्हा सत्र न्यायालयावर नेत आहे. आरोपींनी केलेला प्रकार किळसवाणा असून असा आरोपीचा खटला कोण्ही वकील लढू नये यासाठी हा मोर्चा आरोजित करण्यात आला आहे.. या मोर्च्यात मोठ्या संख्येने महिला मुली सहभागी झाल्या होत्या.1