निवृत्त शिक्षकाची ५५.५१ लाखांची फसवणूक; जिल्ह्यात उडाली खळबळ! बनावट ओळखपत्रे, खोटे दस्तऐवज आणि तोतया महिला उभी करून एका निवृत्त शिक्षकाची सुमारे ५५ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तक्रारदाराने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार देऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखला करण्याची मागणी केली आहे. एकांबा (ता. जि. वाशीम) येथील रहिवासी आणि निवृत्त शिक्षक लक्ष्मण प्रल्हाद वानखेडे (वय ५९ वर्षे) हे १२ एप्रिल २०२५ रोजी शिक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम आणि अनसिंग येथील प्लॉट विक्रीतून आलेले पैसे अशा एकूण ५५.५१ लाख रुपयांमधून त्यांनी वाशीम शहरातील हिंगोली नाका परिसरातील नगर पालिका हद्दीतील प्लॉट क्र. २२ (न.शि.क्र. ११९ सी.स.न. ५११२/२२, क्षेत्रफळ १५० चौ.मी.) खरेदी करण्याचे ठरवले होते. तक्रारदाराने दिलेल्या निवेदनानुसार, यापूर्वी ३ ऑक्टोबर २०२५, ३ फेब्रुवारी २०२६ आणि ३ ऑगस्ट २०२६ रोजी वाशीम शहर पोलीस ठाण्यात तक्रारी देऊनही ठोस कारवाई झाली नाही. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी बाळकृष्ण गायकवाड याने पैसे परत देण्याचा समझोता लिहून दिला होता, मात्र तरीही रक्कम परत मिळाली नाही. आरोपींना शहर पोलीस यांच्याकडून अभय मिळत असल्याचा आरोप वानखेडे यांनी केला आहे. याप्रकरणी दोन दिवसांत स्वतंत्र FIR नोंदवून आरोपींना अटक न केल्यास आणि प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे न सोपवल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण आणि आत्मदहन करण्याचा इशारा लक्ष्मण वानखेडे यांनी दिला आहे.

- मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे , धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे1
- सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते1
- साखरेच्या दरवाढीवर सरकारचा मोठा निर्णय! १० लाख टन साखर आयात; साठेबाजीवर कडक निर्बंध, ४ हजार क्विंटलची मर्यादा1
- कळमनुरी येथे भुमिअभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून वाद,शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून शिरस्तेदार व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि.26 आगष्ट रोजी प्राप्त झाली आहे. सदर घटना ही घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात घडली असून याप्रकरणी कार्यालयातील शिरस्तेदार शेख रफीक शेख अब्दुला यांनी 25 ऑगस्ट रोजी तोंडी फिर्याद दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादीच्या नातेवाईकांच्या आखाडा बाळापूर येथील सर्वे क्रमांक 82/3 मधील शेतीच्या मोजणीच्या कारणावरून आरोपी केशव शंकरराव बोंढारे, विशाल अशोक बोंढारे, मंगेश केशव बोंढारे आणि दिगंबर शंकरराव बोंढारे (सर्व रा. आखाडा बाळापूर) यांनी संगनमत करून कार्यालयात येत फिर्यादी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.यावरून कळमनुरी परिसरात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास आडे हे अधिक तपास करीत आहेत .1
- *ई-चलान मेसेजमुळे १० बनावट ऑटो रिक्षांचे रॅकेट उघड* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम : हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला. आपली रिक्षा वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले, याची माहिती घेण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट नंबरप्लेटच्या ऑटो रिक्षांचे रॅकेट उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व पथकाने शुक्रवार पेठ येथील दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. तपासणीदरम्यान या रिक्षांच्या नंबरप्लेट, चेसिस नंबर तसेच खरेदीची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रत्येक ऑटो दररोज २५० रुपये भाड्याने देत असल्याचेही समोर आले. या कारवाईत ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला वाशिम शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.2
- परभणी जिल्हा परिषद कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेचे आंदोलन परभणी जिल्हा परिषद कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेचे आंदोलन1
- 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू, 📍 वसमत, जि. हिंगोली शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली— 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” असा स्पष्ट इशारा! ✊ जमीन आमची — निर्णय आमचा! 🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द! #शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट1
- *अनोखी चोरी डीपी फोडून आतील साहित्य चोरट्यांनी केले लंपास* वाशिम मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुर्जना मोरे-मजलापूर परिसरात २४ ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपी फोडून त्यामधील मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची अनोखी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विद्युत विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपीला लक्ष्य केले. चोरट्यांनी डीपीची तोडफोड करून त्यातील साहित्य बाहेर काढले आणि ते चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास डीपी फुटलेल्या अवस्थेत आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संबंधित विद्युत विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. डीपीमधील साहित्य चोरीला गेल्याने परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्युत यंत्रणेची तोडफोड करून चोरी करण्यात आल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. चोरट्यांनी नेमके कोणते साहित्य आणि किती प्रमाणात चोरून नेले, तसेच या घटनेत किती रुपयांचे नुकसान झाले, हे संबंधित विभागाकडून पंचनामा व तपासणी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. ग्रामीण भागात विद्युत डीपी, तारा व इतर विद्युत साहित्य चोरीच्या घटना अधूनमधून घडत असल्याने विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी विद्युत विभागाने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.2