अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सीपीआय आणि सीपीएमकडून आदरांजली रॅली अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सीपीआय आणि सीपीएमकडून आदरांजली रॅली नागपूर, (१ ऑगस्ट): भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (सीपीएम) यांनी लोकशाहीवादी आणि साहित्यिक व्यक्तिमत्व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी आदरांजली रॅलीचे आयोजन केले. ही रॅली कॉटन मार्केटमधील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून सुरू झाली आणि सीताबर्डी मार्केटमार्गे व्हरायटी चौकापर्यंत गेली. कॉम्रेड अरुण लाटकर आणि कॉम्रेड डॉ. युगल रेलू यांनी व्हरायटी चौकात जमलेल्यांना संबोधित केले. आपल्या भाषणात, कॉम्रेड अरुण लाटकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनावर, सामाजिक योगदानावर आणि साहित्यिक वारशावर प्रकाश टाकला आणि त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणास्रोत असल्याचे सांगितले. कॉम्रेड डॉ. युगल रेलू यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या गुणांवर सविस्तर चर्चा केली आणि ते केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा अभिमान असल्याचे सांगितले. त्यांनी माहिती दिली की, रशियाची राजधानी मॉस्को येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. बैठकीनंतर पक्षाचे अधिकारी आणि कार्यकर्ते दीक्षाभूमी येथील अण्णाभाऊ साठे स्मारकावर पोहोचले, जिथे त्यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. याप्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांचे अधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सीपीआय आणि सीपीएमकडून आदरांजली रॅली अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सीपीआय आणि सीपीएमकडून आदरांजली रॅली नागपूर, (१ ऑगस्ट): भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (सीपीएम) यांनी लोकशाहीवादी आणि साहित्यिक व्यक्तिमत्व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी आदरांजली रॅलीचे आयोजन केले. ही रॅली कॉटन मार्केटमधील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून सुरू झाली आणि सीताबर्डी मार्केटमार्गे व्हरायटी चौकापर्यंत गेली. कॉम्रेड अरुण लाटकर आणि कॉम्रेड डॉ. युगल रेलू यांनी व्हरायटी चौकात जमलेल्यांना संबोधित केले. आपल्या भाषणात, कॉम्रेड अरुण लाटकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनावर, सामाजिक योगदानावर आणि साहित्यिक वारशावर प्रकाश टाकला आणि त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणास्रोत असल्याचे सांगितले. कॉम्रेड डॉ. युगल रेलू यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या गुणांवर सविस्तर चर्चा केली आणि ते केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा अभिमान असल्याचे सांगितले. त्यांनी माहिती दिली की, रशियाची राजधानी मॉस्को येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. बैठकीनंतर पक्षाचे अधिकारी आणि कार्यकर्ते दीक्षाभूमी येथील अण्णाभाऊ साठे स्मारकावर पोहोचले, जिथे त्यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. याप्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांचे अधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
- *रस्त्यावर मोकाट गायी मुळे अपघाताचा धोका...* *सावनेर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव रस्त्यावर उतरून स्वतः पुढाकार घेत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर* सावनेर:-वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मोकाट गायींमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी नगरपरिषद सावनेरच्या संबंधित पथकाला तात्काळ पाचारण केले. नगरपरिषद सावनेरच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मोकाट गायी पकडून त्यांचा ताबा घेतला. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आणि संभाव्य अपघाताचा धोका टळला. यानंतर पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी नगरपरिषद सावनेर येथे जाऊन मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष यांची भेट घेतली. शहरातील मोकाट जनावरांची समस्या, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना, शहरातील पार्किंग व्यवस्था आणि वाढते अतिक्रमण याबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांची सुरक्षितता, वाहतुकीची शिस्त आणि शहर सुस्थितीत राहण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. रस्त्यावर मोकाट जनावरे ही केवळ वाहतुकीची समस्या नसून अनेक गंभीर अपघातांचे कारण ठरू शकतात. त्यामुळे अशा समस्यांवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना होणे ही काळाची गरज आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्परतेने कार्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव, सावनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी तसेच नगरपरिषद सावनेरच्या पथकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक कौतुक.पोलीस प्रशासनाकडून सातत्याने पुढाकार घेतला जात असला, तरी नगरपरिषदेकडून अपेक्षित प्रमाणात आणि सातत्यपूर्ण कार्यवाही होताना दिसत नाही. मोकाट जनावरे, अतिक्रमण आणि पार्किंगसारख्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने अधिक प्रभावी आणि नियमित कारवाई करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. :हितेश बनसोड सामाजिक कार्यकर्ते सावनेर1
- विषय : घराची भिंत कोसळल्यामुळे तातडीची मदत, पंचनामा व सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करण्याबाबत मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय, काटोल, जि. नागपूर. विषय : घराची भिंत कोसळल्यामुळे तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत व घरकुल योजनेचा लाभ मिळण्याबाबत विनंती. महोदय, मी, ज्ञानेश्वर धनराज जाधव, रा. पुसागोंडी, ता. काटोल, जि. नागपूर, आपणास नम्र विनंती करतो की, आमचे घर लाकूड, माती व कौलांनी बांधलेले असून अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. अलीकडे आमच्या घराची एक भिंत पूर्णपणे कोसळली असून उर्वरित घरही कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे पावसाळ्यात आमच्या कुटुंबाच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी मी घराच्या नुकसानीची छायाचित्रे सरपंच यांच्या मार्फत संबंधित तलाठी यांच्याकडे पाठविली होती. मात्र आजपर्यंत तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिलेली नाही, पंचनामा केलेला नाही आणि कोणतीही कार्यवाही झालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. तरीदेखील आजपर्यंत आम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून सुरक्षित निवाऱ्याची कोणतीही व्यवस्था नाही. म्हणून आपणास नम्र विनंती आहे की : आमच्या घराचा तात्काळ पंचनामा करण्यात यावा. शासनाच्या नियमानुसार तातडीची आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी. घरकुल योजनेसाठी आमच्या अर्जाची त्वरित पडताळणी करून पात्रतेनुसार लाभ मंजूर करण्यात यावा. आमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. आपण आमच्या अत्यंत गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, ही नम्र विनंती. आपला विश्वासू, ज्ञानेश्वर धनराज जाधव रा. पुसागोंडी, ता. काटोल, जि. नागपूर मोबा. 88053774532
- वर्धा जिल्हा पोलीस दलात वाहन हस्तांतरण सोहळा वृक्षारोपण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन वर्धा जिल्हा पोलीस दलात वाहन हस्तांतरण सोहळा वृक्षारोपण सोहळा कार्यक्रम माननीय पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक येथे नाही म्हणता बारा तेरा महिंद्रा स्कार्पियो एन हाय स्पीड गाड्या चे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाला सुधीर पांगुळ नगराध्यक्ष वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व अन्य मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते डॉक्टर पंकज भाऊ यांनी म्हटले की जलद गतीने तपास व्हावा म्हणून या गाड्या पोलीस दलात देण्यात आलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे मध्ये विविध प्रकारचे गुन्हेगारी वाढत असल्याकारणाने त्या तपासासाठी जलद गतीने तपास व्हावा यासाठी या गाड्या वर्धा येथे पोलीस दलात देण्यात आल्या डॉक्टर पंकज भोयर बोलताना हे पण सुखदा सांगितले की रस्त्यावरील गुरढोरांचे खूप प्रकार वाढलेला आहे याच्या मध्ये स्थानिक स्वराज्य आणि वाहतूक शाखेने लक्ष घालून लवकरात लवकर याच्यावर लक्ष द्यावे हे जिल्ह्याच पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितले1
- वर्ध्याच्या भुगाव येथील कंपनीतून लोखंड चोरी; सावंगी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत उलगडला गुन्हा वर्धा : भुगाव येथील पर्ल इंजिनिअरिंग कंपनीतून कच्चे लोखंड व सळईचे तुकडे चोरी करणाऱ्या चौघांना सावंगी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद करत गुन्ह्याचा पर्दाफाश केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित ऑटोची तपासणी केली असता चोरीचा माल आढळून आला. चौकशीत तीन महिलांसह ऑटोचालकाने चोरीची कबुली दिली. आरोपींकडून चोरीस गेलेले लोखंड, सळईचे तुकडे आणि गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण १.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.1
- रोलर नाही… थेट बसच वापरली! आर्वी आगारातील धक्कादायक प्रकार; प्रश्न विचारताच व्यवस्थापकांची उद्धट भाषा?”1
- सावरला गावाचे हातापम्प ना दुरुस्त झाले आहे 1 महिना झाला आहे तरीही ही ग्रामपंचायत काय करत आहे1
- ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ1
- देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी आज देवळी-पुलगाव मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त भीडी परिसराची प्रत्यक्ष पाहणी राजेश बकाने आमदार यांनी करून शेतकरी बांधव व नागरिकांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, घरांचे व इतर मालमत्तेचे झालेले नुकसान पाहून मन अत्यंत व्यथित झाले. या नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी मी बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मतदारसंघातील सर्व प्रभावित गावांचा दौरा करून प्रत्येक नुकसानग्रस्ताला शासनाची मदत तातडीने मिळावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे. तसेच संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे पूर्ण करून कोणत्याही पात्र शेतकरी किंवा नागरिकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेत त्वरित मदत प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.1
- डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवणार; विदर्भ राज्य आंदोलन समितीची मिशन 2027 घोषणा वर्धा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा वेग देत विदर्भ राज्य आंदोलन समितीने 'मिशन 2027'ची घोषणा केली आहे. डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवण्याचा निर्धार समितीने वर्ध्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. या अभियानांतर्गत विदर्भातील 11 जिल्हे आणि 120 तालुक्यांमध्ये जनजागृती मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच 9 ऑगस्ट 2026 रोजी नागपुरातील दीक्षाभूमी ते संविधान चौक असा भव्य लॉंगमार्च काढण्यात येणार असून त्यानंतर जनसंकल्प जाहीरसभा होणार आहे. समितीच्या मते, विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्य आवश्यक असून सिंचन, रोजगार, उद्योग, आरोग्य आणि पायाभूत सुविधांतील अनुशेष दूर करण्यासाठी केंद्र सरकारने विदर्भ राज्य निर्मितीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.1