logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

"सुख-दुःखात कायम सोबत उभा राहणाऱ्या प्रत्येक मित्राला आजचा हा दिवस समर्पित!" मैत्री म्हणजे विश्वास, साथ आणि आयुष्यभर जपण्यासारखं सुंदर नातं! ❤️🤝 महाराष्ट्र न्यूज 24 कडून सर्व मित्रांना मित्रता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 #मित्रतादिवस #FriendshipDay #MaharashtraNews24 #Varud #Marathi

14 hrs ago
user_Suraj Patil
Suraj Patil
Advertising agency वरुड, अमरावती, महाराष्ट्र•
14 hrs ago

"सुख-दुःखात कायम सोबत उभा राहणाऱ्या प्रत्येक मित्राला आजचा हा दिवस समर्पित!" मैत्री म्हणजे विश्वास, साथ आणि आयुष्यभर जपण्यासारखं सुंदर नातं! ❤️🤝 महाराष्ट्र न्यूज 24 कडून सर्व मित्रांना मित्रता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 #मित्रतादिवस #FriendshipDay #MaharashtraNews24 #Varud #Marathi

More news from Amravati and nearby areas
  • धामणगांव रेल्वेत साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी धामणगांव रेल्वेत साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त धामणगांव रेल्वे शहर व तालुक्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच शहरासह तालुक्यातील विविध भागांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा व पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. संपूर्ण शहर पिवळ्या ध्वजांनी सजले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही सायंकाळी दत्तापूर येथून भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत मातंग समाजातील युवक, युवती, महिला, पुरुष तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डीजे, बँजो, आकर्षक देखावे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीने शहरातील प्रमुख मार्गांवरून जल्लोषमय वातावरण निर्माण केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जयघोष, पिवळ्या ध्वजांची दिमाखदार शोभा आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण धामणगांव रेल्वे शहर दुमदुमून गेले. युवक, युवती, महिला आणि पुरुषांनी नाचत-गाजत मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जयंती सोहळ्याला अभूतपूर्व उत्साह दिला. ही भव्य मिरवणूक शहरातील मुख्य मार्गांवरून मार्गक्रमण करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे पोहोचली. तेथे महाआरती व अभिवादनानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दत्तापूर पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. शांतता व शिस्तबद्ध वातावरणात संपूर्ण जयंती महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    1
    धामणगांव रेल्वेत साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी

धामणगांव रेल्वेत साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी
साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त धामणगांव रेल्वे शहर व तालुक्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली.
सकाळपासूनच शहरासह तालुक्यातील विविध भागांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा व पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. संपूर्ण शहर पिवळ्या ध्वजांनी सजले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सायंकाळी दत्तापूर येथून भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत मातंग समाजातील युवक, युवती, महिला, पुरुष तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डीजे, बँजो, आकर्षक देखावे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीने शहरातील प्रमुख मार्गांवरून जल्लोषमय वातावरण निर्माण केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जयघोष, पिवळ्या ध्वजांची दिमाखदार शोभा आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण धामणगांव रेल्वे शहर दुमदुमून गेले. युवक, युवती, महिला आणि पुरुषांनी नाचत-गाजत मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जयंती सोहळ्याला अभूतपूर्व उत्साह दिला.
ही भव्य मिरवणूक शहरातील मुख्य मार्गांवरून मार्गक्रमण करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे पोहोचली. तेथे महाआरती व अभिवादनानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दत्तापूर पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. शांतता व शिस्तबद्ध वातावरणात संपूर्ण जयंती महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला.
सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    5 hrs ago
  • 'एक तास वाचनाचा' उपक्रमात जि. प. भोजापूरचे विद्यार्थी दंग 'एक तास वाचनाचा' उपक्रमात भोजापूरचे विद्यार्थी दंग पवनी: जि.प. उच्च प्राथमिक शाळा, भोजापूर, ता. पवनी, जिल्हा भंडारा येथे एक तास वाचनाचा उपक्रमात विद्यार्थी दंग
    1
    'एक तास वाचनाचा' उपक्रमात जि. प. भोजापूरचे विद्यार्थी दंग
'एक तास वाचनाचा' उपक्रमात भोजापूरचे विद्यार्थी दंग
पवनी: जि.प. उच्च प्राथमिक शाळा, भोजापूर, ता. पवनी, जिल्हा भंडारा येथे एक तास वाचनाचा उपक्रमात विद्यार्थी दंग
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • वर्धा जिल्ह्यातील काचनगाव मध्ये चिमुकल्यां विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संदेश काचंनगावमध्ये चिमुरड्यांचा पर्यावरण संदेश; जि प उच्च प्राथमिक शाळेची 'वृक्षदिंडी' उत्साहात संपन्न! काचनगाव: येथील जि प उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने आज गावामध्ये पर्यावरण जनजागृतीसाठी भव्य 'वृक्षदिंडी' काढण्यात आली. "झाडे लावा, झाडे जगवा" अशा घोषणांनी आज संपूर्ण काचनगाव परिसर दुमदुमून गेला होता. लहान वयापासूनच मुलांवर पर्यावरणाचे संस्कार व्हावेत, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वनपाल माधव बोचरे साहेब यांच्या हस्ते वृक्षपूजन : कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अल्लीपूर क्षेत्राचे वनपाल माधव बोचरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वृक्षपूजन करून दिंडीची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी बोलताना माधव बोचरे यांनी, "केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे," असे सांगत विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिश अं कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी विध्यार्थ्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त कमीतकमी एक झाड लावावे असा संदेश दिला. बँडचा गजर, वृक्षपालकी, हातात वृक्ष घेतलेले विध्यार्थी,विद्यार्थिनी यांनी संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण केला होता. विद्यार्थ्यांनी हातामध्ये 'झाडे निसर्गाचा दागिना', 'पाणी अडवा, पाणी जिरवा' असे पर्यावरण संदेश देणारे फलक धरले होते. दिंडीच्या मार्गावर गावकऱ्यांनी ठिकठिकाणी चिमुरड्यांचे स्वागत केले. शिक्षक व ग्रामस्थांचा सहभाग : हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कुरटकर सर, मांढरे सर, धुर्वे सर, मोघे सर आणि काकडे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. या वृक्षदिंडीमध्ये शाळेतील सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य, माता पालक संघ आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.
    2
    वर्धा जिल्ह्यातील काचनगाव मध्ये चिमुकल्यां विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संदेश
काचंनगावमध्ये चिमुरड्यांचा पर्यावरण संदेश; 
जि प उच्च प्राथमिक शाळेची 'वृक्षदिंडी' उत्साहात संपन्न!
काचनगाव: येथील जि प उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने आज गावामध्ये पर्यावरण जनजागृतीसाठी भव्य 'वृक्षदिंडी' काढण्यात आली. "झाडे लावा, झाडे जगवा" अशा घोषणांनी आज संपूर्ण काचनगाव परिसर दुमदुमून गेला होता. लहान वयापासूनच मुलांवर पर्यावरणाचे संस्कार व्हावेत, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वनपाल माधव बोचरे साहेब यांच्या हस्ते वृक्षपूजन : 
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अल्लीपूर क्षेत्राचे वनपाल माधव बोचरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वृक्षपूजन करून दिंडीची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी बोलताना माधव बोचरे यांनी, "केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे," असे सांगत विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिश अं कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी विध्यार्थ्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त कमीतकमी एक झाड लावावे असा संदेश दिला.
बँडचा गजर, वृक्षपालकी, हातात वृक्ष घेतलेले विध्यार्थी,विद्यार्थिनी यांनी संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण केला होता. विद्यार्थ्यांनी हातामध्ये 'झाडे निसर्गाचा दागिना', 'पाणी अडवा, पाणी जिरवा' असे पर्यावरण संदेश देणारे फलक धरले होते. दिंडीच्या मार्गावर गावकऱ्यांनी ठिकठिकाणी  चिमुरड्यांचे स्वागत केले.
शिक्षक व ग्रामस्थांचा सहभाग : हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कुरटकर सर, मांढरे सर, धुर्वे सर, मोघे सर आणि काकडे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. या वृक्षदिंडीमध्ये शाळेतील सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे  पदाधिकारी, सदस्य, माता पालक संघ आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • महावितरण च्या हलगर्जीपणामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू;खा.बळवंत वानखडे यांच्या मध्यस्थीनंतरच मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांची सहमती
    1
    महावितरण च्या हलगर्जीपणामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू;खा.बळवंत वानखडे यांच्या मध्यस्थीनंतरच मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांची सहमती
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Double Podium for Bharat! Sonam Wins Gold & Shubham Takes Silver in Shot Put F57 Double Podium for Bharat! Sonam Wins Gold & Shubham Takes Silver in Shot Put F57
    1
    Double Podium for Bharat!
Sonam Wins Gold & Shubham Takes Silver in Shot Put F57
Double Podium for Bharat!
Sonam Wins Gold & Shubham Takes Silver in Shot Put F57
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहाचे औचित्य - जगदविख्यात साहित्य भूषण शिवशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहाचे औचित्य - जगदविख्यात साहित्य भूषण शिवशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , सामाजिक न्याय विभाग ( श,प) व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ.प ) यांचे आर्वीत भव्य भोजनदानाचे आयोजन आर्वी:-दिनांक एक जून 2026 रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णा भाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत नेते माजी उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजित दादा पवार यांचे जयंतीच्या अनुषंगाने आर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे राज्य संघटक सचिव राजपाल भगत व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार विचाराचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात भव्य भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते आर्वी शहरांमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ढोल ताशे सांस्कृतीक देखावे, लोकांचा जनसागर विविध प्रभागातून भव्य मिरवणूका निघाल्या होत्या यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित देखावे सादर केले होते हजारो लोकांचा जनसागर जयंतीच्या निमित्ताने रस्त्यावर आला होता यावेळी दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून संयुक्तपणे आयोजित भोजनदान कार्यक्रमाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांनी व नागरिकांनी अत्यंत आनंदाने आस्वाद घेतला या कार्यक्रमा च्यायशस्वितेसाठी सौ भारती पोटफोडे महिला व बालकल्याण सभापती आर्वी नगरपरिषद, सौ रेखा वानखडे जिल्हाध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार सेल, सोनू चिंधेकर, सोनिका गोधने, शिल्पा इखार, सोनाली जैन, महेश देवशोध, दिनेश रुद्रकार, सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील, वासुदेवराव सपकाळ, नितीन मिश्रा, सिद्धांत कळंबे, रवींद्र वानखडे, रशीद शेख, राहुल विरेकर, निखिल वानखडे, समीर शेख, गोलू रायकवार, यांनी परिश्रम घेतले यावेळी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
    1
    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहाचे औचित्य - जगदविख्यात साहित्य भूषण शिवशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहाचे औचित्य - जगदविख्यात साहित्य भूषण शिवशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , सामाजिक न्याय विभाग ( श,प) व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ.प ) यांचे आर्वीत भव्य भोजनदानाचे आयोजन
आर्वी:-दिनांक एक जून 2026 रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णा भाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत नेते माजी उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजित दादा पवार यांचे जयंतीच्या अनुषंगाने आर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे राज्य संघटक सचिव राजपाल भगत व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार विचाराचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात भव्य भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते आर्वी शहरांमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ढोल ताशे सांस्कृतीक  देखावे, लोकांचा जनसागर विविध प्रभागातून भव्य मिरवणूका निघाल्या होत्या यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित देखावे सादर केले होते हजारो लोकांचा जनसागर जयंतीच्या निमित्ताने रस्त्यावर आला होता यावेळी दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून संयुक्तपणे आयोजित  भोजनदान कार्यक्रमाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांनी व नागरिकांनी अत्यंत आनंदाने आस्वाद घेतला या कार्यक्रमा च्यायशस्वितेसाठी सौ भारती पोटफोडे महिला व बालकल्याण सभापती आर्वी  नगरपरिषद, सौ रेखा  वानखडे जिल्हाध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार सेल, सोनू  चिंधेकर, सोनिका गोधने, शिल्पा इखार, सोनाली जैन, महेश देवशोध, दिनेश रुद्रकार, सामाजिक कार्यकर्ते  संजय पाटील, वासुदेवराव सपकाळ, नितीन मिश्रा, सिद्धांत कळंबे, रवींद्र वानखडे, रशीद शेख, राहुल विरेकर, निखिल वानखडे, समीर शेख, गोलू रायकवार, यांनी परिश्रम घेतले यावेळी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
    user_राजेंद्र वामनराव खंडारे
    राजेंद्र वामनराव खंडारे
    आष्टी, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • "सुख-दुःखात कायम सोबत उभा राहणाऱ्या प्रत्येक मित्राला आजचा हा दिवस समर्पित!" मैत्री म्हणजे विश्वास, साथ आणि आयुष्यभर जपण्यासारखं सुंदर नातं! ❤️🤝 महाराष्ट्र न्यूज 24 कडून सर्व मित्रांना मित्रता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 #मित्रतादिवस #FriendshipDay #MaharashtraNews24 #Varud #Marathi
    1
    "सुख-दुःखात कायम सोबत उभा राहणाऱ्या प्रत्येक मित्राला आजचा हा दिवस समर्पित!"
मैत्री म्हणजे विश्वास, साथ आणि आयुष्यभर जपण्यासारखं सुंदर नातं! ❤️🤝
महाराष्ट्र न्यूज 24 कडून सर्व मित्रांना मित्रता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
#मित्रतादिवस #FriendshipDay #MaharashtraNews24 #Varud #Marathi
    user_Suraj Patil
    Suraj Patil
    Advertising agency वरुड, अमरावती, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.