logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महामहीम राज्यपालांच्या अभिभाषणाला विरोध विशेष प्रतिधीधी मुंबई मुंबई: (दि २६) महामहीम राज्यपालांनी विधिमंडळात सादर केलेले अभिभाषण संपूर्ण महाराष्ट्राला निराश करणारे आहे. राज्यातील आजची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकटासह सरकारच्या अवकृपेचे सुलतानी संकट आहे, राज्यातील महिला असुरक्षित आहेत, राज्यातील बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. आजच्या या समस्या सोडवण्यासाठी सरकार काय करणार याचा उल्लेख न करता राज्यपालांच्या अभिभाषणात २०४७ सालचे व्हिजन रंगवण्यात आले आहे. - अभिभाषणात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या नावाचा उल्लेख केवळ राजकीय आहे. प्रत्यक्षात राजभवनात बसून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणाऱ्या माणसाला "पद्मश्री" पुरस्काराचे बक्षीस देण्यात आले. - महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक व्यक्तीस जगण्याचा समान अधिकार दिला. पण सरकारमध्ये असणारे मंत्री उघडपणे दोन समाजात तेढ निर्माण करण्याची भाषा करतात. महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवून स्वतःची राजकीय पोळी भाजतात. - २०२४ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करणार असं मागे सांगण्यात आलं होतं. ते लक्ष्य पूर्ण का झालं नाही याचं उत्तर न देता आता २०४७ साली ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं गाजर दाखवण्यात आलं. - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी शेणगोटे झेलले, याच महाराष्ट्रात आता २२०० शाळा शिक्षक नाहीत म्हणून बंद पडत आहेत. - कुंभमेळ्यासाठी १४००० कोटींची उधळपट्टी करणाऱ्या सरकारकडे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पैसा नाही हे फार मोठे दुर्दैव आहे. - सरकारकडे रुग्णवाहिका दुरुस्त करण्यासाठी पैसे नसताना ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या गप्पा ही जनतेची फसवणूक आहे. - राज्यात कमिशनखोरी प्रचंड वाढली असून, औषध बनवणाऱ्या कंपन्यांना दप्तर बनवण्याचे कंत्राट देऊन मर्जीतल्या लोकांचे खिसे भरले जात आहेत. - महाराष्ट्राची हवा, पाणी व जमीन आपल्या मर्जीतील उद्योगपतींना विकण्याचे पाप हे सरकार करत आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाशेजारील जमीन व नागपूर वनविभागाची वन्यप्राणी अधिवासाची जमीन उद्योगपतींच्या घशात घातली जात आहे. - सरकारच्या नाकर्तेपणामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांवर किडन्या विकण्याची वेळ आली आहे. तरीही राज्यपालांच्या अभिभाषणात शेतकरी कर्जमुक्तीचा साधा उल्लेखही नाही यावरून सरकारची शेतकरी विरोधी मानसिकता लक्षात येते. - दावोस मध्ये जाऊन केलेले करार म्हणजे महाराष्ट्राची शुद्ध फसवणूक आहे. महाराष्ट्रातल्या कंपन्यांशी करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय ? - दरवर्षी दावोसमध्ये झालेल्या करारांचे, गुंतवणुकीचे व रोजगाराचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत. मात्र, यातून आतापर्यंत किती नागरिकांना रोजगार मिळाला याची श्वेतपत्रिका सरकारने जाहीर करावी.

10 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सध्या गरज आहे राज्याला विचार करण्याची
    1
    सध्या गरज आहे राज्याला विचार करण्याची
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    28 min ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Irshad Alam
    1
    Post by Irshad Alam
    user_Irshad Alam
    Irshad Alam
    Nagpur (Urban), Maharashtra•
    21 hrs ago
  • आंभोरा पुलावर तीन दिवसांत दुसरी आत्महत्या; नागरिकांमध्ये तीव्र चिंता कुही जि.नागपुर(शरद शहारे) कुही तालुक्यातील आंभोरा येथील पुलावरून उडी घेऊन तीन दिवसांत दुसऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सलग घटनांमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन मुरलीधर ढोबळे (वय ३३, रा. नरसाळा, नागपूर) यांनी घरगुती तणावातून आंभोरा येथील पुलावरून उडी घेत जीवन संपविले. चेतन यांना वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर रेल्वे विभागात नोकरी मिळाली होती. मात्र सुमारे तीन वर्षांपूर्वी पत्नीशी झालेल्या घटस्फोटानंतर ते मानसिक तणावात होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य राबवून मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, याच पुलावरून २३ फेब्रुवारी रोजी प्रज्वल सोम ढेंगे (वय २५, रा. परसोडी) या तरुणानेही उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी शोधमोहीम राबवूनही अद्याप त्याचा मृतदेह सापडलेला नाही. सलग दोन घटनांमुळे आंभोरा पुलिया हा आत्महत्येचा ‘स्पॉट’ बनत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुलावर संरक्षक जाळी बसविणे, सतत पोलीस गस्त वाढविणे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून अशा घटनांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    1
    आंभोरा पुलावर तीन दिवसांत दुसरी आत्महत्या; नागरिकांमध्ये तीव्र चिंता
कुही जि.नागपुर(शरद शहारे)
कुही तालुक्यातील आंभोरा येथील पुलावरून उडी घेऊन तीन दिवसांत दुसऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सलग घटनांमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन मुरलीधर ढोबळे (वय ३३, रा. नरसाळा, नागपूर) यांनी घरगुती तणावातून आंभोरा येथील पुलावरून उडी घेत जीवन संपविले. चेतन यांना वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर रेल्वे विभागात नोकरी मिळाली होती. मात्र सुमारे तीन वर्षांपूर्वी पत्नीशी झालेल्या घटस्फोटानंतर ते मानसिक तणावात होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य राबवून मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, याच पुलावरून २३ फेब्रुवारी रोजी प्रज्वल सोम ढेंगे (वय २५, रा. परसोडी) या तरुणानेही उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी शोधमोहीम राबवूनही अद्याप त्याचा मृतदेह सापडलेला नाही.
सलग दोन घटनांमुळे आंभोरा पुलिया हा आत्महत्येचा ‘स्पॉट’ बनत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुलावर संरक्षक जाळी बसविणे, सतत पोलीस गस्त वाढविणे  अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून अशा घटनांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • ० नागपूर , चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील नागरीक याठिकाणी रविवारी पर्यटनाला येतात ० ० येथे स्वयंपाक करून वन्य भोजना चा अस्वाद घेतात ० ० वनविभागाकडून रविवारला पर्यटका साठी जाण्याची सुविधा मिळते. ० राजु जांभुळे (उमरेड ) भिवापूर पासून १० किमी अंतरावर असलेल्या भंडारा जिल्हयातील पवनी तालुक्यात येणाऱ्या रानाळा हे निसर्गरम्य पर्यटन सहलीचे केंद्र व रानाई माता परिसरतील भाविकांचे श्रध्देचे स्थान आहे. परंतु हे ठिकाण उमरेड - कऱ्हांडला अभयरण्यात येत असल्याने येथे ये -जा करण्यास वनविभागाची मनाई आहे. परंतु शारदीय व चैत्र नवरात्रोत्सवात भाविकांची दर्शना एकच गर्दी पहावयास मिळते. तसेच पर्यटक रविवारला पिकनिक म्हणून हमखास याठिकाणी भेटी देतात. तसेच वन्यभोजन करण्यासाठी हे ठिकाण ओळखले जातात. रनाला म्हणून सर्वदूर परिचित असलेला या परिसराची नोंद राजस्व व वनविभागाच्या दप्तरी जोगीखेडा (हमेशी ) या रिठी गावाच्या नावाने आहे. सदर स्थळ वनविभागाच्या अतर्गत येत असल्याने येथे वन्य प्राण्याचा वावर असल्याने हे पर्यटन स्थळ उपेक्षित होते. परंतु रानाई मातेची जागृत स्थळ बघता काही भाविकांनी एकत्र 2018 ला रानाई माता बहुउद्देशीय सेवा समिती जोगीखेडा ( आमगाव ) ता. पवनी या नावाने ट्रस्ट ची नोंदणी केली असून या माध्यमातून देवस्थानाचा कारभार चालतो. पुर्वी रानाई मातेचे झाडाखाली मुर्ती होती. आता देवस्थान कमेटीच्या वतीने भव्य मंदिराचे स्वरूप देण्यात आले आहे. लगतच अनेक देव देवताच्या दगडी मुर्ती आहेत. परिसरात काही हेक्टर सरकारी तर काही मालगुजारी जंगल आहे. लगतच डॉ. भिवापूरकर यांची वनराई असून आंब्यांचे झाड, चिकू, पेरू, खिरणी चे झाडे होती. रानाळा हे एकेकाळी घनदाट अरण्य होते.
    1
    ० नागपूर , चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील नागरीक याठिकाणी रविवारी पर्यटनाला येतात ०
० येथे स्वयंपाक करून वन्य    भोजना चा अस्वाद घेतात ०
० वनविभागाकडून रविवारला पर्यटका साठी जाण्याची सुविधा मिळते. ०
राजु जांभुळे (उमरेड )
भिवापूर पासून १० किमी अंतरावर असलेल्या भंडारा जिल्हयातील पवनी तालुक्यात येणाऱ्या रानाळा हे निसर्गरम्य पर्यटन सहलीचे
केंद्र व रानाई माता परिसरतील भाविकांचे श्रध्देचे स्थान आहे. परंतु हे ठिकाण उमरेड - कऱ्हांडला अभयरण्यात येत असल्याने येथे ये -जा करण्यास वनविभागाची मनाई आहे. परंतु शारदीय व चैत्र नवरात्रोत्सवात भाविकांची दर्शना एकच गर्दी पहावयास मिळते. तसेच पर्यटक रविवारला पिकनिक म्हणून हमखास याठिकाणी भेटी देतात. तसेच वन्यभोजन करण्यासाठी हे ठिकाण ओळखले जातात.
रनाला म्हणून सर्वदूर परिचित असलेला या परिसराची नोंद राजस्व व वनविभागाच्या दप्तरी जोगीखेडा (हमेशी ) या रिठी गावाच्या नावाने आहे. सदर स्थळ वनविभागाच्या अतर्गत येत असल्याने येथे वन्य प्राण्याचा वावर असल्याने हे पर्यटन स्थळ उपेक्षित होते. परंतु रानाई मातेची जागृत स्थळ बघता काही भाविकांनी एकत्र 2018 ला रानाई माता बहुउद्देशीय सेवा समिती जोगीखेडा ( आमगाव ) ता. पवनी या नावाने ट्रस्ट ची नोंदणी केली असून या माध्यमातून देवस्थानाचा कारभार चालतो.
पुर्वी रानाई मातेचे झाडाखाली मुर्ती होती. आता देवस्थान कमेटीच्या वतीने भव्य मंदिराचे स्वरूप देण्यात आले आहे. लगतच अनेक देव देवताच्या दगडी मुर्ती आहेत. परिसरात काही हेक्टर सरकारी तर काही मालगुजारी जंगल आहे. लगतच डॉ. भिवापूरकर यांची वनराई असून आंब्यांचे झाड, चिकू, पेरू, खिरणी चे झाडे होती. रानाळा हे एकेकाळी घनदाट अरण्य होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • पुणे के कांग्रेस प्रवक्ता । श्री हनुमंत पवार पर हुऐ हमले के निषेध वर्धा कांग्रेस पार्टी है मैदान में
    1
    पुणे के कांग्रेस प्रवक्ता । श्री हनुमंत पवार पर हुऐ हमले के निषेध वर्धा कांग्रेस पार्टी है मैदान में
    user_Kranti Surya Jyothi news wardha
    Kranti Surya Jyothi news wardha
    Voice of people Wardha, Maharashtra•
    6 hrs ago
  • 'ಕುಸುಮ ಸಂಜೀವಿನಿ' ಹಿಮೋಫೀಲಿಯ ರೋಗಿಗಳಿಗೆ ರೋಗ ನಿರೋಧಕ ಚಿಕಿತ್ಸೆ
    1
    'ಕುಸುಮ ಸಂಜೀವಿನಿ' ಹಿಮೋಫೀಲಿಯ ರೋಗಿಗಳಿಗೆ ರೋಗ ನಿರೋಧಕ ಚಿಕಿತ್ಸೆ
    user_SSV TV NEWS
    SSV TV NEWS
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • विशेष प्रतिनिधी मुंबई/ चंद्रपूर: महाराष्ट्रात सावकार पाशामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः किडनी विकण्याची वेळ येत आहे, याहून मोठं दुर्दैव काय? ही केवळ बातमी नाही, तर महाराष्ट्राच्या अंतरात्म्याला हादरून टाकणारी घटना आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुडे या शेतकऱ्याने फक्त १ लाखांच्या कर्जासाठी तब्बल ७४ लाख रुपये सावकाराला दिले. ट्रॅक्टर गेला, शेती गेली,तरी कर्ज फिटेना. शेवटी कुटुंब वाचवण्यासाठी किडनी विकण्याचा निर्णय घ्यावा लागला. हे आपल्या व्यवस्थेचं अपयश आहे, असं माझं ठाम मत आहे. मी स्वतः पुढाकार घेऊन या शेतकऱ्याला परदेशातून मायदेशी परत आणले. पण प्रश्न आहे की अशा रॅकेट्सना संरक्षण कोण देत आहे? दिल्लीपासून दक्षिण भारतापर्यंत पसरलेल्या या किडनी रॅकेटमध्ये एका पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉक्टराचा सहभाग असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सरकार त्या डॉक्टरला अटक करण्याचे धाडस दाखवणार का?, असा प्रश्न आज विधिमंडळात उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि सहभागी सावकारांवर Maharashtra Control of Organised Crime Act (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई झालीच पाहिजे. संघटित गुन्हेगारीला साध्या कलमांनी नाही, तर कठोर कायद्यानेच उत्तर द्यावे लागेल. ज्यांच्या घरातील कर्ता पुरुष किडनी गमावून बसला, ते कुटुंब आज उघड्यावर आहे. त्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून किमान १० लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर झाली पाहिजे. शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. त्याला सावकारांच्या पाशात ढकलणाऱ्या व्यवस्थेविरोधात आमचा लढा आहे.
    1
    विशेष प्रतिनिधी
मुंबई/ चंद्रपूर: महाराष्ट्रात सावकार पाशामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः किडनी विकण्याची वेळ येत आहे, याहून मोठं दुर्दैव काय? ही केवळ बातमी नाही, तर महाराष्ट्राच्या अंतरात्म्याला हादरून टाकणारी घटना आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुडे या शेतकऱ्याने फक्त १ लाखांच्या कर्जासाठी तब्बल ७४ लाख रुपये सावकाराला दिले. ट्रॅक्टर गेला, शेती गेली,तरी कर्ज फिटेना. शेवटी कुटुंब वाचवण्यासाठी किडनी विकण्याचा निर्णय घ्यावा लागला. हे आपल्या व्यवस्थेचं अपयश आहे, असं माझं ठाम मत आहे.
मी स्वतः पुढाकार घेऊन या शेतकऱ्याला परदेशातून मायदेशी परत आणले. पण प्रश्न आहे की अशा रॅकेट्सना संरक्षण कोण देत आहे? दिल्लीपासून दक्षिण भारतापर्यंत पसरलेल्या या किडनी रॅकेटमध्ये एका पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉक्टराचा सहभाग असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सरकार त्या डॉक्टरला अटक करण्याचे धाडस दाखवणार का?, असा प्रश्न आज विधिमंडळात उपस्थित केला.
या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि सहभागी सावकारांवर Maharashtra Control of Organised Crime Act (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई झालीच पाहिजे. संघटित गुन्हेगारीला साध्या कलमांनी नाही, तर कठोर कायद्यानेच उत्तर द्यावे लागेल.
ज्यांच्या घरातील कर्ता पुरुष किडनी गमावून बसला, ते कुटुंब आज उघड्यावर आहे. त्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून किमान १० लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर झाली पाहिजे.
शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. त्याला सावकारांच्या पाशात ढकलणाऱ्या व्यवस्थेविरोधात आमचा लढा आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    45 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.